News Flash

गोष्ट- आय. सी. यू.

मृत्यू ही प्रत्येक माणसाच्या आयुष्यात घडणारी अपरिहार्य घटना. पण तिच्याकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन मात्र वेगळा..

| January 2, 2015 01:15 am

मृत्यू ही प्रत्येक माणसाच्या आयुष्यात घडणारी अपरिहार्य घटना. पण तिच्याकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन मात्र वेगळा.. जोशी आजींना जोशी आजोबांचा मृत्यू स्वीकारता आला आणि सारिकाला शशांकचा स्वीकारता येत नव्हता तो त्यामुळेच.

आय.सी.यू.च्या बाहेरच्या बाकावर जोशी आजी बसल्या होत्या. चार दिवसांपूर्वीच आजोबांना या  हॉस्पिटलमध्ये भरती केलेलं. गेल्या दोन वर्षांत सात-आठ वेळा वेगवेगळय़ा कारणांनी आजोबांना महागडय़ा हॉस्पिटलात भरती व्हायला लागलेलं. प्रत्येक वेळी लाख-दीड लाख रुपये खर्च झालेले, पण मुलांनी कधीच तक्रार केली नाही. उलट आजोबांनी ‘‘किती खर्च आला?’’ असं विचारलं तर मुलं वैतागून म्हणणार, ‘‘ते तुम्हाला काय करायचंय?’’ मग आजोबाच गमतीनं म्हणणार, ‘‘दर वेळी आमची लाखाची पिकनिक होते. म्हातारा-म्हातारीला फाइव्ह स्टार हॉटेलसारखी मजा.’’
आजींना चार दिवसांपूर्वीची आठवण झाली. पहाटेच आजोबा जागे झाले. आजींचा हात हातात घेतला आणि आठवणी काढत बसले. सात-साडेसातला चहा घेऊन चक्क दोघं मिळून जाऊन आले. मग आजोबा पलंगावर आडवे झाले. जरा वेळाने आंघोळ-देवपूजा आटोपून आजी खोलीत परतल्या तर आजोबांच्या घशातून आवाज येत होता. उजवी बाजू लुळी पडलेली. मुलगा-सून धावत आले. फॅमिली डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करायला सांगितलं.
पुन्हा सगळं तेच. आय.सी.यू. चा  तोच परिचित वास. तेच हिरवा मास्क लावलेले चेहरे. तीच उपकरणं. फक्त आजार तेवढा बदललेला. या वेळी पॅरॅलिसिस- पक्षाघात. नेहमीप्रमाणे मुलांनी डॉक्टरांना सांगितलं, ‘वाट्टेल ते करून बाबांना वाचवायचंच. पैसा हा मुद्दाच नाही.’ डॉक्टर आत गेले. सगळे बाहेर चिंतेत. जरा वेळानं डॉक्टर बाहेर आले. ‘‘उपचार लगेच चालू केले आहेत. काळजी करू नका. सीरियस तर आहेच, पण अगदी अॅडव्हान्सड् औषधं आणि इंजेक्शन्स् चालू केली आहेत.’’
गेल्या चार दिवसांत आजोबा एकदाही शुद्धीवर आले नव्हते. एम.आर.आय. चा रिपोर्ट सांगत होता की, मेंदूच्या डाव्या भागात बरंच डॅमेज झालेय. औषधांचा मारा चालू होता. आजी विचार करत होत्या, ‘‘किती दिवस चालायचं हे असं? डॉक्टर कधी म्हणतात, ‘कालच्यापेक्षा किंचित बरं आहे.’ तर कधी सांगतात, ‘कालच्यापेक्षा किंचित खराब आहे.’ पण यांनी मात्र एकदाही डोळे उघडले नाहीत. वाटतं सरळ डॉक्टरांना विचारावं, ‘‘या आजारातून हे बरे होऊन परततील ना? महिन्या-दोन महिन्यानंतर तरी चालायला-बोलायला लागतील ना? पण धीरच होत नाही.’’
