15 August 2020

News Flash

सरकारची ग्रहदशा

तीन पक्षांची मोट बांधून सुरू असलेले सध्याचे राज्यातील सरकार टिकेल का, या सरकारपुढची आव्हानं कोणती असतील, ती सरकारला पेलवतील का, सरकारपुढची ग्रहस्थिती कशी आहे अशा

अवघड अशा ग्रहस्थितीमुळे सरकारला अनंत अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

भविष्य विशेष
उदयराज साने – response.lokprabha@expressindia.com

तीन पक्षांची मोट बांधून सुरू असलेले सध्याचे राज्यातील सरकार टिकेल का, या सरकारपुढची आव्हानं कोणती असतील, ती सरकारला पेलवतील का, सरकारपुढची ग्रहस्थिती कशी आहे अशा प्रश्नांची उत्तरे

महाराष्ट्राचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी सायंकाळी सहा वाजून ४३ मिनिटांनी शपथ घेतली. या क्षणापासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा नूरच बदलला. ज्योतिष माध्यमांतून या घडामोडींचा वेध घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत-

‘कुंभ’ राशीतील नेपच्यूनचा यामध्ये प्रामुख्याने वाटा असल्याचे दिसून येत आहे. ‘वृषभ’ लग्न सुरू असताना ही शपथ घेतली गेली. या वेळी लग्नेश शुक्रासहित गोचर ‘गुरू-चंद्र’सुद्धा असल्याने ‘मूळ’ नक्षत्रात होते. या ग्रहांसोबतच ‘शनी-केतु-प्लुटो’ हे सुद्धा असल्याने आज त्यानंतर १४ दिवसांनी नव्या सरकारचे खातेवाटप झाले. या सरकारपुढे अडचणींचे डोंगर उभे असल्याचे दिसून येते, हेच यातून अधोरेखित करावयाचे होते.

शपथविधी कुंडलीत सहा ग्रह अष्टमस्थानात आहेत, तर ‘मंगळ-हर्षल’ प्रतियोगात आहेत. या अवघड अशा ग्रहस्थितीमुळे सरकारला अनंत अडचणींचा सामना करावा लागणार आहे. यात येणारे गोचर आणखी बोचरे होत जाणार आहेत. यात सर्वात प्रथम गोचर रविने १६ डिसेंबरला धनु राशीत प्रवेश केला. यानंतर बरोबर दहा दिवसांनंतर सूर्यग्रहण होत आहे. २६ डिसेंबरला झालेले सूर्यग्रहण महाराष्ट्राच्या कुंडलीत लग्नातच असल्याने जास्त तापदायक आहे. शपथविधी पत्रिकेत अष्टमात होत असल्याने मानसिक आजारपणाला सरकारमधील प्रमुखांना सामोरे जावे लागणार आहे.

शिवसेनेच्या कुंडलीत हे सूर्यग्रहण राशीच्या सप्तमात होत असल्याने मतभेद चव्हाटय़ावर येणार आहेत. या सूर्यग्रहणाचे दीर्घकालीन वैचारिक परिणाम दिसून येतील. हे सूर्यग्रहण अनेक पक्षांत वैचारिक बदलांना सुरुवात करून देईल. सप्तमातील सूर्यग्रहण भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वासमोर तगडे आव्हान उभे करणार आहे. विशिष्ट सामाजिक वर्ग भाजपापासून थोडे अंतर ठेवून होता, ती दरी आणखी रुंदावण्याची शक्यता आहे.

