22 October 2019

News Flash

दि. २७ मार्च ते २ एप्रिल २०१५

मेष : जे काम तुम्ही हातात घेतलेले आहे त्यामध्ये सफलता मिळवण्यासाठी तुमचे धोरण ‘वारा वाहील तशी पाठ फिरविणे’ असे ठेवणे श्रेयस्कर ठरेल.

| March 27, 2015 01:16 am

01vijayमेष जे काम तुम्ही हातात घेतलेले आहे त्यामध्ये सफलता मिळवण्यासाठी तुमचे धोरण ‘वारा वाहील तशी पाठ फिरविणे’ असे ठेवणे श्रेयस्कर ठरेल. व्यवसाय-उद्योगात एखादी संधी जरी समोर आली तरी कुठलाही निर्णय घाईने घेऊ नका. नोकरीमध्ये वरिष्ठ तुमच्याशी सल्लामसलत करण्यापूर्वी कामातील बदलासंबंधी निर्णय घेण्याची शक्यता आहे. नवीन नोकरीच्या कामात तुमचे प्रयत्न सोडू नका. घरामध्ये सगळ्यांची मोट बांधण्याचे अवघड काम तुम्ही यशस्वीरीत्या पार पाडाल. विद्यार्थ्यांनी केलेल्या अभ्यासाची उजळणी करावी.

वृषभ हातामध्ये चार पसे खुळखुळत असल्यामुळे अनेक नवीन प्रयोग करून बघण्याचा तुम्हाला मूड येईल. व्यवसाय-उद्योगामध्ये जादा नफा देणारे काही प्रोजेक्टस् तुमच्यापुढे येतील. त्याचा स्वीकार करण्यापूर्वी त्यातील जमाखर्चाचे आकडे नीट मांडून पाहा. नोकरीमध्ये आयत्या वेळेला तुमची धावपळ होईल. घरामध्ये सर्व काही ठीक असेल. पण प्रत्येक जण स्वत:च्या नादात राहिल्यामुळे कोणाचाच कोणाशी मेळ राहणार नाही. विद्यार्थ्यांनी स्वत:च्या पद्धतीने केलेला अभ्यास त्यांना उपयोगी पडेल.

मिथुन अनेक संधी तुमच्यापुढे असतील. त्याचा फायदा घेण्यासाठी तुम्ही अधीर असाल. परंतु त्या नादात दैनंदिन कामात दुर्लक्ष झाले तर त्यातून नुकसान संभवते. व्यवसाय-उद्योगात गिऱ्हाईकांची गरज काय आहे याला महत्त्व दिलेत तर फायद्याचे प्रमाण वाढेल. नोकरीमध्ये तुमचे हितशत्रू वरिष्ठांकडे खोटय़ा तक्रारी करण्याची शक्यता आहे. घरामध्ये तुम्ही एखादा शुभ कार्यक्रम ठरवण्याची शक्यता आहे. त्यात तुम्ही स्वत:च्या मताप्रमाणे सगळ्यांनी वागावे असा आग्रह धराल. विद्यार्थ्यांना चांगले ग्रहमान आहे.

कर्क जी कामे छोटय़ामोठय़ा कारणावरून लांबत आलेली होती ती पूर्ण करण्याचा तुम्ही निश्चय कराल. मात्र तुमचे कोणतेही बेत हितशत्रूंना कळणार नाहीत याची काळजी घ्या. व्यवसाय-उद्योगात पशाची उभारणीकरिता हितचिंतकांपेक्षा आíथक संस्था उपयोगी पडतील. नोकरीमध्ये मतलबी व्यक्ती तुमच्याभोवती गोंडा घोळतील. घरामध्ये एखाद्या कार्यक्रमाविषयी उलटसुलट चर्चा होईल. पण निष्कर्ष काहीच निघणार नाही. विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या वेळेला इतर कशातही लक्ष घालू नये.

सिंह कासवाच्या गतीने जायचे आणि शर्यत जिंकायची असा दृष्टिकोन तुम्ही ठेवलात तर यश तुमचेच आहे. व्यापार-उद्योगाच्या क्षेत्रात जी कामे गेल्या २-३ आठवडय़ांत लांबलेली होती ती पूर्ण करण्याकरिता रात्रीचा दिवस करावा लागेल. पशाची पकड ढिली होऊ देऊ नका. नोकरीमध्ये सहकाऱ्यांकडून मदत मिळवून घेण्यासाठी ‘सुसरबाई तुझी पाठ मऊ’ या नीतीने वागावे लागेल. घरामध्ये काही प्रश्न विनाकारण चिघळले असतील तर त्यावर मध्यस्थांच्या मदतीने मार्ग काढू शकाल. जुन्या आजारांकडे लक्ष ठेवा.

कन्या एखाद्या समस्येमुळे तुम्ही जर कोडय़ात पडलेले असाल तर या आठवडय़ात त्यावर तात्पुरता मार्ग काढू शकाल. व्यापार-उद्योगात एक वेळ काम कमी झाले तरी चालेल. परंतु अयोग्य व्यक्तींची संगत धरू नका. गिऱ्हाईकांना दिलेला शब्द वेळेनुसार पाळा. नोकरीमध्ये वरिष्ठ तुम्हाला कोणते आणि किती काम पेलवेल याचा विचार न करता एकामागून एक काम सांगतच राहतील. घरामध्ये इच्छा असूनही सगळ्यांची मोट बांधणे कठीण होईल. त्यावरून रागलोभाचे प्रसंग येतील. विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या वेळी तब्येत सांभाळावी.

