दि. १९ ते २५ मे २०१७

व्यापार-उद्योगाच्या क्षेत्रात तुम्हाला धडाडीचे काम करावेसे वाटेल.

Astrology
राशिचक्र

मेष ज्या व्यक्तीचा सहवास तुम्हास बराच काळ लाभला होता, त्या व्यक्तीच्या लांब जाण्या01vijay1मुळे एक प्रकारची पोकळी जाणवेल. व्यापार-उद्योगाच्या क्षेत्रात तुम्हाला धडाडीचे काम करावेसे वाटेल. नवीन गुंतवणूक अपरिहार्य होईल. नोकरीच्या ठिकाणी तुम्हालाच स्वयंभू बनावे लागेल. घरामध्ये त्याच त्याच विषयावर पुन्हा पुन्हा चर्चा झाल्याने तुम्हाला थोडासा कंटाळा येईल. देणीघेणी, डागडुजीकरिता चार पसे राखून ठेवा.

वृषभ कल्पनेच्या विश्वामध्ये रमणारी तुमची रास नाही. व्यक्तिगत बाबतीत तुम्ही थोडेसे हळवे बनाल. व्यापार-उद्योगाच्या क्षेत्रात आठवडय़ाची सुरुवात आणि शेवट तुमच्या दृष्टीने लाभदायक ठरेल. आपण केलेल्या कष्टाचे चीज झाले आहे असे तुम्हाला वाटेल. कामगारांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे लागेल. नोकरीमध्ये एखादे काम पूर्ण करण्याकरता तुम्ही अथक मेहनत घ्याल. तुमचा कामाचा दर्जा उत्तम राहील. घरामध्ये एखादा बेत ठरवताना गरमागरम चर्चा होईल. तुम्ही तुमचे विचार इतरांना पटवून द्याल.

मिथुन ग्रहमान तुमच्यातील उत्साह वाढवणारे आहे. आपल्या मनातील इच्छा साकार करण्याकरता तुमची आता धाडस करण्याची तयारी असेल. व्यवसाय-उद्योगात काही कारणांमुळे जुन्या हितसंबंधांना रामराम ठोकावा लागेल. नवीन तंत्रज्ञान तुम्ही जितक्या लवकर शिकाल तितका तुमचा फायदा अधिक होईल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्याकडे बरेच काम असेल, पण वरिष्ठ एखादी नवीन टूम काढतील. घरामधल्या व्यक्तींसमवेत पूर्वी ठरवलेला कार्यक्रम रद्द होण्याची शक्यता आहे.

कर्क एखाद्या अवघड प्रश्नावर विचार करून तुम्ही एखादा तोडगा शोधून काढता. या आठवडय़ामध्ये याच कारणामुळे तुमच्या बुद्धीचा कस लागेल. व्यापार-उद्योगात जे पसे अपेक्षित आहेत ते शक्यतो ताबडतोब वसूल करा. नोकरीच्या ठिकाणी तुमचा कामाचा वेग आणि उत्साह वाखणण्याजोगा असेल. जी गोष्ट तुम्हाला आवडते ती करायला गेल्यामुळे तुमची तक्रार नसेल. नवीन नोकरीचा प्रयत्न ताबडतोब करा. घरामध्ये इतरांच्या कलाने वागणे भाग पडेल.

सिंह आपल्या जीवनात जेव्हा काहीतरी चांगले घडत असते त्या वेळी ते प्रिय व्यक्तींबरोबर शेअर करावे असे वाटते. व्यापार-उद्योगात एखादी जुनी वसुली झाल्याने दीर्घकाळाची देणी देता येतील. नोकरीच्या ठिकाणी अधिकारांचा गरवापर करण्याचा मोह अनावर होईल. सरकारी आणि वरिष्ठ यांच्याशी जपून बोला आणि वागा. घरामध्ये जोडीदाराशी किरकोळ कारणावरून रुसवेफुगवे होतील. सारवासारव करून वेळ मारून न्याल.

कन्या काम कोणतेही असो त्यामध्ये यश मिळविण्याची तुम्हाला खात्री वाटेल. ज्या व्यक्तींनी पूर्वी तुम्हाला विरोध केला होता त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल. व्यापार-उद्योगात कामकाज सुधारण्याकरिता तुम्ही प्रयत्नशील राहाल. पशाची आवक थोडीफार सुधारेल. नोकरीमध्ये संस्थेच्या गरजेनुसार तुमच्या कामाच्या स्वरूपामध्ये फेरफार केले जाण्याची शक्यता आहे. घरामध्ये एखाद्या सदस्याला  आश्वासन दिले असेल तर ते तुम्ही पूर्ण कराल. प्रिय व्यक्तींशी गाठीभेटी झाल्यामुळे तुम्हाला वेगळेपण जाणवेल.

