17 February 2019

News Flash

कलाजाणीव

शिक्रा हा खरेतर उंच आभाळात विहार करणारा पक्षी. शिक्राची जोडी नजरेस पडणे हा तसा वेगळा योगच.

| January 30, 2015 12:59 pm

शिक्रा हा खरेतर उंच आभाळात विहार करणारा पक्षी. शिक्राची जोडी नजरेस पडणे हा तसा वेगळा योगच. आणि या प्रस्तुतच्या छायाचित्रात तर त्यांचे पूर्ण कुटुंबच दिसते आहे. हा योग तसा दुर्मिळच. परसदारातील lp06बागेत सागाच्या झाडावर सात वर्षांपासून शिक्राची मादी विणीच्या हंगामात येते, असे छायाचित्रकार भाग्यश्री पटवर्धन यांना लक्षात आले. गेल्या वर्षी त्या मादीने तीन पिल्लांना जन्म दिला. बागेत येणाऱ्या पक्ष्यांसाठी उन्हाळ्यात पाणी ठेवले जायचे. या वेळी शिक्राची तीनही पिल्लं आपल्या आईसोबत पाण्यावर आली आणि चार शिक्रांचा एक वेगळा एकत्रित फोटो त्यांना टिपता आला…
भाग्यश्री पटवर्धन

First Published on January 30, 2015 12:59 pm

Web Title: art 3
टॅग Art,Kalajaniva