News Flash

राशिभविष्य : दि. ६ ते १२ डिसेंबर

चंद्र-गुरूच्या नवपंचम योगामुळे मित्र-परिवाराच्या समस्या सोडवाल.

राशिभविष्य : दि. ६ ते १२ डिसेंबर

सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष चंद्र-गुरूच्या नवपंचम योगामुळे मित्र-परिवाराच्या समस्या सोडवाल. नोकरी व्यवसायात कामे पुढे सरकतील. धीमी गती असली तरी सातत्य सोडू नका. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील. पचन व उत्सर्जन संस्थेच्या कार्यात बिघाड झाल्यास वैद्यकीय उपचार घ्यावेत.

वृषभ रवी-चंद्राच्या नवपंचम योगामुळे अधिकाधिक लाभ मिळतील.  धरसोड वृत्ती बाजूला ठेवा. नोकरी व्यवसायात अडचणींवर मात कराल. सहकारी वर्गाच्या प्रश्नांची उत्तरे शोधाल. जोडीदाराची प्रगती होईल. अधिकार वाढतील. कौटुंबिक वातावरण सलोख्याचे राहील. अंतस्रावी ग्रंथींच्या आरोग्याकडे दुर्लक्ष नको.

मिथुन शुक्र-नेपच्युनच्या लाभ योगामुळे नवी स्फूर्ती मिळेल. नियोजित वेळेत ध्येय गाठण्याचा प्रयत्न कराल. नोकरी-व्यवसायात जनसंपर्क वाढेल. नव्या ओळखी नजिकच्या भविष्यात उपयोगी पडतील. जोडीदाराची परिस्थिती समजून घ्यावी लागेल. त्याचा दिनक्रम अधिकच व्यस्त असेल. कौटुंबिक जबाबदारी पार पाडताना मित्रपरिवाराची मदत मिळेल. पित्तामुळे पोट बिघडेल. घरगुती उपाय करावेत.

कर्क चंद्र-बुधाच्या प्रति योगामुळे चौकस बुद्धीला जोड मिळेल. नव्या मुद्दय़ांवर अभ्यासपूर्वक विचार कराल. नोकरी व्यवसायात समयसुचकतेने परिस्थिती आटोक्यात आणाल. जोडीदाराला भावनिक आधार द्याल. पडणे, मार लागणे, जखम चिघळणे असे त्रास उद्भवल्यास काळजी घ्यावी. दुखणे वाढण्याची शक्यता आहे.

सिंह चंद्र-हर्षलच्या युतीयोगामुळे नव्या गोष्टी वैविध्यपूर्ण पद्धतीने करण्याचा प्रयत्न कराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांना आपले मत पटवून द्याल. जोडीदारासह वेळ मजेत जाईल. आवडत्या छंदासाठी वेळ राखून ठेवाल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. नियंत्रित आहार व योग्य पथ्य पाळले तर आरोग्य चांगले राहील.

कन्या चंद्र-शुक्राच्या केंद्र योगामुळे कल्पना शक्तीला उत्तेजन मिळेल. कलेची जोपासना कराल. नोकरी-व्यवसायात नवे करार करताना अधिक खबरदारी घ्याल. सरकारी कामे लांबणीवर पडतील. सहकारी वर्गाची मोलाची मदत मिळाल्याने  जोडीदारासह सूर चांगले जुळतील. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील.

तूळ शनी-चंद्राच्या नवपंचम योगामुळे विचारपूर्वक कृती कराल.  यश मिळण्यास विलंब लागेल. नोकरी व्यवसायातील निर्णयात अचानक बदल करावे लागतील. जोडीदारासह जेवढय़ास तेवढे बोलणे ठेवाल. वादाचे मुद्दे चच्रेस न घेता बाकीच्या गोष्टींचा योग्य विचार कराल. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील. घरात नवे नियम लागू कराल. पित्तशयाच्या तक्रारी तज्ज्ञांच्या निदर्शनास आणाव्यात.

वृश्चिक रवी-नेपच्युनच्या केंद्र योगामुळे भावनांवर ताबा ठेवणे कठीण जाईल. परक्या व्यक्तींवर विश्वास ठेवू नका. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे मन जिंकाल. सहकारी वर्ग चतुराईने मार्ग दाखवेल. तो आपल्या फायद्याचाच ठरेल. जोडीदारासह वेळ चांगला जाईल. विचार जुळतील. एकमेकांना आधार द्याल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. मानसिक व शारीरिक आरोग्य संतुलित ठेवाल.

धनू चंद्र-मंगळाच्या प्रतियोगामुळे हाती घेतलेल्या कामात उशिरा यश मिळेल. तरी सातत्य सोडू नका. नोकरी-व्यवसायात सहकारी वर्ग आवश्यक ती सर्व कामे करण्याची तयारी दाखवेल. जोडीदाराची मुत्सद्देगिरी कुटुंबाला लाभकारक ठरेल. नात्यातील प्रेमाचा व्यवहार जोडीदार योग्य प्रकारे सांभाळेल.

मकर शुक्र-शनीच्या युतीयोगामुळे भावना दाबून न ठेवता त्या योग्य प्रकारे व्यक्त करा. नोकरी-व्यवसायात सहकारी वर्गातील योग्य व्यक्तीला योग्य जबाबदारी सोपवाल. जोडीदारासह वेळ आनंदात जाईल. एकमेकांना समजून घ्याल. फुप्फुसांचे आरोग्य सांभाळावे. प्राणायामाचा विशेष लाभ होईल.

कुंभ रवी-चंद्राच्या षडाष्टक योगामुळे मनस्थिती अस्थिर राहील.  नोकरी-व्यवसायात नव्या संधी उपलब्ध होतील. कामावरील एकाग्रता वाढवून योग्य निर्णय घ्याल. अडथळ्यांवर मात करण्याचा प्रयत्न कराल. कुटुंब सदस्यांसाठी केलेल्या कामात यश मिळेल. जुन्या मित्रमंडळींच्या भेटीगाठी होतील. मान लचके, मुरगळणे यांसारखे त्रास सहन करावे लागतील.

मीन शनी-चंद्राच्या केंद्र योगामुळे आत्मविश्वास कमी होऊ शकतो. धीर सोडू नका. हाती घेतलेल्या कामात विलंब होईल. नोकरी-व्यवसायातील अडचणींवर प्रयत्नपूर्वक मात कराल. वरिष्ठांचे म्हणणे ऐकणेच हितावह ठरेल. सहकारी वर्ग चांगले सहाय्य करेल. जोडीदारासह चांगले जुळेल. एकत्र प्रवास कराल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. मणक्याचे दुखणे अंगावर काढू नका.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 6, 2019 1:01 am

Web Title: astrology 6th to 12th december 2019
Next Stories
1 दि. २९ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०१९
2 राशिभविष्य : दि. २२ ते २८ नोव्हेंबर २०१९
3 राशिभविष्य : दि. १५ ते २२ नोव्हेंबर २०१९
Just Now!
X