विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com
मेष ज्या कामांकडे तुमच्या हातून कळत नकळत दुर्लक्ष झाले होते त्या कामांना आता तुम्ही गती द्याल. व्यापार-उद्योगात सहकारी कामे किंवा कोर्टव्यवहार याकडे लक्ष द्यावे लागेल. नोकरीमध्ये एखादे किचकट आणि कंटाळवाणे काम पूर्ण करावे लागेल. ते पूर्ण झाल्यावर वरिष्ठ तुमचे कौतुक करतील. पण तुमची मात्र धावपळ उडेल. घरामध्ये सगळ्यांची मोट बांधणे कठीण होईल. पण तुम्ही ते काम युक्तीने हाताळाल.




वृषभ ग्रहमान तुमच्या दूरदर्शी स्वभावाची परीक्षा घेणारे आहे. ज्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला पार पाडायच्या आहेत त्याचा प्रारंभ सप्ताहाच्या सुरुवातीला करा. व्यापारउद्योगात वारा वाहील तशी पाठ फिरवण्याचे धोरण ठेवा. स्पर्धकांच्या हालचालींवर बारीक लक्ष असू द्या. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे मूड सांभाळा. घरामध्ये शेजारपाजारी आणि नातेवाईक यांच्या कामात थोडेसे लक्ष घालावे लागेल. छोटासा समारंभ साजरा होईल.
मिथुन गेल्या एक-दोन आठवडय़ांमध्ये काही प्रश्न निर्माण झाले असतील तर त्यावर आता तुम्ही लक्ष केंद्रित कराल. व्यापारउद्योगात जुने ते सोने हे लक्षात ठेवा. कोणाशीही हितसंबंध बिघडू देऊ नका. नोकरीमध्ये जे काम पूर्वी वाया गेले असे वाटले होते त्या कामाचा उपयोग होईल. बदली हवी असल्यास प्रयत्न सुरू करा. घरामध्ये मदतीकरिता सगळ्यांची भिस्त तुमच्यावर असेल. प्रकृतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
कर्क संपूर्ण आठवडा खूप दगदग आणि धावपळ करायला लावणारा आहे. स्वत:च्या प्रकृतीकडे लक्ष ठेवा. व्यापारउद्योगात एखादे किचकट आणि कंटाळवाणे काम असेल तर ते तुम्हाला पूर्ण करावे लागेल. गिऱ्हाइकांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी खूप कष्ट करावे लागेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ अनुपस्थित सहकाऱ्याचे काम तुमच्यावर ढकलतील. घरातील सदस्य तुम्ही केलेले काम विसरून जाऊन चुकांवर बोट ठेवतील.
सिंह गेल्या काही दिवसांच्या अनुभवावरून कोणावर विश्वास ठेवायचा आणि किती ठेवायचा याचा अंदाज तुम्हाला आला असेल. त्याचा आता उपयोग होईल. सप्ताहाच्या सुरुवातीला तुमचा दिवस खूप दगदग आणि धावपळीचा जाईल. व्यापारउद्योगात रोखीपेक्षा उधारीचे व्यवहार जास्त होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी एखादा सहकारी गरहजर असल्यामुळे तुम्हाला त्याचे काम करावे लागेल.
कन्या जी कामे गेल्या दोन-तीन महिन्यांपासून विनाकारण लांबलेली होती त्या कामांना मुहूर्त लाभेल. व्यापारउद्योगातील जी कामे प्रवासावर अवलंबून होती त्या कामांना मुहूर्त लाभेल. अनपेक्षित व्यक्तींशी होणाऱ्या गाठीभेटी तुम्हाला फलदायी ठरतील. नोकरीच्या ठिकाणी कामातले अडथळे दूर झाल्यामुळे प्रत्येक काम तुम्ही वेळेत पार पाडू शकाल. घरामध्ये तुमच्या शब्दाला मान मिळेल.
तूळ जी कामे तुमच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत ती कामे शक्यतो या आठवडय़ातच संपवा. व्यापारउद्योगात पूर्वी ज्या गिऱ्हाईकांचे तुम्ही काम केले आहे त्यांच्याकडून तुम्हाला पुन्हा ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. अशी कामे ताबडतोब पूर्ण करून टाका. नोकरीमधल्या तातडीच्या कामानिमित्त सप्ताहाच्या सुरुवातीला छोटा प्रवास होण्याची शक्यता आहे. घरामध्ये दीर्घकाळानंतर लांबच्या नातेवाईकांना भेटण्याचा योग संभवतो.
वृश्चिक व्यक्ती तितक्या प्रकृती हे मानणारी तुमची रास आहे. समोरची व्यक्ती जशी वागेल त्याप्रमाणे तुम्ही तुमचा पवित्रा ठरविता. व्यापारउद्योगात गेल्या आठवडय़ामध्ये काही निर्णय लांबविले असतील तर त्यावर आता मार्ग निघेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आठवडय़ाच्या सुरुवातीला वेगळ्या कामाची कल्पना देतील. ते पूर्ण करण्याकरिता कदाचित प्रवास करावा लागेल. घरामध्ये एखादा अवघड प्रश्न सर्वाच्या मदतीने सोडविता येईल.
धनू प्रयत्नांती परमेश्वर यावर विश्वास ठेवून तुम्ही पुढे गेलात तर तुमची निराशा कमी होईल आणि थोडीफार प्रगती होईल. व्यापारउद्योगात हातामध्ये थोडेफार पसे असल्यामुळे तुम्ही आलेली वेळ मारून न्याल. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी जास्त न बोलता स्वावलंबनाचे धोरण चांगले ठरेल. घरामध्ये लांबच्या व्यक्तीशी संपर्क झाल्यामुळे काही वेगळे कार्यक्रम ठरवता येतील. कोणत्याही गोष्टीचा अतिविचार करू नका.
मकर ग्रहमान आíथकदृष्टय़ा चांगले आहे. त्यासंबंधी काही कामे करायची असतील तर त्याला या आठवडय़ात प्राधान्य द्या. व्यापारउद्योगात आठवडय़ाचा मध्य तुम्हाला कमाईकरिता विशेष चांगला आहे. नोकरीच्या ठिकाणी तुमची छोटीमोठी मागणी असेल तर वरिष्ठ ती मान्य करतील. एखाद्या अवघड कामामध्ये साथीदाराची तुम्हाला मदत होईल. घरामध्ये लांबच्या नातेवाईकांशी गाठभेट होण्याचा योग संभवतो.
कुंभ ग्रहमान तुमचा उत्साह वाढविणारे आहे. व्यापारउद्योगात एखाद्या कामात नवीन तंत्रज्ञानापेक्षा जुनी पद्धत जास्त उपयोगी पडेल. आठवडय़ाची सुरुवात आणि शेवट लाभदायक ठरेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचा वेग अचाट, अफाट असेल. ज्या कामातून तुम्हाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष फायदा आहे अशा कामावर लक्ष केंद्रित कराल. घरामध्ये एखाद्या कार्यक्रमानिमित्ताने लांबचे नातेवाईक, मित्रमंडळी भेटतील.
मीन ‘कळतं पण वळत नाही’ अशी तुमची स्थिती असेल. व्यापारउद्योगात जुन्या ओळखींचा उपयोग होईल. त्यांच्याकडून काही नवीन योजना सुचविल्या जातील. प्रवासाच्या वेळेला कागदपत्र नीट सांभाळा. नोकरीच्या ठिकाणी एखादी अफवा पसरेल. यावर विश्वास न ठेवता तुमचे काम तुम्ही करा. घरामध्ये नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्याशी जपून बोला.