lp00दहावी-बारावीनंतर कोणत्या क्षेत्रात करिअर करायचं, वेगवेगळ्या कोर्सेसची नेमकी कुठे माहिती मिळवायची हा अनेकांसमोर प्रश्न असतो. ही माहिती असेल तर तुमच्यासाठी अनेक गोष्टी सोप्या होतील.

खान-पान-आतिथ्य सेवा
सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या व्यवसायात हॉटेल व्यवसायाचा अग्र्रक्रम लागतो. अर्थव्यवस्था खुली झाली आहे. जागतिक व्यापार संघटेनेचे सदस्यत्व जगातील बहुतेक राष्ट्रांनी स्वीकारल्याने व्यापार व्यवसायाच्या सीमा एकमेकांत मिसळून गेल्या आहेत. त्यामुळे हॉटेल व्यवसायाची वाढ होण्याचा सध्याचा काळ सर्वोत्तम समजायला हवा. केंद्र आणि राज्य सरकारे या दोन्ही उद्योगांना बऱ्याच सवलती देतात.
प्रतिष्ठित हॉटेल्स त्यांच्या आतिथ्यासाठी, पदार्थासाठी, वैशिष्टय़पूर्ण सेवेसाठी ओळखली जातात. ही ओळख त्यांच्या यशाचा मापदंड ठरते. हॉटेल उद्योगाची वाढ होत असल्याने या उद्योगासाठी आवश्यक असलेल्या lp32प्रशिक्षित मनुष्यबळाचीही तेवढीच गरज भासते आहे. ही गरज हॉटेल आणि केटरिंग क्षेत्रातील व्यवस्थापन तज्ज्ञ भागवू शकतात.
हा व्यवसाय वाढत चालल्याने या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची गरजसुद्धा मोठय़ा प्रमाणावर निर्माण झाली आहे. या व्यवसायाचा आत्मा ‘सोफिस्टेकेशन’ असल्याने हे तंत्र आत्मसात करणे आवश्यक ठरते. हॉटेल व्यवसायाच्या आर्थिक समृद्धीशी हे तज्ज्ञ थेट संबंधित असल्याने त्यांना मोठी मार्केट व्हॅल्यू निर्माण झाली आहे. हॉटेल व्यवस्थापनाचे शिक्षण-प्रशिक्षण देणाऱ्या अनेक संस्था देशात आहेत. मात्र केंद्र आणि राज्य सरकारच्या साहाय्याने चालविण्यात येणाऱ्या संस्थांचा दर्जा व गुणवत्ता मोठी आहे.
भारत सरकारच्या पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणारी नॅशनल कौंसिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी ही संस्था आणि इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ (ओपन युनिव्हर्सिटी) मार्फत बॅचलर ऑफ सायन्स इन हॉस्पिटॅलिटी अँड हॉटेल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन या विषयाच्या प्रवेशासाठी संयुक्त प्रवेश परीक्षा घेण्यात येते. हा अभ्यासक्रम केल्यानंतर फूड प्रॉडक्शन, फूड अँड बिव्हरेजेस सव्‍‌र्हिस, फ्रंट ऑफिस ऑपरेशन, हाऊस कीपिंग, हॉटेल अकौंटंसी, फूड सेफ्टी अँड क्वालिटी, ह्य़ुमन रिसोर्स मॅनेजमेंट, फायनान्शियल प्लानिंग, फायनान्शियल मॅनेजमेंट, स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट, टुरिझम मार्केटिंग आणि टुरिझम मॅनेजमेंट यांसारख्या संस्थांमध्ये करिअरची संधी मिळते.
या परीक्षेद्वारे तीन वर्षे कालावधीच्या पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षांसाठी प्रवेश दिला जातो. भारत सरकारच्या अखत्यारीत असलेल्या २१ आणि राज्य सरकारांच्या अखत्यारीत असलेल्या २१ संस्था, १५ खासगी संस्था आणि ७ फूड क्रॉफ्ट इन्स्टिटय़ूटमध्ये प्रवेश दिला जातो.
अर्हता : या परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांने विज्ञान, कला किंवा वाणिज्य शाखेतील बारावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. मात्र प्रत्येक शाखेतील विद्यार्थ्यांनी बारावीला इंग्रजी हा विषय घेतलेला असावा. बारावीची परीक्षा देणारे विद्यार्थी ही प्रवेश परीक्षा देऊ शकतात. ही परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा २२ वर्षे. एसटी आणि एससीसाठी कमाल वयोमर्यादा २५ वर्षे.
१५ टक्के जागा एससीसाठी, ७.५ टक्के जागा एसटी आणि ३ टक्के जागा अपंगांसाठी राखीव आहेत.
स्पर्धा परीक्षा देशभरातील विविध शहरांमध्ये घेण्यात येते. यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि नागपूरचा समावेश आहे.
परीक्षा पद्धती
या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जॉइंट एन्ट्रन्स टेस्ट घेतली जाते. परीक्षेचा कालावधी तीन तास. या परीक्षेत ऑब्जेक्टिव्ह प्रकारातील प्रश्न विचारले जातील. यामध्ये १) न्यूमरिकल अँड सायंटिफिक अ‍ॅप्टिटय़ूड, २) रिझनिंग, लॉजिकल डिडक्शन ३) जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स ४) अ‍ॅप्टिटय़ूड फॉर सव्‍‌र्हिस सेक्टर या चार घटकांवर प्रत्येकी ३० गुणांचे प्रश्न विचारले जातील तर ५) इंग्रजी या घटकांवर ८० गुणांचे प्रश्न विचारले जातील.
पत्ता : नॅशनल कौंसिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट, हेड क्वार्टर- प्लॉट नंबर, ए-३४, सेक्टर-६२, नॉयडा, यूपी-२०१३०९, दूरध्वनी : ०१२०-२५९०६०४, वेबसाइट – www.nchm.nic.in
या परीक्षेद्वारे महाराष्ट्रातील इन्स्टिटय़ूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि कॅटेरिंग टेक्नॉलॉजी या शासकीय संस्थेत प्रवेश मिळू शकतो. पत्ता- वीर सावरकर मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई ४०००२८, दूरध्वनी- ०२२-२४४५७२४१

lp33डिझायनर्सचे जग
डिझाइन हा तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा समजला जातो. त्यामुळेच घरापासून ते घागऱ्यापर्यंत साऱ्याच गोष्टी डिझाइन केलेल्या मिळतात. दर्जा, गुणवत्ता आणि कलात्मकता या बाबी डिझाइनशी निगडित आहेत. देशातील उच्चवर्गापुरतं मर्यादित असलेलं डिझायनर्स जीवन जगण्याचं स्वप्न आता उच्च मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीयांनासुद्धा पडू लागलं आहे. डिझायनिंगमधील नवे तंत्र आणि मंत्रामुळे हे स्वप्न साकार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळेच विविध प्रकारच्या डिझायनर्सना मार्केटमध्ये मोठी मागणी निर्माण झाली आहे. या डिझायनर्सनी आपला अभ्यासक्रम इंडियन इन्स्टिटयूट ऑफ डिझाइन या संस्थेतून केलेला असल्यास त्याचा करियरचा ग्राफ हा सदैव चढत राहतो.
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन
वेगवेगळ्या विषयांमध्ये डिझाइनचे अभ्यासक्रम चालविणारी ही आपल्या देशातीलच नव्हे तर आशिया खंडातील एकमेव संस्था होय. या अभ्यासक्रमांना आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त झाली आहे. या क्षेत्रात माहिती तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर व्हावा यासाठी संस्थेने पुढाकार घेतला आहे. या संस्थेमार्फत पदवी आणि पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम चालविले जातात.
पदवी अभ्यासक्रम (बॅचलर ऑफ डिझाइन)
या अभ्यासक्रमांना बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. या विद्यार्थ्यांचे वय २० वर्षे असावे. या अभ्यासक्रमांचा कालावधी चार वर्षे. अभ्यासक्रमांतर्गत पुढील शाखांमध्ये स्पेशलायझेशन करता येते- अ‍ॅनिमेशन फिल्म डिझाइन/ सिरॅमिक अँड ग्लॉस डिझाइन/ एक्झिबिशन डिझाइन/ फिल्म अँड व्हिडीओ कम्युनिकेशन/ फर्निचर डिझाइन / ग्राफिक डिझाइन/ प्रॉडक्ट डिझाइन/ टेक्स्टाइल डिझाइन.
पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम
सिरॅमिक अँड ग्लास डिझाइन (एकूण जागा- १५), अ‍ॅपेरेल डिझाइन (एकूण जागा- १५), डिझाइन अँड रिटेल एक्सपीरियंस (एकूण जागा- १५), लाइफ स्टाइल अ‍ॅक्सेसरीज डिझाइन (एकूण जागा- १०), न्यू मीडिया डिझाइन (एकूण जागा- १५), फोटोग्राफी डिझाइन, प्रॉडक्ट डिझाइन (एकूण जागा- १५), स्ट्रॅटेजिक डिझाइन मॅनेजमेंट (एकूण जागा- १५), टेक्स्टाइल डिझाइन, टॉय अँड गेम डिझाइन (एकूण जागा- १५),
ट्रान्स्पोर्टेशन अँड ऑटोमोबाइल डिझाइन (एकूण जागा- १०), युनिव्हर्सल डिझाइन या शाखांमध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम करता येतो. या अभ्यासक्रमांचा कालावधी अडीच वर्षे. संबंधित शाखेच्या अनुषंगाने आवश्यक असणारी पदवी ही शैक्षणिक अर्हता समजली जाते. विद्यार्थ्यांचं वय २७ वर्षांपेक्षा अधिक नसावं. राखीव जागांसाठी तीन वर्षे वयात सवलत. उमेदवारांना कोणत्याही दोन विषयांसाठी अर्ज करता येईल. मात्र त्यासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागेल.
प्रवेश कसा मिळेल?
या संस्थेच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी स्पर्धापरीक्षा घेतली जाते. ही परीक्षा अहमदाबाद, बंगलोर, मुंबई, नागपूर, कानपूर, कोची, दिल्ली या केंद्रांवर होईल. या परीक्षेमधून निवडल्या गेलेल्या विद्यार्थ्यांना अहमदाबाद येथे स्टुडिओ टेस्ट आणि मुलाखतीसाठी एप्रिल/मेमध्ये बोलावले जाते. जूनच्या मध्यापासून प्रत्यक्ष अभ्यासक्रमास प्रारंभ होतो.
पत्ता : एनआयडी, पालडी, अहमदाबाद-३८०००७, गुजरात. दूरध्वनी : ०७९-२६६२३६९२/ २६६२३४६२, फॅक्स : २६६२११६७. वेबसाइट : www.nid.edu

