scorecardresearch

दि. १५ ते २१ एप्रिल २०१६

कोणत्याही कामाकरिता थांबून राहणारी तुमची रास नाही.

दि. १५ ते २१ एप्रिल २०१६

01vijay1मेष ज्या प्रश्नांनी विनाकारण थैमान घालून तुमच्या विचारांची कवाडं बंद करून टाकली होती, त्यामध्ये तात्पुरता मार्ग मिळेल. बुधाचा प्लुटोशी त्रिकोण तर शुक्राचा केंद्रयोग होईल. कोणत्याही कामाकरिता थांबून राहणारी तुमची रास नाही. जी माणसे तुमच्या अवतीभोवती असतील त्यांना हाताशी घेऊन व्यापारातील कामांना गती द्यावी लागेल. सरकारी कामे वेग घेतील. नोकरीमध्ये तुमची अडचण समजून वरिष्ठ त्यावर तोडगा शोधतील.

वृषभ ज्या कामाला चांगली गती येत होती त्या कामात तांत्रिक अडथळे निर्माण झाल्यामुळे तुम्हाला तुमच्या कामाच्या पद्धतीत फेरफार करणे भाग पडेल. व्यापार-उद्योगात एखादा नवीन प्रोजेक्ट हाती घ्यावासा वाटेल. पण त्यातून लगेच पसे मिळणार नाहीत. नवीन नोकरीच्या संधी प्राप्त होतील. घरामधल्या व्यक्तींना तुमची गरज असल्यामुळे तुमची बडदास्त ठेवली जाईल. जोडीदाराच्या प्रकृतीविषयी किंवा स्वास्थ्याविषयी चिंता निर्माण होईल.

मिथुन गेल्या काही महिन्यांत इतर कोणत्याही गोष्टींचा विचार न करता जी गोष्ट तुम्हाला हवी होती ती तुम्ही आग्रहाने पूर्ण केलीत. पण आता तुम्हाला यावर मुरड घालावी लागेल. व्यवसाय-उद्योगात कळत नकळत प्रतिस्पध्र्याकडे तुमचे दुर्लक्ष झाले असेल, तर त्यातून आता त्रास संभवतो. कोर्ट व्यवहार आणि सरकारी कायदेकानून यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांच्या आणि वरिष्ठांच्या शब्दाला योग्य तो मान द्या.

कर्क तुमचे घर आणि करिअर या दोन्ही गोष्टींपकी एकाची निवड करावी लागेल. व्यापार-उद्योगातील ज्या व्यक्तींनी पूर्वी सहकार्य द्यायला टाळाटाळ केली होती त्यांच्याकडून तुम्हाला ग्रीन सिग्नल मिळेल. सरकारी कामे आणि कोर्ट व्यवहारांना चालना मिळाल्याने काही गुंतागुंतीचे प्रश्न सोपे होऊन जातील. नोकरीमध्ये तुमची कार्यपद्धत वरिष्ठांना पसंत पडेल. घरामध्ये सगळ्यांना मदत करण्याची तुमची इच्छा असेल, पण तेवढा वेळ तुम्हाला देता येणार नाही.

सिंह एखाद्या घरगुती प्रश्नामध्ये खूप ताणतणाव निर्माण झाला असेल, तर त्यावर आता तात्पुरता तोडगा निघेल. त्यामुळे जरी प्रश्न सुटला नाही तरी तुम्हाला थोडीशी मन:शांती लाभेल. व्यापार-उद्योगात बाजारातील घडामोडीकडे बारकाईने लक्ष द्या. कोणताही निर्णय घाईने निश्चित करू नका. नोकरीमध्ये एखादे किचकट काम कोणाच्याही मदतीशिवाय संपवल्यामुळे तुमचा तुम्हालाच अभिमान वाटेल. वरिष्ठ केलेल्या कामाची दखल घेतील.

कन्या ज्या कामांना तुम्ही बरीच गती आणली होती त्यात काहीतरी अडचण आल्याने तुमचा कामाचा वेग मंदावण्याची शक्यता आहे. हे ग्रहमान संमिश्र आहे. ज्या कामात तुम्ही लक्ष घालाल ते काम व्यवस्थितपणे पार पडेल. पण तुमचे थोडेसे जरी दुर्लक्ष झाले तरी त्याचा भरुदड तुम्हाला सोसावा लागेल. व्यापार-उद्योगात आíथकदृष्टय़ा काही काळ तुमचे बेत लांबवावे लागतील. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कर्तव्यात दक्ष राहण्याचा प्रयत्न कराल.

