01vijayमेष पसा ही एक अशी गोष्ट आहे की ज्यामुळे माणसाची हितसंबंध जुळतात किंवा त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण होतो. तुमचा रोखठोक स्वभाव तुम्हाला उपयोगी ठरेल. व्यापार-उद्योगात पशाची आवक गरजेपुरती राहील. परंतु पूर्वीची काही देणी द्यायची असल्याने हातात पसे शिल्लक राहणार नाही. नवीन नोकरीच्या कामामध्ये तांत्रिक कारणावरून विलंब होण्याची शक्यता आहे. घरामध्ये वयोवृद्ध व्यक्तीच्या प्रकृतीविषयी चिंता राहील. विद्यार्थ्यांनी झालेल्या अभ्यासाची पुन्हा एकदा उजळणी करणे. 

वृषभ सर्व काही चांगले असेल. पण चंद्राला जसा डाग असतो त्याप्रमाणे एखाद्या कारणाने तुमच्या या यशाला गालबोट लागण्याची शक्यता आहे. व्यापार उद्योगात विस्ताराच्या कल्पनांनी तुम्ही भारावून गेलेले असाल. देशात किंवा परदेशात एखादी शाखा उघडून फायद्याचे प्रमाण वाढवावेसे वाटतील. नोकरीमध्ये अतिउत्साहाच्या भरामध्ये अधिकाराचा गरवापर करण्याचा मोह होण्याची शक्यता आहे. घरामध्ये एखादा शुभ समारंभ ठरेल. विद्यार्थ्यांनीही खाण्यापिण्यांवर र्निबध ठेवून अति आत्मविश्वास टाळावा.

Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
beed lok sabha marathi news, beed lok sabha election 2024
बीडमध्ये सामान्यांच्या प्रश्नांपेक्षा आरक्षणाचाच मुद्दा प्रचारात प्रभावी
Why MHADA will not build houses in high income group
म्हाडाकडून यापुढे उच्च उत्पन्न गटातील घरांची निर्मिती नाही?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !

मिथुन एकेकाळी तुमच्या कल्पना आणि विचार योग्य असूनही ज्यांनी तुम्हाला विरोध केला होता त्यांच्याकडून आता मित्रत्वाची भाषा ऐकू येईल. व्यापार उद्योगात मात्र नवीन हितसंबंध जोडताना किंवा करार करताना ज्यांच्याशी तुम्ही व्यवहार करणार आहात त्यांची विश्वासार्हता पडताळून पहा. नोकरीतल्या कामात स्वयंभू रहा. वरिष्ठांसमोर बढाया मारू नका. घरामध्ये वयोवृद्ध व्यक्तींच्या प्रकृतीची काळजी घ्या. स्वत:करिता एखाद्या वेगळ्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. विद्यार्थ्यांनी एकंदरीत अभ्यासाचा आढावा घ्यावा

कर्क काहीतरी मिळविण्याकरिता काहीतरी गमवावे लागते याची आठवण करून देणारे हे ग्रहमान आहे. व्यापार उद्योगात ज्या कामात तुम्ही लक्ष घालाल ती कामे तुमच्या मनाप्रमाणे मार्गी लागतील, पशाची आवक-जावक समसमान राहील. नाकरीमध्ये तुम्ही चांगले काम कराल. वरिष्ठ जादा काम करून घेण्यासाठी एखादे आमिष दाखवतील. घरातील बुजुर्ग व्यक्तीच्या प्रकृतीची काळजी वाटेल. मुलांच्या प्रगतीकडे लक्ष ठेवणे भाग पडेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या वेळेला शॉर्टकट घेण्याचा प्रयत्न करू नये.

सिंह तुमचे उद्दिष्ट गाठण्यासाठी तुम्हाला या आठवडय़ात आव्हानात्मक परिस्थितीला तोंड द्यावे लागेल. व्यापार-उद्योगात कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर एकदम विश्वास टाकू नका. सरकारी कामे आणि कोर्ट व्यवहार विचारपूर्वक हाताळा. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कर्तृत्वात थोडी जरी चूक झाली तरी वरिष्ठांना ती सहन होणार नाही. घरामधल्या वयोवृद्ध व्यक्तीच्या स्वास्थ्याविषयी काळजी वाटेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या वेळेला कोणतेही प्रयोग न करता त्यांच्याच पद्धतीने अभ्यास करणे चांगले.

कन्या जे काम तुम्हाला पूर्ण करायचे आहे. त्यामध्ये सुरुवातीला तुम्ही सहकाऱ्यांवर अवलंबून राहाल. व्यापार-उद्योगात मध्यस्थांतर्फे चालू असलेल्या कामात गाफील न राहता अधूनमधून कामाचा आढावा घेत रहा. नोकरीमध्ये जर तुम्हाला कामाच्या स्वरूपामध्ये बदल किंवा बदली हवी असेल तर वरिष्ठांना न दुखवता शब्द टाकून पहा. घरामध्ये एखादे मंगल कार्य ठरविताना सगळ्यांचे एकमत होणे कठीण आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या वेळेला इतर कशातही लक्ष घालू नये.

