सोनल चितळे

मेष

. कामांना खीळ बसेल. नोकरी-व्यवसायात नवे नियम अंगी बाणवावे लागतील. सहकारी वर्गाकडून मदतीचा हात मिळेल. जोडीदार आपली स्थिती समजून घेईल. परंतु त्याच्या समंजसपणाचा फायदा घेऊ नका. सबुरीने घ्यावे लागेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. खांदे तसेच खुब्याच्या सांध्यांची काळजी घ्यावी. वैद्यकीय सल्ल्याने हलका व्यायाम करावा.

वृषभ

चंद्र व शुक्र या दोन स्त्री ग्रहांच्या युती योगामुळे हाती घेतलेल्या कामाचे नियोजन उत्तम प्रकारे कराल. सर्व बाजूंचा साकल्याने विचार कराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांची बाजू ऐकून घ्याल. एखाद्या गोष्टीचा पूर्ण अभ्यास करून मग त्यावर आपला अहवाल सादर कराल. जोडीदाराच्या कामाला गती मिळेल. समाजोपयोगी कामात दोघे भाग घ्याल. कुटुंब सदस्यांची जातीने देखभाल कराल. एकाच वेळी अनेक कामांना न्याय देताना वैचारिक थकवा जाणवेल.

मिथुन

चंद्र-बुधाच्या युती योगामुळे व्यवहार व भावना या दोहोंना योग्य न्याय द्याल. समयसूचकतेमुळे धोका टळेल. नोकरी-व्यवसायात दळणवळण, व्यापार यात एक पाऊल पुढे टाकाल. वरिष्ठ आणि सहकारी वर्गाची साथ मिळेल. जोडीदाराच्या आरोग्याच्या तक्रारी डोकं वर काढतील. कुटुंबाची आर्थिक धुरा दोघे मिळून पेलाल. घरच्यांचे गरसमज दूर कराल. उत्सर्जन संस्थेच्या तक्रारी सतावतील. तळपायाची आग होईल. पथ्याप्रमाणे आहारात बदल करावेत.

कर्क

गुरू-चंद्राच्या समसप्तम योगामुळे चंद्राच्या शालीनतेला गुरूच्या सात्त्विकतेची जोड मिळेल. नोकरी-व्यवसायात गरजूंना मदत कराल. वरिष्ठांसह वाद टाळा. सहकारी वर्गाकडून उल्लेखनीय कामगिरी होईल. जोडीदाराचा ताणतणाव दूर करण्यासाठी त्याच्याशी मनमोकळ्या गप्पा माराल. कौटुंबिक वातावरण हलकेफुलके ठेवाल. नव्याने निर्णय घेताना सर्वाचे मत विचारात घ्याल. पचन आणि उत्सर्जन संस्थेच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.

सिंह

शनी-चंद्राच्या प्रतियोगामुळे हाती घेतलेले काम लक्षपूर्वक करावे. लक्ष विचलित झाल्यास चुका होऊ शकतात. सावधानता बाळगावी. नोकरी-व्यवसायात वरिष्ठ कामात खोट काढतील. सहकारी वर्गासह काम करताना धीराने घ्या. आपल्या विचारांचा वेग अधिक आहे हे ध्यानात असू द्या. जोडीदाराच्या जबाबदाऱ्या वाढतील. नव्या पद्धती, नवे नियम अंगवळणी पडायला वेळ लागेल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. कामाच्या व वैचारिक ताणामुळे पाठदुखीचा त्रास वाढेल.

कन्या

चंद्र-शुक्राच्या लाभ योगामुळे स्वत:मध्ये अपेक्षित बदल करण्याची तयारी ठेवाल. विचारांना सकारात्मक दिशा द्याल. नोकरी-व्यवसायात अडचणीतून मार्ग काढाल. वरिष्ठांच्या मताचा स्वीकार करावा लागेल. तरीदेखील अन्यायाविरुद्ध वाचा फोडाल. सहकारी वर्गाच्या सूचना उपयोगी पडतील. जोडीदाराचे काम गतिमान होईल. त्याच्या मनाजोगत्या गोष्टी घडतील. कुटुंबातील वाद फारसा वाढू देऊ नका. मानसिक तणावामुळे सतत सुरू असलेले विचारचक्र थांबवा.