आगामी काळात पक्षाला मोठय़ा संघर्षांला तोंड द्यावे लागणार आहे. त्याची सुरुवात या सूर्यग्रहणाने करून दिली आहे. पक्षाला विशिष्ट प्रश्नांवर ठोस भूमिका घेऊन त्या भूमिकेला चिकटून राहावे लागणार आहे. पक्षात नवे आणि जुने यांचा संघर्ष चांगलाच उफाळून येणार असून, यावर लगेचच मोठा कोणताही उपाय पक्षाला करता येणार नसला, तरी हा वाद वाढणार नाही, याची दक्षता घ्यावी लागणार आहे. भारताच्या ‘कुंभ’ लग्नाच्या पार्लमेंटच्या स्थानातूनच हे ग्रहण होत असल्याने सरकारचा संपूर्ण ढाचा यामुळे बदलण्यास सुरुवात होईल. महाराष्ट्राच्या कुंडलीत लग्नातच येणाऱ्या सूर्यग्रहणामुळे महाराष्ट्रातसुद्धा नवे विचारमंथन सुरू होणार आहे. राज्यातील व्यापारी, मजूर, कामगार वर्ग यांत सध्या असंतोष दिसत आहे. त्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. लहान मुले-स्त्रिया यांची सुरक्षा आणि त्यांचे आरोग्य यासाठी अनेक प्रकारच्या नव्या योजना तयार केल्या जाणार आहेत. बुद्धिजीवी वर्गाला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांना पुढील काळात चांगले प्रोत्साहन आणि शासनाची भरघोस मदत मिळणार आहे.

शपथविधी कुंडलीत लग्नेश शुक्र अष्टमात असल्याने आणि पापग्रहांनी तो बिघडलेला असल्याने राज्याच्या तिजोरीत अपेक्षित उत्पन्न येणार नसल्याचे दिसून येते. महिलांवर होणाऱ्या अत्याचारांनी राज्य सुन्न होणार आहे. या शपथविधी कुंडलीत गोचर ‘गुरू-चंद्र-शुक्र’ अष्टमात आणि मूळ नक्षत्रात असल्याने सामाजिक तसेच मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होणार आहेत. सरकारी वसूल अर्थातच महसुली उत्पन्नात चांगलीच घट दिसून येणार आहे. अनेक प्रकारच्या चांगल्या योजनांच्या निधीपुरवठय़ात विस्कळीतपणा येणार आहे. सामाजिक असंतोषात चांगलीच भर पडणार आहे. शुक्र-केतूच्या मूळ नक्षत्रात तर केतू शुक्राच्या पूर्वाषाढा नक्षत्रात असल्याने समाजातील श्रीमंत लोकांना त्याची चांगलीच झळ बसणार आहे. शपथविधी कुंडलीच्या अष्टमस्थानात गोचर ‘शनी-प्लुटो’ युती असल्याने राज्यात आरोग्याचे गंभीर प्रश्न डोके वर काढणार असून, त्याचा राज्यकर्त्यांना चांगलाच त्रास होणार आहे.

शपथविधी कुंडलीतील आणखी एक मोठा कुयोग म्हणजे ‘मंगळ-हर्षल’ प्रतियोग. या प्रतियोगाला गोचर बुधाचे बळ मिळणार आहे. त्यामुळे हवामानात झपाटय़ाने बदल होतील. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे हवामान अनुभवास येईल. याला आणखी एक कारण घडणार आहे. १५ डिसेंबरला गोचर शुक्राने मकर राशीत प्रवेश केला. यंदा अतिवृष्टी झाल्याने आधीच अनेक ठिकाणी नुकसान झालेले आहे. त्यातच या लहरी हवामानाचा फटका त्यांना बसणार आहे. धान्यांवर रोग आणि दुभत्या जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न चांगलाच सतावणार आहे. अकल्पित रीतीने अनेक प्रश्न अनपेक्षित समोर येतील. त्यात सत्ताधीशांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. मोठे यांत्रिक अपघात, दरोडे, रस्ते तसेच रेल्वे यांवरील मोठे अपघात यात बरीच वाढ होणार असल्याने सत्ताधाऱ्यांवरील जनतेचा रोष आणखी वाढत जाणार आहे. सत्ताधाऱ्यांना कायदा आणि सुव्यवस्था हाताळण्यात मोठय़ा प्रमाणात अपयश येऊ शकते. यामुळेही जनता नाराज होणार असून, त्याचा जाब विरोधक त्यांना विचारणार आहेत. या सरकारमध्ये केवळ शिवसेनाच सामील नसून, ‘राष्ट्रवादी काँग्रेस’सुद्धा अग्रक्रमाने सामील आहे. या पक्षाला सूर्यग्रहण अनुकूल असून त्यांनी सरकारात आपले हात-पाय आणखी पसरण्यास हरकत नसल्याचे दिसून येते. तथापि, पक्षांतर्गत मोठी अस्वस्थता दिसून येणार आहे.