तूळ तुमची परिस्थिती ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी होणार आहे. व्यवसाय-उद्योगात काही कामे आíथकदृष्टय़ा फायदेशीर असल्यामुळे त्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करा, पण नेहमीच्या गिऱ्हाइकांकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. नोकरीमध्ये वरिष्ठ एखादे अवघड काम तुमच्यावर सोपवून तुमची जणू काही परीक्षाच बघतील. त्याला नकार दिला तर त्यांचा रोष ओढवेल. घरामध्ये प्रिय व्यक्तीच्या वागण्या-बोलण्यामुळे किंवा एखाद्या समस्येमुळे तुम्ही थोडेसे हळवे बनाल. विद्यार्थ्यांनी नशिबापेक्षा प्रयत्नांवर अवलंबून राहणे चांगले.

वृश्चिक एखाद्या कामामध्ये आपण मिळवलेले यश सगळ्यांच्या नजरेस पडते, पण त्यामागचे कष्ट मात्र कोणीच लक्षात घेत नाही. व्यवसाय उद्योगात जरी नशिबाची थोडीफार साथ मिळाली तरी तुमचे प्रयत्न आणि चिकाटी सोडू नका. नोकरीमध्ये वरिष्ठांना कामाच्या वेळेला तुमची आठवण येईल पण नंतर मात्र तुम्हाला ते विसरतील. घरामध्ये प्रिय व्यक्तीच्या प्रगतीविषयी किंवा स्वास्थ्याविषयी तुम्ही सतर्क बनाल. विद्यार्थ्यांना आळस करून चालणार नाही.

धनू कर्तव्य ही गोष्ट अशी आहे की ज्याचा आपल्याला मनस्वी कंटाळा येतो. व्यापार उद्योगात हातामध्ये असलेले काम वेळेत पूर्ण करण्याकरिता गिऱ्हाइकांचा तगादा राहील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ एकामागून एक सूचना देत राहतील. त्याचा तुम्हाला कंटाळा येईल. घरामध्ये एका निमित्ताने छोटेखानी कार्यक्रम करायचे ठरवाल, पण त्याचे नियोजन करताना तुमची खूपच धावपळ होईल. विद्यार्थ्यांनी घरगुती गोष्टीचा विचार न करता केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे.

मकर तुमची रास व्यापारी बुद्धीची असल्यामुळे सहसा तुम्ही कोणाशीही विरोध पत्करत नाही. व्यवसाय उद्योगात लक्ष्मी चंचल असते याची आठवण ठेवा. एखाद्या मोहमयी प्रोजेक्टमध्ये पसे गुंतवण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. नोकरीमध्ये तुमची कॉलर ताठ राहील. घरामध्ये वडिलोपार्जति प्रॉपर्टी किंवा काही जुने वादविवाद असतील तर ते अचानक डोके वर काढतील. नातेसंबंध आणि पशाची गल्लत होऊ देऊ नका. विद्यार्थ्यांनी घरातल्या वातावरणाचा अभ्यासावर परिणाम होऊ देऊ नये.

कुंभ प्रत्येक व्यक्तीची अशी इच्छा असते की आपण जे काम करतो त्याला इतरांकडून चांगला प्रतिसाद मिळावा. ग्रहमान चांगले असल्यामुळे तसे संकेत तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. व्यापार उद्योगात मिळालेल्या पशाचा विचारपूर्वक वापर करा. नोकरीमध्ये वरिष्ठ तुम्हाला जादा सवलती देतील. अधिकारांचा गरवापर करण्याची इच्छा होईल. घरांमध्ये मोठया व्यक्तींबरोबर तुमचे सूर जुळणार नाही. पण त्यांचा सल्ला जरुर लक्षात घ्या. स्वतच्या प्रकृतीकडे लक्ष द्या. विद्यार्थ्यांनी परीक्षेचा ताण घेऊ नये.

मीन माणसाचे जीवन म्हणजे समुद्रातील भरती व ओहोटीसारखी असते. ज्या कामांमुळे पूर्वी तुम्हाला बरीच निराशा आली होती त्यात गती येईल. व्यापार-उद्योगात तुमच्या मालाचा किंवा तुम्ही देत असलेल्या सेवेमुळे गिऱ्हाईक तुम्हाला उत्तम प्रतिसाद देतील. नोकरीच्या ठिकाणी संस्थेकडून एखाद्या चांगल्या कामाकरिता तुमची निवड होईल. घरामध्ये जिथे कमी तिथे आम्ही अशी तुमची स्थिती असेल. विद्यार्थ्यांनी कष्टात कसूर केली तर ती महागात पडेल.
विजय केळकर