scorecardresearch

राशिभविष्य : दि. ४ ते १० मार्च २०२२

चंद्र-मंगळाचा केंद्र योग हा धाडस आणि साहस दाखवणारा योग आहे. मोठी जोखीम घेणे इष्ट ठरणार नाही.

zodiac sign weekly astrology
साप्ताहिक राशिभविष्य : असा असेल तुमचा आठवडा

सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष चंद्र-मंगळाचा केंद्र योग हा धाडस आणि साहस दाखवणारा योग आहे. मोठी जोखीम घेणे इष्ट ठरणार नाही. विचारपूर्वकच निर्णय घ्यावा. नोकरी-व्यवसायात कसोटीचा क्षण येईल. सहकारी वर्गाची मदत वेळेवर मिळेल. जोडीदाराच्या कार्यक्षेत्रात आवश्यक ते बदल होतील. मुलांच्या हिताचा निर्णय घ्याल. उष्णतेचे विकार बळावतील. वातावरणातील बदलाचा अंदाज घेऊन आहारात बदल करावा.

वृषभ शुक्र-मंगळाचा युती योग हा मनाजोगत्या गोष्टी करण्यास उपयुक्त ठरणारा योग आहे. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या साहाय्याने मोठी जबाबदारी पेलाल. सहकारी वर्गातील काही जण आपल्यातील उणिवा दाखवून देतील. सुधारणा करण्याचा प्रयत्न कराल. नव्या संधी उपलब्ध होतील. जोडीदारासह वैचारिक मतभेद होतील. मूत्रविकार सतावतील. पाण्याचे प्रमाण सांभाळावे.

मिथुन रवी-चंद्राचा लाभ योग  हा आपल्या कार्याची दखल घेणारा योग आहे. संशोधकांसाठी लाभदायक बातमी समजेल. नोकरी-व्यवसायात नवे व्यावसायिक संबंध जोडाल. सहकारी वर्गाची मदत घेऊन रखडलेली कामे मार्गी लावाल. जोडीदार त्याच्या कामात व्यग्र असेल. रक्तातील दोषामुळे त्वचेवर पुरळ, पुटकुळय़ा येण्याची शक्यता आहे. वेळेवर काळजी  घ्यावी.

कर्क चंद्र-मंगळाचा नवपंचम योग हा कामातील उत्साह वाढवणारा योग आहे. अधिक मेहनत घेतलीत तरच आपले ध्येय गाठू शकाल.  नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा दरारा वाढेल. सहकारी वर्गाच्या मदतीने कामातील नवे पैलू समजून घ्याल. तडजोड करावी लागेल. जोडीदाराचा ताणतणाव वाढेल. मुलांच्या बाबतीत शिस्तीला महत्त्व द्याल. उत्सर्जन संस्था बिघडेल. वैद्यकीय उपचार घ्यावे.

सिंह चंद्र-गुरूचा लाभ योग हा आपल्या कष्टाचे योग्य फळ देणारा योग आहे. मेहनत घेतलीत तर लाभदायक ठरेल. कामात चालढकल करू नका. नोकरी-व्यवसायात आपल्या अधिकारांचा उपयोग करून गरजवंतांना साहाय्य कराल. जोडीदाराच्या कामाचा व्याप वाढेल. दोघांनी एकमेकांना समजून घ्यावे. मुलांच्या बाबतीत हळवे होऊ नका. वैचारिक ताण जाणवेल. नित्याच्या कामांचा विसर पडेल.

कन्या चंद्र-शुक्राचा नवपंचम योग हा आपणास अधिक चिकित्सक बनवेल. आपल्या मनाप्रमाणे गोष्टी न घडल्यास थोडे सबुरीने घ्यावे. नोकरी-व्यवसायात नवनवीन गोष्टी शिकून घ्याल.  सहकारी वर्गातील हेवेदावे कमी करण्याचा प्रयत्न कराल. जोडीदारासह वाद झाल्यास प्रथम गैरसमज दूर करावेत. कान, नाक, घसा यांची काळजी घ्यावी. गरज पडल्यास वैद्यकीय उपचार घ्यावेत.

तूळ चंद्र-शुक्राचा केंद्र योग हा आपल्या विचारांना आणि भावनांना वाट मोकळी करून देईल. आपली मते इतरांचे मन न दुखवता व्यक्त कराल. नोकरी-व्यवसायात नव्या संधी उपलब्ध होतील. अडथळे पार करत पुढे जाण्याची तयारी ठेवावी. जोडीदाराची प्रगती होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. मुलांचा दृष्टिकोण समजून घ्याल; परंतु आवश्यकतेनुसार शिस्तीचा बडगा दाखवाल.

वृश्चिक चंद्र-शनीचा नवपंचम योग हा चंद्राच्या उत्सुकतेला शनीच्या चिकाटीची जोड देणारा योग आहे. त्यामुळे कामातील सातत्य टिकून राहण्यास मदत होईल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांपुढे आपले म्हणणे परखडपणे मांडाल. जोडीदाराच्या काही गोष्टी आपल्याला पटत नाहीत. त्याकडे दुर्लक्ष करावे. मुलांना भावनिक आधार द्याल. हाडांसंबंधित दुखणे वाढेल. पचनक्रियेत बिघाड होईल.

धनू चंद्र-बुधाचा केंद्र योग हा भावना आणि व्यवहार यांच्यात समतोल साधणारा योग आहे. नोकरी-व्यवसायात अनेक अडचणींवर मात करत पुढे जाल. वरिष्ठांच्या सूचनांचे तंतोतंत पालन कराल. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आगेकूच केल्यास गोष्टी सुलभ होतील. शंका दूर सारा. जोडीदाराचा सल्ला महत्त्वपूर्ण ठरेल. आहारावर नियंत्रण ठेवा. रक्तदाबासंबंधित तक्रारी वाढतील.

मकर चंद्र-शनीचा लाभ योग हा शनीच्या चिकाटीला आणि मेहनतीला योग्य फळ देणारा योग आहे. उत्साहवर्धक वातावरण निर्माण होईल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या प्रश्नांना सामोरे जावे लागेल. जोडीदार हिमतीने आगेकूच करेल. कौटुंबिक जबाबदारी स्वत:हून स्वीकारेल. वातविकार बळावेल. पचनक्रिया सुधारावी लागेल. व्यायाम आवश्यक!

कुंभ चंद्र-गुरूचा केंद्र योग हा मानसिक समाधान देणारा योग आहे. नवे ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नशील राहाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या अपेक्षेप्रमाणे कार्य पूर्ण कराल. सहकारी वर्गाची चांगली साथ मिळेल. जोडीदार आपल्या कामकाजात व्यस्त होईल.  मुलांच्या समस्या समजून घ्याल. घसा खवखवणे, छातीत जळजळ होणे असे त्रास उद्भवण्याची शक्यता आहे.

मीन चंद्र-बुधाचा लाभ योग हा भावनिक समतोल राखणारा योग आहे. व्यावहारिकदृष्टय़ा विचारमंथन करून मगच निर्णय घ्याल. मित्रमंडळींना मदत कराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठ आपल्या त्रुटी दाखवून देतील. सकारात्मकतेने पुढे चला. सहकारी वर्गाचा पािठबा मिळेल. जोडीदाराची मेहनत घ्यायची तयारी दिसेल. मुलांचे वायफळ हट्ट पुरवू नका. पोटऱ्या, पावले दुखतील.

मराठीतील सर्व भविष्य ( Bhavishya ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Astrology horoscope rashibhavishya bhavishya star sign zodiac sign dd

ताज्या बातम्या