lp34लष्करी सेवा
सेवेमध्ये जाण्यासाठी कम्बाइन्ड डिफेन्स सव्‍‌र्हिस परीक्षा हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. या परीक्षेद्वारे देहरादूनस्थित इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडमी, एजिमालास्थित इंडियन नेव्हल अ‍ॅकॅडमी, हैदराबादस्थित एअरफोर्स अ‍ॅकॅडमी, चेन्नईस्थित ऑफिसर्स ट्रेनिंग अ‍ॅकॅडमीमध्ये प्रवेश दिला जातो. विशेषत: ज्या तरुणींना लष्करात जाऊन साहस गाजवायचं आहे, त्यांच्यासाठी ही परीक्षा उत्तम संधी प्रदान करते. तरुणींना चेन्नईस्थित ऑफिसर्स ट्रेनिंग अ‍ॅकॅडमी येथील अतांत्रिक अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो.
इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडमीमधील काही जागा एनसीसी सी प्रमाणपत्र (आर्मी) धारकांसाठी राखीव असतात. इंडियन नेव्हल अ‍ॅकॅडमीमधील काही जागा एनसीसी सी प्रमाणपत्र (नेव्ही) धारकांसाठी राखीव असतात. या अ‍ॅकॅडमी कार्यकारी- सामान्य सेवेसाठीचा अभ्यासक्रम चालविला जातो. एअरफोर्स अ‍ॅकॅडमीमध्ये प्री-फ्लाइंग अभ्यासक्रम चालविला जातो. चेन्नईस्थित ऑफिसर्स ट्रेनिंग अ‍ॅकॅडमीमध्ये महिला आणि पुरुषांसाठी शॉर्ट सव्‍‌र्हिस कमिशन अभ्यासक्रम चालविला जातो.
शैक्षणिक अर्हता-
इंडियन नेव्हल अ‍ॅकॅडमी- मान्यताप्राप्त विद्यापीठातील अभियांत्रिकी पदवी. एअर फोर्स अ‍ॅकॅडमी- मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. मात्र बारावीमध्ये फिजिक्स आणि गणित या विषयांचा अभ्यास केलेला असावा किंवा अभियांत्रिकी पदवी. ऑफिसर्स ट्रेनिंग अ‍ॅकॅडमी- कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठात कोणत्याही विषयातील पदवी. इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडमी- कोणत्याही विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी.
परीक्षा प्रक्रिया
ही परीक्षा दरवर्षी दोनदा देशातील विविध शहरांमध्ये घेतली जाईल. यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई आणि नागपूर या शहरांचा समावेश आहे.
इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडमी, इंडियन नेव्हल अ‍ॅकॅडमी आणि एअर फोर्स अ‍ॅकॅडमीच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेत इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि मूलभूत अंकगणित या तीन विषयांचे प्रत्येकी दोन तासांचे आणि प्रत्येकी १०० गुणांचे तीन पेपर्स असतात.
ऑफिसर्स ट्रेनिंग अ‍ॅकॅडमीच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेत इंग्रजी आणि सामान्य ज्ञान या दोन विषयांचे प्रत्येकी दोन तासांचे आणि प्रत्येकी १०० गुणांचे दोन पेपर्स असतात. प्रश्न वस्तुनिष्ठ पद्धतीचे म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह असतात व ते इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषांत असतात. निगेटिव्ह मार्किंग आहे. प्रत्येक चुकलेल्या प्रश्नासाठी ०.३३ गुण वजा केले जातात. एकापेक्षा जास्त उत्तरे नोंदवल्यास ०.३३ गुण वजा केले जातात. प्रश्नाचे उत्तर लिहिले नाही तर कोणत्याही प्रकारे गुण वजा केले जात नाहीत.
या पेपरमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक गुणांचे निर्धारण कमिशनच्या वतीनं केलं जातं. मूलभूत गणिताच्या पेपरचा दर्जा हा दहावी स्तराचा आणि इंग्रजी व सामान्य अध्ययन पेपरचा दर्जा पदवी स्तराचा असतो. इंग्रजीच्या पेपरमध्ये उमेदवाराचं या भाषेवरचं सर्वसाधारण प्रभुत्व आणि शब्दांची उपयोगिता तपासली जाते. सामान्य अध्ययनाच्या पेपरमध्ये चालू घडामोडी, दैनंदिन जीवनाशी निगडित सामान्य विज्ञान, भारताचा इतिहास आणि भूगोल इत्यादी.
मुलाखतीचे गुण
इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडमी, इंडियन नेव्हल अ‍ॅकॅडमी आणि एअर फोर्स अ‍ॅकॅडमीच्या मुलाखतीसाठी ३०० गुण आणि ऑफिसर्स ट्रेनिंग अ‍ॅकॅडमीच्या प्रवेशासाठीच्या मुलाखतीसाठी २०० गुण असतात.
बुद्धिमता आणि व्यक्तिमत्त्व चाचणी
ही चाचणी दोनस्तरीय असते. पहिल्या टप्प्यात ऑफिसर्स इंटेलिजन्स टेस्टचा समावेश आहे. यामध्ये प्री पर्सेप्शन टेस्ट, डिस्क्रिप्शन टेस्टचा समावेश होतो. या टेस्टच्या गुणांवर आधारित दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारांची निवड केली जाते. या टप्प्यात मुलाखत, ग्रुप टेस्टिंग ऑफिसर टास्क, मानसशास्त्रीय चाचणी आणि चर्चा यांचा समावेश आहे. ही संपूर्ण प्रक्रिया चार दिवस चालते. उमेदवार मानसिक आणि बौद्धिकदृष्टय़ा लष्करी सेवा करण्यासाठी सक्षम आहे किंवा नाही याची सखोल तपासणी या चाळण्यांद्वारे केली जाते.
या परीक्षेला अर्ज करू इच्छिणारा उमेदवार शारीरिकदृष्टय़ा सक्षम असणं गरजेचं आहे. उंची, वजन, डोळे याविषयीचे मानके (स्टँडर्ड्स) निर्धारित करण्यात आले आहेत. अशाच पात्र उमेदवारांची निवड होऊ शकते.
विद्यावेतन आणि पदोन्नती
आर्मी आणि नेव्ही सेवांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षण काळात २१ हजार रुपये विद्यावेतन दिलं जातं. प्रशिक्षणाचा कालावधी- १८ महिने. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर पर्मनंट कमिशनद्वारे सेवेत सामावून घेतले जाते. या सेवेत येणाऱ्या उमेदवारांना दोन वर्षांत लेफ्टनंट, सहा वर्षांनंतर मेजर आणि १३ वर्षांनंतर लेफ्टनंट कर्नल, २६ वर्षांनंतर कर्नल या पदावर पदोन्नतीची संधी मिळू शकते. निवड पद्धतीने उमेदवारांना १५ वर्षांत कर्नल, २३ वर्षांत ब्रिगेडियर आणि २५ वर्षांत मेजर जनरल, २८ वर्षांत लेफ्टनंट जनरल या पदावर नियुक्तीची संधी मिळू शकते.
एअर फोर्स ट्रेनिंग अ‍ॅकॅडमीमध्ये ७४ आठवडय़ांचे प्रशिक्षण दिलं जातं. यशस्वी प्रशिक्षणानंतर उमेदवारांना फ्लाइंग ऑफिसर म्हणून सामावून घेतलं जातं. त्यानंतर कालबद्धरीत्या फ्लाइट लेफ्टनंट, स्क्वाड्रन लीडर, विंग कमांडर, ग्रुप कॅप्टन अशी पदोन्नती अनुक्रम २, ६, १३ आणि २६ वर्षांनंतर दिली जाते. निवड पद्धतीने एअर कमोडोर, एअर व्हाइस मार्शल, एअर मार्शल या पदांवर नियुक्ती होण्याचीही संधी मिळू शकते.
ऑफिसर्स ट्रेनिंग अ‍ॅकॅडमीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना दहा हजार महिना विद्यावेतन दिलं जातं. हे प्रशिक्षण ४९ आठवडय़ांचं असतं. हे प्रशिक्षण संपलं की लघू सेवा कमिशनद्वारे लेफ्टनंटच्या रँकमध्ये सामावून घेतलं जातं. हे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर मद्रास विद्यापीठाची डिफेन्स मॅनेजमेंट अ‍ॅण्ड स्ट्रॅटेजिक स्टडीज ही पदविका प्रदान केली जाते. प्रशिक्षणानंतर प्रारंभी दहा वर्षांसाठी सामावून घेतलं जातं. त्यानंतर उमेदवारांची कार्यक्षमता बघून चार वर्षांसाठी ही सेवा वाढवली जाऊ शकते. या सेवेत येणाऱ्या उमेदवारांना दोन वर्षांत कॅप्टन, सहा वर्षांनंतर मेजर आणि १३ वर्षांनंतर लेफ्टनंट या पदावर पदोन्नतीची संधी मिळू शकते.
फी आणि संपर्क
महिला आणि अनुसूचित जाती व जमाती संवर्गातील उमेदवारांना या परीक्षेची फी भरावी लागत नाही. खुल्या आणि इतर मागासवर्ग संवर्गातील उमेदवारांना २०० रुपये फी आहे. ही फी नेटबँकिंगद्वारे भरता येते. उमेदवारांनी http://www.upsconline.nic.in  या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करावा. उमेदवारांनी एकदाच अर्ज करणं आवश्यक आहे. अन्यथा अर्ज रद्द केला जातो. शासकीय सेवेत वा खासगी सेवेत असणारे उमेदवार थेट अर्ज करू शकतात. मात्र त्यांनी असा अर्ज केल्याची माहिती आपल्या सध्याच्या कंपनीला वा आस्थापनेला देणे गरजेचं आहे. मुलाखतीच्या वेळी संबंधितांचं ना हरकत प्रमाणपत्र सादर करावं लागतं.
परीक्षेच्या तीन आठवडे आधी ई-अ‍ॅडमिट कार्ड पाठवलं जातं. हे प्रवेशपत्र यूपीएससीच्या http://www.upsc.gov.in या संकेत-स्थळावरून डाऊनलोड करता येतं.
संपर्क- (१) फॅसिलेशन काऊंटर, दूरध्वनी- ०११-२३३८११२५/ २३३८५२७१, (२) इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडेमीसाठी- joinidianarmy.nic.in  (३) रिक्रूटमेंट डायरेक्टोरेट- ०११-२६१७३२१५, फॅक्स-२६१९६२०५, (४) एअर फोर्ससाठी- पीओ३ -ए/एअर हेडक्वार्टर्स, जे ब्लॉक, रूम नंबर-१७, अपोजिट वायू भवन, मोतीलाल नेहरू मार्ग, नवी दिल्ली-११००११, (५) नेव्हीसाठी- रूम नंबर- २०४, सी विंग, सेनाभवन, नवी दिल्ली-११००११, नेव्हीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी त्याचे नियुक्तीपत्र http://www.nausena-bharti.nic.in या संकेतस्थळावरून डाऊनलोड करावे.

lp35नौदलाचे बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी
नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडमी आणि इंडियन नेव्हल अ‍ॅकॅडमीसाठी दरवर्षी दोनदा संघ लोकसेवा आयोग म्हणजेच युनियन पब्लिक सव्‍‌र्हिस कमिशन मार्फत अखिल भारतीय स्तरावर स्पर्धा परीक्षा घेतली जाते. आयआयटी प्रवेशासाठी असणाऱ्या जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनसारखीच काठिण्य पातळी असणारी पण ही परीक्षा क्रॅक केली तरी विद्यार्थ्यांला कहाँ से कहाँ नेणारी नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडमी अ‍ॅण्ड नेव्हल अ‍ॅकॅडमी एक्झामिनेशन आहे. या परीक्षेचा समावेश विद्यार्थी आणि पालकांनी मिशन अ‍ॅडमिशनमध्ये आवर्जून करायलाच हवा. या परीक्षेद्वारे नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडमीसाठी निवडले गेलेल्या उमेदवारांना चार वर्षे कालावधीच्या बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजीचा अभ्यासक्रम करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येते. त्यानंतर जागेच्या उपलब्धतेनुसार नौदलाच्या कार्यकारी आणि तांत्रिकी शाखेत थेट अधिकारी म्हणून सामावून घेतले जाते.
या परीक्षेद्वारे लष्कर, नौदल आणि वायुदल आणि कार्यकारी शाखेतील सर्वसाधारणपणे ३०० हून अधिक जागा भरल्या जातात. ही परीक्षा १४ एप्रिल रोजी देशभरातील विविध केंद्रांमध्ये घेतली जाते. यामध्ये नागपूर केंद्राचा समावेश आहे. शैक्षणिक अर्हता : १) आर्मी (लष्कर) : १२ वी उत्तीर्ण; (२) वायुदल आणि नौदल शाखा : १२ वी. विद्यार्थ्यांने भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राचा अभ्यास केलेला असावा. यंदा १२ वीला असलेले विद्यार्थी या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.
या परीक्षेला अविवाहित मुलेच बसू शकतात. पत्ता : सेक्रेटरी, युनियन पब्लिक सव्‍‌र्हिस कमिशन, धोलपूर, नवी दिल्ली- ११००६९, लेखी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांची बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्त्व चाचणी घेतली जाते. त्यानंतरच अंतिम निवड केली जाते. दूरध्वनी : ०११-२३३८५२७१/ २३३८११२५/ २३०९८५४३
वेबसाइट- ६६६.४स्र्२ूल्ल’्रल्ली.ल्ल्रू.्रल्ल आणि ६६६.४स्र्२ू.ॠ५.्रल्ल
परीक्षा पद्धती
एनडीए परीक्षेसाठी गणित आणि सामान्य क्षमता चाचणी (जनरल अ‍ॅबिलिटी टेस्ट) असे दोन पेपर्स घेण्यात येतील. दोन्ही पेपरचा कालावधी प्रत्येकी अडीच तास आहे. गणिताचा पेपर तीनशे गुणांचा तर अ‍ॅबिलिटी टेस्टचे गुण सहाशे आहेत. ही परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची असेल. निगेटिव्ह मार्किंग पद्धतीचा अवलंब केला जातो.
जनरल अ‍ॅबिलिटी टेस्टच्या पेपरमध्ये इंग्रजीवर दोनशे गुणांचे प्रश्न विचारले जातील. या पेपरमध्ये व्याकरण आणि त्याचे उपयोग, शब्दसंग्रह, उताऱ्यावरील प्रश्न अशासारख्या प्रश्नांचा समावेश असेल. उमेदवारांच्या इंग्रजीवरील प्रभुत्वाची चाचणी करण्यासाठी हा पेपर घेण्यात येतो. सामान्य ज्ञानावर ४०० गुणांचे प्रश्न विचारले जातील. या पेपरमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, सामान्य विज्ञान, सामाजिक शास्त्रे, भूगोल, दैनंदिन घडामोडी यावर प्रश्न विचारले जातील. बुद्धिमापन आणि व्यक्तिमत्त्व चाचणीमध्ये विद्यार्थ्यांची सर्वसाधारण स्वरूपाची बुद्धिमत्ता तपासली जाते. ग्रुप डिस्कशन, ग्रुप प्लानिंग, आउटडोर ग्रुप टास्क अशासारख्या चाळण्यांनासुद्धा विद्यार्थ्यांना तोंड द्यावे लागते. या विषयावर त्यांना व्याख्यान (लेक्चर) द्यावे लागते. उमेदवारांची मानसिक क्षमता, दैनंदिन घडामोडीविषयी त्याचे आकलन, त्याची सामाजिक जाणीव यांची चाचपणी करण्यासाठी या चाळण्यांचा उपयोग होतो.
शारीरिक क्षमता
एनडीएची परीक्षा देऊ इच्छिणारा विद्यार्थी शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा सक्षम असावा. त्याला कोणत्याही स्वरूपाचा गंभीर स्वरूपाचा आजार नसावा. उंचीनुसारच त्याचं वजन असावं. कमी अथवा जास्त वजन नसावं.

