मेष जी कामे जनसंपर्काअभावी हातातोंडाशी विनाकारण लोंबकळत पडली होती त्याला धक्का स्टार्ट पद्धतीने तुम्ही गती देण्याचा प्रयत्न कराल. व्यापार उद्योगात तुमची कल्पकता उपयोगी पडेल. विक्री वाढविण्यासाठी जाहिरातीचे तंत्र अमलात आणाल. नोकरीमध्ये तातडीच्या कामगिरीनिमित्त देशात किंवा परदेशात छोटा प्रवास करण्याचे अचानक ठरेल. नवीन नोकरीसंबंधीचा निर्णय तातडीने घ्या. घरामध्ये लांबलेल्या मंगलकार्याबाबत सर्वानुमते निर्णय होईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रयत्नांच्या प्रमाणामध्ये फळ देणारे ग्रहमान आहे.

वृषभ जरा ग्रहमान सुधारले की माणसाच्या अभिलाषा वाढायला सुरुवात होते. तुम्हाला जे मिळालेले आहे ते कमीच वाटेल. तुम्ही अधिकाधिक गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करता, ही गोष्ट प्रगतीच्या दृष्टीने चांगलीच असते. पण त्याचा अतिरेक करू नका. व्यापार उद्योगात फार मोठा धोका पत्करू नका. नोकरीमध्ये बढाया मारल्यात तर वरिष्ठ तुमच्यावर एकामागोमाग एक जबाबदारी टाकतील. नवीन नोकरीच्या प्रयत्नात यश मिळेल. घरामधला माहोल छान असेल, कारण प्रत्येकाकडे नवनवीन कल्पना असतील.

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
Efforts continue to rescue a six-year-old boy who fell into a borewell in Madhya Pradesh'
VIDEO : ४० फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला चिमुकला, १२ तासांपासून आपत्कालीन प्रतिसाद दलाकडून शर्थीचे प्रयत्न
Mumbai road mastic, Mumbai potholes road,
मुंबई : खड्ड्यांना ‘मास्टिक’ची मलमपट्टी, प्रयोगांना सोडचिठ्ठी देत नव्या प्रशासनाचे जुन्या पद्धतीलाच प्राधान्य

मिथुन जी कामे विनाकारण लांबलेली होती ती आता मार्गी लागतील. सतत भव्यदिव्य कल्पनांच्या राज्यामध्ये तुम्ही रममाण झालेले असता. विचार न करता केलेल्या कृतीमध्ये तुम्ही प्रचंड घाई कराल. अशी घाई तुम्हाला महागात पडेल. व्यवसाय उद्योगामध्ये फायदा वाढवण्याच्या दृष्टीने चांगली संधी तुमचे लक्ष आकर्षित करेल. पण त्यात दिसते तसे नसते असा प्रकार होऊ शकेल. वरिष्ठांशी गोडीगुलाबीने राहा. घरामध्ये विविध व्यक्तींचे विविध कार्यक्रम वातावरणात उत्साह निर्माण करतील.

कर्क ज्या कामामध्ये विलंब झाला होता त्यामध्ये आता हळूहळू वेग येईल. तुमच्या कर्तृत्वाला आणि कल्पकतेला भरपूर वाव देणारे ग्रहमान आहे. त्यामुळे आता नवे बेत करायला हरकत नाही. मात्र कार्यान्वित होत नाहीत तोपर्यंत त्याविषयी वाच्यता करू नका. व्यापार उद्योगात पेरल्याशिवाय उगवत नाही याची तुम्हाला जाणीव होईल. नोकरीमध्ये दम धरलात तर तुमच्या मागण्या मान्य करण्याचे वरिष्ठ आश्वासन देतील. घरामध्ये तुम्ही तुमचा शब्द खाली पडू देणार नाही. विद्यार्थ्यांनी योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन घ्यावे.

सिंह ग्रहस्थिती तुम्हाला रस्त्यावरील सिग्नलप्रमाणे थांबा, पाहा आणि पुढे जा असा इशारा देत आहे. नोकरीमध्ये वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी बोलताना जपून. नवीन नोकरी स्वीकारताना त्यातील जबाबदाऱ्यांचाही अंदाज घ्या. घरामध्ये नातेवाईक आप्तेष्ट यांच्याशी बोलताना त्यांचा अभिमान दुखावला जाणार नाही याकडे लक्ष द्या. नवीन जागा खरेदी करताना किंवा वडिलोपार्जित इस्टेटीचे प्रश्न सोडविताना कागदपत्रांची नीट छाननी करा. विद्यार्थ्यांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा कमी मार्क मिळतील.

कन्या तुमचा काहीही दोष नसताना एखादे काम लांबले असेल तर त्याला गती येईल. ग्रहमान सुधारले की माणसाच्या आचार-विचारात आणि हालचालींमध्ये एक प्रकारची तडफ दिसू लागते. व्यापार उद्योगामध्ये एखाद्या नवीन योजनेसाठी संबंधित व्यक्तींना कामाला लावाल. कारखानदारांना आर्थिकदृष्टय़ा फायदेशीर संधी दृष्टिक्षेपात येईल. नोकरीमध्ये तुमच्या कौशल्याला भरपूर वाव मिळाल्यामुळे संस्थेतर्फे तुमची बडदास्त ठेवली जाईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या मनाप्रमाणे करिअर मिळेल.