गोचर शनीचे राश्यांतर २४ जानेवारी २०२० ला होणार असून, हा गोचर शनी पक्षाच्या चतुर्थ स्थानातून भ्रमण करणार आहे. तो ‘चंद्र-मंगळ-राहू-गुरू-शनी’ या मूळ कुंडलीतील ग्रहांच्या कुयोगातून जाणार असल्याने तसेच या गोचर शनीचे भ्रमण पक्षाच्या मूळ कुंडलीतील ‘हर्षल-नेपच्यून’वरूनही होणार असल्याने पक्षाला त्याचे परिणाम भोगावे लागणार आहेत. या गोचर शनीचे प्रारंभीचे कुयोग ‘शनी-मंगळ’ केंद्रयोग, ‘चंद्र-शनी’ केंद्रयोग आणि ‘शनी-नेपच्यून’ अशुभ योग हे मूळ कुंडलीतील २०२०चे पहिल्या वर्षांतील मकर-शनीचे योग असून, त्यांच्यामुळे पक्ष फुटीच्या उंबरठय़ावर दाखल होईल. अर्थातच त्याचा सरकारवर गंभीर परिणाम होणार आहे.  त्याच वेळी शिवसेनेच्या कुंडलीतील राहू-भ्रमण निर्णायक टप्प्यांवर येऊन पोहोचले असेल. मार्च २०२० च्या प्रारंभापासूनच ‘शिवसेना-राष्ट्रवादी’ परस्परांना जोरदार टक्कर देण्यास सिद्ध असल्याचे दिसून येईल. याच सुमारास काँग्रेसच्या कुंडलीतसुद्धा हे मिथुनचे राहू-भ्रमण निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचणार आहे. या अगोदरच बदललेला शनी मूळ कुंडलीतील ‘गुरू-प्लुटो-चंद्र-मंगळ’ यांच्या कुयोगातून जाणार असल्याने कोणीही तारतम्य-सबुरी दाखविणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या मूळ कुंडलीत हे गोचर राहू-भ्रमण आणि गोचर शनी-भ्रमण निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचणार आहे. त्यामुळेच चलबिचल प्रचंड वाढणार असून, आता हे कडबोळे सरकार टिकते की पडते असा प्रश्न निर्माण होणार आहे.