एअरमॅन टेक्निकल ट्रेड
महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यंच्या मुख्यालयांमध्ये एअरमॅन ग्रुप टेन टेक्निकल ट्रेडपदाच्या निवडीसाठी रिक्रूटमेंट रॅली नियमितरीत्या आयोजित केली जाते. त्याच्या सूचना सर्व महत्त्वाच्या वृत्तपत्रांमधून वेळोवेळी दिल्या जातात. बारावीनंतर वायुदलात करिअर करण्यासाठी एअरमन हा एक चांगला पर्याय आहे. एअरमन होण्यासाठी नित्यनेमाने इच्छुक उमेदवारांची निवड केली जाते. कोणत्याही अविवाहित मुलास या पदासाठी नियुक्ती मिळू शकते.
कोणत्याही विषयातील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना एअरमन होण्याची संधी मिळू शकते. या विद्यार्थ्यांना बारावीमध्ये सरासरीने ५० टक्के गुण आणि इंग्रजीमध्ये ५० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. ही अर्हता नसल्यास ज्या विद्यार्थ्यांनी +२ स्तरावरील व्होकेशनल अभ्यासक्रम पूर्ण केला असेल, असेही विद्यार्थीही एअरमन पदासाठी अर्ज करू शकतात. हा अभ्यासक्रम बारावीशी समकक्ष असणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना सरासरीनं ५० टक्के गुण मिळणं आवश्यक आहे. इंग्रजीमध्ये ५० टक्के गुण मिळायला हवेत. व्होकेशनल अभ्यासक्रमात इंग्रजी विषय नसल्यास मॅट्रिक परीक्षेत इंग्रजीमध्ये ५० टक्के गुण मिळायला हवेत.
अर्हता
एअरमॅन ग्रुप टेन टेक्निकल ट्रेड पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा २१ वर्षांपेक्षा अधिक नसावा. किमान उंची १५२.५ सेमी असावी. छाती किमान पाच सेमीने फुगवता आली पाहिजे. उंची आणि वयाच्या प्रमाणात वजन असावे. उमेदवारांना सहा मीटरवरील कुजबुज दोन्ही कानांनी स्पष्टपणे ऐकायला यायली हवी. दंत आरोग्य उत्तम हवे. त्वचेचा आजार नको. संसर्ग आजार नको. जगातील कोणत्याही देशातील कोणत्याही हवामान आणि वातावरणात कार्यरत राहण्यासाठी मानसिक आणि शारीरिक क्षमता हवी. दृष्टीबाबतही विशिष्ट मानके निर्धारित करण्यात आली आहेत. दृष्टिदोषासाठी शस्त्रक्रिया झालेली नसावी. उमेदवार शारीरिकदृष्टय़ा तंदुरुस्त असावा आणि कोणतीही शस्त्रक्रिया झालेली नसावी.
निवडीचे टप्पे
एअरमन ग्रुप टेन टेक्निकल ट्रेडनिवडीसाठी लेखी परीक्षा, शारीरिक क्षमता चाचणी, मुलाखत आणि वैद्यकीय चाचणी या चार टप्प्यांना उमेदवारांना सामोरे जावे लागते.
१) लेखी चाळणी- ही परीक्षा वस्तुनिष्ठ पद्धतीची असते. पेपर इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषांत असतो. पेपरचा कालावधी ६० मिनिटे असतो. इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि गणित या विषयांवर प्रश्न विचारले जातील. अभ्यासक्रम सीबीएसईचा असेल. इंग्रजी सोडून इतर विषयांचे प्रश्न दोन्ही भाषांत असतात. उमेदवारांना सर्व सेक्शनमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक असते. लेखी परीक्षेचा निकाल त्याच दिवशी लावला जातो.
२) शारीरिक क्षमता चाचणी- लेखी परीक्षेत उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांना शारीरिक क्षमता चाचणी द्यावी लागते. ही चाचणी दुसऱ्या दिवशी होते. यामध्ये आठ मिनिटांमध्ये १.६ किलोमीटर धावणे या क्षमता चाचणीचा समावेश आहे. साडेसात मिनिटांत हे किलोमीटर पूर्ण केल्यास संबंधित उमेदवारांना अतिरिक्त गुण दिले जातात. या चाळणीसाठी उमेदवारांनी त्यांचे स्पोर्ट्स शूज आणणे आवश्यक आहे.
३) मुलाखती- जे उमेदवार लेखी परीक्षा आणि शारीरिक क्षमता उत्तीर्ण होतील त्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाते. मुलाखत इंग्रजीमध्ये होत असल्याने त्यांना संभाषण करण्याइतपत इंग्रजीचं ज्ञान आवश्यक ठरतं.
४) वैद्यकीय चाळणी- भारतीय वायू सेनेने निर्धारित केलेल्या प्रमाणकांनुसार वैद्यकीय चाळणी जानेवारी २०१५ मध्ये घेतली जाईल. जे उमेदवार या वैद्यकीय चाळणीत अयोग्य घोषित केले जातात त्यांना अपील मेडिकल बोर्डाकडे जाऊन पुनर्चाळणीची संधी घेता येऊ शकते.
उमेदवारांना प्रारंभी २० वर्षांपर्यंत नियुक्ती दिली जाते. ही नियुक्ती वयाच्या ५७ व्या वर्षांपर्यंत वाढू शकते. प्रारंभी बेळगाव (कर्नाटक) येथे असणाऱ्या प्रशिक्षण संस्थेत मूलभूत प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यावर विशिष्ट ट्रेडसाठी निवड केली जाऊन त्याचे प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष नियुक्तीच्या जागी पाठवले जाते.
निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यावर एअरमन सिलेक्शन सेंटर मुंबई येथे अखिल भारतीय निवड यादी जाहीर केली जाते. ही यादी http://www.indianairforce.nic.in  या संकेतस्थळावरही घोषित केली जाते.
पत्ता- कमांडिंग ऑफिसर ६, एअरमॅन सिलेक्शन सेन्टर, एअर फोर्स स्टेशन, कॉटन ग्रीन, मुंबई, महाराष्ट्र-४०००३३, दूरध्वनी-२३७१४९८२, विस्तार- २५१.

lp36फूड प्रोसेसिंग आणि फूड टेक्नॉलॉजी
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ क्रॉप प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी ही जागतिक दर्जाची शिक्षण आणि संशोधन देणारी संस्था आहे. ही संस्था भारत सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने स्थापन केली आहे. या संस्थेने बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन फूड प्रोसेसिंग इंजिनीयरिंग हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्हता- गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रासह बारावी उत्तीर्ण. या अभ्यासक्रमाचा कालावधी – चार वर्षे. खुल्या आणि इतर मागासवर्ग संवर्गातील विद्यार्थ्यांना ५० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांसाठी ही अट लागू नाही. या अभ्यासक्रमाला ४० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. हा प्रवेश बारावी विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयातील सरासरी गुणांवर आधारित दिला जातो.
प्रवेश कसा मिळेल?
या अभ्यासक्रमाला JEE- MAIN मध्ये मिळालेल्या गुणांवर प्रवेश दिला जातो. हा प्रवेश देताना बारावीच्या गुणांना ४० टक्के वेटेज आणि JEE- MAIN  च्या गुणांना ६० टक्के वेटेज दिला जाईल. JEE- MAIN परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना या संस्थेचा अर्ज स्वतंत्रपणे भरावा लागतो. ही संस्था प्रवेश प्रक्रिया स्वतंत्रपणे राबवते. ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमासाठी अर्ज केला असेल त्यांना JEE- MAIN  मध्ये मिळालेल्या गुणांवर व बारावीच्या गुणांवर आधारित प्रवेश निश्चित केला जातो.
या संस्थेने पदवी अभ्यासक्रमा-सोबतच मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी इन फूड प्रोसेसिंग इंजिनीयरिंग आणि पीएचडी अभ्यासक्रमसुद्धा सुरू केले आहेत. मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी इन फूड प्रोसेसिंग इंजिनीयरिंग या अभ्यासक्रमासाठी अर्हता- बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन फूड प्रोसेसिंग इंजिनीयरिंग, या अभ्यासक्रमाचा कालावधी – दोन वर्षे.
पत्ता- इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ क्रॉप प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी, पुदूकोट्टल रोड, तंजावूर- ६१३००५, तामीळनाडू, दूरध्वनी- ०४३६२-२२८१५५, फॅक्स- २२७९ ७१ मेल – academic@iicpt.edu.in वेबसाइट- www.iicpt.edu.in 

फूड टेक्नॉलॉजी एन्टरप्रिन्युरशिप अ‍ॅण्ड मॅनेजमेंट
गेल्या काही वर्षांत देशातील अन्न प्रक्रिया उद्योगाची वाढ दरवर्षी १५ टक्के वेगाने होत आहे. सध्या या क्षेत्राची झपाटय़ाने होत असलेली वाढ लक्षात घेता २०१७ सालापर्यंत ३५ लाखांवर तज्ज्ञ व्यक्तींची गरज भासू शकते. त्यामुळे या क्षेत्रात करिअरच्या उत्तमोत्तम संधी उपलब्ध होऊ शकतात. ही बाब लक्षात घेऊनच भारत सरकारने नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी एन्टरप्रिन्युरशिप अ‍ॅण्ड मॅनेजमेंट या संस्थेची स्थापना केली. ही संस्था अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयांतर्गत कार्यरत आहे.
या संस्थेमार्फत बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन फूड प्रोसेसिंग इंजिनीयरिंग आणि मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी इन फूड प्रोसेसिंग इंजिनीयरिंग हे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. याशिवाय संस्थेमार्फत पीएचडी करण्याचीही संधी उपलब्ध करून देण्यात येते.
संस्थेने सुरू केलेल्या बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन फूड टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड मॅनेजमेंट या अभ्यासक्रमाचा कालावधी हा चार वर्षे आहे.
अर्हता – या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र आणि गणित या दोन विषयांसह पुढीलपैकी कोणत्याही एका विषयात बारावी विज्ञान परीक्षेत ५० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. हे विषय आहेत- बायॉलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी किंवा कॉम्प्युटर सायन्स किंवा केमेस्ट्री. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि इतर अभियांत्रिकी संस्थांमधील प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या JEE- MAIN  या परीक्षेत मिळालेले गुण ग्राह्य़ धरले जातात.
करिअरच्या संधी – हा अभ्यासक्रम केल्यानंतर करिअरच्या पुढील संधी उपलब्ध होऊ शकतात- (१) प्रॉडक्ट डेव्हलपमेंट सायन्टिस्ट (२) सेन्सरी सायन्टिस्ट (३) फूड मायक्रोबॉयलॉजिस्ट (४) फूड अनॉलिस्ट (५) क्वालिटी कंट्रोल सुपरवायझर (६) फूड प्रोसेस इंजिनीअर (७) फूड इंटेलिजन्ट मॅनेजर (८) फूड रेग्युलेटरी अफेअर्स स्पेश्ॉलिस्ट (९) न्युट्रिशन स्पेश्ॉलिस्ट (१०) फूड फर्मेन्टेशन स्पेश्ॉलिस्ट (१०) फूड सव्‍‌र्हिस सेक्टर-सप्लाय चैन, पोस्ट हार्वेस्ट, फूड रिटेलिंग, फूड रेग्युलेशन, हेल्थ अ‍ॅण्ड वेल्थ वेलनेस सव्‍‌र्हिस प्रोव्हायडर (१२) फूड प्रोसेसिंग सेक्टर- स्नॅक फूड, बिव्हरजेस, मिट, वायनेरी, डेअरी.
या संस्थेच्या बीटेक अभ्यासक्रमाचा अर्ज http://www.niftem.ac.in  या वेबसाइटवर ठेवण्यात येतो. पत्ता- अ‍ॅडमिशन सेल, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी एन्टरप्रिन्युरशिप अ‍ॅण्ड मॅनेजमेंट, प्लॉट नंबर ९७, सेक्टर ५६, एचएसआयडीसी, इंडस्ट्रिअल इस्टेट, कुंडली – १३१०२८, जिल्हा-सोनपत, हरयाणा, दूरध्वनी- ०१३०-२२८११०१