एवढय़ात स्वागत कक्षातील फोन वाजला. फोन ठेवल्याबरोबर नर्स, वॉर्डबॉय यांची एकच धावपळ उडाली. बाहेरचं गेट अॅम्ब्युलन्ससाठी उघडलं गेलं. स्ट्रेचर, ऑक्सिजन सिलेंडर यांची जुळवाजुळव. या सगळय़ावरून आजींना कल्पना आलीच, कुठलीशी सीरियस केस येतेय. पाहता पाहता सायरन वाजवत अॅम्ब्युलन्स आली. स्ट्रेचरवर एक अपघात झालेला तरुण आणि सोबतीला आलेल्या गाडय़ांमधून त्याचे मित्र, नातेवाईक वगैरे. हॉस्पिटलमधलं वातावरण गंभीर बनून गेलं. नातेवाईकांमधली एक तरुण मुलगी अगदी धाय मोकलून रडत होती, तर साधारणत: त्या तरुणाच्या आईच्या वयाची स्त्री अगदी खंबीरपणे सर्व सोपस्कार पार पाडत होती. नातलगांच्या गलक्यावरून आजींना समजलं की ज्या तरुणाचा अपघात झाला तो शशांक. रडणारी मुलगी त्याची नियोजित वधू सारिका. सगळे आज लग्नाच्या खरेदीसाठी एकत्र आलेले. शशांक ऑफिसमधून परस्पर आपल्या दोन मित्रांसोबत येणार होता. सिग्नलवर असताना भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने त्याला उडविलं.
डॉक्टर शशांकच्या आईला सांगत होते. शशांकच्या पाठीचा कणा पूर्णपणे मोडलाय. शिवाय मेंदूलाही गंभीर दुखापत झालीय. रोहिणी मॅडम वैद्यकीय क्षेत्र तुम्हाला नवीन नाही. शशांकवर कराव्या लागणाऱ्या उपचारांमधल्या मर्यादा तुम्ही समजू शकता. अध्र्या तासाच्या आत उपचार सुरू करावेत की नाही हे ठरवून मला कळवा,’ असं म्हणून डॉक्टर आपल्या केबिनकडे निघून गेले. सारिका आणि जमलेले सर्व नातलग रोहिणीभोवती गोळा झाले. रोहिणीने प्रश्न केला, ‘‘सारिका काय करायचं?’’
क्षणाचाही विलंब न करता ती उत्तरली, ‘‘आई तुम्ही स्वत: या क्षेत्रातल्या आहात. तुमच्या वैद्यकीय शिक्षणामध्ये सर्व प्रयत्न करून मृत्यूवर विजय मिळविणं किंवा त्याला टाळणं हे प्राथमिक ध्येय असल्याचं शिकविलं जातं ना? मग उपचार सुरू करावेत किंवा नाही यावर विचार करण्याचा प्रश्नच येत नाही.’’
‘‘शशांकचा पाठीचा कणा पूर्णपणे मोडलाय याचाच अर्थ तो पुन्हा काधीही त्याचा आवडता फुटबॉल तर खेळू शकणार नाहीच, पण चालणं, उभं राहणंही कठीणच. एरवी तो आयुष्यभर अगदी बिछान्यावर राहिला तरी चालेल, पण त्याच्या मेंदूलाही गंभीर दुखापत झालीय.’’
रोहिणीचं बोलणं मध्येच तोडत सारिका म्हणाली, ‘‘आई, बाकी चर्चा आपण नंतर करू. आधी शशांकवरचे उपचार तातडीने सुरू करू या. तो पूर्णपणे बरा होण्याची शक्यता अगदी एक टक्का असली तरीही.’’
लगेच शशांकला ओ.टी.मध्ये हलविण्यात आले. मोडलेली हाडे सांधण्यासाठी शशांकवर पाच वेगवेगळय़ा शस्त्रक्रिया करण्यात आल्या. पण मेंदूवर अजूनपर्यंत एकही शस्त्रक्रिया झाली नव्हती. कालपासून त्याला श्वसनाचा त्रास सुरू झाल्यामुळे व्हेंटिलेटर लावून कृत्रिम श्वास सुरू केला होता. आय.सी.यू.बाहेर जोशी आजींच्या शेजारी शशांकची आई रोहिणी बसली होती. आजी तिला घरी जाऊन आराम कर म्हणाल्या, तेव्हा अगदी विषण्णपणे ती बोलली, ‘‘आजी, मी घरी नेमकं का आणि कुणासाठी जायचं? खरं म्हणजे मी इथेसुद्धा का बसून आहे? कशाची वाट पाहतेय?’’
‘‘असं का म्हणतेस बेटा. शशांकवर नक्की बरा होईल बघ आणि तूच असा धीर सोडलास तर या पोरीनं कुणाकडे बघायचं?’
