सुनीता साने – response.lokprabha@expressindia.com

आपल्या जन्मतारखेवरून जसे भाग्यांक, प्रारब्ध अंक, महत्त्वाची वष्रे, जीवनाला कलाटणी देणारी वर्षे, शुभ रंग, शुभ तारखा, शुभ अंक शोधून दैनंदिन जीवन सुकर, समृद्ध करण्याचा प्रयत्न केला जातो, तसेच आपले नाव आणि सही जन्मतारखेला सुयोग्य आहे का हे अंकशास्त्रावरून, म्हणजे आपल्या जन्मतारखेवरून जाणून घेता येते.

self awareness in artificial intelligence
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता- स्व-जाणीव
CIDCO lottery winners, possession of home
दोन वर्षांपासून ताबा न मिळालेले लाभार्थी सिडकोच्या दारी
Astrology By Date Of Birth Number 5, 14 and 23 nature and personality
Astrology By Date Of Birth : ५, १४ आणि २३ तारखेला जन्मलेल्या लोकांचा स्वभाव कसा असतो? जाणून घ्या सविस्तर
Reptiles, tigers, Reptiles news, Reptiles latest news,
विश्लेषण : वाघांइतकेच सरपटणारे प्राणीदेखील महत्त्वाचे.. पण तरीही ते दुर्लक्षित का असतात?

जन्मतारखेत असलेल्या अंकांएवढेच नसलेले अंकही महत्त्वाचे असतात. कारण त्या अंकांचे फायदे, गुणधर्म आपल्याला मिळत नाहीत. नसलेले अंक ज्याला आपण मिसिंग नंबर म्हणतो, ते वास्तूमध्ये काही दोष किंवा उणिवा दाखवतात. कधी कधी तिथे चुकीच्या वस्तूदेखील ठेवलेल्या आढळतात. अर्थात प्रत्यक्ष वास्तू बघताना तिथली स्पंदने जाणवतातच, हे मात्र नक्की. पण अंकांच्या साहाय्याने वास्तुरचनेतील काही उणिवा सहज लक्षात येतात.

शहरांत राहताना जसे घर मिळेल, तसे घेणे क्रमप्राप्त ठरते. त्यामुळे त्यातील दोषनिवारण करणे फार महत्त्वाचे आहे. वास्तूतील दोष म्हणजे दिशा वाढ आणि कट असणे, विदिशा वास्तू असणे, दिशा बंद असणे, योग्य ठिकाणी खिडक्या नसणे, सूर्यप्रकाश घरात न येणे, मोठय़ा झाडांची सावली घरावर पडणे, आजूबाजूला इमारती असणे, जागेचा अभाव, खिडक्या समोरासमोर असल्याने सतत पडदे लावावे लागणे, देवघर, बेडरूम, स्वयंपाकघर, बाथरूम, टॉयलेट यांच्या जागा चुकीच्या असणे, घराचा मुख्य दरवाजा चुकीच्या स्थानी असणे, खूप अडगळ असणे, खूप वस्तू नुसत्या खरेदी करून ठेवलेल्या असणे अशांपकी काहीही असू शकते.

मिसिंग नंबरचे अंक, त्यांचे तत्त्व आणि तिथे ठेवलेल्या वस्तू यांचा ताळमेळ आहे, का हेदेखील पाहावे लागते. हे जाणून घेण्यासाठी आपण त्या अंकांच्या दिशा आणि त्यांची तत्त्वे पाहू या.. या ग्रीडचे वैशिष्टय़ म्हणजे यातील अंकांची बेरीज कशीही उभी, आडवी, तिरकी केली तरी ती १५च येते. (यामध्ये फक्त १ ते ९ अंक घेतले आहेत. ० घेतलेले नाही.)

वास्तूमध्ये या तत्त्वांचा समतोल खूप महत्त्वाचा असतो. पंचतत्त्वाने आपले जीवन, वसुंधरा, परिसर संतुलित राहतो. पंचतत्त्वांपकी कोणतेही एक तत्त्व अधिक झाले किंवा कमी झाले तर त्याचा आपल्याला त्रास होतो. जसे की पाऊस खूप पडला तर ओला दुष्काळ पडतो आणि पाऊस पडला नाही तर दुष्काळ पडल्याने शेतीला पाणी मिळत नाही. शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाले तर घशाला कोरड पडते, त्वचेच्या समस्या  वाढतात. ते जास्त झाले तर सर्दीचा त्रास होऊ शकतो, मूत्रपिंडांवर अतिरिक्त ताण येणे असे त्रास होऊ शकतात.

