25 May 2020

News Flash

दि. ३ ते ९ जुलै २०१५

मेष - तुमच्या कृतिशीलतेला कल्पकतेची आणि बुद्धीची जोड मिळाल्यामुळे दुधात साखर पडल्यासारखे वाटे. जे काम हातात घ्याल त्याचा फडशा पाडाल. व्यापारउद्योगात जे काम चालू आहे.

| July 3, 2015 01:08 am

01vijayमेष तुमच्या कृतिशीलतेला कल्पकतेची आणि बुद्धीची जोड मिळाल्यामुळे दुधात साखर पडल्यासारखे वाटे. जे काम हातात घ्याल त्याचा फडशा पाडाल. व्यापारउद्योगात जे काम चालू आहे. त्यावर समाधान न मानता आपले वेगळेपण सिद्ध करण्याकरिता तुम्ही आता सुसज्ज असाल. पशाची आवक जरी साधारण असली तरी तुम्ही निर्माण केलेल्या सदिच्छेचा तुम्हाला उपयोग होईल. नोकरीच्या कामात काही चांगले फेरफार होण्याचे संकेत मिळतील. मात्र त्यासंबंधी गुप्तता राखा. घरामध्ये शुभकार्याची नांदी होईल.

वृषभ एखादे आवडीचे काम तुम्हाला मिळाल्यामुळे त्यामध्ये तुम्ही स्वत:चे कौशल्य पणाला लावाल. व्यापार उद्योगात चालू कामातून व्यवस्थित पसे मिळत राहिल्यामुळे आíथक स्तरावर चिंता राहणार नाही. तुमच्या मनोकामना पूर्ण करण्याची तुम्हाला प्रचंड घाई असेल. नोकरीमध्ये तुमच्याकडे एखादे खास कौशल्य असेल तर त्याला बराच वाव मिळेल. संस्थेकडून तुमची काळजी घेतली जाईल. या कारणाने तुमची कॉलर ताठ असेल. घरामध्ये इतरांनी तुमच्या इच्छा-आकांक्षा जपल्यामुळे तुम्ही खूश असाल.

मिथुन इच्छा आहे तिथे मार्ग आहे हे कृतीतून इतरांना दाखवून द्याल. तुमच्या क्षेत्रातील व्यापारउद्योगातील तीव्र स्पर्धेला तुम्ही शह द्यायचे ठरवाल. त्यासाठी वेगवेगळया योजना तयार कराल. भांडवलाची सोय झाल्यामुळे छोटे व्यावसायिक आणि दुकानदार यांचा काम करण्याचा उत्साह वाढेल. नोकरीमध्ये तुमच्या कल्पना वरिष्ठांना पसंत पडतील. त्याची अंमलबजावणी करण्याचे त्यांच्याकडून आश्वासन मिळेल. घरामध्ये तुमच्या विचारांना महत्त्व आल्यामुळे तुमची बडदास्त ठेवली जाईल.

कर्क नेहमीच्या उत्साही स्वभावानुसार प्रत्येक कामात पुढाकार घ्याल. पण नंतर असे लक्षात येईल की त्याचा फायदा इतरांनाच जास्त मिळणार आहे. व्यापारउद्योगात एकंदरीत कामकाज चांगले असले तरी जे पसे हातात पडतील त्याच्या खर्चाची तरतूद आधीच झालेली असेल. प्रत्यक्ष शिल्लक रक्कम कमी राहील. नोकरीमध्ये तुम्ही बरेच काम कराल. एखादी नवीन संधी तुमचे लक्ष केंद्रित करेल. घरामध्ये काही अत्यावश्यक कारणाकरिता पशाची तरतूद करावी लागेल. अचानक पाहुणे येण्याची शक्यता आहे.

सिंह तुमच्या जीवनात नवीन, सौख्यकारक पर्वाची सुरुवात होते आहे. सुरुवातीला तुम्हाला वाट बिकट वाटली तरी नंतर सर्व काही तुमच्या दृष्टीने फायद्याचे ठरेल. व्यवसाय उद्योगात लक्ष एखाद्या मोठय़ा कामावर केंद्रित कराल. त्यातून तुम्हाला बराच फायदा मिळेल. प्रतिस्पध्र्याकडे मात्र लक्ष ठेवा. नोकरीमध्ये ज्या कामाकरिता तुम्ही बरेच दिवस थांबून राहिला होता ते काम मिळण्याची शक्यता निर्माण होईल. इतर सुविधांकरिता तुमची निवड होईल. सांसारिक जीवनात आनंददायी पर्वाची सुरुवात होईल.