तुळ सतत होणाऱ्या दगदग आणि धावपळीमुळे तुम्हाला कामाचा मनस्वी कंटाळा येईल. त्यातून सुटका करून घेण्यासाठी एखादी पळवाट शोधून काढण्याचा प्रयत्न कराल. व्यवसाय-उद्योगात योग्य व्यक्तीची योग्य कामाकरिता निवड केली तर तुमचा भार हलका होईल. नोकरीमध्ये कामाचा तणाव बराच असेल. पण एखाद्या जिवलग साथीदाराने मदत केल्याने तुम्हाला हातभार लागेल. घरामध्ये अचानक एखाद्या आवडत्या व्यक्तीची हजेरी लागल्यामुळे वातावरणात चांगला बदल होईल. विद्यार्थ्यांचा ताण तणाव कमी होईल.

वृश्चिक जे आपल्याकडे आहे त्याचा फायदा कसा उठवता येईल याचा विचार करा. व्यापार-उद्योगात तुमच्या आर्थिक आणि इतर मर्यादा लक्षात घेऊन एखादे नवीन काम स्वीकारायला हरकत नाही. नोकरीच्या ठिकाणी सरकारी आणि इतर जोखमीची कामे तुम्हाला वेळेत उरकायला लागतील. पण तुम्ही वेळ मिळेल तेव्हा सवलतींचा फायदा उठवाल. घरातील व्यक्तींच्या तातडींच्या गरजा भागवण्यासाठी थोडासा वेळ आणि पसे हातात राखून ठेवा. विद्यार्थ्यांना अभ्यासाचा कंटाळा येईल.

धनू काही माणसे आपल्या जीवनात एखाद्या विशिष्ट कारणाने येतात आणि काम संपल्यावर आपल्यापासून दूर होतात असा अनुभव येईल. व्यवसाय-उद्योगात वेळप्रसंगी तुम्हाला रात्रीचा दिवस करावा लागेल. पण एवढे करून त्या मानाने पसे कमीच मिळत आहेत अशी तुमची तक्रार असेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांनी त्यांच्या सूचना अचानक बदलल्यामुळे तेच तेच काम पुन्हा करावे लागेल. घरामध्ये आवडत्या व्यक्तीचे हट्ट आणि गरजा पुरवण्यासाठी तुम्हाला सिद्ध व्हावे लागेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाची पद्धत बदलू नये.

मकर तुमच्या कामामध्ये काही कारणाने विस्कळीतपणा आला असेल तर अशी कामे मार्गी लावणे हेच तुमच्या पुढचे मुख्य उद्दिष्ट असेल. व्यापार-उद्योगात कामाचा ताणतणाव भरपूर असल्यामुळे घडय़ाळ्याच्या काटय़ानुसार काम करावे लागेल. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या अपेक्षा खूप असतील. त्या पूर्ण करण्याकरिता तुम्हाला वेळप्रसंगी रात्रीचा दिवस करावा लागेल. घरामध्ये तुम्हाला म्हणावे इतके लक्ष देता येणार नाही. त्यामुळे कदाचित बुजुर्ग व्यक्तींचा मूड बिनसण्याची शक्यता आहे.

कुंभ ज्या कामात पूर्वी तुम्हाला यश मिळाले नव्हते असे काम पूर्ण करण्याकरिता तुमची धाडस करण्याची तयारी असेल. व्यापार-उद्योगात तुमची मर्यादा ओलांडू नका. जे काम चांगले झालेले आहे ते पाहून एखाद्या गिऱ्हाईकांकडून नवीन ऑर्डर मिळेल. नोकरीमध्ये जे काम तुम्हाला आवडते ते काम वरिष्ठांनी तुमच्यावर सोपवल्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त स्वत:चा फायदा करून घ्याल. घरामध्ये काही न चुकवता येणारी कर्तव्ये तुम्हाला करावी लागतील. विद्यार्थ्यांनी झालेल्या अभ्यासाची पुन्हा उजळणी करावी.

मीन प्रेम आणि जिव्हाळा हे तुमच्या राशीत असणारे दोन चांगले गुण आहेत. त्या जोरावर तुम्ही जेथे जाता तेथे नवीन मित्र मिळविता. व्यापार-उद्योगात आíथक मान तुमच्या मनाप्रमाणे वाढत राहील. त्याचा जरी आनंद असला तरी काम वेळेत संपविण्याकरिता वरिष्ठांचा सतत तगादा राहील. नोकरीमध्ये तुमची खुशामत करून वेगळे भत्ते द्यायलाही वरिष्ठ तयार होतील. नवीन नोकरीच्या प्रयत्नात सफलता मिळेल. घरामध्ये तुमचा शब्द तुम्ही खाली पडू देणार नाही.
विजय केळकर

First Published on March 27, 2015 1:16 am

Web Title: astrology 8
टॅग Astrology