अनोखे सामर्थ्य..
वेगळे शिक्षण
अपंगांना अनोख्या सामर्थ्यांचं धनी समजलं जातं. त्यांना तंत्रशुद्ध पद्धतीनं शिक्षण-प्रशिक्षण दिलं गेलं, तर ते स्वबळावर आयुष्य जगू शकतात. विविध प्रकारचं अपंगत्व असलेल्या व्यक्तींना शिक्षण आणि प्रशिक्षण देण्यासाठी स्पेशलाइज्ड अभ्यासक्रम भारत सरकारने सुरू केले आहेत. या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे अभ्यासक्रम करिअरच्या चांगल्या संधी उपलब्ध करून देतात. या अभ्यासक्रमांमध्ये पदवी, पदविका, प्रमाणपत्र आणि पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या संस्थांमधील काही अभ्यासक्रमांना थेट प्रवेश दिला जातो, तर काही अभ्यासक्रमांना चाळणी परीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो.
अली यावर जंग नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हिअरिंग हँडिकॅप्ड
ही संस्था भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे. या संस्थेने पुढील अभ्यासक्रम सुरू केले आहेत-
(१) बॅचलर ऑफ ऑडिऑलॉजी अ‍ॅण्ड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी, (१२ वी विज्ञान, फिजिक्स, केमेस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स किंवा बॉयलॉजी. हा अभ्यासक्रम संस्थेच्या मुंबई, कोलकाता, सिकंदराबाद, नवी दिल्ली या कॅम्पसमध्ये चालविला जातो. कालावधी- चार वर्षे)
(२) बॅचलर ऑफ एज्युकेशन इन हिअरिंग इम्ल्पाटिंग (कोणत्याही विषयातील बारावी. खुल्या आणि इतर मागासवर्ग संवर्गातील विद्यार्थ्यांना ४५ टक्के आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या संवर्गातील विद्यार्थ्यांना ४० टक्के गुण मिळायला हवेत. हा अभ्यासक्रम संस्थेच्या भुवनेश्वर, कोलकाता, सिकंदराबाद, नवी दिल्ली या कॅम्पसमध्ये चालविला जातो. प्रत्येक कॅम्पसमध्ये ३१ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.)
(३) डिप्लोमा इन हिअरिंग लँग्वेज अँड स्पीच, अर्हता-बारावी विज्ञान, फिजिक्स, केमेस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स किंवा बॉयलॉजी. हा अभ्यासक्रम संस्थेच्या भुवनेश्वर, कोलकाता, सिकंदराबाद, नवी दिल्ली या कॅम्पसमध्ये चालविला जातो. प्रत्येक कॅम्पसमध्ये ३१ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
(४) डिप्लोमा इन हिअरिंग लँग्वेज अँड स्पीच, (५) डिप्लोमा इन साइन लँग्वेज इंटरप्रीटर कोर्स- अर्हता- कोणत्याही शाखेतील बारावी. उच्च अर्हता असल्यास उत्तम. बारावी परीक्षेत ५० टक्के किंवा त्याहून अधिक गुण असल्यास दरमहा दोन हजार रुपये स्टायपंड दिला जातो. हा अभ्यासक्रम संस्थेच्या कोलकाता, मुंबई, नवी दिल्ली या कॅम्पसमध्ये चालविला जातो. कालावधी एक वर्ष.
६) बॅचलर ऑफ एज्युकेशन इन हिअरिंग इम्ल्पाटिंग, अर्हता-कोणत्याही विषयातील पदवी. हा अभ्यासक्रम संस्थेच्या मुंबई, कोलकाता, सिकंदराबाद या कॅम्पसमध्ये चालविला जातो. या अभ्यासक्रमाच्या मुंबई आणि कोलकाता कॅम्पस येथील प्रवेशासाठी मुंबई येथील कॅम्पसमध्ये चाळणी परीक्षा घेतली जाते. कालावधी- एक वर्षे. मुंबई कॅम्पसमध्ये ३९ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
पत्ता- अली यावर जंग नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हिअरिंग हँडिकॅप्ड बांद्रा रिक्लेमेशन, बांद्रा वेस्ट, मुंबई-४०००५०, दूरध्वनी- ०२२-२६४००२१५, फॅक्स- २६४०४१७०. मेल- ayjnihh-mum@nic.in, वेबसाइट- ayjnihh.nic.in

ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ स्पीच अ‍ॅण्ड हिअरिंग
ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ स्पीच अ‍ॅण्ड हिअरिंग ही संस्था म्हैसूर येथे असून या संस्थेची स्थापना भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने स्थापन केली आहे. ही स्वायत्त संस्था आहे. ही संस्था म्हैसूर विद्यापीठाशी संलग्न आहे.
या संस्थेमध्ये बॅचलर ऑफ सायन्स इन स्पीच अ‍ॅण्ड हिअरिंग हा अभ्यासक्रम चालविला जातो. या अभ्यासक्रमाला अखिल भारतीय प्रवेश परीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो. या अभ्यासक्रमाचा कालावधी चार वर्षे आहे. हा अभ्यासक्रम सहा सत्रांचा आहे. एक वर्ष इंटर्नशिपचे आहे. अर्हता-बारावी विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित या विषयांमध्ये सरासरीने ५० टक्के गुण मिळायला हवेत.
परीक्षेचा पॅटर्न
चाळणी परीक्षेच्या पेपरमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित विषयांवरील प्रश्न विचारले जातील. यापैकी कोणत्याही तीन विषयांतील प्रश्न सोडवावे लागतील. हा अभ्यासक्रम अकरावी आणि बारावीच्या केंद्रीय बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारित राहील. अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांची निवड या परीक्षेत मिळालेल्या गुणांवर आधारित केली जाते. या परीक्षेची केंद्रे- मुंबई, म्हैसूर, कोलकाता, दिल्ली, चेन्नई, गौहाटी.
अल्प कालावधीचे अभ्यासक्रम
या संस्थेने अल्प कालावधीचे अभ्यासक्रमसुद्धा सुरू केले आहेत. ते पुढीलप्रमाणे आहेत.
(१) सर्टिफिकेट कोर्स ऑन कम्युनिकेशन डिसऑर्डर, अर्हता- दहावी उत्तीर्ण/ कालावधी- १४ आठवडे. २० ते २५ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
(२) डिप्लोमा इन हिअरिंग एड अ‍ॅण्ड इअरमोल्ड टेक्नॉलॉजी, अर्हता-इलेक्ट्रॉनिक्स विषयासह आयटीआय / कालावधी- एक वर्ष. २० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
(३) डिप्लोमा इन हिअरिंग लँग्वेज अ‍ॅण्ड स्पीच थ्रू क्वासी डिस्टन्स मोड, अर्हता- बारावी / कालावधी- एक वर्ष. २० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
(४) डिप्लोमा इन यंग (डिफ अ‍ॅण्ड हिअरिंग), अर्हता- बारावी (भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ जीवशास्त्र / गणित) / कालावधी- एक वर्ष. २५ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
(५) बॅचलर ऑफ सायन्स इन एज्युकेशन इन हिअरिंग इम्पेरमेंट, या अभ्यासक्रमाला चाळणी परीक्षा न घेता थेट प्रवेश दिला जातो. या अभ्यासक्रमाला २० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. अर्हता- बीएड. या अभ्यासक्रमाचा कालावधी – एक वर्ष. या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांस ४०० रुपये स्टायपेंड दिले जाते.
पत्ता- ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ स्पीच अ‍ॅण्ड हिअरिंग, नैमिशाम कॅम्पस, मानसगंगोत्री, म्हैसूर- ५७०००६, दूरध्वनी- ०८२१-२५१२०००, फॅक्स- २५१०५१५, वेबसाइट- http://www.aiishmysore.in  ई-मेल – admissions@aiishmysore.in. माहितीपत्रक आणि अर्ज संस्थेच्या वेबसाइटवरून डाऊनलोड करता येतो.

lp37मरिन इंजिनीअरिंग आणि नॉटिकल सायन्स
जहाजबांधणी आणि सागरी क्षेत्राशी निगडित करिअर करण्यासाठी उपयुक्त ठरतील असे अभ्यासक्रम इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सिटीने सुरू केले आहेत. या संस्थेची स्थापना २००८ साली केंद्रीय युनिव्हर्सिटी म्हणून करण्यात आली. संस्थेच्या वतीने पदवी, पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक सुरू करण्यात आले आहेत. या संस्थेची मुंबई, चेन्नई, कांडला पोर्ट, कोलकाता, कोचिन आणि विजाग येथे कॅम्पसेस आहेत.
संस्थेच्या स्कूल ऑफ नॉटिकल स्टडीजतर्फे पुढील अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. १) बॅचलर ऑफ सायन्स इन नॉटिकल सायन्स. हा अभ्यासक्रम चेन्नई, मुंबई, कोलकाता, कोचिन कांडला पोर्ट येथे शिकवला जातो. अर्हता- बारावी विज्ञान शाखेत फिजिक्स, केमेस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स या विषयांमध्ये सरासरीने ६० टक्के, इंग्रजीमध्ये ५० टक्के गुण मिळायला हवेत. या अभ्यासक्रमांना केवळ अविवाहित उमेदवारच अर्ज करू शकतात.
२) बॅचलर ऑफ सायन्स इन नॉटिकल सायन्स. हा तीन वर्षं कालावधीचा अभ्यासक्रम चेन्नई, मुंबई या कॅम्पसमध्ये शिकविला जातो. अर्हता- बारावी विज्ञान शाखेत फिजिक्स, केमेस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स या विषयांमध्ये सरासरीने ६० टक्के, इंग्रजीमध्ये ५० टक्के गुण मिळायला हवेत. या अभ्यासक्रमांना केवळ अविवाहित उमेदवारच अर्ज करू शकतात. दोन्ही अभ्यासक्रम निवासी स्वरूपाचे आहेत.
स्कूल ऑफ नॉटिकल स्टडीजमार्फत बॅचलर ऑफ सायन्स इन मेरिटाइम सायन्स हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. हा तीन वर्षं कालावधीचा असून तो मुंबई कॅम्पसमध्ये शिकविला जातो. अर्हता- बारावी विज्ञान शाखेत फिजिक्स, केमेस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स या विषयांमध्ये सरासरीने ६० टक्के, इंग्रजीमध्ये ५० टक्के गुण मिळायला हवेत. हा अभ्यासक्रम निवासी स्वरूपाचा आहे.
स्कूल ऑफ मरिन इंजिनीअरिंगतर्फे बॅचलर ऑफ टेक्नालॉजी इन मरिन इंजिनीअरिंग हा चार वर्षं कालावधीचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम मुंबई आणि चेन्नई कॅम्पसमध्ये शिकविला जातो अर्हता- बारावी विज्ञान शाखेत फिजिक्स, केमेस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स या विषयांमध्ये सरासरीने ६० टक्के, इंग्रजीमध्ये ५० टक्के गुण मिळायला हवे. हा निवासी अभ्यासक्रम आहे.
स्कूल ऑफ नेव्हल आर्किटेक्चर अ‍ॅण्ड ओशन इंजिनीअरिंगतर्फे बॅचलर ऑफ सायन्स इन शिप बिल्डिंग अ‍ॅण्ड रिपेअर हा तीन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम कोचिन कॅम्पसमध्ये सुरू करण्यात आला आहे. अर्हता- बारावी विज्ञान शाखेत फिजिक्स, केमेस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स या विषयांमध्ये सरासरीने ६० टक्के, इंग्रजीमध्ये ५० टक्के गुण मिळायला हवेत. हा अभ्यासक्रम अनिवासी स्वरूपाचा आहे.
स्कूल ऑफ नेव्हल आर्किटेक्चर अ‍ॅण्ड ओशन इंजिनीअरिंगने बॅचलर ऑफ टेक्नालॉजी इन नेव्हल आर्किटेक्चर अ‍ॅण्ड ओशन इंजिनीअरिंग अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी चार वर्षं. हा अभ्यासक्रम विशाखापट्टणम कॅम्पसमध्ये शिकविला जातो. अर्हता- बारावी विज्ञान शाखेत फिजिक्स, केमेस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स या विषयांमध्ये सरासरीने ६० टक्के, इंग्रजीमध्ये ५० टक्के गुण मिळायला हवे. हा निवासी अभ्यासक्रम आहे. हा अभ्यासक्रम अनिवासी स्वरूपाचा आहे.
प्रवेश प्रकिया
या अभ्यासक्रमांना अखिल भारतीय चाळणी परीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो. महाराष्ट्रातील या परीक्षेची केंद्रे- मुंबई, पुणे, नागपूर. परीक्षेसाठी अर्ज ऑनलाइनच करावा लागेल. या अभ्यासक्रमांसाठी http://www.imu.edu.in या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करता येतो. पत्ता- इस्ट कोस्ट रोड, उत्थांडी, चेन्नई, तामिळनाडू-६००११९, दूरध्वनी- ०४४-२४५३०३४३.

