scorecardresearch

Premium

भविष्य : दि. २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०१८

तुमच्या वागण्यात आणि बोलण्यात एक प्रकारचा विपर्यास दिसून येईल.

भविष्य : दि. २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०१८

विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

मेष तुमच्या वागण्यात आणि बोलण्यात एक प्रकारचा विपर्यास दिसून येईल. आपण खूप काम करायचे, असे तुम्ही मनाशी ठरवाल; पण प्रत्यक्ष वेळ आल्यानंतर थोडीशी मौजमजा कराल. व्यापार-उद्योगात निष्णात व्यक्तीचा सल्ला घेतल्याशिवाय मोठी गुंतवणूक करू नका. नोकरीमध्ये कामाचा उरक चांगला असेल, पण थोडीशी फुरसत न मिळाल्यामुळे तुमची चिडचिड होईल. घरामध्ये जोडीदाराच्या सल्ल्याला महत्त्व द्या.

gurupatwant singh pannu residence raid
Canada vs India: कॅनडात भारतीयांना धमकावणाऱ्या गुरपतवंत सिंग पन्नूच्या घरी NIA ची धाड; जप्तीची कारवाई!
justin trudea canada india conflict
Video: “जस्टिन ट्रुडोंनी फार मोठी चूक केलीये”, अमेरिकेतील अभ्यासकांनी सांगितलं कारण; म्हणे, “हे म्हणजे मुंगीनं…”!
Gautami Patil
“आम्हाला वाचवण्याच्या ऐवजी बाउंसर…” गौतमी पाटीलनं सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “ती भीतीदायक परिस्थिती…”
hardeep singh nijjar murder case canada allegations on india
Video: “जे अमेरिकेनं लादेनबाबत केलं, तेच भारतानं…”, कॅनडाच्या आरोपांवर माजी अधिकाऱ्याचा अमेरिकेला घरचा आहेर; म्हणे, “स्वत:लाच फसवू नये”!

वृषभ एखादे काम आठवडय़ाच्या सुरुवातीला सहज आणि सोपे वाटेल, पण ते पूर्ण करण्याकरिता तुमची बरीच धावपळ होईल. व्यापारउद्योगात अवघड काम मार्गी लावण्याकरिता मध्यस्थांचा उपयोग करावा लागेल. छोटय़ा प्रवासाचे योग संभवतात. नोकरीमध्ये तुम्ही केलेल्या सूचना वरिष्ठांना आवडतील; पण त्यामुळे तुमचेच काम वाढणार नाही याची खबरदारी घ्या. घरामध्ये जोडीदाराचे हट्ट पुरवावे लागतील.

मिथुन मनात आलेली इच्छा पूर्ण झाली, की जो आनंद मिळतो तो काही वेगळाच असतो. या आठवडय़ात नेमके उलटे होणार आहे. जे तुम्हाला करायचे आहे ते तुम्हाला करता येणार नाही. व्यापारउद्योगात ‘कळतं पण वळत नाही’ अशी तुमची परिस्थिती असेल. मनातल्या योजना साकार करण्याकरिता आवश्यक ते भांडवल मिळणार नाही. नोकरीमध्ये  प्रत्येक काम पूर्ण करताना तुमच्या बुद्धीचा कस लागेल. मन आणि शरीर खंबीर ठेवा.

कर्क स्वभावत: तुम्ही अत्यंत साधे आणि काटकसरी आहात. व्यापारउद्योगात काही कामे तुम्ही तुमच्या तत्त्वाविरुद्ध जाऊन कराल. जनसंपर्क आणि प्रसिद्धी या गोष्टींकडे तुमचे विशेष लक्ष असेल. नोकरीच्या ठिकाणी ठरविलेले काम विशिष्ट वेळेत पूर्ण कराल. उरलेल्या वेळात संस्थेमधल्या सामूहिक कामात लक्ष घालाल. घरामध्ये प्रत्येकाची आवडनिवड वेगळी असल्याने त्याचा विचार करून खरेदीचे बेत आखाल.

सिंह कायम आनंदी आणि उत्साही राहणारी तुमची रास आहे. हा तुमचा स्वभाव या आठवडय़ामध्ये विशेषरूपाने दिसून येईल. पशाची थोडीशी उधळपट्टी कराल. व्यापारउद्योगात सगळी कामे एकटय़ाने करण्याच्या भानगडीत पडू नका.   नोकरीच्या ठिकाणी तुम्ही स्वत: काम न करता उंटावरून शेळ्या हाकाल. घराची सजावट वगरे गोष्टींत स्वत: जातीने लक्ष घालाल. दीर्घकाळानंतर एखाद्या लांबच्या नातेवाईकांशी गाठभेट होईल.

