09 March 2021

News Flash

दि. १४ ते २० ऑगस्ट २०१५

मेष : तुमची एखादी आंतरिक इच्छा पूर्ण न झाल्यामुळे तुम्ही नाराज असाल. व्यवसाय उद्योगात साधे आणि सोपे वाटणारे काम हातात घेतल्यानंतर त्यातील गुंतागुंत लक्षात येईल.

| August 14, 2015 01:04 am

01vijayमेष तुमची एखादी आंतरिक इच्छा पूर्ण न झाल्यामुळे तुम्ही नाराज असाल. व्यवसाय उद्योगात साधे आणि सोपे वाटणारे काम हातात घेतल्यानंतर त्यातील गुंतागुंत लक्षात येईल. त्यावर मार्ग शोधून काढण्यासाठी तुम्हाला कंबर कसून सिद्ध व्हावे लागेल. अनोळखी व्यक्तींशी पशाचे व्यवहार करताना बेसावध राहू नका. नोकरीमध्ये तुमचे कष्ट वाचविण्याकरिता एखादा शॉर्टकट शोधून काढाल. परंतु वरिष्ठांना तो पसंत न पडल्याने नेहमीची पद्धतच अवलंबावी लागेल. एखादी घरगुती जबाबदारी त्रासदायक वाटेल.

वृषभ ग्रहमान कोडय़ात टाकणारे आहे. घरामधील एखाद्या प्रश्नात काही तोडगा निघत असेल तर त्याला अचानक वेगळी कलाटणी मिळाल्याने तुमचे निर्णय तुम्हाला काही कालावधीकरता लांबवावे लागतील. नातेवाईक, आप्तेष्ट किंवा घरातील एखाद्या सदस्याच्या वागणुकीमुळे त्रास संभवतो. व्यवसाय-उद्योगात तुमच्या कल्पना चांगल्या असल्यामुळे स्पर्धक त्याची कॉपी करण्याचा प्रयत्न करतील. पण तुम्ही तुमच्या पद्धतीनेच काम करणे चांगले. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ बऱ्याच अपेक्षा ठेवतील.

मिथुन असे म्हणतात की, माणसापुढे जोपर्यंत एखादे स्वप्न नाही तोपर्यंत मोठे उद्दिष्ट गाठता येत नाही. एखादी मायाजाल निर्माण करणारी कल्पना तुमचे लक्ष आकर्षति करेल. मात्र त्याकरिता किती वेळ आणि पसे खर्च करायचे याचा सारासार विचार करा. व्यवसाय-उद्योगात तुमची भरपूर काम करण्याची तयारी असेल, पण पशाची गुंतवणूक सावधानतेने करा. नोकरीमध्ये आधी केले मग सांगितले असे धोरण ठेवा. सहकाऱ्यांशी जपून बोला. नातेवाईक आणि मित्र तुमचा फायदा उठवतील.

कर्क ग्रहमान चांगले नसले तरी गोंधळ असतो, आणि ते चांगले झाले तरी गोंधळ उडतो. कारण अनेक पर्याय आपल्यासमोर असतात. या आठवडय़ात याचा प्रत्यय तुम्हाला येईल. व्यवसाय-उद्योगात एखादी जगावेगळी कल्पना तुमच्या मनात घर करेल. त्यातून लगेच जरी चांगले उत्पन्न नसले तरी भविष्यकाळात मोठा फायदा होईल, याची तुम्हाला खात्री वाटेल. नोकरीमध्ये साधी आणि सरळ वाटणारी कामे इतरांवर सोपवून महत्त्वाची जबाबदारी तुमच्या खांद्यावर टाकतील.

सिंह ग्रहमान संमिश्र आहे. ‘खाईन तर तुपाशी’ ही तुमची वृत्ती विशेष रूपाने उफाळून येईल. सभोवतालच्या व्यक्ती तुम्हाला चांगला सल्ला देतील, पण तो पटणार नाही. व्यवसाय-उद्योगात एखाद्या स्वप्नमयी कल्पनेच्या मागे तुम्ही धावत राहाल. त्यानंतर नेहमीच्या कामाकडे थोडेफार दुर्लक्ष होईल. नोकरीमध्ये कामाच्या वेळी काम आणि इतर वेळेला थोडासा आराम करण्याकडे तुमचा कल राहील. वरिष्ठांच्या सूचनांकडे नीट लक्ष द्या आणि त्याप्रमाणे काम करा. घरामध्ये इतरांना तुम्ही शिस्तीचे आणि काटकसरीचे धडे द्याल.

कन्या ‘मानलं तर समाधान’ अशी तुमची सध्या स्थिती असेल. जी गोष्ट तुम्हाला हवी आहे, ती मिळवायला गेल्यानंतर ती लांब पळत आहे, असा अनुभव येईल. व्यवसाय-उद्योगात ज्यांनी तुम्हाला पसे द्यायचे कबूल केले होते, त्यांनी त्यांचा शब्द फिरवल्यामुळे तुमची धावपळ होईल. त्याच वेळी जुनी देणीही डोके वर काढतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ नेहमीपेक्षा वेगळे आणि जास्तीचे काम तुम्हाला करायला लावतील. घरामध्ये प्रत्येकजण आपापल्या नादात व्यग्र असल्यामुळे कोणाचाच कोणाला पायपोस राहणार नाही.

