सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष चंद्र व शुक्र या स्त्री ग्रहांच्या युतीयोगामुळे आवडीच्या कामात अधिक वेळ रमाल. हाती घेतलेले काम नियोजनबद्ध पद्धतीने अमलात आणाल. नोकरी-व्यवसायात योग्य व्यक्तीकडून पुढील कामाची सूत्रे हलवाल. अडचणींवर मात कराल. सहकारी वर्गातील बुद्धिमत्तेची पारख कराल. त्यांच्या सूचना विचारात घ्याल. जोडीदाराच्या विशेष आवडीनिवडी जपाल. नातेवाईकांकडून शुभ वार्ता समजतील.  अतिश्रमामुळे पोटऱ्यांमध्ये गोळे येतील.

वृषभ भावनाप्रधान चंद्र व धाडसी मंगळाच्या नवपंचम योगामुळे विचारांचा वेग वाढेल. सामाजिक कार्यात हिरिरीने सहभागी व्हाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा सल्ला लाभदायक ठरेल. नव्या विचारांना त्यांच्याकडून पािठबा मिळेल. सहकारी वर्गाच्या अडचणींना वाचा फोडाल. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी धडपड कराल. जोडीदाराचा त्याच्या कार्यक्षेत्रात मान वाढेल. जास्तीच्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील.

मिथुन बुद्धीचा कारक बुध व मनाचा कारक चंद्र यांच्या बौद्धिक राशीतून होणाऱ्या नवपंचम योगामुळे बऱ्याच गोष्टी मनाप्रमाणे घडतील. आपल्या व्यवहारचातुर्याचे कौतुक होईल. नोकरी-व्यवसायात जशास तसे वागून हितशत्रूंना नामोहरम कराल. सहकारी वर्गातील सदस्यांची कला व तंत्रज्ञान क्षेत्रात योग्य नेमणूक कराल. जोडीदाराचा संपूर्ण पािठबा मिळेल. नात्यातील ज्येष्ठ मंडळींचे मार्गदर्शन नातेसंबंध जोडण्यास उपयोगी ठरेल. उष्णतेच्या विकारांकडे दुर्लक्ष नको.

कर्क चंद्र-मंगळाच्या समसप्तम योगामुळे अधिकारी व्यक्तींकडून प्रेरणा घ्याल. नव्या योजना राबविण्यासाठी आगेकूच कराल. विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक! नोकरी-व्यवसायात लहान वाटणाऱ्या गोष्टी महत्त्वपूर्ण ठरतील. त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. सहकारी वर्गाकडून अपेक्षित साहाय्य मिळेल. ज्येष्ठ सदस्यांचे अनुभवाचे बोल कामी येतील. जोडीदाराच्या शिस्तीचा बडगा कुटुंब सदस्यांना सहन करावा लागेल. पोट दुखणे, आतडय़ाला सूज येणे असे त्रास उद्भवतील.

सिंह चंद्र-नेपच्यूनच्या केंद्र योगामुळे भावनांवर ताबा ठेवणे गरजेचे ठरेल. विवेकी विचारांना महत्त्व द्याल. मानापमान बाजूला ठेवा. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांकडून वाहवा मिळवाल. इतरांकडे फारसे लक्ष देऊ नये. सरकारी कामे गतिमान होतील. कायदेपंडितांसह वाद घालून उपयोग नाही. जोडीदारासह वेळ आनंदात जाईल. एकमेकांच्या आवडीनिवडी जपाल. कुटुंब सदस्यांच्यामागे खंबीरपणे उभे राहाल. त्यांना धीर द्याल. उष्णतेची सर्दी त्रासदायक ठरेल.

कन्या आत्मा कारक रवी आणि मनाचा कारक चंद्र यांच्या लाभ योगामुळे यश, कीर्ती, संपत्ती मिळेल. आत्मविश्वास वाढेल. नोकरी-व्यवसायात अधिकाराचे पद भूषवाल. नवे विचार मांडाल. सहकारी वर्ग नेमून दिलेली कामे वेळेत पूर्ण करेल. वैयक्तिक ओळखीचा लाभ मिळेल. मित्रांचे सल्ले आठवणीने अमलात आणाल. जोडीदारासह चांगले सूर जुळतील. कुटुंबासाठी विशेष वेळ राखून ठेवाल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. मानसिक स्वास्थ्य बिघडवू नका.

