01vijay1  मेष  व्यवसाय-उद्योगात प्राप्ती वाढविण्यासाठी काहीतरी अचाट अफाट करावेसे वाटेल. अशा वेळी तुमच्या अंदाजावर अवलंबून न राहता जमाखर्चाची कागदावर नीट आकडेमोड करून बघा. कारखानदारांनी कामाचे वेळापत्रक व्यवस्थित सांभाळणे आवश्यक आहे. नोकरीत घाईने बदल करू नका. घरामध्ये वस्तूची मोडतोड किंवा अनपेक्षित कारणाने पसे खर्च होतील. विद्यार्थ्यांनी बेसावध राहू नये.

वृषभ ग्रहमान तुम्हाला आíथकदृष्टय़ा लाभदायक असल्याने तुमच्यामध्ये भरपूर काम करण्याची एक नवीन ऊर्मी निर्माण होईल. व्यवसाय-उद्योगात नवीन कामामुळे तुमचे लक्ष विचलित होऊ देऊ नका. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांच्या अपेक्षा चांगले काम केल्यामुळे वाढतील. जादा काम करून जादा कमाई करण्याची संधी असेल तर ती तुम्ही सोडणार नाही. घरामध्ये लहान मुलांच्या आणि प्रिय व्यक्तीच्या गरजांना प्राधान्य दिल्यामुळे त्यांना बरे वाटेल.

मिथुन एखादी स्वप्नमयी कल्पना साकार करण्याकरिता तुम्ही बरीच धडपड कराल. मात्र या नादात दैनंदिन व्यवहारांकडे दुर्लक्ष होणार नाही याची खबरदारी बाळगा. व्यवसाय-उद्योगात जे काम हातात आहे ते वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. नोकरीमध्ये एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर असा तुमचा प्रकार होईल. कारण एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या तुम्हाला सांभाळाव्या लागतील. घरामध्ये जो काम करतो, त्याच्याच मागे काम लागते, असा अनुभव येईल.

कर्क गेल्या तीन-चार आठवडय़ांपासून तुम्ही खूप मेहनत घेतली. आता केलेले कष्ट वाया जात नाहीत, याची तुम्हाला एखाद्या कारणाने प्रचीती आल्याने बरे वाटेल. व्यापार-उद्योगात तुमचे कामाचे उद्दिष्ट मोठे असेल. ते पूर्ण करण्याकरिता अहोरात्र काम कराल. भांडवलाची सोय होईल. नोकरीच्या ठिकाणी जे काम सहकाऱ्यांवर सोपवलेले होते ते नीट न झाल्याने अखेर तुम्हीच पूर्ण करून टाकाल.  विद्यार्थ्यांना योग्य व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळाल्याने बरे वाटेल.

सिंह मोडेल पण वाकणार नाही हा तुमचा स्वभाव आहे. पण सध्याचे ग्रहमान प्रत्येक बाबतीत तडजोड करायला भाग पाडणारे आहे. व्यापार-उद्योगात जे काम तुमच्या हातात आहे ते वेळेत पार पाडा. नोकरीमध्ये प्रत्येक कामात काहीतरी त्रुटी राहिल्यामुळे केलेल्या कामाचे तुम्हाला समाधान लाभणार नाही. वरिष्ठांची मते पटली नाहीत तरी तुमचा नाइलाज असेल. घरामध्ये ज्यांचा तुमच्याकडे मतलब आहे अशा व्यक्ती तुमची स्तुती करतील. प्रकृतीचे जुने आजार बळावतील.

कन्या साध्या सरळ मार्गाने जायला तुम्हाला नेहमीच आवडते, पण या आठवडय़ात तुम्हाला एखादी नवीन युक्ती शोधावी लागेल. त्याचा उपयोग झाल्यामुळे तुमचा तणाव कमी होईल. व्यवसाय उद्योगात एकाच वेळी वेगवेगळी कामे तुम्हाला हाताळावी लागतील. प्रत्येक कामाची विशिष्ट वेळ ठरल्यामुळे घडय़ाळाच्या काटय़ानुसार तुम्हाला काम करावे लागेल. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या अपेक्षा जास्त असतील.  घरामध्ये जोडीदाराची साथ मिळविण्याकरिता युक्ती शोधून काढावी लागेल.