याच महिन्याच्या शेवटाला गोचर गुरु २९ मार्चला ‘मकर’ राशीत प्रवेश करेल आणि परस्परांमधील मतभेद कमी करण्याचा जोरदार प्रयत्न सुरू होतील, त्याला चांगले यश मिळत असलेले दिसून येईल. हा गोचर गुरू ‘मुख्यमंत्र्यांसहित-राष्ट्रवादी व काँग्रेस’ यांना गुरुबळ पुरवत असल्याने या सरकारवरील धोका टळलेला दिसून येईल. जून २०२० च्या २९ तारखेला हे अल्पकालीन असलेले गुरुबळ संपणार आहे. त्यानंतर पुन्हा एकदा ‘शनी-राहू’ची जोडी निर्णायक हल्ला करण्यास सिद्ध होईल. यात प्रामुख्याने अवेळी तसेच अवकाळी पाऊस, कर्जमाफी, नव्या योजना साकार करण्यासाठी अगदी तुटपुंजा निधी, नव्या करप्रणालीमुळे वाढलेला असंतोष, वाढती गुन्हेगारी, वाढती बेरोजगारी यांसारख्या समस्या डोके वर काढणार आहेत. त्या सोडविण्यासाठी ठोस उपाय नसल्याने सरकारमधील घटक पक्ष परस्परांवर आरोप-प्रत्यारोप करणार आहेत. १८ जूनला गोचर मंगळ मीन राशीत प्रवेश करणार असून, हे गोचर मंगळ भ्रमण कुयोगाची जोरदार फळे देणार असून, काँग्रेसच्या कुंडलीत हा गोचर मंगळ-चंद्राला बारावा असून, अत्यंत स्फोटक फळे देणारा आहे. शिवसेनेच्या कुंडलीतसुद्धा चंद्राच्या दशमातून आणि मूळ कुंडलीतील शनिवरून भ्रमण करणार असून, पक्षात जोरदार असंतोष तसेच फुटीची खुली भाषा सुरू करून देणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुंडलीत हे मंगळ भ्रमण ताठर भूमिका घेणे भाग पाडणार असून, यामुळे या सरकारला जबरदस्त हादरे बसणार आहेत. २०२० मध्ये ग्रहांची भ्रमणे नव्या सरकारसाठी अधिक स्फोटक फळे देणारी आहेत. १९ सप्टेंबरला गोचर राहूचा वृषभ राशीत होणारा प्रवेश हे त्यातील सर्वात निर्णायक असे भ्रमण आहे. हे राहू-भ्रमण राष्ट्रवादीला अत्यंत तापदायक, तर शिवसेना आणि काँग्रेसला धोकादायक असून, तीनही पक्षांना सारख्याच त्रासाचे असल्याचे दिसत आहे. पण या सरकारला नियतीने पुरते घेरले असूनसुद्धा हे सरकार जे चांगले काम करून दाखविणार आहे. त्यात सर्वात महत्त्वाचे योगदान म्हणजे हे सरकार अत्यंत अपुऱ्या निधीत शेतीच्या संदर्भातील बरीच कामे करून दाखवेल. तसेच महसुलाचा योग्य वापर करून त्याला काटेकोर अशा नियोजनाची जोड देऊन गावपातळीवरील पाणीप्रश्नासाठी हे सरकार भरीव काम करून दाखवेल. सततच्या अशुभ ग्रह-गोचरीला या सरकारला सतत तोंड द्यावे लागणार आहे. सांप्रत त्यांना केतूची दशा सुरू असल्याने तीन पक्षांचे भिन्न विचारांचे हे सरकार आणखी किती काळ चालेल, असाच वाचकांना मुख्य प्रश्न असेल; पण त्याला उत्तर असे द्यावे लागते की, सत्ता माणसाला संयमाचा धडा देते; पण मूळ प्रवृत्तीसुद्धा त्याला शांत राहू देत नाही. गोचर शनी संयमाबरोबरच काटकसरीचे धोरण सत्ताधाऱ्यांकडून राबवून घेणार असून, त्याला हात लावण्याचा प्रयत्न झाल्यास तात्काळ पायउतार व्हावे लागेल. केतूमध्ये राहुची अंतर्दशा सुरू झाल्यावर नव्या सरकारवर ही वेळ येऊ शकते. म्हणजेच पुढील दिवाळीनंतर याची खूणगाठ बांधून राज्य काटकसरीने चालविल्यास कदाचित जास्तीचा कालखंडसुद्धा शनीमहाराज देऊ शकतात. नव्या सरकारची वैशिष्टय़े..

  • घटकपक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याचा सतत प्रयत्न करतील.
  • अकल्पित संकटांचा सामना करण्यासाठी सरकार गोंधळलेले असेल.
  • महसूल कमी राहणार असल्याने आíथक टंचाईशी सामना करावा लागेल.
  • करवाढ-वाढती गुन्हेगारी, नसíगक आपत्ती, अतर्विरोध यामुळे सरकारपुढील अडचणी चांगल्याच वाढणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2020 1:03 am

Web Title: astrology prediction maharashtra government
Next Stories
1 तुमचा मोबाइल नंबर काय सांगतो?
2 युरोपातील ख्रिसमस
3 ख्रिसमस डेस्टिनेशन्स
Just Now!
X