lp02वर्षभराहून अधिक काळ रुळांवरून चालत जाताना एक वेगळीच ग्राफिटी योगेश बर्वेच्या लक्षात आली. रूळ समांतर आणि सरळ जातात. काही ठिकाणी बारीकशा वळणांनंतरही त्या समांतर जाण्यातून एक वेगळीच सरळ रेषा तयार होत जाते. खूप पुढे पाहिले तर कडक उन्हाळ्यात समोरच्या बाजूस रुळांवर एक मृगजळही दृष्टीस पडते. त्यातही त्या समांतर रेषा कधी धूसर होतात, कधी एकमेकांत मिसळतात. तरीही त्यातूनही ती एक सरळ जाणारी रेषा कायमच राहते. हेच सारे दृश्यात्मक भाषेत योगेशने मांडले आणि मग वसईतील रेल्वे कुंपणाची भिंतच कॅनव्हास झाली.