05 June 2020

News Flash

दि. २६ जून ते २ जुलै २०१५

मेष तुमचे करिअर आणि घर या दोन्ही आघाडय़ांवर बऱ्याच घडामोडी घडत असल्यामुळे तुम्हाला आता सतर्क राहावे लागेल. व्यवसाय-उद्योगात भविष्यातील अडथळ्यांचा जास्त विचार न करता उलाढाल

| June 26, 2015 01:03 am

01vijayमेष तुमचे करिअर आणि घर या दोन्ही आघाडय़ांवर बऱ्याच घडामोडी घडत असल्यामुळे तुम्हाला आता सतर्क राहावे लागेल. व्यवसाय-उद्योगात भविष्यातील अडथळ्यांचा जास्त विचार न करता उलाढाल आणि फायद्याचे प्रमाण वाढविण्याकरिता नवीन योजनेचा प्रारंभ कराल. त्यानिमित्ताने वेगळ्या व्यक्तींचा सहवास लाभेल. नोकरीमध्ये फिरतीचे काम आणि टेबलवर्क अशी दोन्ही कामे करायला लागल्यामुळे तुमच्या पायाला िभगरी लागेल. घरामध्ये माझे तेच खरे, असा तुमचा आग्रह राहील.

वृषभ सभोवतालच्या व्यक्ती तुमच्या शब्दाला नुसताच मान देत नाहीत तर तुम्हाला खूशही करण्याचा प्रयत्न करतील. व्यापार-उद्योगात जेवढे जास्त काम तेवढी जास्त कमाई असे समीकरण असल्यामुळे कितीही कष्ट पडले तरी त्याची तुम्ही तक्रार करणार नाही. नोकरीमध्ये अशा कामावर तुमची नेमणूक होईल की, ज्यामधून तुम्हाला आíथक फायद्याबरोबरच इतर सवलतीही मिळू शकतील. काहींना थोडय़ा अवधीकरिता परदेशात जाता येईल. घरामधला माहोल आनंदी व उत्साही असेल. घराची डागडुजी आणि सजावट होईल.

मिथुन हाती घ्याल ते तडीस न्याल असा एकंदरीत तुमचा बाणा असेल. ज्या कामात पूर्वी अडथळे आले होते ते काम आता तुम्ही केवळ जिद्दीच्या जोरावर पूर्ण करून दाखवाल. व्यापार- विस्ताराचे नवीन प्रस्ताव तुमच्यापुढे असतील. पूर्वी केलेल्या कामातून वसुली होईल. नोकरीमध्ये चांगले काम केल्याचा आनंद घ्याल. काहींना परदेशी जाण्याची संधी मिळेल. जादा सवलतींकरिता तुमची निवड होईल. घरामधल्या एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने खरेदीची हौस भागवून घ्याल. नवीन जागेकरिता गुंतवणूक होईल.

कर्क जी गोष्ट तुमच्या मनामध्ये असते ती पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला चन पडणार नाही. पण एखादे वेगळे काम असेल तर त्यात लक्ष घालाल. तुमच्या व्यवसायाशी निगडित एखादी मीटिंग किंवा कॉन्फरन्स असेल तर त्यामध्ये सहभागी व्हाल. नोकरीमध्ये प्रत्यक्ष कामापेक्षा संस्थेमध्ये घडणाऱ्या इतर घडामोडींकडे लक्ष असेल. नवीन नोकरीच्या कामात तांत्रिक कारणामुळे विलंब होण्याची शक्यता आहे. घरामध्ये इतरांमुळे लांबलेले कार्य निश्चित झाल्यामुळे घाईने उरकले जाईल. घराची सजावट किंवा डागडुजी करणे भाग पडेल.

सिंह सध्याचे ग्रहमान थोडेसे खर्च वाढविणारे असले तरी त्यातून काही तरी चांगलेच निष्पन्न होईल या हेतूने तुम्ही सक्रिय राहाल. व्यवसाय-उद्योगात पशाचा ओघ विविध मार्गानी चालू असेल. दीर्घकाळापासून एखादे येणे लांबत आले असेल तर ते मिळण्याची शक्यता निर्माण होईल. नोकरीमध्ये पगारवाढ किंवा इतर सवलतींमध्ये वाढ होण्याच्या दृष्टीने बदल करू इच्छिणाऱ्यांना चांगले ग्रहमान आहे. सध्याच्या नोकरीतही एखाद्या चांगल्या कामगिरीवर तुमची नेमणूक होईल. घरामध्ये एखाद्या मंगलकार्याची नांदी होईल.

कन्या जी गोष्ट तुम्ही मनात आणाल, ती सहजासहजी पूर्ण होत असल्यामुळे सहसा तुम्हाला अशक्य असे काहीच वाटणार नाही. व्यवसायात छोटी-मोठी कामे न करता एखादा मोठा हात मारावा असा तुमचा संकल्प असेल. ज्यांचा परदेशात व्यवहार आहे त्यांना तेथून चांगला प्रतिसाद मिळेल. नोकरीमध्ये संस्थेचे काम पूर्ण होण्यासाठी तुम्हाला आवश्यक त्या सर्व सुविधा मिळतील. घरामध्ये मंगलकार्य ठरेल किंवा पार पडेल. मौजमस्तीचा मूड येईल. त्या वेळी काळ, पशाचे भान राहणार नाही.