‘‘आजी, शशांकच्या बाबांचा कॅन्सरने झालेला अकाली मृत्यू मी स्वत: त्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर असूनही टाळू शकले नाही. माझ्या व्यवसायात असे अनेक मृत्यू मी प्रत्यक्ष पाहिले आहेत. मृत्यू ही प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत अटळ आणि अप्रिय घटना आहे. या मृत्यूच्या येण्याचा मार्ग आणि वेळ मात्र अज्ञात असते. शशांकला इथे आणलं तेव्हाच डॉक्टर या नात्यानं त्याच्या मृत्यूची अटळता मला प्रकर्षांनं जाणवली. म्हणूनच शशांकवर उपचार सुरू करायचे की नाहीत याचा निर्णय मी सारिकावर ढकलला. पण गेले चार दिवस इथे बसून मी नेमकं काय करतेय तेच मला कळत नाहीय. इथे बसून जे अटळ आहे. त्याची मी नकळतपणे वाट पाहातेय, असंच वाटतंय मला सारखं.’’
50‘‘पण आई, डॉक्टर म्हणालेत ना प्रयत्न चाललेत म्हणून. शशांक बरा होईलही. मग असं निराश होण्याचं कारण काय?’’ सारिका भाबडेपणानं म्हणाली. कालच सारिकाच्या वडिलांनी ‘शशांकला पूर्वस्थितीत यायला किती दिवस लागतील?’ असं विचारलं तेव्हाच डॉक्टर म्हणाले होते, ‘‘आधी सव्र्हायव्हलचं बघू, मग रिकव्हरीचा विचार.’’
डॉक्टर राऊंडवर आले तेव्हा सारिकानं समोर होऊन त्यांना विचारलंच, ‘‘डॉक्टर, शशांकच्या तब्येतीत सुधारणा तर काहीच दिसत नाही. तो बरा होईल ना? मला खरं काय ते सांगा.’’
‘‘सांगण तसं कठीणच. खरं सांगायचं तर तो या दुखण्यातून वाचेल असंही खात्रीनं सांगता येत नाही. शक्यता कमीच आहे. त्यातूनही वाचला तर घरी कायमस्वरूपी नर्स लागेल.’’
पुढच्या दोन दिवसांत सर्वानुमते असं ठरलं की, शशांकवर चालू असलेले सर्व उपचार थांबवावेत! सारिकाचं मात्र म्हणणं होतं, ‘‘आपण देवाच्या कामात निष्कारण लुडबुड करतोय, असं करण्याचा आपल्याला काय अधिकार?’’ शेवटी डॉक्टरांनीच तिला समजावलं, ‘‘शशांक यापुढे नॉर्मल आयुष्य तर जगू शकणार नाहीच, पण फार काळ जिवंतही राहणार नाही, असं माहिती असूनसुद्धा केवळ कृत्रिम उपाय योजून त्याला खोटं खोटं जगवत ठेवून आपण देवाच्या योजनेत अडथळा तर आणत नाहीय ना?’’
आजोबांच्या बाबतीतही जवळपास असंच होतं. आजोबांच्या वाचण्याची शक्यता कमीच आणि ते वाचले तरी सर्वसामान्य आयुष्य जगणं मात्र अशक्य आहे, हे आजींना कळून चुकलं होतं. म्हणूनच आज आजोबांजवळ आपल्या भाच्याला ठेवून आजी घरी दोन्ही मुलं, सुना यांच्यासोबत चर्चा करत होत्या. ‘‘मला वाटतं आपण यांच्यावरचे चालू असणारे सर्व उपचार थांबवावेत.’’ आजींनं थेट मुद्दय़ालाच हात घातला.
सर्व जण थक्क होऊन बघत राहिले. आजी बोलत होत्या, ‘‘तुमचे बाबा म्हणजे एक चालतंबोलतं व्यक्तिमत्त्व. त्यांना असं विकलांग होऊन, मूकपणे पलंगावर पडून आयुष्य काढताना बघण्याची कल्पनाच मला करवत नाही. आपल्याला बोलता येत नाही या असहायपणे त्यांच्या डोळय़ांतून पाणी गळतंय हे मी कधीच पाहू शकणार नाही. मला कळतंय, ते आपल्या सगळय़ांना हवेच आहेत, पण असा त्यांचा बळी देऊन नाही.’’
‘‘आई, पण ते पुन्हा चालू-बोलू शकणार नाहीत असं कुणी सांगितलं तुला? आपण उद्या डॉक्टरांशी पुन्हा या विषयावर बोलू हवं तर.’’ मोठा मुलगा म्हणाला.
‘‘त्या दिवशी डॉक्टरांनी तुला सांगितलं ना त्यांचं वाचणं दुरापास्त आहे, मग पुन्हा पहिल्यासारखं होणं तर जवळजवळ अशक्यच! तेव्हा मी तुझ्या मागेच उभे होते.’’
‘‘अगं, पण आपण शक्य ते सगळं करतोच आहोत ना?’’
‘‘तेच वाचणार नसतील तर किती पैसा खर्च करणार तुम्ही?’’
