सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष चंद्र-गुरूच्या लाभ योगामुळे चंद्राच्या नावीन्याला गुरूच्या ज्ञानाची साथ मिळेल. हाती घेतलेल्या कामातील अडचणीतून मार्ग काढत पुढे जाल. नोकरी-व्यवसायात आपल्या कामाचा ठसा उमटवाल. मेहनतीचे फळ मिळेल. सहकारी वर्गाकडून मदतीचा हात मिळवाल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी मिटेल. कौटुंबिक वातावरणात उत्साह येईल. मुलांच्या प्रगतीच्या वाटा मोकळ्या होतील. प्राणायाम करणे हिताचे ठरेल. आहारावर नियंत्रण ठेवा.

वृषभ चंद्र-मंगळाच्या केंद्र योगामुळे चंद्राचे कुतूहल आणि मंगळाची ऊर्जा यांना एकमेकांची जोड मिळेल. कामाला नव्याने सुरुवात कराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. सहकारी वर्गाला मदत करावी लागेल. कामाव्यतिरिक्त इतर व्याप वाढतील. शांत डोक्याने काम करावे. जोडीदारासह सूर चांगले जुळतील. कौटुंबिक कलहापासून दूर राहा. मुलांना आपल्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल. उत्सर्जन संस्थेसंबंधीचे विकार बळावतील.

मिथुन चंद्र आणि शुक्र या स्त्री ग्रहांच्या युतीयोगामुळे आपल्याच मनाप्रमाणे वागण्याचा आग्रह धराल. चोखंदळपणा वाढेल. मनावर ताबा ठेवा. नोकरी-व्यवसायात शब्द जपून वापरा.  वरिष्ठांचा सल्ला मानावा लागेल. सहकारी वर्गासह थोडे जुळवून घ्यावे. आपले अंदाज चुकतील. जोडीदार त्याच्या कामात चांगले योगदान देईल. कौटुंबिक वातावरण बिघडवू नका. मुलांना योग्य मार्ग सापडेल. उष्णतेचे विकार आणि त्वचेच्या तक्रारी वाढतील.

कर्क भरणपोषणाचा कारक ग्रह रवी आणि संरक्षक शक्तीचा कारक ग्रह मंगळ यांच्या लाभ योगामुळे आरोग्य चांगले राहील. कामातील उत्साह वाढेल. मानसन्मान मिळेल. नोकरी-व्यवसायात अपेक्षित गोष्टी साध्य कराल. सहकारी वर्गाकडून साहाय्य मिळेल. जोडीदाराचे प्रयत्न सफल होतील. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. आर्थिक  बाजू सुधारेल. नातेवाईकांकडून आनंदवार्ता समजतील. सामाजिक कार्यात हिरिरीने सहभागी व्हाल.

सिंह मंगळ-नेपच्यूनच्या केंद्र योगामुळे मंगळाच्या उत्साहाला नेपच्यूनच्या उत्स्फूर्ततेची संगत लाभेल. नवी उमेद निर्माण होईल. परिस्थितीचा आढावा घेऊन योग्य पावले उचलाल. नोकरी-व्यवसायात आपली कर्तबगारी विशेष दिसून येईल. सहकारी वर्गासह वाद वाढवणे हिताचे नाही . वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. जोडीदाराच्या गुणांना वाव मिळेल, परंतु सध्याच्या मर्यादा लक्षात घ्याव्यात. मुलांचे कौतुक कराल. उष्णतेमुळे सर्दीपडसे होईल.

कन्या शनी-बुधाच्या लाभ योगामुळे बुधाच्या व्यवहारी वृत्तीला शनीच्या मुत्सद्दी धोरणांची जोड मिळेल. नियोजनबद्ध आखणी करून विचार कृतीत आणाल. नोकरी-व्यवसायात इतरांवर योग्य नियंत्रण ठेवाल. अपेक्षित व्यक्तींना भेटण्याचे योग येतील.  मुलांना त्याच्या मेहनतीचे फळ मिळेल. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा आधार वाटेल. अचानक ओटीपोटाचे दुखणे उद्भवेल. गरजेनुसार वैद्यकीय सल्ला घ्यावा लागेल.