तूळ  चंद्र आणि बुध यांच्या लाभ योगामुळे विचार व भावनांचा उत्तम समतोल राखाल. नोकरी-व्यवसायात आपल्या नियोजनाबद्दलच्या चर्चा होतील. वरिष्ठांकडून वाहवा मिळवाल. व्यवसायवृद्धीसाठी नवे मार्ग चोखाळाल. हिमतीने पुढे जाल. नातेवाईक आणि मित्रमंडळींची मदत मिळेल. जोडीदाराची प्रगती होईल. कुटुंब सदस्यांच्या अडचणी समजून घ्याल. शिस्तीच्या नावाखाली त्यांच्यावर दडपण आणू नका. मोकळा संवाद साधणे आवश्यक!

वृश्चिक शांत, विचारी शनी आणि धाडसी मंगळ यांच्या युतीयोगामुळे यश, कीर्ती आणि अधिकार मिळवाल. नोकरी-व्यवसायात अडचणींना धीराने सामोरे जाल. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रांत मोठी झेप घ्याल. वरिष्ठांचा पािठबा मिळवाल. सहकारी वर्गाची समयसूचकता लाभदायी ठरेल. जोडीदाराचे निर्णय कालानुरूप बदलतील. दोघांचे विचार जुळतील. कुटुंब सदस्य एकाग्रतेने व चिकाटीने आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करतील. ताप, उन्हाळी सर्दी, डोकेदुखी यांचा त्रास जाणवेल.

धनू  चंद्र-शुक्राच्या युतीयोगामुळे आपल्या छंदामध्ये अधिक वेळ रमाल. यातूनच सामाजिक बांधिलकीचे भान जपाल. नोकरी-व्यवसायात नवे प्रकल्प हाती घ्याल. बुद्धिमत्तेला व्यावहारिकतेची जोड देऊन काही बदल सुचवाल. सहकारी वर्गाचे हित साधाल. जोडीदाराच्या एखाद्या कृतीमागचे कारण समजून घ्या. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला मोलाचा ठरेल. गुरुजनांचा सहवास लाभेल. प्रगतीची संधी दौडू नका. मेहनतीचे फळ मिळेल. आरोग्य चांगले राहील.

मकर गुरू-चंद्राच्या नवपंचम योगामुळे गरजूंना योग्य सल्लामसलत कराल. नोकरी-व्यवसायात अधिकाराचे पद मिळवाल. आपल्या कार्यक्षेत्रात विशेष कामगिरी पार पाडाल. वरिष्ठांचा विश्वास संपादन कराल. सहकारी वर्गातील गुणांची चांगली पारख कराल. त्यांना त्याचा मोबदला मिळवून द्याल. जोडीदारासह सूर चांगले जुळतील. एकमेकांच्या विचारांचा आदर करून प्रेमाची नाती दृढ होतील. कौटुंबिक समस्या हळुवारपणे हाताळाल. घसा सांभाळावा लागेल.

कुंभ चंद्र-नेपच्यूनच्या लाभ योगामुळे बुद्धिमत्तेला भावनांची साथ मिळेल. लेखन, वाचन, चिंतन, काव्य यात मन रमेल. नोकरी-व्यवासायात शिस्तीच्या फटक्याने न होणारी कामे आपुलकीच्या शब्दांमुळे चुटकीसरशी पूर्ण होतील. सहकारी वर्गाची चांगली साथ मिळेल. गुरुजनांच्या भेटीगाठी होण्याचे योग येतील. जोडीदार आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करेल. नातेवाईकांच्या आजारपणाची बातमी समजेल. कुटुंब सदस्यांची मदत मिळेल. पित्ताचा त्रास होईल.

मीन कलेचा कारक शुक्र आणि ज्ञानाचा कारक गुरू या शुभ ग्रहांच्या शुभ योगामुळे यश, कीर्ती, संपत्ती मिळेल. कला व तंत्रज्ञानाचा सुरेख मिलाफ होऊन प्रगती कराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा मान राखाल. सहकारी वर्ग आपली भूमिका ठासून मांडेल. जोडीदाराला कामानिमित्त प्रवास करावा लागेल.  कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे लागेल. पाठ, मणका व डोकेदुखीचा त्रास उद्भवेल.