lp02मूळच्या औरंगाबादच्या असलेल्या नानासाहेब येवले यांच्या चित्राला अलीकडेच पार पडलेल्या ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’च्या वार्षिक प्रदर्शनात सवरेत्कृष्ट प्रवेशिकेचे सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले. त्यांनी ललित कलेतील पदवी, पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. युरोपमधील संग्रहालयांना भेट देण्यासाठी कॅम्लिनतर्फे देशभरातून निवडलेल्या दहा निवडक चित्रकारांमध्ये त्यांचा समावेश होता. अलीकडेच पार पडलेल्या पोर्ट्ेट आर्टिस्ट ग्रुपच्या वार्षिक स्पर्धेमध्ये त्यांना द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

lp05