सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com
मेष चंद्र-गुरूचा नवपंचम योग हा नव्या गोष्टी, नव्या पद्धती शिकून घेण्यासाठी पूरक योग आहे. कष्टाचे चीज होईल. मोठय़ा मंडळींच्या भेटीगाठी लाभदायक ठरतील. जोडीदारासह वेळ आनंदात घालवाल. एकमेकांना समजून घ्याल. मुलांच्या समस्या हळूहळू सुटतील. कौटुंबिक पातळीवर शांतता ठेवावी. सर्दी, पडसे आणि सांधेदुखी, मणका याबाबत काळजी घ्यावी. वैद्यकीय सल्ला घ्यावा.
वृषभ भाग्य स्थानातील रवी-बुधाचा युती योग बुद्धिमत्तेला प्रसिद्धीची साथ देणारा आहे. नव्या जबाबदाऱ्या स्वीकारण्याची तयारी ठेवा. सहकारी वर्गाचा प्रश्न संस्थेपुढे मांडाल. बदलत्या परिस्थितीशी जुळवून घ्याल. जोडीदाराच्या कामकाजात अडथळे येतील. नातेवाईकांची मदत कराल. मुलांचे म्हणणे मुद्दय़ाला धरूनच असेल. अट्टहास सोडून द्यावा. डोकेदुखी, ताप असे त्रास होतील.
मिथुन चंद्र-शुक्राचा केंद्र योग सौंदर्यदृष्टीत भर घालेल; आर्थिकदृष्टय़ा व्यवहारही सांभाळेल. बुद्धिमत्तेचा योग्य उपयोग कराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे म्हणणे मान्य करणे शहाणपणाचे ठरेल. रखडलेली कामे पूर्णत्वाला न्याल. जोडीदार त्याच्या कामात व्यग्र असेल. जोखमीचे काम पूर्ण होईल. मुलाबाबत महत्त्वाचे निर्णय घ्याल. फोड, पुटकुळय़ा यात पू तयार होण्याची शक्यता आहे. काळजी घ्यावी.
कर्क चंद्र-बुधाचा केंद्र योग आपल्या मानसिक स्थितीचा समतोल राखणारा योग आहे. भावनेच्या आहारी न जाता व्यावहारिक दृष्टिकोन उपयोगी ठरेल. नोकरी-व्यवसायात प्रगती करण्यासाठी अनेक अडचणींवर मात करत पुढे जावे लागेल. वरिष्ठ अधिकारी व सहकारी वर्गाची साथ मिळेल. जोडीदाराला आधाराची गरज भासेल. मुलांच्या कामाला गती येईल. उष्णतेचे विकार बळावतील.
सिंह चंद्र-नेपच्यूनचा प्रतियोग हा करारी स्वभावाला ममतेची जोड देणारा योग आहे. परिस्थितीला योग्य प्रकारे सामोरे जाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या सल्ल्याने आगेकूच कराल. सहकारी वर्गाच्या समस्या जाणून घ्याल. जोडीदाराला भावनिक आधाराची गरज भासेल. मुलांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घ्याल. ताप, सर्दी यामुळे दमणूक जाणवेल. आहार-विश्रांतीकडे लक्ष द्यावे.
कन्या चंद्र-मंगळाचा केंद्र योग हा आपल्यासाठी अडचणीतून मार्ग काढत पुढे नेणारा ऊर्जेचा स्रोत ठरेल. धीर सोडू नका. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह बोलताना गैरसमज होऊ देऊ नका. सहकारी वर्गाच्या साथीने मोठी जबाबदारी पेलाल. जोडीदाराशी सूर चांगले जुळतील. तब्येतीची काळजी घ्यावी. कौटुंबिक ताणतणाव कमी करावा. रक्तातील साखर सांभाळा.
तूळ चंद्र-मंगळाचा लाभ योग आत्मविश्वासवर्धक योग आहे. कामातील चोखपणा आणि बारकावे उत्तम प्रकारे सादर कराल. नोकरी-व्यवसायात अतिरिक्त जबाबदारी स्वीकाराल. सहकारी वर्गावरील विश्वास खरा ठरेल. जोडीदाराचा कामाचा उरक वाढेल. उत्साह नसला तरीदेखील जबाबदारीच्या दृष्टीने तो कामे नेटाने पूर्ण करेल. मुलांना फक्त समज द्यावी. काळजी नसावी.
वृश्चिक चंद्र-शनीचा नवपंचम योग हा वैचारिक स्थैर्य देणारा योग आहे. कठीण परिस्थितीत खंबीरपणे उभे राहाल. नोकरी-व्यवसायात आरोप-प्रत्यारोप होतील. सत्याची बाजू सोडू नका. वरिष्ठ आणि सहकारी वर्ग यांच्या साथीने मार्ग सापडेल. कौटुंबिक वातावरण संमिश्र असेल. जोडीदाराच्या प्रगतीचा आलेख उंचावेल. मुलांना सोयीसुविधा पुरवाल. चिडचिड करू नका. कुढत बसू नका.
धनू चंद्र-शुक्राचा नवपंचम योग नावीन्यपूर्ण कल्पना अमलात आणणारा आहे. आपल्यासह इतरांचाही उत्साह वाढवाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठ अधिकारी आपल्या कामाची दखल घेतील. सहकारी वर्गाचे साहाय्य मिळेल. गुणग्राहकता हा तर आपला मूळ स्वभाव आहे. जोडीदारासाठी नव्या संधी उपलब्ध होतील. मुलांचा सहवास आनंददायी असेल. डोळय़ांची जळजळ होईल.
मकर रवी-चंद्राचा नवपंचम योग समस्येवर उत्तर शोधण्यास मदत करेल. सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास कामाला गती येतील. नोकरी-व्यवसायात परदेशासंबंधित कामे रखडतील. सहकारी वर्गाकडून सहकार्य मिळणार नाही. जोडीदाराला आपल्या मनाजोगते निर्णय घेता येतील. मुलांच्या भविष्याची चिंता करू नका. आपले संस्कार त्यांना सक्षम करतील. सांधेदुखीचा त्रास संभवतो.
कुंभ चंद्र-शुक्राचा लाभ योग हा भाग्यकारक आणि यशदायक योग आहे. हाती घेतलेले काम पूर्ण होईल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. नव्या क्षेत्रात पदार्पण कराल. सहकारी वर्गाला गरजेनुसार समज देणे आवश्यक ठरेल. आपल्या चांगुलपणाचा कोणाला फायदा घेऊ देऊ नका. जोडीदाराला भावनिक आधाराची गरज भासेल. आहाराचे पथ्य सांभाळावे.
मीन चंद्र-बुधाच्या नवपंचम योगामुळे आपल्या भावना आणि बुद्धिमत्ता यांच्यातील संबंध सुधारेल. भावनेच्या आहारी न जाता सारासार विचार करून निर्णय घ्याल. नोकरी-व्यवसायात तंत्रज्ञान आणि कला यांचा योग्य समन्वय साधाल. जोडीदार आपली जबाबदारी उत्तमरीत्या पार पडेल. मुलांना शिस्तीसह प्रेमाने वागवाल. हाडांशी संबंधित त्रास वाढल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा.