scorecardresearch

दि. ८ ते १४ एप्रिल २०१६

या आठवडय़ात कृतीपेक्षा नियोजनाला भर द्या. म्हणजे कामाचा दर्जा चांगला राहील.

दि. ८ ते १४ एप्रिल २०१६

01vijay1मेष या आठवडय़ात कृतीपेक्षा  नियोजनाला भर द्या. म्हणजे कामाचा दर्जा चांगला राहील. व्यापार-उद्योगात नवीन आíथक वर्षांकरिता जे बेत आखले आहेत त्याची सिद्धता करण्याकरिता तुम्ही सतर्क राहाल. हितचिंतकाच्या मदतीमुळे अडून राहिलेली कामे पुढे सरकतील. नोकरीमध्ये धोपट मार्गाने काम करून चालणार नाही. त्याकरिता वेगळ्या युक्तीचा अवलंब करणे भाग पडेल. बेकार व्यक्तींना काम मिळण्याची चिन्हे दिसू लागतील.

वृषभ ज्या कामात तुम्हाला फायदा होणार आहे, अशा कामाला महत्त्व देऊन इतर कामे तुम्ही बाजूला ठेवाल. त्याकरिता गरज वाटल्यास दैनंदिनीत बदल करण्याची तुमची तयारी असते. व्यवसाय-उद्योगात नवीन गुंतवणूक करावी लागेल. आíथक संस्था व हितचिंतक तुम्हाला मदत करतील. नोकरीमध्ये वरिष्ठांनी त्यांच्या सूचनेत बदल केल्यामुळे तुमचा गोंधळ उडेल. तरी तुम्ही परिस्थिती सावरून घ्याल. घरामध्ये आवडत्या व्यक्तींना जे पाहिजे आहे ते देण्याचा प्रयत्न कराल.

मिथुन नवीन विचार आणि नवीन तरंग तुम्हाला ताबडतोब आकर्षति करतात. या आठवडय़ात याचा समन्वय साधण्यासाठी कर्तव्य आणि मौजमजा यांना सारखेच महत्त्व द्या. व्यापार-उद्योगात पूर्वी केलेले काम आणि जाहिरात याचा चांगला उपयोग होईल. चार पसे हातात खुळखुळतील. नोकरीमध्ये नवीन कामात तुम्ही आवर्जून लक्ष घालाल. घरामध्ये एखाद्या विशिष्ट कारणाकरिता इतर सदस्य तुम्हाला हरभऱ्याच्या झाडावर चढवतील. हे समजूनही तुम्ही त्यांना मदत कराल.

कर्क अपेक्षित कामांना गती मिळाल्यामुळे तुमच्या पायाला िभगरी लागेल. तातडीची कामे हातात घेऊन व्यापार-उद्योगातील महत्त्वाच्या निर्णयाला आणि नियोजनाला तुम्ही गती द्याल. जुन्या ओळखींचा उपयोग होईल. एखादा विचित्र, पण सनसनाटी निर्णय तुम्ही घ्याल. नोकरीमध्ये कोणाकरताही न थांबता जी गोष्ट तुम्हाला योग्य वाटेल ती करून टाकाल. बेकार व्यक्तींना काम मिळेल. घरामध्ये एखादे शुभकार्य ठरले असेल तर सर्वजण तुमच्यावर भिस्त ठेवतील.

सिंह आठवडय़ाच्या सुरुवातीला तुम्ही एखादा सनसनाटी निर्णय घेण्याची शक्यता आहे. म्हणून मनावर नियंत्रण ठेवा. व्यापार-उद्योगात ज्या कामात तांत्रिक किंवा सरकारी कारणांमुळे नियंत्रण आले होते त्यातील महत्त्वाचा अडसर दूर होईल. केलेल्या कामाचे थोडेफार पसे मिळतील. नोकरीमध्ये मोठय़ा जिद्दीच्या जोरावर किचकट कामातून तुम्ही तुमची सुटका करून घ्याल. घरामध्ये पूर्वी ज्यांना तुमचा सल्ला पटला नव्हता, त्यांना तो पटेल.

कन्या ‘शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ’ असे मानणारी तुमची रास आहे. या तुमच्या नीतीनुसार तुम्ही जर वागलात तर त्याचे परिणाम जरा चांगले होतील. व्यापार-उद्योगात नवीन आíथक वर्षांकरिता तुम्ही काही बेत आखून ठेवले असतील तर त्यात थोडेफार फेरफार करावे लागतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्यावर विश्वास ठेवतील. वेगवेगळी कामे करून घेण्याचा त्यांचा इरादा असेल. घरामध्ये सगळ्यांच्या गरजा जास्त असल्याने अखेर तुम्हाला नकारघंटा ऐकावी लागेल.