तूळ मानलं तर समाधान अशी तुमची स्थिती असेल. मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी विश्रांती घेण्याची कल्पना तरळत असेल. नेहमीच्या कर्तव्यात जखडले गेल्यामुळे तुम्हाला शांतता अशी लाभणार नाही. व्यापार-उद्योगात तुमचे लक्ष कामावर केंद्रित करा. कोणत्याही परिस्थितीत गिऱ्हाईकांशी वादविवाद करू नका.  घरामध्ये एखाद्या व्यक्तीचे मन:स्वास्थ्य आणि तुमची नतिक जबाबदारी या दोन्हीकडे लक्ष द्यावे लागेल.

वृश्चिक तुमची दोन वेगवेगळी रूपे या आठवडय़ात सभोवतालच्या व्यक्तींना दिसतील. व्यवसाय नोकरीमधील प्रश्न सोडविताना तुम्ही अत्यंत शांत व संयमी असाल. पण घरामधील प्रश्न हाताळताना छोटय़ा-मोठय़ा कारणांवरून तुमच्या मनाचा तोल ढळण्याची शक्यता आहे. व्यवसाय-उद्योगात तुमचे भविष्यातील बेत गुप्त ठेवा. एखादी नवीन आणि चांगली संधी तुमची निराशा घालवायला उपयोगी पडेल. घरामध्ये वातावरण गोंधळाचे असेल. तुम्हालाच धावपळ करावी लागेल.

धनू तुमचे करिअर आणि घर या दोन्ही आघाडय़ांवर गरजा आणि अपेक्षा वाढल्याने तुम्हाला जणू काही बहुरूपीच बनले पाहिजे. व्यापार-उद्योगात गिऱ्हाईकांचा तगादा राहील. त्यामुळे तुमची धावपळ उडेल. भांडवलही हातात जेमतेम असेल. नोकरीमध्ये तेच काम पुन्हा पुन्हा करावे लागल्याने तुमचे मन बंड करून उठेल. पण कर्तव्य हीच काशी हे लक्षात ठेवा. घरामध्ये  ज्याचे करावे भले तो म्हणतो माझेच खरे याचा अनुभव येईल.

मकर थोडासा वेळ तुम्हाला मिळाला की तुमच्या मनात वेगवेगळे तरंग उठतात आणि प्रगतीकरिता एखादे धाडस करण्याचा विचार मनात येतो. या आठवडय़ात सर्व बाजूला ठेवून तुमचे लक्ष केवळ कामावर केंद्रित करा. व्यापारीवर्गाला हा आठवडा बराच गडबडीत जाईल. नवीन आíथक वर्षांकरिता काही खास बेत ठरतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आव्हानात्मक कामगिरीकरिता तुमची निवड करतील. त्यामध्ये कष्ट आणि आíथक फायदा दोन्ही जास्त असेल.

कुंभ तुमच्या स्वभावातील आधुनिकता आणि जुनाटपणा या दोन्हीचे दर्शन या आठवडय़ात होईल. ज्या ठिकाणी तुमचा स्वार्थ आहे त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या कामाची पद्धत बदलाल. व्यवसाय किंवा उद्योगात योग्य व्यक्तीची योग्य कारणाकरिता निवड कराल. त्यामुळे काम वेळेत आणि शिस्तबद्ध पद्धतीत पार पडेल. नवीन गुंतवणूक घाईने करू नका. नोकरीच्या ठिकाणी एखादा अवघड प्रश्न तुम्ही चांगली शक्कल लढवून सोडवून दाखवाल. त्याचे सर्वजण कौतुक करतील.

मीन: कामाचा डोंगर तुमच्यापुढे असेल. पण जेव्हा वेळ मिळेल त्या वेळी तुम्हाला थोडासा आराम आणि चन करावीशी वाटेल.  व्यापार-उद्योगात गिऱ्हाईकांचे समाधान करण्याकरिता घडय़ाळाच्या काटय़ानुसार काम करावे लागेल. आवश्यक पशांची गरज आयत्या वेळी भागल्यामुळे बरे वाटेल. नोकरीच्या ठिकाणी  शॉर्टकट शोधावासा वाटेल. घरामध्ये आयत्या वेळी येणाऱ्या पाहुण्यांमुळे किंवा कार्यक्रमामुळे तुमचे गणित मागे-पुढे होईल.