वास्तूमध्ये योग्य दिशेला योग्य ते तत्त्व, वस्तू, रंग नसल्यास त्याचा त्रासच होतो. अर्थात आपण हे फक्त जन्मतारखेवरून सांगत आहोत. जिथे जलतत्त्व हवे, तिथे जर अग्नितत्त्व (टॉर्च, काडेपेटी, सजावटीचे दिवे) खूप प्रमाणात असतील किंवा जलतत्त्वाच्या जागी अग्नितत्त्वाचे रंग दिले असतील तर असंतुलन होते. आपल्या घरात असे घडत असेल तर ते तत्त्व नीट संतुलित ठेवणे खूप महत्त्वाचे आहे.

आपल्या जन्मतारखेत कोणते अंक नाहीत, हे कसे बघायचे ते पुढील उदाहरणावरून लक्षात येईल. समजा एखाद्या तारखेत कोणताही एक अंक तीन, चार किंवा त्याहून अधिक वेळा आला, उदाहरणार्थ २०-०२-२०१० तरी त्या जातकाच्या वास्तूमध्ये त्या अंकाच्या दिशेत काही बिघाड आढळतो. जन्मतारीख जर ०६-०८-१९९७ असेल तर त्याची कुंडली पुढीलप्रमाणे आहे. ६+८+१+९+९+७ = ४०. ४ हा अंकसुद्धा घ्यायचा आहे. म्हणजेच या तारखेत ६,८,१,९,७,४ हे अंक आहेत. तर २,३,५ हे अंक मिसिंग आहेत.

२ हा अंक वास्तूमधील नऋत्य दिशादोष दाखवतो. इथे जड वस्तू असणे अपेक्षित आहे. ही जागा हलकी नसावी, दरवाजा नसावा. अन्यथा नातेसंबंध, पार्टनरशिप यशस्वी होण्यात अडचणी येतात.

५ हा अंक वास्तूतील ब्रह्मस्थान दाखवतो. वास्तूतील ब्रह्मस्थान नेहमी रिकामे/ मोकळे असावे, तिथे कोणतीही जड वस्तू नसावी. तसेच हा अंक नसल्यामुळे पोटाचे त्रास संभवतात. जसे आपले घर ही वास्तू असते, तसेच आपले शरीर हीसुद्धा एक स्ववास्तू आहे. शरीराचे ब्रह्मस्थान म्हणजे नाभी आहे.

३ अंकाचा अभाव असल्यास पूर्व दिशा बंद असणे, सूर्यकिरण घरात येण्यासाठी मोकळी जागा नसणे, खिडकी नसणे, जड वस्तू ठेवलेल्या असणे अशी स्थिती आढळते. घरात आजारपण, औषध घेण्याचे प्रमाण जास्त आढळते. सौर ऊर्जेचा अभाव आढळतो.

१ अंकाचा अभाव असल्यास, उत्तर दिशा मोकळी नसते, दिशा बंद आढळते. जलतत्त्वाऐवजी अग्नितत्त्व जास्त प्रमाणात वाढलेले असते. तसेच करिअरमध्ये अडचणी निर्माण होतात. वडिलांशी पटत नाही.

४ अंक हा आग्नेय दिशा दाखवतो. आग्नेय दिशेला स्वयंपाकघर असावे, पण फ्लॅट सिस्टममुळे ते सर्वत्र शक्य होतेच असे नाही. हा अंक नसल्यास आíथक ओढाताण खूप होते. (अंकशास्त्रात ४ आणि ८ अंकांना उशीर लागतो म्हणून खूप लोक ते अंक नको म्हणतात. पण हे अंक नसल्यास चुकीच्या आíथक उलढाली झालेल्या बघायला मिळतात किंवा पसे बुडणे, उधारी वसूल न होणे, आपलेच पसे योग्य वेळी उपलब्ध न  होणे, योग्य किमतीला जागा विकली न जाणे असे घडताना दिसते.)