तूळ हातातोंडाशी आलेली काही कामे अचानक लांबण्याची शक्यता आहे. एखादी पर्यायी योजना मनात तयार करून ठेवा. व्यापार-उद्योगात ‘रुपयाभोवती फिरते दुनिया’ याचा प्रत्यय तुम्हाला येण्याची शक्यता आहे. नवीन आíथक वर्षांकरिता काही योजना आखल्या असतील तर त्याला तात्पुरती स्थगिती मिळेल. हातातले पसे काटकसरीने वापरा. घरामध्ये कोणत्याही प्रश्नावर सगळ्यांचे एकमत न झाल्याने काही कार्यक्रम लांबवावे लागतील.

वृश्चिक सध्या शनी आणि मंगळ तुमच्या राशीत असल्याने कोणतीही गोष्ट सहजगत्या पार पडत नाही. कधी कधी त्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावावी लागते. या आठवडय़ात एखादे अवघड काम तुम्ही केवळ तुमच्या इच्छाशक्तीच्या जोरावर पार पाडाल. व्यापार-उद्योगात उत्पन्न वाढविण्याकरिता बुजुर्ग व्यक्तींचा सल्ला घ्या. नोकरीमध्ये एखादे वेगळे काम तुमच्या वाटय़ाला आल्यामुळे तुम्हाला थोडेसे बरे वाटेल. छोटा प्रवास किंवा नवीन व्यक्तीशी ओळख होण्याचा योग येईल.

धनू ज्या कामात वेग येत नव्हता त्यामध्ये तुम्ही बऱ्याच कष्टांनी गती आणण्याचा प्रयत्न कराल. पण पुन्हा एकदा एखाद्या छोटय़ा कारणावरून अडथळा निर्माण होईल. व्यापार-उद्योगात तातडीची कामे ताबडतोब नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करा. नंतर त्यामध्ये विलंब होईल. पशाच्या व्यवहारांना गती द्या. नोकरीमध्ये सोपे वाटलेले काम अवघड होऊन बसेल. घरामध्ये तुमचा एखादा पटलेला मुद्दा कार्यान्वित करायला वेळ लागेल.

मकर पशासंबंधी काही महत्त्वाची कामे असतील तर ती विनाकारण रखडण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या कामांना प्राधान्य द्या. ज्या व्यक्ती अचानक कच खातील त्याची उणीव इतर मार्गाने भरून निघाल्यामुळे तुम्हाला बरे वाटेल. व्यापार-उद्योगाच्या कामात मध्यस्थांवर अवलंबून असाल तर त्यांनी केलेले काम तपासून पाहा. नोकरीमध्ये स्वयंभू बनणे चांगले. घरामध्ये आवडत्या व्यक्ती तुम्हाला कमी लेखतील. पण बाहेरच्या व्यक्तींना तुमचे महत्त्व कळेल.

कुंभ हे ग्रहमान तुम्हाला उत्साही बनवेल. मात्र एखादे महत्त्वाचे काम थोडा काळ लांबल्यामुळे तुम्ही अस्वस्थ बनाल. व्यापार-उद्योगात जुनी वसुली करताना ओळखीचा उपयोग होईल. ज्यांचा जोडधंदा आहे त्यांना लाभदायक संधी मिळेल. नोकरीतील काम पूर्ण करताना तुमची बरीच दगदग आणि धावपळ होईल. नवीन नोकरीच्या कामात तांत्रिक कारणामुळे थोडासा विलंब होईल. घरामध्ये एखाद्या नवीन कामाची जबाबदारी सर्वजण तुमच्यावर सोपवतील.

मीन ज्या व्यक्तींवर तुम्ही विशिष्ट कामाकरिता अवलंबून राहिला होतात त्याची अडचण असल्यामुळे अशी कामे लांबणीवर पडतील. त्याऐवजी वेगळ्या प्रोजेक्टमध्ये लक्ष घालावे लागेल. व्यापार-उद्योगात उलाढाल आणि फायद्याचे प्रमाण वाढविण्याकरिता तुम्हाला विशेष प्रयत्न करावा लागेल. नोकरीच्या ठिकाणी जे काम इतरांना जमले नाही ते काम तुमच्यावर सोपवल्यामुळे तुमची धावपळ होईल. घरामध्ये प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने कार्यक्रम ठरवेल.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

मराठीतील सर्व भविष्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-04-2016 at 01:03 IST

संबंधित बातम्या