lp38फॅशनच्या वाटा
तुमचं आमचं संपूर्ण व्यक्तिमत्त्व बदलवून टाकण्याचं सामथ्र्य फॅशन डिझायनर्समध्ये असतं. परदेशात असताना आपले पंतप्रधान जे डिझायनर्स सूट घालतात, त्यामुळे त्यांचं आधीचंच बहारदार असलेलं व्यक्तिमत्त्व आणखी खुलून दिसायला लागल्याचं बोललं जातं.
फॅशन डिझायनर्स कोणतीही किमया करू शकतात. त्यांनी माधुरी, करिश्मा, राणी मुखर्जी या नटय़ांना नवा स्मार्ट लुक दिला. अनेक पुरुष नटांचं बहारदार व्यक्तिमत्त्व या डिझायनर्सच्या पोशाखांमुळेच उठावदार झालेलं असतं. केवळ ग्लॅमरच्या क्षेत्रातच डिझायनर्स कपडय़ांची चलती नसून सामान्य व्यक्तीलासुद्धा असे कपडे हवे असतात. त्यालासुद्धा यशस्वी व्हायचंय. स्मार्ट काळाची गती ओळखून धावायचय. त्यामुळेच नवे ट्रेंड्स, नव्या स्टाइल याकडे तो बारकाईनं लक्ष ठेवून असतो.
दर पंधरा दिवसाला मुंबईच्या फॅशन स्ट्रीटवर नव्या ट्रेंडी पोशाखांचा पाऊस पडलेला असतो. प्रत्येक व्यक्ती रितू बेरी, नीता लुल्ला किंवा मनीष मल्होत्रा बनू शकत नसल्या तरी सर्जनशील व्यक्ती या व्यवसायात उत्तम प्रगती साधू शकते. मात्र त्यासाठी त्याने दर्जेदार संस्थेमधून शिक्षण- प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. अशी एक संस्था आहे – नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नालॉजी. ही देशातील सर्वात महत्त्वाची आणि दर्जेदार संस्था ही भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे. या संस्थेमार्फत फॅशन डिझाइन उद्योगाशी निगडित पुढील अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.
१) बॅचलर ऑफ डिझाइन इन अ‍ॅक्सेसरी डिझाइन.
या अभ्यासक्रमाचा कालावधी- चार वर्षे, हा अभ्यासक्रम गांधीनगर, बेंगलुरू, नवी दिल्ली, भूवनेश्वर, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, रायबरेली, मुंबई, जोधपूर, कानपूर, भोपाळ आणि शिलाँग येथील कॅम्पसमध्ये चालविण्यात येतो.
२) बॅचलर ऑफ डिझाइन इन फॅशन कम्युनिकेशन.
या अभ्यासक्रमाचा कालावधी- चार वर्षे, हा अभ्यासक्रम बेंगलुरू, नवी दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, कोलकता, मुंबई, कानपूर, कांग्रा आणि गांधीनगर येथील कॅम्पसमध्ये चालविण्यात येतो.
३) बॅचलर ऑफ डिझाइन इन फॅशन डिझाइन.
या अभ्यासक्रमाचा कालावधी- चार वर्षे, हा अभ्यासक्रम गांधीनगर, बेंगलुरू, नवी दिल्ली, भुवनेश्वर, चेन्नई, हैदराबाद, कोलकता, रायबलेरी, मुंबई, पाटणा , कानपूर, कांग्रा, आणि शिलाँग येथील कॅम्पसमध्ये चालविण्यात येतो.
४) बॅचलर ऑफ डिझाइन इन निटवेअर डिझाइन.
या अभ्यासक्रमाचा कालावधी- चार वर्षे. हा अभ्यासक्रम बेंगलुरू, नवी दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, मुंबई, कानपूर, येथील कॅम्पसमध्ये चालविण्यात येतो.
५) बॅचलर ऑफ डिझाइन इन लेदर डिझाइन
या अभ्यासक्रमाचा कालावधी- चार वर्षे, हा अभ्यासक्रम नवी दिल्ली, चेन्नई, कोलकता, रायबलेरी येथील कॅम्पसमध्ये चालविण्यात येतो.
या अभ्यासक्रमाचा कालावधी- दोन वर्षे, हा अभ्यासक्रम गांधीनगर, बेंगलुरू, नवी दिल्ली, भुवनेश्वर, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, पाटणा, रायबलेरी, मुंबई, जोधपूर, कानपूर आणि शिलाँग येथील कॅम्पसमध्ये चालविण्यात येतो.
६) बॅचलर ऑफ डिझाइन इन टेक्सटाइल डिझाइन.
या अभ्यासक्रमाचा कालावधी- चार वर्षे, हा अभ्यासक्रम बेंगलुरू, भूवनेश्वर, भोपाळ, गांधीनगर, नवी दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, मुंबई, कांग्रा, कानपूर, जोधपूर आणि पाटणा येथील कॅम्पसमध्ये चालविण्यात येतो.
(अर्हता- उपरोक्त नमूद १ ते ६ अभ्यासक्रमांसाठी कोणत्याही शाखेतील १२वीची परीक्षा उत्तीर्ण)
७) बॅचलर ऑफ फॅशन टेक्नालॉजी इन अ‍ॅपरेल प्रॉडक्शन.
अर्हता- फिजिक्स, केमेस्ट्री, मॅथेमॅटिक्स या विषयांसह १२वीची परीक्षा उत्तीर्ण) या अभ्यासक्रमाचा कालावधी- चार वर्षे, हा अभ्यासक्रम गांधीनगर, बेंगलुरू, नवी दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, पाटणा, मुंबई, कानपूर, काँग्रा येथील कॅम्पसमध्ये चालविण्यात येतो.
पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम
या संस्थेमार्फत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमही सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये
१) मास्टर ऑफ डिझाइन इन डिझाइन स्पेस. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण, किंवा नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नालॉजीचे बॅचलर ऑफ डिझाइन ही पदवी किंवा नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइनची पदवी/पदविका) या अभ्यासक्रमाचा कालावधी- दोन वर्षे, हा अभ्यासक्रम कानपूर, मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई येथील कॅम्पसमध्ये चालविण्यात येतो.
२) मास्टर ऑफ डिझाइन इन फॅशन मॅनेजमेंट
(अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी परीक्षा उतीर्ण किंवा नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नालॉजीचे बॅचलर ऑफ डिझाइन ही पदवी किंवा नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइनची पदवी/पदविका या अभ्यासक्रमाचा कालावधी- दोन वर्षे, हा अभ्यासक्रम गांधीनगर, बेंगलुरू, नवी दिल्ली, भुवनेश्वर, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, पाटणा, रायबलेरी, मुंबई, जोधपूर, कानपूर आणि शिलाँग येथील कॅम्पसमध्ये चालविण्यात येतो.
३) मास्टर ऑफ डिझाइन इन फॅशन टेक्नालॉजी
(अर्हता- बॅचलर ऑफ टेक्नालॉजी किंवा नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नालॉजीचे) बॅचलर ऑफ फॅशन टेक्नालॉजी ही पदवी. या अभ्यासक्रमाचा कालावधी- दोन वर्षे, हा अभ्यासक्रम गांधीनगर, बेंगलुरू आणि नवी दिल्ली येथील कॅम्पसमध्ये चालविण्यात येतो.
या अभ्यासक्रमांना चाळणी परीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो. ही परीक्षा देशभरातील विविध शहरांमध्ये घेतली जाते. या परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांची अंतिम निवड मुलाखत आणि समूह चर्चेनंतर केली जाते.
पत्ता.
१) नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी प्लॉट क्र. १५, सेक्टर चार, खारघर, नवी मुंबई-४१०२१० दूरध्वनी : ०२२-२७५६५३८६ फॅक्स : २७५६३७५८
२) नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी कॅम्पस, हौज खास, गुलमोहर पार्कजवळ, नवी दिल्ली-११००१६, दूरध्वनी : ०११-२६५४२१०० फॅक्स : २६५४५२१५१ वेबसाइट- www.nift.ac.in

lp39अंतराळ संशोधनाची दिशा
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ स्पेस सायन्स अ‍ॅण्ड टेक्नालॉजी ही संस्था भारत सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ स्पेसअंतर्गत कार्यरत असणारी संस्था होय.
वालीमाला-तिरुवनंतपूरम येथे स्थित या संस्थेत अवकाशशास्त्र आणि तंत्रज्ञानातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम चालविले जातात. या संस्थेत जागतिक संशोधनाच्या सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या संस्थेत प्रवेश मिळालेल्या प्रत्येक उमेदवाराला शैक्षणिक शुल्क, निवास, भोजन यासाठी साहाय्य दिले जाते. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये अभियंते किंवा शास्त्रज्ञ म्हणून सामावून घेतले जाते.

या संस्थेत बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन एरोस्पेस, एव्हीओनिक्स आणि फिजिकल सायन्स या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी JEE-ADVANCED मधील गुण ग्राह्य़ धरले जातात.
अर्हता- उमेदवारांना १२वी परीक्षेत भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्रात ७० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. एससी, एसटी आणि शारीरिकदृष्टय़ा अपंगांसाठी ६० टक्के गुण हवेत. त्याशिवाय दहावीच्या परीक्षेत ७० टक्के गुण मिळायला हवेत (एससी, एसटी आणि शारीरिकदृष्टय़ा अपंगांसाठी ६० टक्के गुण हवेत.). उमेदवारांनी दहावी आणि बारावीची परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
संपर्क- द चेअरमन, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ स्पेस सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, वालीयामाला, तिरुवनंतपूरम ६९५५४७ केरळ. दूरध्वनी- ०४७१-२५६८४५२, फॅक्स- २५६८४६२, वेबसाइट – http://www.iist.ac.in, ईमेल – admin@iist.ac.in