६ अंक नसल्यास घरातील वायव्य दिशा दूषित आढळते. अशा लोकांना प्रवासात त्रास होतो, कागदपत्रे नीट जपून ठेवावी लागतात. मदतीचा हात मिळत नाही. घरातील फोन या दिशेला ठेवल्यास राँग नंबर खूप येतात. टीव्ही, फ्रिज, मिक्सर किंवा कोणतीही उपकरणे वरचेवर बिघडतात.

७ अंक जन्मतारखेत नसल्यास मुलांची तब्येत वरचेवर बिघडते. अशा व्यक्ती नवीन गोष्टींना सामोरे जाताना खूप घाबरतात. उदाहरणार्थ ऑनलाइन पद्धतीने कामे करणे टाळणे, अनोळखी व्यक्तींना भेटण्यात टाळाटाळ करणे, नवीन जबाबदारी स्वीकारायला घाबरणे, कृतिशीलता कमी असणे इत्यादी.

८ अंक नसल्यास त्या जातकाला अभ्यास करायचा कंटाळा येतो, आध्यात्मिक रुची कमी असते. हा अंक पृथ्वीतत्त्वाखाली येत असल्याने आíथक उलाढाली खूप असल्या तरी श्री शिल्लक कष्टांच्या तुलनेत खूप कमी असते. यांनी घर खरेदी करताना शक्यतो तयार घर (रेडी पझेशन) घ्यावे, स्वत बांधून राहायचे ठरवल्यास अडचणी खूप येतात. ईशान्य दिशेला देवघर नसते, बेडरूम आढळते, देव स्वयंपाकघरात किंवा कोनाडय़ात ठेवलेले असतात. रोज पूजा करायचा कंटाळा आढळतो. धार्मिक गोष्टी घरात होत नाहीत किंवा इतर करत असतील तर त्या फारशा पटत नाहीत.

९ अंक हा दक्षिण दिशा दाखवतो. मोठय़ा खिडक्या, पाण्याची टाकी असणे, लाल रंगाचा अतिरिक्त वापर हा अंक नावलौकिक (फेम) दाखवतो. त्यामुळे जन्मतारखेत हा अंक नसलेल्यांना नेम आणि फेम मिळवण्यात अडचणी येतात. आपल्या कामाचे कौतुक न होणे, नावाला वलय न मिळणे, कुप्रसिद्धी असे घडू शकते.

२००० सालापासून जन्मलेल्या व्यक्तींच्या जन्मतारखेत १ आणि ९ अंक नाहीत. (अपवाद २०१९ साल). त्यामुळे त्यांना १ आणि ९ अंकाचे फायदे मिळणार नाहीत. ज्यांच्या जन्मतारखेत १ अंक नसेल अशा व्यक्तींना स्वत:चे व्यक्तिमत्त्व सादर करणे कठीण होईल. त्यांना अहंकार, अभिमान, इगोमुळे निर्माण होणाऱ्या समस्या उद्भवणार नाहीत आणि त्यांचा बहुतांश वेळ इतरांना मदत करण्यात, त्यांचे भले करण्याचा सर्जनशील प्रयत्न करण्यात जाईल. ठेविले अनंते तैसेची राहावे वृत्ती वाढत जाणार आहे.

ज्यांच्या जन्मतारखेत ९ अंक नसेल अशा व्यक्ती असंवेदनशील, इतरांपासून अलिप्त, इतरांच्या गरजांकडे दुर्लक्ष करणाऱ्या असतील. त्यांनी व्यवहारात, जीवनात अधिक प्रामाणिक असणे, संवेदनशील असणे खूप महत्त्वाचे ठरणार आहे.

आपली वास्तू तथास्तू म्हणत असते, म्हणून वास्तूमध्ये शुभ बोलणे, चांगले काम करणे, मन प्रसन्न राहील असे वातावरण ठेवणे खूप आवश्यक आहे. अंकशास्त्राच्या आधारे, नसलेल्या अंकांचे फायदे मिळवून आपले जीवनमान उंचावून स्वतला वलयांकित कसे ठेवता येईल हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.