सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com
मेष शुक्र हर्षलचा केंद्र योग हा स्वच्छंदपणे आणि मनमोकळेपणाने जगण्याचा उत्साह देणारा योग आहे; परंतु मर्यादा ओलांडू नका. नोकरी- व्यवसायात अतिस्पष्ट बोलण्याची गरज नाही. नातीही महत्त्वाची आहेत याचे भान ठेवाल. वरिष्ठांसह जुळवून घ्याल. सहकारी वर्गाच्या तक्रारी समजून घ्याल. जोडीदार त्याच्या कामाच्या व्यापाने त्रस्त होईल. मुलांसाठी अधिक खर्च कराल. आहारात ऋतुमानानुसार बदल करावेत.

वृषभ चंद्र शनीचा नवपंचम योग हा मुत्सद्दीपणाचा लाभ देणारा योग आहे. नोकरी- व्यवसायात आपले विचार ठामपणे मांडल्याने वरिष्ठांचा आपल्यावरील विश्वास दृढ होईल. नव्या संधींची आता थोडाच काळ वाट पाहावी लागेल. सहकारी वर्गासह तार जुळेल. मित्रमंडळाच्या मदतीला उभे राहाल. जोडीदाराची प्रगती कौतुकास पात्र असेल. डोळय़ांची विशेष काळजी घ्यावी. वैद्यकीय सल्ला आवश्यक!

unclean water supply, Thane, Rumors of unclean water,
ठाणे, कल्याणात अशुद्ध पाणीपुरवठ्याची अफवा; पालिका प्रशासन म्हणाले, अफवांवर विश्वास ठेऊ नका
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
Like daughter even daughter in law can get job on compassionate basis
मुलीप्रमाणेच सुनेलासुद्धा अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळू शकते…
Shukra Transit: 31 March Malavya Rajyog In Meen Rashi
३१ मार्चपासून मालव्य राजयोग बनल्याने ‘या’ राही कमावतील प्रेम, पैसे व प्रतिष्ठा; धनलक्ष्मीच्या आवडत्या राशी कोणत्या पाहा?

मिथुन बुद्धीचा कारक बुध आणि ज्ञानाचा कारक गुरू यांचा युती योग हा विवेक बुद्धीचा उपयोग करणारा योग आहे. स्वार्थ बाजूला सारून आपल्या ज्ञानाचा लोककल्याणासाठी उपयोग कराल. नोकरी- व्यवसायात आपले पुरोगामी विचार सर्वानाच पटतील असे नाही. वरिष्ठांचे मत जाणून घ्याल. सहकारी वर्गासह जुळवून घ्याल. जोडीदाराच्या कार्याला गती मिळेल. नवे संकल्प हाती घ्याल. 

कर्क चंद्र शुक्राचा केंद्र योग हा विचार आणि भावना यांच्यात द्विधा स्थिती निर्माण करणारा योग आहे. अशा वेळी विवेकबुद्धी जागरूक ठेवावी. बदलत्या परिस्थितीकडे बघून मगच निर्णय पक्का करावा. नोकरी- व्यवसायात मोठी उलाढाल होईल. डोकं शांत ठेवणे गरजेचे! सहकारी वर्गाकडून अपेक्षित मदत मिळेल. जोडीदाराचे त्याच्या कामाच्या ठिकाणी वर्चस्व वाढेल. मुलांच्या बाबतीत प्रगतिकारक घटना घडतील.

सिंह चंद्र हर्षलचा समसप्तम योग हा वैविध्यपूर्ण विचार करणारा योग आहे. चाकोरीपलीकडील संकल्पना मांडाल. नोकरी- व्यवसायात वरिष्ठ अधिकारी आपल्या बाजूने कौल देतील. सहकारी वर्गासाठी मदतीचा हात पुढे कराल. जोडीदाराच्या मेहनतीचे चीज होईल. मुलांच्या बाबतीत योग्य निर्णय घ्याल. रखडलेली कामे लवकरात लवकर सुरू करावीत. सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून एखादे कार्य हाती घ्याल.