तूळ जी गोष्ट तुम्हाला पाहिजे असते त्याकरिता काहीही करण्याची तुमची तयारी असते. या आठवडय़ात हातामध्ये चार पसे खुळखुळल्याने तुमच्यातील रसिकता आणि चंचलता जागृत होईल. व्यापार-उद्योगात कामाचे प्रमाण वाढल्यामुळे उत्पन्नाचे प्रमाणही वाढेल. नोकरी-मध्ये विशिष्ट कामगिरीकरिता तुम्हाला जादा भत्ते मिळतील. तुम्ही त्याचा थोडासा गरफायदा उठवाल. अधिकारांचा वापर न्याय्य कारणाकरिता करा. घरामध्ये सर्वानी तुमच्या मतानुसार वागावे म्हणून तुम्ही प्रयत्नशील राहाल. मुलांचे लाड पुरवाल.

वृश्चिक जशी परिस्थिती असते त्याप्रमाणे तुम्ही तुमचा पवित्रा बदलता आणि स्वत:च्या यशाची खात्री करून घेता. या सप्ताहात तुमच्या या धोरणाची सत्यता सभोवतालच्या व्यक्तींना दिसून येईल. व्यापार-उद्योगाच्या क्षेत्रात खूप चांगले काम करून आपली वेगळी प्रतिमा निर्माण करावी असे तुम्हाला वाटेल. ज्यांचा परदेशात व्यवहार आहे त्यांना तेथून सकारात्मक उत्तर मिळेल. नोकरीमध्ये तुमच्यावर झालेल्या अन्यायाची वरिष्ठ दखल घेतील. घरामध्ये कोणतेही निर्णय घेताना तुमच्या गरजांना महत्त्व आल्यामुळे तुमचा अहम् दुखावला जाईल.

धनू तुमचे खर्च हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. पण कार्य चांगले असल्यामुळे तुम्हाला वाईट वाटणार नाही. बेधडक वागण्याच्या तुमच्या स्वभावाला ग्रहांची चांगली साथ असल्यामुळे तुम्ही आता थोडेसे बिनधास्त होणार आहात. व्यापार-उद्योगात नवीन गिऱ्हाईकांशी संबंध वाढविताना त्यांची विश्वासार्हता पडताळून पहा. नोकरीमध्ये तुमच्या पद्धतीने काम करण्याचे स्वातंत्र्य मिळाल्याने तुम्ही अधिक उत्साहाने आणि कल्पकतेने काम करू शकाल. जोडीदाराशी. किरकोळ खटके उडतील.

मकर परिस्थिती जेव्हा फारशी अनुकूल नसते तेव्हा तुम्ही लव्हाळाप्रमाणे वाकून राहता आणि ती सुधारल्यानंतर पुन्हा एकदा नव्याने उभे राहता. व्यापार-उद्योगात काही अनपेक्षित खर्च समोर दिसत असल्यामुळे तुम्हाला तुमचे पूर्वी ठरविलेले धोरण बदलणे भाग पडेल. नोकरीच्या ठिकाणी जे काम तुम्हाला फारसे पसंत नाही त्या कामाला वरिष्ठ प्राधान्य देतील. घरामध्ये प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने वेगवेगळे कार्यक्रम ठरवतील. पण त्यामध्ये तुम्हाला कारण नसताना गृहीत धरतील. त्याचा राग येईल.

कुंभ एखाद्या न समजलेल्या कामाला गती देण्यासाठी तुम्ही सक्रिय बनाल. व्यवसाय-उद्योगात नवीन काम मिळविण्याकरिता एखाद्या मध्यस्थाची गरज भासेल. पण त्याच्या कामाची पद्धत आणि अटी नीट समजून घ्या. नोकरीच्या ठिकाणी कामाचा थोडासा आळस आल्यामुळे पूर्वीच्याच कामाला मुलामा देऊन ते काम नवीन पद्धतीने केले आहे असे इतरांना दाखवाल. एकंदरीत काम कमी कामाचा पसारा जास्त असा प्रकार असला तरी तुम्ही मात्र समाधानी दिसाल. घरामध्ये जोडीदाराची थट्टामस्करी करावी लागेल.

मीन या आठवडय़ात ‘हाथी चले अपनी चाल..’ असे धोरण ठेवा. तुमचे काम जितक्या बिनधास्त पद्धतीने कराल तितके तुम्हाला चांगले यश मिळेल. व्यापार उद्योगात सभोवतालच्या व्यक्ती तुम्हाला काही नवीन कल्पना सुचवतील त्या पसंत पडतील, पण याची कार्यवाही करण्यापूर्वी त्यातून फायदा होणार आहे का याचा विचार करा. हातातले पसे राखून ठेवा. नोकरीमध्ये थोडेसे स्वार्थी बनाल. घरांमध्ये सगळ्यांचे एकाच वेळी समाधान करणे कठीण असते. याची तुम्हाला जाणीव होईल.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2015 1:04 am

Web Title: astrology 19
Next Stories
1 दि. ७ ते १३ ऑगस्ट २०१५
2 दि. ३१ जुलै ते ६ ऑगस्ट २०१५
3 दि. २४ ते ३० जुलै २०१५
Just Now!
X