सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष गुरू-चंद्राच्या नवपंचम योगामुळे काही अडकलेल्या कामांना गती मिळेल. थोरामोठय़ांच्या ओळखीतून मार्ग सापडेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे शिस्तीचे नियम कडक होतील. आíथक स्थिती सुधारेल. जोडीदाराच्या कार्यक्षेत्रातील कामाचे स्वरूप बदलेल. असा बदल स्वीकारून काम करताना त्याला जड जाईल. कुटुंब सदस्यांना अभिमान वाटेल असे चांगले काम हातून घडेल. घरात एकोपा राहील. पडणे, मार लागणे, खरचटणे असे त्रास संभवतात.

वृषभ चंद्र आणि शुक्र या एकमेकांना पूरक असलेल्या ग्रहांच्या केंद्र योगामुळे अंगीच्या कलागुणांना वाव मिळेल. नव्या संकल्पना राबवाल. नोकरी-व्यवसायात टप्प्याटप्प्याने पुढे जाल. सहकारी वर्गाकडून हवे तसे साहाय्य मिळणे कठीण. जोडीदाराचा पािठबा मिळेल. कुटुंबाला लाभदायक ठरतील असे निर्णय दोघे मिळून घ्याल. ज्येष्ठांच्या मार्गदर्शन उपयोगी ठरेल. सर्द हवामानामुळे पोटात मुरडा येईल. पथ्य पाळावे व हलका आहार घ्यावा.

मिथुन मनाचा कारक चंद्र आणि बुद्धीचा कारक बुध यांच्या केंद्र योगामुळे व्यवहारचातुर्याने कामे पूर्णत्वास न्याल. नोकरी-व्यवसायात नव्या उत्साहाने कामाला लागाल. काळ वेळ यांचे भान ठेवाल. नव्या नियमांचा सराव करणे आवश्यक! काही गोष्टी मनाला पटल्या नाहीत तरी त्या स्वीकाराव्या लागतील. जोडीदार अनेक अडचणीतून वाट काढत पुढे जाईल. विरोधकांना तोंड देता देता त्याची दमछाक होईल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. शब्द जपून वापरा.

कर्क चंद्र-शुक्राच्या नवपंचम योगामुळे कला व तंत्रज्ञान यांचा अनोखा मिलाप पाहावयास मिळेल. नोकरी व्यवसायात कलात्मक दृष्टिकोन आणि उत्स्फूर्त भावना यांचा एकत्रितपणे योग्य उपयोग कराल. सहकारी वर्गाची खंबीर साथ मिळेल. वरिष्ठांचा विश्वास संपादन कराल. जोडीदाराच्या रखडलेल्या कामांना गती मिळेल. परंतु यात त्याची अतिरिक्त शक्ती खर्ची पडेल. कौटुंबिक वातावरण उत्साहाचे असेल. पित्ताशयाचे त्रास उद्भवतील. काळजी घ्यावी.

सिंह चंद्र-नेपच्यूनच्या समसप्तम योगामुळे उत्तम प्रतीचे लेखन व वाचन कराल. हातून नवी कलानिर्मिती होईल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा पािठबा मिळेल. अद्ययावत तंत्रज्ञानाचा पुरेपूर फायदा करून घ्याल. सहकारी वर्गाच्या समयसूचकतेमुळे मोठे नुकसान टळेल. कामात यश मिळेल. जोडीदाराला आपल्या भावनिक आधाराची गरज भासेल. कुटुंब सदस्यांपुढे आपला हेका चालवू नका. कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवा. पाठीचा मणका सांभाळा. हलका व्यायाम करा.

कन्या चंद्र-शनीच्या नवपंचम योगामुळे चंद्राच्या चंचलतेवर शनीच्या शिस्तीचा बडगा राहील. कामात सातत्य ठेवाल. नोकरी-व्यवसायात वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून अडचणीतून मार्ग काढाल. वरिष्ठांचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्यावे लागेल. सहकारी वर्गाकडून मदतीस नकार मिळेल. त्यांची कार्यमर्यादा समजून घ्यावी. जोडीदाराच्या तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. त्याची शारीरिक आणि मानसिक स्थितीदेखील सांभाळा. आपले आरोग्य चांगले राहील.

तूळ  चंद्र-गुरूच्या केंद्र योगामुळे अडचणी आणि समस्यांवर मात करण्याची तयारी ठेवाल. नोकरी-व्यवसायात आपले प्रयत्न वरिष्ठांच्या पसंतीस पडणे कठीण! सहकारी वर्गाची मदत होईल. जोडीदाराचे काम हळूहळू मार्गी लागेल. त्याच्या रागावर त्याने नियंत्रण ठेवावे. कौटुंबिक वातावरणातील ताणतणाव वाढेल. नातेवाईकांच्या आजारपणात त्याच्या मदतीला धावाल. पायाला सूज येणे, तळपाय वळणे असे त्रास सहन करावे लागतील. घरगुती उपाय करावेत.

वृश्चिक रवी-चंद्राच्या लाभ योगामुळे हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळेल. नोकरी-व्यवसायातील कामात गती येईल. वरिष्ठांचा पािठबा मिळेल.  सहकारी वर्ग नवनव्या समस्यांना तोंड देत राहील. त्यांना आणखी एखादी संधी द्यावी. जोडीदार त्याच्या कार्यक्षेत्रात आगेकूच करेल.  कौटुंबिक जबाबदाऱ्या जिकिरीने पार पाडाल. कुटुंब सदस्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लावेल. पडणे, मार लागणे, हाड मोडणे असे घडण्याची शक्यता आहे.

धनू  चंद्र-मंगळाच्या समसप्तम योगामुळे नवे काम नव्या उत्साहाने आणि जोमाने सुरू कराल. नोकरी व्यवसायात बदललेल्या नियमांचे काटेकोर पालन कराल. विरोधकांचे डाव हाणून पाडाल. सहकारी वर्गाकडून चांगले साहाय्य मिळेल. संस्थेच्या प्रगतीमध्ये आपला मोलाचा वाटा असेल. जोडीदाराच्या व्यवहारचातुर्यामुळे अडचणीतून मार्ग निघेल. कौटुंबिक वातावरणातील ताणतणावावर नियंत्रण ठेवा. मूत्राशयाच्या त्रासाकडे दुर्लक्ष करू नका. वैद्यकीय सल्ला घ्यावा.

मकर चंद्र-हर्षलच्या प्रतियोगामुळे अनपेक्षित अडथळ्यातून मार्ग काढत पुढे जावे लागेल. हाती घेतलेले काम पूर्ण होण्यास दिरंगाई होईल. नोकरी-व्यवसायात आपला गरसमज वाढू देऊ नका. सहकारी वर्गाची दोन्ही बाजूने कोंडी होईल. जोडीदाराच्या शांत व समंजसपणामुळे त्याचा आधार महत्त्वाचा ठरेल. कुटुंब सदस्य आत्मविश्वासाने आपापली जबाबदारी पार पाडतील. उसण भरणे, मान लचकणे यामुळे अस्वस्थता वाढेल. प्राणायाम उपयोगी पडेल.

कुंभ चंद्र-नेपच्यूनच्या केंद्र योगामुळे नवनिर्मितीचा आनंद मिळेल. कामातील उत्साह वाढेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांची मर्जी सांभाळाल. आर्थिक गणित सुटेल. सहकारी वर्गाला मदतीचा हात द्याल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. त्याचा मानसिक ताण कमी करावा. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांचा आधार वाटेल. एकमेकांचे नातेसंबंध दृढ होतील. छाती, बरगडय़ा, मणका यांचे आरोग्य सांभाळा. हलका व्यायाम, प्राणायाम आणि योग्य विश्रांतीची गरज भासेल.

मीन गुरू आणि शुक्र या शुभ ग्रहांच्या षडाष्टक योगामुळे नवे करार करताना अडचणी येतील. नवे नियम लवकरच अंगीकाराल. सहकारी वर्गाची कामे रखडतील. त्यांना मदतीचा हात द्यावा लागेल. जोडीदाराच्या कार्यक्षेत्रात तो त्याच्या बुद्धीची चुणूक दाखवेल. कौटुंबिक वातावरण वैचारिक गोंधळामुळे त्रस्त राहील. ओटीपोटाचे दुखणे वाढू शकते. वैद्यकीय सल्ला घ्यावा लागेल.