News Flash

भविष्य : दि. ३१ जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२०

चंद्र-शुक्राच्या नवपंचम योगामुळे सौंदर्य, साहित्य, कला या क्षेत्रात प्रगती कराल

    सोनल चितळे- response.lokprabha@expressindia.com

मेष

चंद्र-मंगळाच्या नवपंचमयोगामुळे कामाचा उत्साह वाढेल. रेंगाळलेल्या कामांना गती द्याल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे पाठबळ मिळणे कठीण वाटले तरी जिद्द सोडू नका. डोक्यात राग न घालता आपला मुद्दा योग्य प्रकारे समजावून द्याल. सहकारीवर्गाच्या गुणांची कदर कराल. त्यांच्यावर नव्या जबाबदाऱ्या सोपवाल. जोडीदाराची चांगली साथ मिळेल. त्याच्या कलागुणांना वाव मिळेल. एकंदर कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

वृषभ

चंद्र-शुक्राच्या नवपंचम योगामुळे सौंदर्य, साहित्य, कला या क्षेत्रात प्रगती कराल. नव्या विचारांना नवी दिशा द्याल. नोकरी-व्यवसायात योग्य मार्गाने केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. आर्थिक लाभ संभवतो. सहकारीवर्ग कामे झपाटय़ाने पूर्ण करेल. जोडीदाराच्या कार्यक्षेत्रात अडचणी येतील. त्याच्या कामाचा वेग मंदावेल. कौटुंबिक वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. कामाच्या धावपळीत आरोग्याकडे दुर्लक्ष नको. पथ्य पाळा.

मिथुन

चंद्र-बुधाच्या प्रतियोगामुळे सारासार विवेकबुद्धीचा वापर कराल. तणावपूर्ण वातावरण मार्मिक विनोदाने हलके कराल. नोकरी-व्यवसायात नव्या संधी उपलब्ध होतील. सहकारीवर्गातील समस्या व्यवस्थापक मंडळापुढे प्रभावीपणे मांडाल. जोडीदाराचे म्हणणे ऐकून घ्यावे लागेल. कामाच्या ताणामुळे त्याची चिडचिड वाढेल. कुटुंबात आनंदवार्ता कानी पडेल. प्रवासयोग येईल. मूळव्याध, भगींदर यांसारखे जुने आजार डोकं वर काढतील.

कर्क

शनी-चंद्राच्या नवपंचमयोगामुळे धरसोड वृत्तीला आळा बसेल. कामात सातत्य राहील. कष्टाचे चीज होईल. नोकरी-व्यवसायात काही अनिश्चित गोष्टीकडे लक्ष केंद्रित करावे लागेल. आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक कराल. सहकारीवर्गाची वाखाणण्याजोगी साथ मिळेल. जोडीदाराला भावनिक आधार द्याल. मतभेद दूर ठेवा. कुटुंबातील सदस्यांचे प्रवासयोग येतील. उत्सर्जन संस्थेचे त्रास अंगावर काढू नका. वैद्यकीय उपचार घ्या.

सिंह

चंद्र-मंगळाच्या नवपंचमयोगामुळे नव्या उत्साहाने लांबणीवर पडलेली कामे विचारात घ्याल. ध्येयाकडे वाटचाल कराल. सहकारीवर्गाला योग्य मार्गदर्शन कराल. हितशत्रूंपासून सावध राहाल. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. त्याच्यावरील कौटुंबिक जबाबदाऱ्या आपणास पूर्ण कराव्या लागतील. आठवडा धावपळीत जाईल. हाडांचे दुखणे व मणक्याचे आरोग्य जपावे लागेल. वैद्यकीय उपाचार घ्यावे लागतील.

कन्या

चंद्र-मंगळाच्या केंद्रयोगामुळे मनात मोठय़ा योजना मांडाल. परंतु त्या प्रत्यक्षात उतरवणे कठीण जाईल. कोणत्याही गोष्टीत उतावीळपणा उपयोगी नाही. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा सल्ला लाभदायक ठरेल. सहकारीवर्गाला मदतीचा हात पुढे कराल. जोडीदारासह सूर जुळतील. एकमेकांच्या सहवासात वेळ आनंदात घालवाल. मित्रपरिवाराच्या भेटीगाठी होतील. पोटऱ्यांमध्ये पेटके येतील.