lp40चला, वकील होऊ या..
नॅशनल लॉ स्कूल्स
भारतातील सर्व प्रमुख विद्यापीठांमध्ये एलएलबीचा अभ्यासक्रम वर्षांनुवर्षे सुरू आहे. मात्र त्यातील शिक्षणाच्या दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केले जात असतात. ही बाब ध्यानात घेऊन नॅशनल लॉ स्कूल /युनिव्हर्सिटीची स्थापना करण्यात आली. कायद्याच्या विविध पैलूंचे आणि विषयाचे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्णशिक्षण देण्यासाठी, (१) बेंगलुरू (२) हैदराबाद, (३) भोपाळ, (४) कोलकाता, (५) जोधपूर, (६) रायपूर, (७) गांधीनगर, (८) लखनौ, (८) पतियाळा, (९) पाटणा, (१०) कोची (११) ओरिसा, (१२) रांची, (१३) कोची, (१४) गौहाटी, (१५) तिरुचिरापल्ली, (१६) विशाखापट्टणम
या ठिकाणी १६ स्कूलची निर्मिती केली गेली. या संस्थांमध्ये पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अखिल भारतीय स्तरावर कॉमन लॉ अ‍ॅडमिशन टेस्ट घेतली जाते. या परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या उमेदवाराला १२ वीच्या कोणत्याही शाखेत ४५ टक्के गुण मिळायला हवेत. एसस्सी, एसटी, ओबीसी गटातील उमेदवारांना ४० टक्के गुण हवेत. या परीक्षेद्वारे १६६० जागा भरल्या जातात.
कॉमन लॉ अ‍ॅडमिशन टेस्ट
कॉमन लॉ अ‍ॅडमिशन टेस्ट देऊ इच्छिणारा उमेदवार २० वर्षांपेक्षा अधिक नसावा. एससी, एसटी, अपंग गटातील उमेदवारांसाठी ही वयोमर्यादा- २२ वर्षे. या टेस्टचा अर्ज http://www.clat.ac.in  या वेबसाइटवरून डाऊनलोड करता येईल. तसेच या वेबसाइटवर असलेल्या लिंकद्वारे ऑनलाइन अर्जसुद्धा भरता येतो. ईमेल- helpdesk@clat.ac.in 
परीक्षा पॅटर्न- कॉमन लॉ अ‍ॅडमिशन टेस्टचा कालावधी दोन तासांचा राहील. यामध्ये २०० गुणांचे दोनशे प्रश्न विचारले जातील. प्रत्येक चुकलेल्या उत्तरासाठी ०.२५ टक्के गुण वजा केले जातील. ही प्रश्नपत्रिका ऑब्जेक्टिव्ह व बहुपर्यायी पद्धतीची राहील. यामध्ये (१) इंग्रजी कॉम्प्रेहेन्शन या घटकावर ४० गुणांचे प्रश्न विचारले जातील. (२) सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी या घटकावर ५० गुणांचे प्रश्न विचारले जातील. (३) प्राथमिक अंकगणित या घटकावर २० गुणांचे प्रश्न विचारले जातील. या घटकात विद्यार्थ्यांची संख्यात्मक क्षमतेची चाचपणी केली जाते, (४) लॉजिकल रिझनिंग या घटकावर ४० गुणांचे प्रश्न विचारले जातील. (५) लीगल अ‍ॅप्टिटय़ूड या घटकावर ५० गुणांचे प्रश्न विचारले जातील. विद्यार्थ्यांचा विधि शाखेचा अभ्यासक्रम करण्याची क्षमता, कल, आवड याची चाचपणी या घटकातील प्रश्नांद्वारे केली जाते. ही परीक्षा देशभरातील विविध शहरांमध्ये घेतली जाते. यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई शहराचा समावेश आहे.
जून महिन्यात प्रत्यक्ष प्रवेशासाठी कौन्सिलिंग घेतले जाते. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पहिल्या २५०० विद्यार्थ्यांंना ऑनलाइन कौन्सिलिंगमध्ये सहभागी होण्याची संधी दिली जाईल. या उमेदवारांना मिळालेले गुण आणि त्यांनी दर्शवलेला संस्थेचा पसंती क्रम यावर आधारित प्रवेश निश्चित केला जाईल. कौन्सिलिंगच्या वेळी ऑनलाइन पद्धतीने एक लाख रुपये फी भरावी लागते. ही फी भरली नाही तर उमेदवार आपल्या जागेवरील हक्क गमावू शकतो. उमदेवारांनी अंतिमत: ज्या संस्थेत प्रवेश मिळाला असेल त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन उर्वरित फी आणि इतर बाबींची पूर्तता करावी लागते.
नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी
या संस्थेची स्थापना २००८ साली करण्यात आली. या संस्थेमार्फत बॅचलर ऑफ आर्ट्स अ‍ॅण्ड एलएलबी (ऑनर्स) हा पाच वर्षं कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी ऑल इंडिया लॉ एन्ट्रन्स टेस्ट (ailet) घेण्यात येते. हा अभ्यासक्रम ऑगस्टमध्ये सुरू होईल. ही चाळणी परीक्षा अहमदाबाद, बंगलोर, भोपाळ, चंदिगढ, चेन्नई, कोचिन, दिल्ली, गौहाटी, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कोलकत्ता, लखनौ, मुंबई, नॉयडा आणि पाटणा येथे घेण्यात येते. पत्ता-नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी दिल्ली, सेक्टर १४, द्वारका, न्यू दिल्ली-११००७८, वेबसाइट- http://www.nludelhi.ac.in, दूरध्वनी- ०११-२८०३४२५७, admissionhelp.com, चाळणी परीक्षा दीड तासाची राहील. या परीक्षेमध्ये इंग्रजी (एकूण गुण ३५), जनरल नॉलेज (एकूण गुण ३५), करंट इव्हेन्ट्स/ जनरल सायन्स/ हिस्ट्री/ जिओग्रॅफी/ इकॉनॉमिक्स इत्यादी (एकूण गुण ३५), लीगल अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट (एकूण गुण ३५), रिझनिंग आणि एलिमेंटरी मॅथेमॅटिक्स (न्यूमेरिकल अ‍ॅबिलिटी ) (एकूण गुण १०), या विषयांवर १५० गुणांचे १५० प्रश्न विचारले जातील.
डॉ. आंबेडकर लॉ कॉलेज
तिरुपतीस्थित डॉ. आंबेडकर लॉ कॉलेजची स्थापना १९११ साली करण्यात आली. या महाविद्यालयानं बॅचलर ऑफ बिझिनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन हा पाच वर्षं कालावधीचा इंटिग्रेटेड अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमाला १२० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांंना प्रशासन, व्यवस्थापन, बॅकिंग, औद्योगिक क्षेत्र आणि विधि शिक्षण आणि न्यायालयांमध्ये करियरच्या उत्तमोत्तम संधी उपलब्ध होऊ शकतात.
या अभ्यासक्रमात व्यवस्थापनाचे तंत्र-कौशल्य आणि आजच्या काळाशी सुसंगत असे विधि शिक्षणाचे एकत्रीकरण करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांत औद्योगिक, विज्ञान आणि तंत्रज्ञान, प्रशासकीय, नियोजन आणि व्यवस्थापकीय क्षेत्रात विविध प्रकारचे बदल झपाटय़ाने झाले आहेत. हे बदल अद्यापही होत आहेत. या बदलांशी सुसंगत अशा विधि अभ्यासक्रमाची गरज निर्माण झाली. ही बाब लक्षात घेऊन बार कौन्सिल ऑफ इंडियाने विधी अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यासाठी न्यायाधीश, विधि महाविद्यालयांतील प्राध्यापक यांचे साहाय्य घेण्यात आले. याच संस्थेने बॅचलर ऑफ आर्ट अ‍ॅण्ड एलएलबी, बॅचलर ऑफ सायन्स अ‍ॅण्ड एलएलबी, आणि बॅचलर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड एलएलबी हे अभ्यासक्रमही हाच उद्देश ठेवून सुरू केले आहेत. अर्हता-कोणत्याही शाखेतील १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांला या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. मात्र खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांना १२वीमध्ये ४५ टक्के आणि राखीव संवर्गातील विद्यार्थ्यांना ४० टक्के गुण मिळायला हवेत. पत्ता-१९-३-२१/एफ १/ए २०, तेलगु नगर , नीयर टू हॉटेल ब्लिस, रेनिगुंटा रोड तिरुपती ५१७५०१, दूरध्वनी-०८७७-२२३२३५९ वेबसाइट- http://www.drambedkarlawcollege.com, ईमेल- info@drambedkarlawcollege.com
निरमा इन्स्टिटय़ूट ऑफ लॉ
निरमा युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत इन्स्टिटय़ूट ऑफ लॉ या संस्थेच्या वतीने विधि विषयातील पुढील विविध अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत- १) बॅचलर ऑफ आर्ट अँड एलएलबी (ऑनर्स), २) बॅचलर ऑफ कॉमर्स अँड एलएलबी (ऑनर्स), ३) बॅचलर ऑफ बिझिनेस अँडमिनिस्ट्रेशन अँड एलएलबी (ऑनर्स). हे सर्व अभ्यासक्रम पाच वर्ष कालावधीचे आहेत. ५० टक्के गुणांसह १२वी उत्तीर्ण कोणत्याही शाखेतील विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळू शकतो. या प्रवेशासाठी कॉमन लॉ एन्ट्रन्स अ‍ॅडमिशन टेस्ट द्यावी लागेल. निरमा इन्स्टिटय़ूट ऑफ लॉच्या प्रवेश अर्ज http://www.nirmauni.ac.in/law  या वेबसाईटवरून ऑनलाइन भरावा लागेल. संपर्क-द अ‍ॅडमिशन ऑफिसर, इन्स्टिटय़ूट ऑफ लॉ, निरमा युनिव्हसिर्टी, सारखेज-गांधीनगर रोड, अहमदाबाद, गुजराथ-३८२४८१, दूरध्वनी- ०२७१७-२४१९११/२४१९००-०४
सिम्बॉयसिस लॉ स्कूल
सिम्बॉयसिस इन्टरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत सिम्बॉयसिस लॉ स्कूल कार्यरत आहे. या संस्थेमार्फत बॅचलर ऑफ आर्ट अ‍ॅण्ड एलएलबी (एकूण जागा-५०) आणि बॅचलर ऑफ बिझिनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन अ‍ॅण्ड एलएलबी (एकूण जागा-१५०) हे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. दोन्ही अभ्यासक्रमांचा कालावधी प्रत्येकी पाच वर्षं. अर्हता-कोणत्याही विषयातील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतो. मात्र त्यास १२ वी परीक्षेत ४५ टक्के गुण मिळायला हवेत. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गाच्या विद्यार्थ्यांना ४० टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.
परीक्षा आणि प्रवेश प्रक्रिया
या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सिम्बॉयसिस एन्ट्रन्स टेस्ट घेतली जाते. ही परीक्षा पुणे, नागपूर, मुंबई आणि नाशिक येथे घेण्यात येईल. या चाळणी परीक्षेचा पेपर हा बहुपर्यायी वस्तुनिष्ठ पद्धतीचा राहील. यामध्ये १५० प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण ठेवण्यात आला आहे. हे प्रश्न (१) लॉजिकल रिझनिंग – एकूण गुण ३०, (२) लीगल रिझनिंग -एकूण गुण ३०, (३) अनॉलिटिकल रिझनिंग – एकूण गुण ३०, (४) रिडिंग कॉम्प्रेहेन्शन -एकूण गुण ३०, यासाठी, (५) जनरल नॉलेज – एकूण गुण ३०, या विषयांवर विचारले जातील.
http://www.set-test.org  या वेबसाइटवर नोंदणी करावी लागेल. पत्ता-सिम्बॉयसिस लॉ स्कूल, सव्‍‌र्हे नंबर- २२७, प्लॉट नंबर ११, रोहन मिथिलिया, नवीन विमानतळ मार्ग, विमान नगर पुणे-४११०१४, दूरध्वनी-०२०-६५२०१११४, वेबसाइट- www.symlaw.ac.in