तूळ ज्ञानाचा कारक गुरू आणि कलेचा कारक शुक्र यांच्या लाभ योगामुळे नव्या संकल्पना आत्मसात कराल. आपले सादरीकरण प्रभावी ठरेल. नोकरी-व्यवसायात काही निर्णयांचा फेरविचार करण्याची गरज भासेल. परिस्थितीशी मिळतेजुळते घेऊन स्वत:सह इतरांचाही उत्कर्ष साधाल. मुलांचे प्रश्न मार्गी लागतील. जोडीदारासह जुळवून घ्याल. गैरसमज दूर होतील. मज्जासंस्थेवर ताण आल्याने मानसिक व भावनिक थकवा जाणवेल. वैद्यकीय सल्ला घ्यावा.

वृश्चिक चंद्र-मंगळाच्या लाभ योगामुळे कृतिशील चंद्राला आक्रमक मंगळाची पूरक  साथ मिळेल. परिस्थितीवर मात करून पुढे जाल. नोकरी-व्यवसायात आपल्याच मताप्रमाणे काम गती घेईल अशी अपेक्षा ठेवू नका. वरिष्ठांचा विश्वास संपादन करावा लागेल. जोडीदाराच्या कष्टाचे चीज होईल. मुलांवर चांगले संस्कार कराल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. डोकेदुखीचा त्रास वाढेल. पित्तप्रकोप होईल. अतिविचार टाळा.

धनू चंद्र-शनीच्या लाभ योगामुळे  शनीच्या चिकाटीला चंद्राच्या कुतूहलाची जोड मिळेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या पाठबळाने आगेकूच कराल. सहकारी वर्ग विशेष मेहनत घेईल. त्यांच्या सूचनांचा जरूर विचार करावा. परिस्थितीमुळे कामे लांबणीवर पडतील. जोडीदारासह वादविवाद टाळावेत. घरासंबंधित कामे मार्गी लागतील. मुलांना योग्य मार्गदर्शन कराल. त्वचा अधिक संवेदनशील होईल. खाज येणे, लाल होणे असे त्रास उद्भवतील. औषधोपचार घ्यावा.

मकर रवी-गुरूच्या लाभ योगामुळे आपल्या संपर्कातील ज्येष्ठ व्यक्तींचा आधार वाटेल. त्यांचा सल्ला लाभदायक ठरेल. नोकरी-व्यवसायात नव्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. सहकारी वर्गाची मनधरणी करणे हे जरी पटत नसले तरी तसे करावे लागेल. जोडीदारासह सूर चांगले जुळतील. मुलांना योग्य दिशा मिळेल. प्रलोभनांपासून सावधान! कुटुंबात उत्साह असेल. वात आणि कफ विकार बळावतील. वैद्यकीय सल्लय़ाने औषधोपचार घ्यावा. आराम पडेल.

कुंभ चंद्र-नेपच्यूनच्या युती योगामुळे बौद्धिक विवादात आपले मुद्दे  ठामपणे मांडाल. संशोधन कार्यात यश मिळेल. नोकरी-व्यवसायात उत्स्फूर्तता वाखाणण्याजोगी असेल. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. सहकारी वर्गाची चांगली साथ मिळेल. जोडीदाराच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. समाजकार्य कराल. कुटुंबातील ज्येष्ठांना आधार द्याल. मुलांच्या गुणांची प्रशंसा होईल. छातीमध्ये कफ दाटेल. उन्हाळी सर्दीमुळे डोके जड होईल. घरगुती उपायांनी आराम पडेल.

मीन चंद्र-बुधाच्या युती योगामुळे विचार आणि भावना यांच्यात समतोल राखाल. भावनांवर नियंत्रण ठेवाल. नोकरी-व्यवसायात काही कामे लांबणीवर पडल्याने त्या कामांसाठी अधिक मेहनत घेता येईल. नेमके बारकावे टिपाल. सहकारी वर्ग विशेष चिकाटीने काम करेल. प्रवासाची संधी  मिळेल. मुलांशी मोकळेपणाने वागावे. जोडीदाराच्या साथीने कौटुंबिक जबाबदाऱ्या पेलून धराल. मानसिक ताण जाणवेल. आपल्या छंदासाठी थोडा वेळ राखून ठेवावा.