तूळ ज्या गोष्टींविषयी तुम्हाला बरेच आकर्षण होते ती प्रत्यक्षात उतरविण्याची संधी चालून आल्यामुळे तुम्ही आनंदी दिसाल. व्यापार-उद्योगात सध्या चालू असलेल्या कामाव्यतिरिक्त एखादी नवीन काम सुरू करण्याची तमन्ना तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही. नोकरदार व्यक्तींची संस्थेच्या महत्त्वाच्या कामासाठी निवड झाल्यामुळे त्यांना विशेष सवलती बहाल केल्या जातील. बेकार व्यक्तींना काम मिळेल. घरामध्ये काही कारणाने सुशोभीकरण, सजावट वगरे गोष्टी करायला मुहूर्त लाभेल.

वृश्चिक व्यक्तिगत कामात तुम्ही गतिमान दिसाल. पण व्यावसायिक कामात मात्र तुम्हाला तडजोड करावी लागेल. व्यापार-उद्योगात, पण पशाचे सोंग करता येत नाही, असा अनुभव देणारा आठवडा आहे. सरळ मार्ग सोडून तुम्हाला आडवळणाने जावे लागेल. तुमच्या गरजा भागविण्यासाठी तात्पुरते कर्ज घेण्याची वेळ येईल. नोकरीमध्ये बरीच कामे एकाच वेळी हाताळायची असल्यामुळे सहकाऱ्यांच्या दाढीला हात लावावा लागेल. घरामध्ये प्रिय व्यक्तीच्या प्रश्नात तुम्हाला जातीने लक्ष घातल्यामुळे त्यांना बरे वाटेल.

धनू प्रत्येक व्यक्तीला एक अंतस्फूर्ती असते आणि ती त्या व्यक्तीला मार्गदर्शन करते. याचा तुम्ही चांगला वापर केलात तर तुमचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या फायदा होईल. व्यवसाय-उद्योगात पेरल्याशिवाय उगवत नाही याची आठवण होईल. एखादे चांगले काम करण्याचे संकेत तुम्हाला मिळतील. नोकरदार व्यक्तींना संस्थेमध्ये मिळणाऱ्या माहितीमुळे नजीकच्या भविष्यात काही तरी चांगले घडेल अशी आशा वाटेल. काही जणांना नवीन नोकरीची संधी लाभेल. घरामध्ये एखादे मंगलकार्य ठरण्याची शक्यता आहे.

मकर ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करीत आहोत त्या क्षेत्रामध्ये आपल्याला वेगळे स्थान मिळण्याची तुमची इच्छा साकार करणारे सध्याचे ग्रहमान आहे. व्यापार-उद्योगात केलेले काम कधी वाया जात नाही, हे तुम्ही तुमच्या कृतीने सिद्ध करून दाखवाल. नोकरीमध्ये जे काम पूर्वी वाया गेले असे वाटत होते, त्याच कामाचा उपयोग झाल्यामुळे तुम्ही एखादी अवघड जबाबदारी शिवधनुष्य उचलल्याप्रमाणे सहजगत्या पार पाडाल. सांसारिक जीवनातील आनंददायी क्षण सर्व सदस्यांबरोबर साजरा करण्याचा आनंद अनुभवाल.

कुंभ कोणतेही नावीन्यपूर्ण काम तुम्ही उत्तम पद्धतीने करू शकता. मात्र व्यवहाराचा प्रश्न आला की तुमची गडबड होते. त्यामुळे तुम्हाला तोटा सहन करावा लागतो. व्यवसाय-उद्योगात नजीकच्या भाविष्यात एखादे वेगळे आणि चांगले काम करावे ही तुमची भावना प्रकर्षांने उचंबळून येईल. नोकरीमध्ये वरिष्ठ आणि सहकारी त्यांच्या मतलबाकरिता तुम्हाला हरभऱ्याच्या झाडावर बसवतील. घरामध्ये एखाद्या सदस्याच्या स्वास्थ्याकरिता किंवा प्रगतीकरिता अवघड मार्ग स्वीकारावा लागेल; तो खर्चीक असेल.

मीन ग्रहमान तुमच्यावर खूश असल्याने तुमची इच्छा पूर्ण होईल. तुमचा मूड आनंदी आणि उत्साही असेल. व्यापार-उद्योगात एखादी अनपेक्षित आणि चांगली संधी प्राप्त होईल. एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीकडून केलेल्या कामाचे कौतुक ऐकायला मिळेल. नोकरीमध्ये तुमच्या कामाचे महत्त्व असल्यामुळे संस्थेतर्फे तुमची बडदास्त ठेवली जाईल. नोकरीत बदल करायचा असेल तर ताबडतोब पावले उचला. घरामध्ये महत्त्वाची चांगली बातमी कळल्यामुळे पार्टीचा मूड असेल.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2015 1:03 am

Web Title: astrology 12
Next Stories
1 दि. १९ ते २५ जून २०१५
2 दि. ५ ते ११ जून २०१५
3 भविष्य- दि. २९ मे ते ४ जून २०१५
Just Now!
X