तूळ

चंद्र-नेपच्यूनच्या समसप्तमयोगामुळे ललित कलेत रस घ्याल. बौद्धिक छंद जोपासाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे पाठबळ मिळेल. आत्मविश्वास वाढेल. सहकारीवर्गाच्या मदतीने नव्या योजना अमलात आणाल. जोडीदाराला कामानिमित्त प्रवासयोग येईल. त्याला चांगली साथ द्याल. कौटुंबिक वातावरण धावपळीचे जाईल. महत्त्वाची कागदपत्रे मिळवताना त्रास होईल. रक्तदाब व रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणे आवश्यक!

वृश्चिक

रवी-चंद्राच्या नवपंचमयोगामुळे अडचणीतून सहज मार्ग सापडेल. मित्रमंडळी मदत करतील. नोकरी-व्यवसायात देश-विदेशातील संस्थांसह नवे करार कराल. सहकारीवर्गाकडून कामे करवून घ्याल. थोडा वाईटपणा स्वीकारावा लागेल. आर्थिक गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा. जोडीदाराचे प्रेम व साहाय्य मिळेल. एकमेकांना भावनिक आधार द्याल. कौटुंबिक समस्या विचारपूर्वक सोडवाल. पित्त आणि उष्णतेच्या विकारांकडे दुर्लक्ष नको.

धनू

रवी-चंद्राच्या षडाष्टकयोगामुळे अडचणीतून मार्ग काढत पुढे जावे लागेल. मनाविरुद्ध घटना घडल्या तरी धीर सोडू नका. नोकरी-व्यवसायात कामानिमित्त प्रवास कराल. नव्या जोखमीचे ओझे अंगावर घेऊ नका. मित्रमंडळी मदतीसाठी धावून येतील. जोडीदाराची भक्कम साथ मिळेल. त्याच्या बुद्धिचातुर्याचा लाभ होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी व उत्साही राहील. खाण्याच्या बाबतीत तोंडावर ताबा ठेवा. अन्यथा पोटाचे विकार बाळावतील.

मकर

चंद्र-हर्षलच्या केंद्रयोगामुळे लहरीपणा वाढेल. कोणाच्या जिव्हारी लागेल असे स्पष्ट बोलणे टाळा. नोकरी-व्यवसायात असा स्पष्टवक्तेपणा उपयोगी ठरेल. अन्यायाला वाचा फोडाल. माणसांची पारख कराल. जोडीदाराच्या मदतीने घरगुती समस्या सोडवाल. कौटुंबिक वातावरणात अस्थिरता येईल. धीराने घ्या. घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. श्वास लागणे, धाप लागणे अशा लक्षणांकडे दुर्लक्ष नको. योग्य उपचार घावे लागतील.

कुंभ

गुरू-चंद्राच्या नवपंचमयोगामुळे सामाजिक कार्यात हिरिरीने सहभागी व्हाल. वडीलधाऱ्यांचा सल्ला हितावह ठरेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे पाठबळ मिळेल. सहकारीवर्गाची मदत मिळेल. त्यांचा उत्साह वाढवाल. आर्थिक लाभ होतील. जोडीदार कामानिमित्त प्रवास करेल. मतभेद दूर ठेवा. कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवाल. नातेवाईकांकडून शुभवार्ता समजतील. नावीन्यपूर्ण गोष्टींमध्ये मन रमेल. आरोग्य चांगले राहील.

मीन

चंद्र-शुक्राच्या नवपंचमयोगामुळे कष्टाचे योग्य फळ मिळेल. व्यवहार व भावनांचा समतोल राखाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे म्हणणे मान्य करावे लागेल. सहकारीवर्गातील एखादी व्यक्ती आपल्यावर अधिकार गाजवू पाहील. जोडीदारासह लहानसहान गोष्टीबाबत वाद न घालता एकमेकांचे दृष्टिकोन समजून घ्याल. रक्ताभिसरण संस्थेच्या तक्रारी दुर्लक्षित करू नका. वैद्यकीय सल्ला घ्यावा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2020 1:12 am

Web Title: astrology 31th to 3 february 2020 abn 97
Next Stories
1 भविष्य : दि. २४ ते ३० जानेवारी २०२०
2 राशिभविष्य : दि. १७ ते २३ जानेवारी २०२०
3 राशिभविष्य : दि. १० ते १६ जानेवारी २०२०
Just Now!
X