तूळ आठवडय़ाच्या सुरुवातीला एखादे काम वेळेत आणि लवकर  झाले नाही तर  चिडचिड होईल. व्यापार-उद्योगातील कामाला गती देण्यासाठी धाडस करावेसे वाटेल. पण त्याचा फारसा उपयोग होणार नाही. हितचिंतकांचा सल्ला तुम्हाला उपयोगी पडेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांची कामाची पद्धत तुम्हाला आवडणार नाही. पण त्यावर कोणतेही मत व्यक्त करू नका. घरामध्ये अपेक्षित व्यक्ती निराशा करतील.

वृश्चिक एखाद्या प्रश्नामुळे गेल्या दोन-तीन महिन्यांपासून बराच ताणतणाव निर्माण झाला होता. त्यामध्ये तात्पुरती शांतता निर्माण होईल. व्यापार-उद्योगातील महत्त्वाची कामे शक्यतो आठवडय़ाच्या सुरुवातीला हाताळा. त्यामध्ये  आळस झाला तर नंतर विलंब सहन करावा लागेल. नोकरीमध्ये वरिष्ठांचे मूड बदलल्यामुळे तुम्ही नवीन कार्यपद्धतीनुसार काम करण्याचा प्रयत्न कराल. घरामध्ये एखाद्या प्रश्नात तुम्ही बराच काळ संयम राखाल. त्यामुळे तुमच्या मनाचा तोल जाईल.

धनू कोणाला काय वाटेल याची पर्वा न करता एखाद्या गोष्टीची  वाट बघता बघता एकदम निर्णय घेऊन टाकता. या आठवडय़ात तुमच्या या स्वभावाची चुणूक सगळ्यांना दिसून येईल. व्यापार-उद्योगात पूर्वी ठरलेले निर्णय काही प्रमाणात बदलू शकाल. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या विचित्र वागण्याचा तुम्हाला राग येईल. एखादे अवघड आणि इतरांना न जमलेले काम तुमच्या माथी मारले जाईल. घरामध्ये जोडीदाराविषयी एखादी महत्त्वाची बातमी समजल्यामुळे तणाव कमी होईल.

मकर जे कार्यक्रम तुम्ही मनाशी ठरविलेले होते ते तुम्हाला काही कारणाने अचानक बदलावे लागतील. त्यामुळे तुमची थोडीशी चिडचिड होईल. पण नंतर तुम्ही स्वतला सावरून घ्याल. व्यापार-उद्योगात एखाद्या नवीन संधीमुळे तुमच्या प्राप्तीमध्ये चांगली भर पडण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या बदलत्या मूडमुळे तुम्हाला तुमच्या पद्धतीने काम करता येणार नाही. घरामध्ये एखादी गोष्ट  बुजुर्गाना पटवण्याकरिता तुम्हाला बराच वेळ आणि शक्ती खर्च करावी लागेल.

कुंभ ग्रहमान तुमच्यामध्ये कृतिशीलता निर्माण करणारे आहे. प्रत्येक काम तुम्हाला तातडीने करावेसे वाटेल. पण अति घाई संकटात जाई हे लक्षात ठेवा. व्यवसाय-उद्योगात पसे मिळविण्याकरिता काही वेडावाकडा मार्ग निवडू नका. नवीन व्यक्तींशी हितसंबंध जोडताना त्यांची नीट माहिती मिळवा. नोकरीच्या ठिकाणी महत्त्वाच्या कामाकरिता वरिष्ठ तुमची निवड करतील. तुम्ही  दिलेला सल्ला सहकाऱ्यांना आणि संस्थेला उपयोगी पडेल. घरामधल्या व्यक्तींना तुमची आठवण येईल.

मीन काही बदल तुम्ही तडकाफडकी कराल. त्याचे सभोवतालच्या व्यक्तींना आश्चर्य वाटेल. व्यापार-उद्योगात नवीन आíथक वर्षांकरिता जे बेत तुम्ही आखून ठेवले होते त्याची कार्यवाही होईल. गिऱ्हाइकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळेल. जोडधंदा असणाऱ्यांना कमाई करून देणारी संधी दृष्टिक्षेपात येईल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ त्यांच्या गरजेपोटी तुम्हाला जादा सुविधा देतील. घरामध्ये एखादा आनंददायी सोहळा ठरेल. विद्यार्थ्यांनी आळस करू नये.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

मराठीतील सर्व भविष्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-04-2016 at 01:03 IST

संबंधित बातम्या