सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष चंद्र-नेपच्यून या दोन भावनाप्रधान ग्रहांच्या लाभ योगामुळे अतिभावुक व्हाल. परंतु भावनांच्या आहारी जाऊ नका. मेहनतीचे चीज कराल. नोकरी-व्यवसायात आपल्या ज्ञानाचा, अधिकाराचा योग्य उपयोग कराल. वरिष्ठांची मते मानून घेण्यात आपला कमीपणा समजू नका. सहकारी वर्ग, नातेवाईक आणि शेजारीपाजारी यांच्या मदतीला धावून जाल. जोडीदाराचे काम लांबणीवर पडेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. अपचन आणि पित्ताचा त्रास बळावेल.

वृषभ चंद्र-शनीच्या लाभ योगामुळे चंद्राचे कुतूहल आणि शनीची जिद्द, चिकाटी यांचा योग्य मेळ जमवाल. संशोधन कार्यात मोलाची भर घालाल. नोकरी-व्यवसायात हाती घेतलेली कामे पूर्णत्वाला न्याल. नव्या ओळखींमुळे कामाला वेग येईल. सहकारी वर्गाकडून चांगले साहाय्य मिळेल. आपल्या कमतरतांवर मात करण्याचा प्रयत्न कराल. जोडीदाराच्या समस्या शांत चित्ताने सोडवण्याचा प्रयत्न करावा. कुटुंब सदस्यांकडून आधार मिळेल. त्वचेला थंडीचा त्रास जाणवेल.

मिथुन बुध-मंगळाच्या नवपंचम योगामुळे युक्ती आणि शक्ती यांचा योग्य उपयोग कराल. आपल्या कामाचे कौतुक होईल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे पाठबळ मिळेल. मोठी जबाबदारी पार पडेल. सहकारी वर्गाला गृहीत धरू नका. जोडीदाराच्या अडचणी समजून घ्याव्या लागतील. बऱ्याच मेहनतीनंतर त्याला त्याच्या कामाचे फळ मिळेल. कौटुंबिक कलह टाळणे गरजेचे! उत्सर्जनच्या तक्रारी डोके वर काढतील. वैद्यकीय सल्ला घ्यावा.

कर्क चंद्र-बुधाच्या युती योगामुळे मनात अनेकविध विचारांचे काहूर माजेल. अनावश्यक विचारांना प्रयत्नपूर्वक दूर ठेवा. नोकरी-व्यवसायात आधुनिकतेचा वापर करणे हिताचे ठरेल. वरिष्ठांची मर्जी राखाल. सहकारी वर्ग आपल्या मदतीला तत्पर असेल. जोडीदाराला आपल्या आधाराची, मदतीची गरज भासेल. कौटुंबिक वाद, प्रॉपर्टीसंबंधित प्रश्न यांवर चर्चा कराल. फोड येणे, त्वचा फाटणे, त्यात पू होणे असे त्रास अंगावर न काढता वैद्यकीय उपचार घ्यावेत.

सिंह बुध-नेपच्यूनच्या केंद्र योगामुळे बुद्धीला उत्स्फूर्ततेची जोड मिळेल. बौद्धिक क्षेत्रात नव्या संकल्पना मांडाल. नोकरी-व्यवसायात  वरिष्ठांचा पाठिंबा मिळवावा लागेल. सहकारी वर्गाच्या समस्या सोडवण्यासाठी विशेष मेहनत घ्याल. जोडीदाराच्या कष्टाचे चीज होईल. त्याच्या आनंदात सामील व्हाल. कुटुंब सदस्य आपल्या कामात यश मिळवतील. कामाच्या ताणामुळे जास्त दमणूक होईल. आपल्या छंदांसाठी थोडा वेळ राखून ठेवा. उत्साह वाढेल.

कन्या शक्तिदायक मंगळ आणि क्रियाशील चंद्र यांचा नवपंचम योग उत्साहवर्धक ठरेल. कल्पकतेला कृतीची जोड मिळाल्याने नावीन्यपूर्ण विचार प्रत्यक्षात उतरतील. नोकरी-व्यवसायात नवे करार कराल. खाचखळगे तपासून घ्यावेत. वरिष्ठांचा सल्ला साहाय्यकारी ठरेल. सहकारी वर्ग मदतीला तयार नसेल. क्षमतेपलीकडे जाऊन भलते साहस करू नका. जोडीदाराच्या कामात यश मिळेल. मुलांकडून आनंदवार्ता समजतील. पोटाचे दुखणे दुर्लक्षित करू नका.

