सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com
मेष : गुरू-चंद्राचा नवपंचम योग हा ज्ञानवर्धक योग आहे. शैक्षणिक वा प्रशिक्षणाच्या बाबतीत प्रगती कराल. अधिक मेहनत घेण्याची तयारी ठेवाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन कराल. नव्या गोष्टी शिकायला मिळतील. सहकारी वर्गाला उत्तेजन द्याल. जोडीदाराचे अंदाज खरे ठरतील. मुलांना व्यावहारिक वागणुकीचे धडे द्याल. महत्त्वाचे निर्णय घेताना घाई करू नका. पोटात उष्णतेमुळे आग आग होईल. वैद्यकीय सल्ल्यानुसार आहारात बदल करावा.

वृषभ : मंगळ-शनीचा नवपंचम योग हा ध्येयपूर्ती करणारा योग आहे. मंगळाचे धाडस, शनीची चिकाटी यामुळे आपण आपले लक्ष्य गाठू शकाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे पाठबळ मिळाल्याने कामातील आत्मविश्वास वाढेल. सहकारी वर्गाकडून मदत मिळेल. जोडीदाराच्या कामात त्याला यश मिळेल. सार्वजनिक कार्यात त्याची कामगिरी वाखाणण्याजोगी असेल. मुलांच्या प्रगतीचा आलेख उंचावेल. पोटाच्या तक्रारी वाढतील. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवा.

rte marathi news, rte latest marathi news
आरटीई अंतर्गत बदलांमुळे विद्यार्थ्यांच्या चौथी, सातवीनंतरच्या शिक्षणाचे काय होणार?
Extension of time for registration of BBA BMS BCA entrance exam
बीबीए, बीएमएस, बीसीए प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ… आतापपर्यंत किती अर्ज झाले दाखल?
Loksatta kutuhal Limitations of learning
कुतूहल: सखोल शिक्षणाच्या मर्यादा
Priority of schools
आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी शाळांचा प्राधान्यक्रम निश्चित; शिक्षण विभागाकडून मार्गदर्शक सूचना

मिथुन : चंद्र-बुधाचा नवपंचम योग हा विचार व भावना यामध्ये समतोल राखणारा योग आहे. नातेसंबंधातील व्यावहारिक बाजू सांभाळून भावनांची कदर कराल. नोकरी-व्यवसायात अडचणींशी सामना करत आगेकूच करावी लागेल. सहकारी वर्गासह काम करताना लिखित गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे. जोडीदाराला त्याच्या मनाजोगते फळ मिळण्यासाठी अजून थोडी प्रतीक्षा करावी लागेल. मुलांच्या कामाची, अभ्यासाची प्रशंसा कराल. उष्णतेमुळे पोटाचे विकार बळावतील.

कर्क : चंद्र-नेपच्यूनचा केंद्रयोग हा भावभावनांचा सूचक योग आहे. भावनिक गुंतागुंत अलगद सोडवावी लागेल. नोकरी-व्यवसायात महत्त्वाचे निर्णय घेताना द्विधा मन:स्थिती होईल. वरिष्ठ आपल्यातील गुण टिपून आपणास प्रोत्साहन देतील. सहकारी वर्गाकडून साहाय्याची अपेक्षा न करणेच बरे! जोडीदाराची मेहनत फळास येईल. त्याच्या आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. मुलांचा आत्मविश्वास वाढेल. गुोंद्रियांचे आरोग्य जपा. पथ्य आणि व्यायाम आवश्यक!

सिंह : रवी-चंद्राचा नवपंचम योग हा रोगप्रतिकारशक्ती वाढवणारा आणि आरोग्यदायी योग आहे. नोकरी-व्यवसायात अधिकाराचे पद भूषवाल. कामानिमित्त प्रवासयोग संभवतो. वरिष्ठांच्या पािठब्यामुळे मोठी कामगिरी पार पाडाल. सहकारी वर्गाचा सल्ला मोलाचा ठरेल. जोडीदारासह सूर चांगले जुळतील. चच्रेने कौटुंबिक प्रश्न सोडवाल. उत्साही वातावरणात मुलांकडून आनंदाची बातमी समजेल. रखडलेल्या कामकाजाला गती मिळेल. आíथक स्थिती सुधारेल.

कन्या : चंद्र-मंगळाचा नवपंचम योग हा उत्साहवर्धक योग आहे. मंगळाच्या ऊर्जेला आणि तंत्रज्ञानाला चंद्राच्या कुतूहलाची जोड मिळेल. नव्या गोष्टी करण्याकडे कल असेल. नोकरी-व्यवसायात आíथक गणिते नव्याने मांडाल. वरिष्ठ आपल्या गुणांची कदर करतील. जोडीदाराच्या कामकाजात येणाऱ्या अडीअडचणी दूर होतील. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. मुलांना मेहनत आणि सातत्याने महत्त्व पटवून द्याल. वैचारिक थकवा जाणवेल. आहार-विश्रांती यावर लक्ष असू द्यावे.