lp41अ‍ॅनिमेशन इन्फोटेन्मेन्ट अ‍ॅण्ड मीडिया स्कूल
अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीने चित्रपट, दूरचित्रवाणी, डिजिटल मीडिआ क्षेत्रात गेल्या काही वर्षांत आपला दबदबा निर्माण केला आहे. या संस्थेने आता डिजिटल मीडियासाठी उपयुक्त ठरणारे काही लघु मुदतीचे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. त्यासाठी अ‍ॅनिमेशन इन्फोटेन्मेन्ट अ‍ॅण्ड मीडिया स्कूलचं सहकार्य घेतलं आहे. हे अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत- १) अ‍ॅडव्हान्स्ड लायटिंग, कालावधी- २ महिने, अर्हता- १२वी व प्रकाश योजनेचे कार्यात्मक ज्ञान. २) फायनल – कट- प्रो. हा अभ्यासक्रम लिनिअर एडिटिंग म्हणजेच ऑनलाइन संपादनाशी निगडित आहे. कालावधी- २ महिने, अर्हता- १० वी किंवा १२ वी उत्तीर्ण. ३) डिजिटल आर्ट- फोटोग्रॅफी, कालावधी- २ महिने, अर्हता- १०वी/ १२वी उत्तीर्ण. ४) फन्डामेन्टल्स ऑफ फिल्म मेकिंग, कालावधी- २ महिने, अर्हता-१० वी आणि १२वी उत्तीर्ण. ५) स्टोरी बोर्ड आर्टिस्ट, कालावधी- २ महिने, अर्हता- १० वी, १२वी आणि उत्तम चित्ररेखाटन कौशल्य
पत्ता- रिलायन्स-एआयएमएस, ३०१, बी-विंग, बिझिनेस पॉइंट, पाली राम रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५८, दूरध्वनी- ०२२-६५३४५०१६, ईमेल-mum.and@relianceaims.com, वेबसाइट- www.relianceaims.com
मनिपाल विद्यापीठ
ही आपल्या देशातील खासगी क्षेत्रातील महत्त्वाची शैक्षणिक संस्था होय. माध्यमं आणि मनोरंजन या क्षेत्रातील करियरच्या अनेक संधी लक्षात घेता या संस्थेने पुढील अभ्यासक्रम सुरू केले आहेत- (१) बॅचलर ऑफ सायन्स इन अ‍ॅनिमेशन, (२) बॅचलर ऑफ सायन्स इन व्हिज्युअल इफेक्ट्स, (३) बॅचलर ऑफ सायन्स इन व्हिज्युअल कम्युनिकेशन डिझाइन, (४) बॅचलर ऑफ सायन्स इन गेम आर्ट, (५) बॅचलर ऑफ सायन्स इन न्यूज अ‍ॅण्ड इंटरअ‍ॅक्टिव्ह मीडिया, (६) बॅचलर ऑफ सायन्स इन ग्रॅफिक डिझाइन. (७) बॅचलर ऑफ आर्टस् इन जर्नालिझम अ‍ॅण्ड कम्युनिकेशन स्टडीज. या सर्व अभ्यासक्रमांचा कालावधी- प्रत्येकी तीन र्वष. अर्हता- १२वी उत्तीर्ण. वरील सर्व अभ्यासक्रम हे बंगलोरच्या केंद्रात करता येतात. संपर्क-मनिपाल युनिव्हर्सिटी, मनिपाल- ५७६ १०४ कनार्टक, वेबसाईट- http://www.manipal.edu   मेल- admissions@manipal.edu  
एशियन अ‍ॅकाडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन
ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपट क्षेत्राशी निगडित विविध अभ्यासक्रमांचं शिक्षण प्रशिक्षण देत आहे. या संस्थेने चित्रपट क्षेत्राशी निगडित बॅचलर ऑफ सायन्स इन सिनेमा हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमांतर्गत (१) डायरेक्शन (दिग्दर्शन), (२) पोस्ट प्रॉडक्शन (निर्मितीपश्चात कार्य), (३) अ‍ॅक्टिंग (अभिनय), (४) साऊंड रेकॉर्डिग (ध्वनिमुद्रण) या विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येतं. या अभ्यासक्रमांचा कालावधी प्रत्येकी तीन वर्षे. १२वी उतीर्ण विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम करता येतो. या पदवी अभ्यासक्रमास विद्यापीठ अनुदान आयोगाने मान्यता प्रदान केली आहे. या संस्थेने बॅचलर ऑफ आर्ट (ऑनर्स) इन फिल्म प्रॉडक्शन हा दोन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. इंग्लंडमधील युनिव्हर्सिटी ऑफ लँकेशायर ही पदवी प्रदान करते. आता या प्रशिक्षणामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पुढील अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. (१) बॅचलर ऑफ सायन्स इन मल्टिमीडिया अ‍ॅण्ड मल्टिमीडिया प्रॉडक्शन, (२) बॅचलर ऑफ सायन्स इन थ्री डी अ‍ॅनिमेशन अ‍ॅण्ड व्हिज्युएल इफेक्ट्स. या दोन्ही अभ्यासक्रमांचा कालावधी प्रत्येकी तीन वर्षे. अर्हता- १२वी उत्तीर्ण. या पदवीस विद्यापीठ अनुदान आयोगाने मान्यता प्रदान केली आहे.
पत्ता- एशियन अ‍ॅकाडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन, मारवाह, स्टुडिओ कॉम्प्लेक्स, कॉम्प्लेक्स- १, नॉयडा- २०१३०१, दूरध्वनी- ०१२०-४८३११००, फॅक्स-२५१५२४६, ई-मेल- help@aaft.com, वेबसाइट- www.aaft.com
सिम्बॉयसीस इन्स्टिटय़ूट ऑफ मीडिया अ‍ॅण्ड कम्युनिकेशन
सिम्बॉयसीस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या सिम्बॉयसीस इन्स्टिटय़ूट ऑफ मीडिया अ‍ॅण्ड कम्युनिकेशन या संस्थेनं बॅचलर ऑफ मीडिया स्टडीज हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमांतर्गत (१) जर्नालिझम (२) रेडिओ अ‍ॅण्ड टीव्ही प्रॉडक्शन, (३) अ‍ॅडव्हर्टायझिंग (४) पब्लिक रिलेशन अ‍ॅण्ड इव्हेंट्स या विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येतं. या अभ्यासक्रमाला सिम्बॉयसीस एन्ट्रन्स टेस्टद्वारे प्रवेश दिला जातो.
पत्ता-सिम्बॉयसीस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, , २३१, विमाननगर, पुणे-४११०१४, दूरध्वनी-०२०-२६६३४५११/१२/१३, फॅक्स- २६६३४५१५, मेल- contactus@simcug.edu.in, वेबसाईट- www.simcug.edu.in

lp42सेंट्रल इंस्टिटय़ूट ऑफ फिशरिज अ‍ॅण्ड इंजिनीयरिंग
सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ फिशरिज नॉटिकल अ‍ॅण्ड इंजिनीयरिंग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील महत्त्वाची संस्था आहे. या संस्थेच्या वतीने बॅचलर ऑफ फिशरी सायन्स (नॉटिकल सायन्स) हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी चार वर्षांचा आहे. हा अभ्यासक्रम आठ सेमेस्टमध्ये शिकवला जातो. हा इंटिग्रेटेड स्वरूपाचा अभ्यासक्रम असून त्यामध्ये समुद्रातील फिशिंग व्हेसल्सबाबत जहाजावर प्रशिक्षण दिले जाते. हा अभ्यासक्रम कोचीन युनिव्हसिर्टी ऑफ सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीशी संलग्न आहे. या अभ्यासक्रमाला डायरेक्टोरेट जनरल ऑफ शिपिंग यांची मान्यता मिळाली आहे. या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांला १२ वीमध्ये गणित आणि इंग्रजी विषयात किमान ५० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. विज्ञानाच्या इतर विषयांमध्ये सरासरीने ५० टक्के गुण मिळायला हवेत.
या संस्थेच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी चाळणी परीक्षा कोची, चेन्नई आणि विशाखापट्टणम येथे होईल.
पत्ता – सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ फिशरिज नॉटिकल अ‍ॅण्ड इंजिनीयरिंग ट्रेनिंग, फाइन आर्ट अव्हेन्यू, कोची-६८२०१६, दूरध्वनी-०४८४-२३५४९३, फॅक्स-२३७ ०८७९, मेल-cifnet@nic.in, वेबसाइट- www.cifnet.gov.in

lp43बँडबाजा आणि सुरेल करिअर
संगीत क्षेत्रामध्ये करियरच्या उत्तमोत्तम संधी मिळू शकतात. सध्या सर्वत्र या ना त्या स्वरूपाचे संगीत जलसे होत असतात. पाश्चिमात्य आणि शास्त्रीय संगीताच्या मैफिलींना विविध वादकांची मोठीच गरज भासते. मोठय़ा गायक संगीतकाराचे कार्यक्रम सर्व जगभर होतात. या कार्यक्रमांमध्ये ५० ते १०० पर्यंत वाद्यवृंद असतात. काही छोटे छोटे संगीतकार पाच-दहाच्या गटात एकत्र येऊन आपला बँड स्थापन करतात. असा छोटा बँड विविध कार्यक्रम, हॉटेल्स, लग्नादी समारंभ या ठिकाणी आपली कला सादर करतात. अशा कार्यक्रमांची संख्या सारखीच वाढते आहे. सोसायटय़ांमध्ये होणाऱ्या कार्यक्रमांना अशा बँड्सना बोलावण्याकडे कल वाढत आहे. या सर्व बाबी या क्षेत्रात करियरच्या उत्तमोत्तम संधी उपलब्ध होत असल्याचे निदर्शक आहेत. संगीतावर प्रेम करणाऱ्या आणि संगीतकार होण्याचं स्वप्न बघणाऱ्या तरुण-तरुणींसाठी हे क्षेत्र स्पर्धात्मक असलं तरी प्रगती आणि उन्नतीची अचूक दिशा दाखवणारं ठरू शकतं. नव्या तंत्रज्ञानामुळे आणि यूटय़ूबसारखे नवे प्लॅटफॉर्म उपलब्ध झाल्याने नव्या होतकरू संगीतकारांसाठी आता संधी दारापर्यंत चालून आलीय असं म्हटल्यास वावगं ठरू नये. हे क्षेत्र आता पूर्ण वेळ करियर करण्याइतपत सक्षम होत आहे.
संगीतकार होण्यासाठी तशी कोणतीही शैक्षणिक अर्हता आवश्यक नाही. ज्यांना वाद्यांची उत्तम जाणीव आहे, त्यात कौशल्य मिळवले आहे आणि जे उत्तमरीत्या आपली कला सादर करू शकतात. अशी कोणतीही व्यक्ती या क्षेत्रात पाय रोवू शकते. संगीतकाराच्या परिघात केवळ वाद्य वाजवणारेच येतात नव्हे. गायक, गीतकार, विविध संगीत वाद्यांचा मेळ सांभाळणाऱ्या व्यक्तीही या परिघात समाविष्ट होतात. संगीताची आवड असणे हा या क्षेत्रात येण्यासाठीचा प्रारंभबिंदू असला तरी जोपर्यंत कौशल्य प्राप्त करत नाही तोपर्यंत पुढचं पाऊल टाकता येत नाही.
संगीत शिकवणाऱ्या काही संस्था
बनारस हिंदू युनिव्हर्सिटी-
१) बॅचलर ऑफ म्युझिक. कालावधी- तीन र्वष/अर्हता – कोणत्याही विषयातील १२ वी उत्तीर्ण आणि संगीत विशारद असल्यास उत्तम. या अभ्यासक्रमात व्होकल आणि इन्स्ट्रमेन्टल (तबला, सितार, व्हायोलिन, बासरी) संगीत शिकवले जाते. (२) दोन र्वष कालावधीचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन रवींद्र संगीत.
पत्ता- द कंट्रोलर ऑफ एक्झामिनेशन, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, वाराणसी-२२१००५, दूरध्वनी- ०५४२- २३६८५५८, फॅक्स-२३६८४१८, वेबसाइट- http://www.bhu.ac.in, ई-मेल- controller@bhu.ac.in
दयालबाग एज्युकेशनल इन्स्टिटय़ूट-
(१) पी. जी. डिप्लोमा इन डिव्होशनल अ‍ॅण्ड फोक म्युझिक- (कालावधी-एक वर्ष/अर्हता-कोणत्याही शाखेतील पदवी) (२) एम. ए. इन म्युझिक वुइथ स्पेशलायझेशन इन व्होकल, सितार अ‍ॅण्ड तबला /कालावधी-दोन र्वष. अर्हता- कोणत्याही विषयातील किंवा सबंधित विषयातील पदवी.
पत्ता- दयालबाग एज्युकेशनल इन्स्टिटय़ूट, दयालबाग, आग्रा-२८२११०, वेबसाइट- http://www.del.ac.in, ई-मेल- admin@del.ac.in, दूरध्वनी- ०५६२-२८० १५४५ फॅक्स-२८० १२२६.
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ
१) सर्टिफिकेट इन हिंदुस्थानी म्युझिक, या अभ्यासक्रमाचा कालावधी किमान एक वर्ष, कमाल दोन र्वष. अर्हता- १० उत्तीर्ण. २) सर्टिफिकेट इन कर्नाटकी म्युझिक, या अभ्यासक्रमाचा कालावधी किमान एक वर्ष कमाल चार र्वष. अर्हता-१० उत्तीर्ण. ३) मास्टर ऑफ परफार्मिग आर्ट इन हिंदुस्थानी व्होकल म्युझिक. अभ्यासक्रमाचा कालावधी- दोन र्वष. अर्हता-बीए इन म्युझिक किंवा मान्यताप्राप्त समकक्ष पदवी, पत्ता- स्कूल ऑफ परफार्मिग अ‍ॅण्ड व्हिज्युएल आर्ट, आंबेडकर भवन, ब्लॉक बी, अ‍ॅकॅडेमिक कॉम्प्लेक्स, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी, नवी दिल्ली – ११००६८, वेबसाइट – http://www.ignou.ac.in, ई-मेल- sopva@ignou.ac.in, दूरध्वनी- ०११- २९५३ ४८४०.
मुंबई विद्यापीठ
१) बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स इन व्होकल म्युझिक, २) डिप्लोमा कोर्स इन म्युझिक-हिंदुस्थानी व्होकल क्लासिकल (कालावधी-दोन र्वष), २) डिप्लोमा कोर्स इन म्युझिक – हिंदुस्थानी इन्स्ट्रमेन्टल क्लासिकल (कालावधी-दोन र्वष), ३) डिप्लोमा कोर्स इन म्युझिक -हिंदुस्थानी व्होकल लाइट (कालावधी-दोन र्वष), ४) डिप्लोमा कोर्स इन म्युझिक-हिंदुस्थानी इन्स्ट्रमेन्टल क्लासिकल – तबला (कालावधी-दोन र्वष), ५) बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स इन, इन्स्ट्रमेन्टल क्लासिकल – तबला/सितार (कालावधी-तीन र्वष), ६) मास्टर ऑफ फाइन आर्ट्स इन, म्युझिक व्होकल (कालावधी-दोन र्वष)
पत्ता- डिपार्टमेंट ऑफ म्युझिक, विद्यापीठ, विद्यार्थी भवन, बी रोड, चर्चगेट, मुंबई-४०००२०, दूरध्वनी-०२२-२२०४ ८६६५, फॅक्स-२२० ४२८५९, वेबसाइट- www.mu.ac.in/arts/finearts
रवींद्रभारती युनिव्हर्सिटी
(१) बीए (स्पेशल ऑनर्स) इन रवींद्र
संगीत: अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. (२) एम. ए इन रवींद्र संगीत अ‍ॅण्ड व्होकल म्युझिक : अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी.
या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीचा अर्ज http://www.dde.rabindrabharatiuniversity.net या वेबसाइटवरून डाऊनलोड करता येईल.
पत्ता: डायरेक्टर, डायरेक्टोरेट ऑफ डिस्टन्स एज्युकेशन रवींद्र भारती युनिव्हर्सिटी, ५६ ए, बी. टी. रोड, कोलकाता-७०००५०
दूरध्वनी-०३३-२५५८४४४३, वेबसाइट- www.dde.rbu.ac
अण्णामलाई युनिव्हर्सिटी
(१) बॅचलर ऑफ म्युझिक इन वोकल, वीना, व्हॉयोलिन, मृदंगम अ‍ॅण्ड फ्लूट/अर्हता-कोणत्याही शाखेतील बारावी/कालावधी ३ र्वष. (२) इन्टिग्रेटेड बॅचलर इन म्युझिक (म्युझिक इन वोकल, वीना, व्हॉयोलिन, मृदंगम अ‍ॅण्ड फ्लूट) /अर्हता- १०वी /कालावधी ५ र्वष. (४) इन्टिग्रेटेड बॅचलर इन डान्स /अर्हता- १०वी /कालावधी ५ र्वष.
पत्ता- अण्णामलाई युनिव्हर्सिटी, अण्णामलाईनगर ६०८००२ तामिळनाडू, दूरध्वनी-०४१४४-२३८२४८, फॅक्स-२३८८०८० वेबसाइट- www.annamalaiuniversity.ac.in
मेल – dde@annamalaiuniversity.ac.in
भातखंडे संगीत संस्था
१) डिप्लोमा इन म्युझिक (कालावधी- दोन र्वष/अर्हता- कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण ) २) बॅचलर ऑफ परफार्मिग आर्ट्स- (कालावधी- तीन र्वष/अर्हता- डिप्लोमा इन म्युझिक.)
३) सर्टिफिकेट अभ्यासक्रम (१) ध्रुपद/धमाद/होरी, (२) सेमी क्लासिकल म्युझिक इन ठुमरी/दादरा, (३) लाइट म्युझिक, (४) हार्मोनिअम/की बोर्ड. या सर्व अभ्यासक्रमांचा कालावधी प्रत्येकी दोन र्वष.
पत्ता: भातखंडे म्युझिक इन्स्टिटय़ूट युनिव्हर्सिटी, १ कैसरबाग लखनौ (उत्तर प्रदेश.)- २२६००१, वेबसाइट- http://www.bhatkhandemusic.edu.in, ई-मेल- info@ http://www.bhatkhandemusic.edu. in दूरध्वनी-०५२२-२६१०२४८, फॅक्स-२६२२९२६.