तूळ चंद्र-नेपच्यूनच्या नवपंचम योगामुळे कला क्षेत्रात नवे प्रयोग यशस्वी कराल. उत्स्फूर्तता वाढेल. जनमताचा आदर कराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या पाठबळामुळे आपला हुरूप, आत्मविश्वास वाढेल. सहकारी वर्गाच्या गुणांचा उत्तम उपयोग करून घ्याल. त्यामुळे त्यांचा आणि आस्थापनेचाही लाभ होईल. जोडीदाराचे विचार पटले नाहीत तरी वाद न घालता ऐकून घ्यावेत. कुटुंब सदस्यांच्या कामाचा व्याप वाढेल. हाडे, सांधे, तळपाय यांचे दुखणे उद्भवेल.

वृश्चिक आत्मकारक रवी आणि ऊर्जाकारक मंगळ यांच्या नवपंचम योगामुळे जोश, उत्साह वाढेल. घेतलेल्या कामात यश मिळेल. नोकरी व्यवसायात मान, अधिकार मिळवाल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळवताना थोडा त्रास सहन करावा लागेल. प्रयत्नात सातत्य ठेवाल. सहकारी वर्गाची बाजू कमजोर पडेल. कामाच्या नियोजनातील पर्यायी योजना तयार असू द्या. जोडीदार त्याच्या कार्यात यशाची शिखरे सर करेल. त्याच्या आनंदात सहभागी व्हाल. डोके दुखणे, लचक भरणे असे त्रास संभवतात.

धनू चंद्र आणि शुक्र या दोन स्त्री ग्रहांच्या लाभ योगामुळे आपल्यातील उत्कटता सर्वासमोर येईल. भावना आणि कला यांचा सुरेख संगम दिसेल. नोकरी-व्यवसायात कलात्मक सादरीकरण यशस्वी ठरेल. वरिष्ठांचे मन जिंकाल. सहकारी वर्गाचे मोलाचे साहाय्य मिळेल. जोडीदाराला कामानिमित्त प्रवास करावा लागेल. योग्य खबरदारी घ्यावी. अतिरिक्त आत्मविश्वास उपयोगाचा नाही. कौटुंबिक वाद दूर ठेवा. डोळ्यांचे विकार सतावतील. तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

मकर गुरू-चंद्राच्या नवपंचम योगामुळे नव्या ओळखी होतील. हाती घेतलेली कामे मार्गी लागतील. विचारांना चालना मिळेल. नवी दिशा सापडेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे पाठबळ मिळेल.  सहकारी वर्गाच्या लहान-मोठय़ा चुका अंगाशी येतील. गोष्टी वेळच्या वेळी नियंत्रणात ठेवणे आवश्यक! जोडीदाराची कामे धिम्या गतीने पुढे सरकतील. कौटुंबिक वातावरण उत्साही ठेवाल. मणक्याच्या खालील भागावर ताण येईल. व्यायाम आवश्यक!

कुंभ गुरू-शुक्राच्या लाभ योगामुळे ज्ञानाचा आणि कलेचा संगम होईल. तंत्रज्ञानाच्या मदतीने कलेचा चांगला उपयोग करून घ्याल. नोकरी-व्यवसायात अधिकाराचे पद भूषवाल. सहकारी वर्गाला मदतीचा हात द्याल. वरिष्ठांचा विश्वास खरा ठरवाल. जोडीदाराच्या कामाचे आणि कष्टाचे चीज होईल. कुटुंब सदस्य आपापल्या कार्यक्षेत्रांत प्रगती करतील. अतिविचारांनी थकून जाल. डोक्याला विश्रांतीची गरज भासेल. पुन्हा नव्या जोमाने कामाला सुरुवात करू शकाल.

मीन चंद्र-शुक्राच्या युती योगामुळे अडचणींवर मात करण्यासाठी नव्या योजना आखाल. महत्त्वाचे निर्णय ताबडतोब घ्यावे लागतील. नोकरी-व्यवसायात अधिकाराचा योग्य उपयोग कराल. सद्य:स्थितीचे भान ठेवून समाजोपयोगी कार्यात सहभागी व्हाल. जोडीदार अडचणींवर मात करून यश मिळवण्याचे प्रयत्न करेल. कुटुंब सदस्यांना प्रवास योग येईल. सतर्क राहावे. डोळ्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.