कन्या प्रत्येक काम एखाद्या विशिष्ट पद्धतीने आणि वेळेत पार पाडण्यावर तुमचा भर असतो. या आठवडय़ात इतरांच्या सोयीकरिता तुम्हाला थोडीशी तडजोड करावी लागेल. व्यापारउद्योगात नजीकच्या भविष्यात मोठे काम करण्यासाठी तुम्हाला जादा भांडवलाची गरज भासेल. नोकरदार व्यक्तींनी सहकाऱ्यांना मदत करण्यापूर्वी स्वत:ची कामे पूर्ण करावीत. घरामध्ये सर्वाना आवडणारा एखादा कार्यक्रम ठरेल. वातावरण चांगले असेल.

तूळ तुमचे विचार आणि कृती यामध्ये समन्वय राहणे कठीण आहे. त्यामुळे तुमच्यावर ‘दुसऱ्या सांगे तत्त्वज्ञान आपण कोरडे पाषाण’ अशी टीका होण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी शक्यतो कोणत्याही घोषणा आधी करू नका. व्यापार-उद्योगाच्या कामात तुमची बुद्धिमत्ता आणि सौंदर्यदृष्टी दिसून येईल. नोकरीच्या ठिकाणी  इतरांना सल्ला देण्यापूर्वी स्वत:चे काम नीट करा.  घरामध्ये कोणालाही शब्द देण्यापूर्वी विचार करा.

वृश्चिक तुमच्या राशीतील बुद्धिमत्तेचा वापर तुम्ही गरजेनुसार करता, पण त्याविषयी आधी घोषणा करत नाही. या आठवडय़ात याचा प्रत्यय येईल. व्यापारउद्योगात आठवडय़ाची सुरुवात थोडीशी खर्चीक होईल; हातातले पसे काटकसरीने वापरा. नोकरीच्या ठिकाणी जे काम इतरांना जमले नाही ते काम तुम्ही करून दाखवाल.  घरामध्ये मात्र तुमच्या अधिकार गाजवण्याच्या स्वभावामुळे जोडीदाराशी रुसवेफुगवे होतील.

धनू तुमच्या मनामधील चांगले विचार कृतीमध्ये उतरवण्याची तुम्हाला घाई असेल; पण त्यामध्ये अडथळे आल्यामुळे मधूनच तुम्हाला निराशा येईल. अशा वेळेला तुमच्यामधली धार्मिकता जागृत होईल. व्यापारउद्योगात कॉपी करायचा प्रयत्न करू नका. आठवडय़ाच्या शेवटी मोठय़ा व्यक्तीशी गाठभेट होईल. नोकरीच्या ठिकाणी कोणालाही सल्ला द्यायला जाऊ नका.  घरामध्ये कामाच्या निमित्ताने सर्वाना तुमची आठवण येईल.

मकर एखादी गोष्ट मनात आल्यावर ती पूर्ण होईपर्यंत तुम्हाला चन पडणार नाही. त्यामुळे तुमची दगदग वाढेल, व्यापारउद्योगात स्वत:ची टिमकी मिरवण्याचे धोरण अमलात आणाल. त्यासाठी एखाद्या कमिटीवर महत्त्वाचे पद स्वीकाराल. नोकरदार व्यक्ती संस्थेच्या कामाच्या नावाखाली स्वत:चा स्वार्थ साधतील. नवीन नोकरीच्या कामाला गती येईल. घरामधील व्यक्तींना एखादे आश्वासन दिले असेल तर पूर्ण करावे लागेल.

कुंभ तुमचे दोन वेगवेगळे मूड सभोवतालच्या व्यक्तींना बघायला मिळतील. तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी शिस्तबद्ध राहाल. त्यामध्ये मागे-पुढे झालेले चालणार नाही, पण व्यक्तिगत जीवनात मात्र मौजमजा करण्याचा तुमचा इरादा असेल. व्यापारउद्योगात बाजारपेठेत आपण इतरांपेक्षा वेगळे कसे आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न कराल. नोकरीच्या ठिकाणी जे काम इतरांना जमले नाही ते काम वरिष्ठ तुमच्यावर सोपवतील.

मीन स्वभावत: तुम्ही धार्मिक वृत्तीचे असल्यामुळे कोणाला तरी मदत करावी, ही भावना सतत जागृत असते; पण या आठवडय़ामध्ये ती विसरून जाऊन तुमचा वेळ तुम्ही स्वत:च्या मौजमजेकरिता काढाल. व्यापारउद्योगात नवीन कामासंबंधी बोलणी होतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या शब्दाला मान देतील. घरामध्ये सर्व जण त्यांच्या मतलबापुरती तुमची स्तुती करतील.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व भविष्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-10-2018 at 01:01 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×