तूळ

चंद्र-हर्षलच्या लाभ योगामुळे जनहितार्थ कार्यात सक्रिय सहभागी व्हाल. वैद्यकीय क्षेत्रात भरीव कार्य कराल. सहकारी वर्गाला योग्य आधार द्याल. जोडीदाराला त्याच्या कार्यक्षेत्रात नवी आव्हाने स्वीकारावी लागतील. कामाचा व्याप आणि ताण वाढेल. कौटुंबिक वातावरण आपल्या शिस्तीमुळे आटोक्यात राहील. शेजाऱ्यांना मदत कराल. पित्तविकार वाढतील. सांधेदुखी डोके वर काढेल. पथ्य पाळावे आणि योगासने नियमित करावीत.

वृश्चिक

चंद्र-मंगळाच्या नवपंचम योगामुळे नव्या मोहिमेवर आगेकूच कराल. सर्वाच्या हिताचा विचार कराल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळाला नाही तरी आपले काम सचोटीने कराल. सहकारी वर्ग अडचणीत सापडेल. मदतीचा हात द्यावा लागेल. जोडीदार त्याच्या कार्यात मेहनत घेईल. त्याला यश मिळेल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. घरात शांतता राखा. एकमेकांना समजून घ्यावे. आर्थिक समस्या सुटतील. अपचन आणि पोटाचे इतर विकार बळावतील. योग्य काळजी घ्यावी लागेल.

धनू

चंद्र-नेपच्यूनच्या नवपंचम योगामुळे कर्तव्यासह भावनांनाही महत्त्व द्याल. परंतु हळवेपणाला आवर घाला. आप्तजनांच्या काळजीमुळे डोक्यात अनेक विचार येतील. नोकरी-व्यवसायात काही कठोर निर्णय घेणे भाग पडेल. जोडीदार त्याच्या कामाच्या ओझ्याने थकून जाईल. कामाच्या ठिकाणी त्याने शब्द जपून वापरणे आवश्यक! कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींचे मन राखावे. घसा सांभाळा. युरिन इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे. वैद्यकीय सल्ला घ्यावा.

मकर

गुरू-मंगळाच्या लाभ योगामुळे धाडस, धर्य आणि औदार्य यांचा त्रिवेणी संगम होईल. आपल्या हिमतीची दाद मिळेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा विश्वास खरा ठरवाल. जोडीदार स्वत:च्या कार्यक्षेत्रात आपल्या पाठिंब्यावर मोठी कामगिरी पार पाडेल. कौटुंबिक वातावरण हलकेफुलके ठेवाल. न पटणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यातच कुटुंबाचे हित आहे. शीर आखडणे किंवा दबली जाणे या त्रासांमुळे हालचालींवर आळा बसेल.

कुंभ

चंद्र-नेपच्यूनच्या केंद्र योगामुळे अतिभावूक व्हाल. परंतु भावनांवर विचारांचा ताबा ठेवावा लागेल. नोकरी-व्यवसायात आर्थिक बाजू सावरून धराल. आपले हितकारक निर्णय सर्वजण मान्य करतील. सहकारी वर्गाकडून वेळेत कामे पूर्ण करून घ्याल. जोडीदाराच्या कार्यक्षेत्रात त्याच्या मनाविरुद्ध घटना घडतील. त्याची चिडचिड वाढेल. त्याला समजून घेणे आवश्यक. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. जखमेत पाणी वा पू होण्याची शक्यता आहे.

मीन

चंद्र-मंगळाच्या केंद्र योगामुळे वातावरणात उत्साह निर्माण कराल. मरगळ टाकून धडाडीने आगेकूच कराल. नोकरी-व्यवसायात इतरांनाही प्रोत्साहन द्याल. सहकारी वर्गाला मदत कराल. वरिष्ठांपुढे आपले म्हणणे निर्भीडपणे मांडाल. संस्थेच्या व काम करणाऱ्या गटाच्या हिताचा निर्णय घ्याल. सामोपचाराच्या मार्गाने पुढे जाल. जोडीदाराचा वैचारिक गुंता हळुवारपणे सोडवण्याची गरज भासेल.

response.lokprabha@expressindia.com