तूळ : चंद्र-शुक्राचा समसप्तम योग हा नवनिर्मितीचा कारक योग आहे. आपल्यातील कलागुणांना वाव देणारा, व्यक्त करणारा हा योग आहे. नोकरी-व्यवसायात आपल्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल. योग्य निर्णय घ्याल. वरिष्ठ आणि सहकारी वर्ग यांच्यातील दरी मिटवाल. आस्थापनेच्या लाभदायक गोष्टींवर लक्ष केंद्रित कराल. जोडीदाराचा हट्टीपणा त्रासदायक ठरेल. सामोपचाराने घ्यावे लागेल. मुलांची कल्पकता वाढीस लागेल. त्वचा आणि दातांचे दुखणे वाढेल.

वृश्चिक : चंद्र-शनीचा नवपंचम योग हा कष्टाचे चीज करणारा योग आहे. शनीचे सातत्य आणि चंद्राची उत्सुकता यांचा चांगला मिलाप होईल. नोकरी-व्यवसायात प्रगतिकारक पावले उचलाल. सहकारी वर्गाचा कामाचा वेग वाढेल. नवी आशा निर्माण होईल. जोडीदाराच्या कामाचा ताण वाढेल. त्याला आपल्या आधाराची गरज भासेल. मुलांना आपल्या जबाबदाऱ्यांचे भान द्याल. कौटुंबिक वातावरणात हलकेपणा आणण्याचा प्रयत्न कराल. अपचनामुळे, उष्णतेमुळे पोटाचे आरोग्य सांभाळा.

धनू : चंद्र-मंगळाचा केंद्रयोग हा प्रगतिकारक योग आहे. उत्साही वातावरणात सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. तंत्रज्ञानात नव्या गोष्टींचा अवलंब कराल. नोकरी-व्यवसायात अधिकार गाजवाल. गरजवंतांना मदतीचा हात पुढे कराल. सहकारी वर्गाची कर्तबगारी उल्लेखनीय असेल. आपल्या विचारांची आकर्षक पद्धतीने मांडणी कराल. इतरांचा आपल्यावरील विश्वास खरा करून दाखवाल. मुलांच्या हट्टाला आळा घाला. त्वचाविकार आणि अ‍ॅलर्जी यांची वेळेवर काळजी घ्यावी.

मकर : चंद्र-गुरूचा केंद्रयोग हा गुणग्राहकतेला जोपासणारा योग आहे. आपल्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी नवे पाऊल उचलाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या पािठब्यामुळे महत्त्वाचे निर्णय घ्याल. सहकारी वर्गातल्या गुणांचा उत्तम प्रकारे उपयोग कराल. नातेवाईकांसाठी धावपळ करावी लागेल. कौटुंबिक वाद मर्यादेत ठेवाल. जोडीदाराला चांगली साथ द्याल. मुलांची प्रगती समाधानकारक असेल. श्वसनसंस्थेची काळजी घ्यावी. युरिन इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे.

कुंभ : चंद्र-नेपच्यूनचा लाभयोग हा बुद्धिमत्तेला भावनिकतेची जोड देणारा योग आहे. आपल्या कामातील एकाग्रतेमुळे कामाचा दर्जा उंचावेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांना आपली मते समजावून सांगाल. संस्थेच्या हिताचे निर्णय घेताना सहकारी वर्गाची मदत होईल. जागेसंबंधित योग्य निर्णय घ्याल. जोडीदाराच्या कामातील ताणामुळे त्याचे स्वास्थ्य विचलित होईल. मुलांच्या शिक्षणासाठी वा कामकाजासाठी त्यांना प्रवासयोग येतील. खांदे आणि मान यांचे दुखणे दुर्लक्षित करू नका.

मीन : शुक्र-नेपच्यूनचा नवपंचम योग हा कलात्मक दृष्टी देणारा योग आहे. नित्य नमित्तिक गोष्टींमध्ये कलात्मकता निर्माण कराल. नोकरी-व्यवसायात लाभदायक घटना घडतील. मेहनतीचे फळ विलंबाने मिळेल. वरिष्ठांचा पािठबा मिळवताना बरीच ऊर्जा खर्ची पडेल. सहकारी वर्ग पाठीशी उभा राहील. जोडीदाराची पत वाढेल. अडचणीतून मार्ग काढत पुढे जाताना दोघांना एकमेकांची साथ लाभेल. मणका आणि हृदयाचे आरोग्य जपावे. विश्रांती आणि पथ्य यांचे भान राखा.