कन्या तुमच्या दृष्टीने महत्त्वाची असतील ती कामे तातडीने पूर्ण करा. व्यापारउद्योगात एखादी मोठी गुंतवणूक करण्याचा मोह अनिवार्य होईल. तुमच्या दृष्टीने महागडी आणि बजेटबाहेर जाणारी गोष्ट करण्याचा नाईलाज होईल. नवीन व्यक्तींशी कोणतेही व्यवहार करण्यापूर्वी नीट माहिती काढा. नोकरीमध्ये ठरविलेल्या कामामध्ये वरिष्ठांनी अचानक बदल केल्यामुळे तुमचा गोंधळ उडेल. अशा वेळेला शांतचित्ताने काम करा. घरामध्ये इतर सदस्यांना खूश ठेवण्यासाठी मोठय़ा खर्चाची गरज पडेल. शिलकेतल्या पशाला हात लावावा लागेल. तूळ भविष्यातील प्रगतीकरिता आता तुम्ही सिद्ध झालेले असाल. व्यवसाय उद्योगात कितीही अडथळे आले तरी उद्दिष्ट गाठण्याचा तुमचा निश्चय असेल. छोटय़ा व्यावसायिकांना नवीन संधी उपलब्ध होईल. नोकरीमधल्या कामामध्ये तुमच्या बुद्धीला खाद्य मिळाल्यामुळे जरी कष्ट असले तरी त्याविषयी तुमची तक्रार नसेल. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मनासारखी संधी उत्तेजित करेल. घरामध्ये इतरांचा मूड कसाही असो, पण तुम्ही मात्र प्रत्येक बाबतीत आशावादी दिसाल. तुमचा सल्ला इतरांना उपयोगी पडेल.

वृश्चिक कोणत्याही संकटापुढे मान न झुकवता तुम्ही हिमतीने त्यावर तोडगा शोधून काढता. या जिद्दी स्वभावाचा तुम्हाला उपयोग होईल. आíथक स्थिती जेमतेम गरजा भागविण्या इतपत चांगली असेल. नोकरीमध्ये एखाद्या ठिकाणी काम तुम्हाला सांगून वरिष्ठ तुमच्या सहनशीलतेची परीक्षा पाहतील. पण याच कामाचा तुम्हाला नजीकच्या भविष्यात उपयोग होईल. घरामध्ये एखाद्या प्रश्नावर गरमागरम चर्चा होईल. सध्या कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न करता एक-दोन आठवडे शांत राहा.

धनू एखादी गोष्ट अवघड असते तेव्हा तिचा नाद न सोडता तुम्ही तिच्या मागे हात धुऊन मागे लागता. व्यापारात शक्ती आणि युक्तीचा वापर करून तुम्ही हातात घेतलेले काम पूर्ण करण्याच्या मन:स्थितीत असाल. त्यात मदत करण्याचे आश्वासन हितचिंतक देतील. नोकरीमध्ये चालू कामाचा कंटाळा आल्यामुळे त्यामध्ये तुम्ही फारसे लक्ष घालणार नाही. पण एखादे नवीन काम असेल तर ते काम चांगल्या पद्धतीने कराल. घरामध्ये एखाद्या प्रश्नावर बरीच चर्चा होईल. पण त्यावर तोडगा न निघाल्याने एखादा आठवडा थांबायचे ठरवाल.

मकर ज्या कामात तुमचे खऱ्या अर्थाने नपुण्य आहे असे काम तुमच्या वाटय़ाला येण्याची शक्यता आहे. त्यानिमित्त वेगवेगळ्या व्यक्ती आणि कार्यपद्धतींशी तुमचा परिचय होईल. तुमच्या दृष्टीने हे एक नवीन आव्हान असेल. व्यवसाय-उद्योगात भरपूर काम असेल. नोकरदार व्यक्तींची वरिष्ठांच्या अपेक्षा पूर्ण करता करता त्रेधा-तिरपीट उडेल. घरामध्ये प्रत्येक आघाडीवर इतर सदस्यांच्या तुमच्याकडून काही अपेक्षा असतील. त्याला पुरे पडण्यासाठी तुम्हाला सक्रिय व्हावे लागेल.

कुंभ ग्रहमान परस्परविरोधी असल्यामुळे तुमच्यातील वेगवेगळे कंगोरे पुढे येतील. कामाच्या वेळी तुम्ही खूप काटेकोर असाल आणि इतर वेळी जीवनाचा आस्वाद घ्याल. व्यापारउद्योगात कमाई वाढविण्यासाठी अभिनव तंत्राचा वापर कराल. व्यावसायिक लोकांना नेहमीपेक्षा वेगळे काम मिळण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये नेहमीच्या कामाचा आळस कराल. पण संस्थेत घडणाऱ्या इतर गोष्टीत जास्त लक्ष घालाल. घरामध्ये मोठय़ांचे विचार लहानांना पटणार नाहीत. प्रिय व्यक्तीविषयी काही चिंता असेल तर ती कमी होईल.

मीन प्रगतिपथावर नेणाऱ्या बदलाचे संकेत तुम्हाला कदाचित यापूर्वीच मिळाले असतील. व्यापार उद्योगात पशाची आवक आणि प्रगतीचा वेग मनाप्रमाणे असेल. पण तेवढय़ावर तुमचे समाधान नसल्याने नवीन प्रयोग करून बघावासा वाटेल. नोकरीमध्ये तुमचा भाव वधारल्यामुळे संस्थेच्या सुखसुविधांचा जास्तीत जास्त फायदा घ्याल. काम कमी, पसारा जास्त असेल. घरामधल्या महत्त्वाच्या कामांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पुर्वी बुकिंग केलेल्या जागेचा ताबा मिळेल.
विजय केळकर response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2015 1:08 am

Web Title: astrology 18
Next Stories
1 दि. २६ जून ते २ जुलै २०१५
2 दि. १९ ते २५ जून २०१५
3 दि. ५ ते ११ जून २०१५
Just Now!
X