कन्या चंद्र शुक्राचा नवपंचम योग हा कलात्मक दृष्टिकोन देणारा योग आहे. निसर्गाच्या सान्निध्यात मन रमेल. मित्रपरिवारासह वेळ आनंदात जाईल. नोकरी- व्यवसायात कामाच्या व्यापातही स्वत:चा उत्साह जपाल. वरिष्ठांच्या सूचना तंतोतंत पाळाल. जोडीदाराच्या योजनेचा महत्त्वाचा भाग पूर्ण होईल. मुलांना मेहनतीचे महत्त्व पटेल. कौटुंबिक वातावरण आनंदी आणि उत्साही राहील. कफकारक गोष्टी टाळाव्यात.

तूळ चंद्र मंगळाचा केंद्र योग हा उत्साहवर्धक योग आहे. रेंगाळलेली, रखडलेली कामे पूर्ण करण्यात रस दाखवाल. अडचणींवर मात करत पुढे जाणे हेच हिताचे ठरेल. नोकरी- व्यवसायात आपल्या मताला मान मिळेल. व्यावसायिक नातेसंबंध जपाल. वरिष्ठ आणि सहकारी वर्गाकडून आवश्यक तो पािठबा मिळाल्याने सरकारी कामे गतिमान होतील. जोडीदाराची चिडचिड वाढेल. डोळय़ांची विशेष काळजी घ्यावी.

वृश्चिक रवी चंद्राचा  नवपंचम योग आपले नावलौकिक, कीर्ती पसरवेल. ज्ञानाचा उपयोग करून आपल्या कार्यक्षेत्रात मोठी कामगिरी पार पाडाल. नोकरी- व्यवसायात वरिष्ठांचा विश्वास खरा करून दाखवाल. सहकारी वर्गाकडून फारशा अपेक्षा न ठेवता कामाचा व्याप उचलाल. दातांसंबंधित तक्रारी वाढतील. वैद्यकीय तपासणीची गरज भासेल. जोडीदारासह प्रवासयोग संभवतो.राग, रुसवा-फुगवा नको.

धनू चंद्र बुधाचा नवपंचम योग हा बुद्धीला चालना देणारा योग आहे. समयसूचकतेचा उपयोग करून वादंग टाळाल. नोकरी- व्यवसायात उत्साहवर्धक वातावरण निर्माण कराल. वरिष्ठांचा विश्वास खरा ठरवाल. त्यांच्याकडून कामाची पोचपावती मिळेल. सहकारी वर्गावर पूर्णत: विसंबून राहू नका. जोडीदाराच्या कर्तृत्वाचे कौतुक होईल. मुलांना शिस्त आणि संस्कारांचे महत्त्व पटवून द्याल. 

मकर चंद्र मंगळाचा नवपंचम योग हा उत्साह, आनंद आणि धैर्य देणारा योग आहे. अभ्यासविषयक क्षेत्रात एकाग्रता वाढवण्याचा प्रयत्न कराल. नोकरी- व्यवसायासंबंधित कामकाजात दिरंगाई होईल. योग्य निर्णय घेऊन कामे मार्गी लावणे फार गरजेचे भासेल. सहकारी वर्गाचे साहाय्य मिळेल. जोडीदारावरील कामाचा ताण वाढेल. प्रदूषणामुळे व उष्णतेमुळे डोळय़ांचे आरोग्य बिघडेल.

कुंभ चंद्र गुरूचा नवपंचम योग आपल्या ज्ञानाचा उपयोग योग्य प्रकारे करणारा योग आहे. सामाजिक कार्यात मन रमेल. नोकरी- व्यवसायात कष्टाचे आणि सातत्याचे फळ नक्की मिळेल. वरिष्ठांनी महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यापूर्वी त्यांना पर्यायी मार्ग सुचवाल. जोडीदाराला कामानिमित्त प्रवास योग येईल. मुलांची वागणूक कौतुकास्पद असेल. मित्रपरिवारासाठी वेळ राखून ठेवाल.

मीन रवी चंद्राचा समसप्तम योग हा आपले गुण इतरांसमोर सादर किंवा व्यक्त करण्याची संधी देणारा योग आहे. ताणतणाव दूर ठेवून विश्रांती घेण्याची आवश्यकता भासेल. नोकरी- व्यवसायात वरिष्ठ अतिबारकाव्याने आपल्या कामातील त्रुटी शोधतील. सहकारी वर्ग आपल्या पाठीशी उभा राहील. जोडीदाराच्या कामातील बाबी त्याला पुनर्विचार करायला लावतील. मुलांच्या कामात वा अभ्यासात प्रगती दिसेल.