तूळ ग्रहमान तुम्हाला स्वप्नमयी दुनियेमध्ये दंग ठेवणारे आहे. एखादी गोष्ट जरी ताबडतोब पार पडणे शक्य नसेल तरी तुम्ही मात्र त्याचा पिच्छा पुरवल्याशिवाय राहणार नाही. मात्र हे सगळे करताना जास्त धोका पत्करू नका. व्यवसाय उद्योगामध्ये जाहिरात प्रसिद्धी वगैरे गोष्टींना महत्त्व द्यावे लागेल. नोकरीमध्ये तुमचे मन बंड करून उठेल. घरामध्ये जोडीदाराशी तात्त्विक प्रश्नावरून मतभेद होतील. कोणीच मागे हटणार नाही. विद्यार्थ्यांनी घाईघाईत करिअरचा निर्णय घेऊ नये. खेळाडू-तरुणांनी दुखापतीपासून जपून राहावे.

वृश्चिक ज्या वेळेला तुम्हाला विनाकारण कोणी डिवचते त्या वेळेला तुम्ही त्याला प्रतिउत्तर दिल्याशिवाय राहत नाही. एखाद्या प्रश्नाच्या बाबतीत तुमचा संयमाचा बांध सुटण्याची शक्यता आहे. मागचा-पुढचा विचार न करता जे तुम्हाला योग्य वाटेल ते करून तुम्ही मोकळे व्हाल. व्यापार उद्योगात आर्थिक व इतर स्थिती सुधारण्याकरिता एखादा कल्पक, धाडसी निर्णय घ्याल. नोकरीमध्ये ज्यांनी तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला त्यांच्याविरुद्ध दंड थोपटून उभे राहा. घरामध्ये तुमचा रागीट स्वभाव इतरांना दिसेल.

धनू जी कामे अगदी हातातोंडाशी येऊन काही कारणाने थांबून राहिलेली होती त्यामध्ये गती येण्यासाठी तुम्हाला सक्रिय बनावे लागेल. ज्या गोष्टींची अपेक्षा नव्हती, अशा घडामोडी घडल्यामुळे आपल्या नियोजनाला काही अर्थ राहत नाही, असा अनुभव येईल. व्यापार उद्योगात हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे लागण्याचा तुम्हाला मोह होईल. नोकरीमध्ये पूर्वी तुमच्या हातून काही चूक झाली असेल तर ती निस्तरण्यात वेळ जाईल. घरामध्ये तुमच्या वागण्या-बोलण्यात मार्दव ठेवा नाहीतर राईचा पर्वत व्हायला वेळ लागणार नाही.

मकर तुमची दूरदृष्टी आणि कष्टाळू वृत्ती यांचा योग्य समन्वय झाल्यामुळे यशाचे प्रमाण वाढणार आहे. काही महत्त्वाची कागदपत्रे किंवा माहिती तुम्हाला उपलब्ध झाली नसतील तर अशी कामे आता होतील. व्यवसाय उद्योगात एखादे नवीन आणि मोठे काम मिळण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी बदली होईल. बेकार व्यक्तींना काम मिळेल. घरामध्ये एखादी शुभवार्ता कळेल. नवीन जागेमध्ये स्थलांतर होईल. विद्यार्थ्यांना अपेक्षित कोर्सला प्रवेश मिळण्याची शक्यता आहे.

कुंभ इतरांवर अवलंबून राहायला लागल्यामुळे तुमची चिडचिड होईल. त्याचा राग कोणावर तरी निघण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये तुमचे कौशल्य आणि कल्पकतेचे महत्त्व वरिष्ठांना समजणार नाही. व्यापारामध्ये एकलव्याप्रमाणे ठरविलेले उद्दिष्ट साध्य कराल. पैशाची गुंतवणूक करण्यापूर्वी बाजारातील बदलत्या परिस्थितीचा अंदाज घ्या. घरामध्ये तुमचे विचार योग्य असूनही इतरांना ते न पटल्यामुळे तुम्हाला थोडी निराशा येईल. विद्यार्थ्यांनी चांगली संधी सोडली तर नंतर त्यांना पश्चात्ताप करायची वेळ येईल.

मीन ग्रहमान परस्परविरोधी आहे. एखाद्या प्रश्नावर तुम्ही तटस्थ राहायचा प्रयत्न कराल, पण काही कारणाने तुमचा संयम सुटेल. व्यापार उद्योगामध्ये नवनवीन कल्पना तुमच्या मनामध्ये घोळायला सुरुवात होईल. हितचिंतकांकडून सहकार्याचे आश्वासन मिळेल. आर्थिक बाजू सुधारेल. नोकरीमध्ये कामाचा कंटाळा आला तरी संस्थेत घडणाऱ्या घडामोडींमुळे हलचल निर्माण होईल. घरामधील एखाद्या सदस्याच्या प्रश्नामध्ये तुम्ही लक्ष घालून पुढाकार घ्याल.