‘‘आम्ही कधी तक्रार केलीय का? आम्ही समर्थ आहोत आणि हे सामथ्र्य तुम्हीच आम्हाला दिलंय.’’ धाकटाही या वादात सहभागी झाला.
‘‘तुम्ही आमच्यासाठी अजून लाखो रुपये खर्च कराल यात मला शंकाही नाही. पण त्याचा उपयोग होणार आहे का? याचा विचार करा.’’
‘‘बाबांसाठी पैसे खर्च करण्याची क्षमता असूनही आम्ही पैशाचा विचार केला ही अपराधीपणाची भावना आम्हाला सतत टोचणी देईल,’’ मोठय़ाने पुन्हा उपचार थांबविण्याला विरोध केला, पण आजीचं आपलं एकच, ‘‘किती दिवस त्यांच्या जिवाचा असा छळ करायचा? हे बघा, आम्ही अगदी पूर्ण समाधानी आयुष्य जगलो. आमची कोणतीही इच्छा अपुरी नाही. आयुष्याचा मोह कधीच सुटत नसतो, पण त्यांच्या शरीराचे हाल मला नकोत. राजामाणसासारखं जगले ते. आपलं आयुष्य, राहणीमान त्याचा एक दर्जा त्यांनी जपला होता. मग त्यांच्या मृत्यूलासुद्धा तसाच दर्जा देत त्यांना शांततेने मरण येण्याच्या प्रक्रियेत आपण सहभागी व्हायला नको?’’
दोन्ही भाऊ विचार करू लागले, असा निर्णय घ्यावा का? हाच निर्णयाचा क्षण तर नाही? पण निर्णय घेणारे आपण कोण? वैद्यकशास्त्र इतकं पुढे गेलं आहे की आजचं मरण ते उद्यावर ढकलतं. मरण टाळणं तर अशक्य आहे, पण दिसत असलेलं मरणदेखील तांत्रिकदृष्टय़ा काही दिवस टाळणं शक्य आहे.
हॉस्पिटलमध्ये एकाच दिवशी जोशी आजोबा आणि शशांकच्या नातेवाईकांनी आपापल्या पेशंटवर चालू असणारे उपचार थांबवावेत, अशी विनंती डॉक्टरांना केली. त्याच वेळी आजींनी डॉक्टरांना एक पत्र दिलं. पत्रात लिहिलं होतं.
आदरणीय डॉक्टर,
वैद्यकीय सुविधा वाढल्यामुळे आज अनेक रुग्ण पूर्वीपेक्षा जास्त दुर्धर आजारातून वाचू शकतात. रिकव्हरीचे चान्सेस शून्य असतानासुद्धा केवळ व्हेंटिलेटर लावून रुग्णांना खोटं खोटं जिवंत ठेवता येतं, हा अनुभव मी नुकताच माझ्या यजमानांच्या वेळी घेतला. कायदा नसल्यामुळे डॉक्टर स्वत: चालू असणारे औषधोपचार थांबवू शकत नाहीत, तर पेशंटचे नातेवाईक या काळात इतक्या नाजूक मन:स्थितीत असतात की, औषधोपचार थांबवावेत, हा निर्णय घेणं त्यांना कठीण जातं. या उपचारांना भरमसाट खर्च येत असूनही आपल्या माणसाच्या जिवापुढे आपण पैशाचा विचार करतोय याची त्यांना लाज वाटते.
मी अगदी विचारपूर्वक एक निर्णय घेतलेला आहे. मृत्यू कितीही अप्रिय असला तरी आपला मृत्यू दर्जेदार असावा, अशीच माझी इच्छा आहे. त्यामुळे यांच्या माघारी मला कुठलाही आजार उद्भवला आणि त्यातून बरं होण्याची शक्यता नसेल तर माझ्यावरील वैद्यकीय उपचार सर्व जीवनावश्यक उपचारांसहित थांबविण्यात यावेत आणि मला एक शांत मृत्यू द्यावा. माझा हा विचार चुकीचा असू शकतो, पण असा निर्णय घेण्याची वेळ आल्यास माझ्या मुलांच्या मनात तणाव किंवा अपराधीपणाची भावना येऊ नये असाच यामागचा माझा उद्देश आहे.

– जोशी आजी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2015 1:15 am

Web Title: article explaining views about death
टॅग : Death
Next Stories
1 कहाणी चिमणा चिमणीची..
2 ब्लॉगर्स कट्टा -माझे पक्षी मित्र!
3 रुचकर -ग्रीन सूप
Just Now!
X