तूळ ज्या गोष्टी लांबल्या होत्या त्या पूर्ण करण्याकरिता तुम्हाला उसने अवसान आणून काम करावे लागेल. व्यापार-उद्योगात जे काम तुम्ही पूर्वी पूर्ण केले होते त्याचे पसे मिळण्याची शक्यता दिसू लागेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांना खूश ठेवण्यासाठी न आवडणारे काम तुम्हाला करावे लागेल. नेहमीच्या कामाकडे थोडे जरी दुर्लक्ष झाले तरी गडबड-गोंधळ उडेल. घरामध्ये एखाद्या विषयावर गरसमज झाला असेल तर तो दूर करण्याचा प्रयत्न कराल.

वृश्चिक मानलं तर समाधान अशी तुमची स्थिती आहे. जरा वातावरण सुधारले म्हणून तुम्ही खूश असाल तेवढय़ात पुन्हा काहीतरी बिनसण्याची शक्यता आहे. व्यापार-उद्योगात चार पसे हातात खुळखुळल्यामुळे तुमच्या मनामध्ये वेगवेगळे तरंग उठतील. पण एखादा अनपेक्षित खर्च तुम्हाला कोडय़ात टाकेल. नोकरीच्या ठिकाणी कोणावरही जास्त अवलंबून राहू नका. घरामध्ये मौजमजेच्या वेळेला सर्वजण पुढे येतील. कामाच्या वेळी मात्र तुम्ही एकटे पडाल. प्रिय व्यक्तीशी खटके उडतील.

धनू दुसऱ्यावरी जो विसंबला त्याचा कार्यभागही संपला या म्हणीची आठवण ठेवा. व्यापार-उद्योगात  धक्कास्टार्ट या पद्धतीचा अवलंब करावा लागेल. भागीदारी किंवा मत्रीकराराचे प्रस्ताव पुढे येतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुम्हाला एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर अशी सर्कस करायला लावतील. घरामध्ये तुमचा रोखठोक स्वभाव इतरांना आवडणार नाही. पण तुम्ही त्यांची जास्त पर्वा करणार नाही.

मकर समुद्रामध्ये दोन ओंडके एकत्र येतात आणि पुढल्याच क्षणी एक लाट आल्यामुळे एकमेकांपासून लांब जातात. या आठवडय़ात तुम्हाला थोडाफार असा अनुभव येईल. व्यापार-उद्योगात एखादे नवीन काम मिळाल्याने जुन्या कामाला राम राम ठोकावासा वाटेल. घाईने निर्णय न घेता विचारपूर्वक कृती करा. नोकरीच्या ठिकाणी विशिष्ट प्रोजेक्टच्या निमित्ताने नवीन व्यक्तींशी ओळखी होतील. त्यांच्याकडून तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळेल. घरामध्ये मौजमजेचा माहोल असेल.

कुंभ ग्रहमान संमिश्र आहे. करिअर आणि तुमचे घर या दोन आघाडय़ांवर तुम्हाला वेगवेगळे अनुभव येतील. व्यापार-उद्योगाच्या क्षेत्रात भरपूर काम करावेसे वाटेल. बँक किंवा मित्रमंडळींकडून खेळत्या भांडवलाची सोय होईल. नोकरीमध्ये वेगळ्या पद्धतीचे काम हाताळण्याकरिता नवीन वातावरणाशी जुळवून घ्यावे लागेल. एखाद्या जुन्या सहकाऱ्यापासून ताटातूट होईल. घरामध्ये शब्दाने शब्द वाढतो हे लक्षात ठेवून वादविवाद टाळा. एखाद्या शुभकार्याला तुमची हजेरी लागेल.

मीन माणसांचा लळा तुम्हाला फार पटकन लागतो. किंबहुना तोच तुमचा एकमेव आधार असतो. काही कारणाने या आठवडय़ात आपुलकीच्या व्यक्तीपासून लांब जावे लागेल. व्यापार-उद्योगातील प्रगती चांगली असेल. नवीन तंत्रज्ञान शिकावे लागेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. नोकरीच्या ठिकाणी संस्थेमधील घडामोडींमुळे वेगळ्या ठिकाणी हजर राहाल. घरामध्ये एखादे कार्य संपन्न झाल्यामुळे घरातील वातावरण बदलेल.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Astrology 19th to 25th may

ताज्या बातम्या