lp44इन्टिग्रेटेड अभ्यासक्रम नवा स्मार्ट पर्याय
वैद्यकीय आणि अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांसोबतच गेल्या तीन-चार वर्षांत इन्टिग्रेटेड अभ्यासक्रमांचा नवा स्मार्ट ट्रेन्ड बऱ्यापैकी रुजतोय. याबाबत बरेच मराठी पालक आणि विद्यार्थी अनभिज्ञ आहेत. इन्टिग्रेटेड अभ्यासक्रम हा पाच र्वष कालावधीचा अभ्यासक्रम. याचा सोपा अर्थ असा की १२ वीनंतर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला की मग पदव्युत्तर पदवीपर्यंत काळजीचं कारण नाही. हे अभ्यासक्रम अभियांत्रिकी, कला, वाणिज्य आणि विधि शाखांमध्ये सुरू झाले आहेत. चार र्वष कालावधीच्या इंटिग्रेटेड बॅचलर ऑफ सायन्स अ‍ॅण्ड बीएड किंवा बॅचलर ऑफ आर्ट्स अ‍ॅण्ड बीएड असेही अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. पारंपरिक अभ्यासक्रमांच्या सोबतच याही अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीचा हा स्मार्ट पर्याय पालकांनी ठेवायला हवा. असेच काही अभ्यासक्रम.
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च या संस्थेची स्थापना भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयानं केली आहे. अधिकाधिक प्रज्ञावंत मुलांनी मूलभूत शास्त्रांच्या संशोधनाकडे वळावं यासाठी सर्व अत्याधुनिक सोयी-सुविधा या संस्थेमध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत. या संस्थेचे कॅम्पस कोलकाता, पुणे, भोपाळ, मोहाली आणि थिरुवनंतपुरम येथे आहेत. या संस्थेला स्वायत्ततेचा दर्जा दिलेला आहे. संस्थेचा अभ्यासक्रम बॅचलर ऑफ सायन्स-मास्टर ऑफ सायन्स म्हणजेच बी एस-एम एस या नावाने ओळखला जातो. हा पाच र्वष कालावधीचा डय़ुएल डिग्री अभ्यासक्रम आहे. प्रत्येक कॅम्पसमध्ये १२० विद्यार्थ्यांना म्हणजेच एकूण ६०० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. यापैकी १५० विद्यार्थ्यांचा प्रवेश किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत होणाऱ्या परीक्षेवर आधारित गुणांवर दिला जातो. १५० विद्यार्थ्यांचा प्रवेश हा आयआयटीच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जाइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन- अ‍ॅडव्हान्स्डमधील गुणांवर आधारित दिला जातो. JEE-ADVANCED च्या गुणांवर आधारित प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या खुल्या गटातील विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेत किमान ६० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती आणि जमाती आणि शारीरिकदृष्टय़ा अपंग या गटातील विद्यार्थ्यांना ५५ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. उर्वरित ३०० विद्यार्थ्यांना चाळणी परीक्षेत (अ‍ॅप्टिटय़ुड टेस्ट ) द्वारे प्रवेश दिला जातो. पुणे येथे ही अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट घेण्यात येते. वरील तिन्ही प्रकारच्या प्रवेश प्रक्रियेसाठी स्वतंत्रपणे अर्ज भरावा लागतो. या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांला दरमहा ५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. हा अभ्यासक्रम निवासी स्वरूपाचा असून विद्यार्थ्यांना वसतिगृहातच राहणे बंधनकारक आहे.
पत्ता- इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च, फर्स्ट फ्लोअर, सेंट्रल टॉवर, ट्रिनिटी, साई बिल्डिंग, गरवारे सर्कल, सुतारवाडी, पाषाण पुणे- ४११०२१, दूरध्वनी- ०२०- २५९०८००१, फॅक्स-२५८६५०८६, वेबसाइट- http://www.iiserpune.ac.in, आणि http://www.iiserpun.ac.in  ई-मेल- webmaster@iiserpune.ac.in. विद्यार्थ्यांना अर्ज ऑनलाइन करावा लागेल.
नर्सी मोन्जी इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचे अभ्यासक्रम
नर्सी मोन्जी इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या संस्थेच्या वतीने अभियांत्रिकी आणि औषधीनिर्माणशास्त्र (फार्मसी) शाखेतील अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. फार्मसीच्या अभ्यासक्रमाला एमबीएची जोड देण्यात आली आहे. हा अभ्यासक्रम एमबीए इन फार्मास्युटिकल टेक्नॉलॉजी या नावे ओळखला जातो. या इन्टिग्रेटेड अभ्यासक्रमाचा कालावधी पाच र्वष आहे. हा अभ्यासक्रम संस्थेच्या मुंबईस्थित स्कूल ऑफ फार्मसी अ‍ॅण्ड टेक्नालॉजी मॅनेजमेंट आणि शिरपूर (जिल्हा धुळे) येथे चालविला जातो.
मुंबई कॅम्पस
संस्थेच्या मुकेश पटेल स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट इंजिनीअरिंग, मुंबई कॅम्पसमध्ये इन्टिग्रेटेड एमबीए इन टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमांतर्गत एमबीए इन टेक्नॉलॉजी इन इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, एमबीए इन टेक्नॉलॉजी इन सिव्हिल इंजिनीअरिंग, एमबीए इन टेक्नॉलॉजी इन केमिकल इंजिनीअरिंग, एमबीए इन टेक्नॉलॉजी इन मेकॅनिकल इंजिनीअरिंग आणि एमबीए इन टेक्नॉलॉजी इन इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग या विषयांचा समावेश आहे.
शिरपूर कॅम्पस
संस्थेच्या शिरपूर कॅम्पसमध्ये एमबीए इन टेक्नॉलॉजी इन इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, एमबीए इन टेक्नॉलॉजी इन सिव्हिल इंजिनीअरिंग एमबीए इन टेक्नॉलॉजी इन मेकॅनिकल इंजिनीअरिंग, एमबीए इन टेक्नॉलॉजी इन कॉम्प्युटर इंजिनीअरिंग आणि एमबीए इन इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग.
नर्सी मोंजी अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट
या संस्थेतील इन्टिग्रेटेड एमबीए इन टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमासाठी मुंबई कॅम्पसमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना १२ वी विज्ञान परीक्षेत केमेस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स या विषयांमध्ये सरासरीने किमान ५० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. शिरपूर कॅम्पसमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना १२ वी विज्ञान परीक्षेत फिजिक्स, केमेस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स या विषयांमध्ये सरासरीने किमान ४५ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे.
या सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नर्सी मोंजी अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट घेतली जाते. ही ऑनलाइन टेस्ट आहे. या ऑनलाइन टेस्टसाठी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, शिरपूर, नाशिक आणि नागपूर ही केंद्रे आहेत. पत्ता-नर्सी मोंजी इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, व्ही. एल. मेहता रोड, विलेपार्ले पश्चिम मुंबई-४०००५६, वेबसाइट-  www.nmims.edu संस्थेच्या वेबसाइटवर ऑनलाइन टेस्टसाठी रजिस्ट्रेशन करता येते. दूरध्वनी-०२२-४२३३२०००, ई-मेल-enquiry@nmims.edu
इन्टिग्रेटेड मास्टर ऑफ बिझिनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन -फार्मा टेक्नॉलॉजी
या संस्थेच्या मुंबईस्थित शोभनाबेन प्रतापभाई पटेल स्कूल ऑफ फार्मसी अ‍ॅण्ड टेक्नालॉजी मॅनेजमेंट इथे आणि शिरपूरस्थित स्कूल ऑफ फार्मसी अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी येथे १२ वीनंतरचा पाच वर्षे कालावधीचा इन्टिग्रेटेड मास्टर ऑफ बिझिनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन -फार्मा टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम सुरू केला आहे.
मोदी युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी-
(१) इंटिग्रेटेड बीटेक अ‍ॅण्ड एमटेक इन कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंग, (२) इंटिग्रेटेड बीटेक अ‍ॅण्ड एमटेक इन इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग, (३) इंटिग्रेटेड बीटेक अ‍ॅण्ड एमबीए इन कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंग, (४) इंटिग्रेटेड बीटेक अ‍ॅण्ड एमबीए इन इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग
पत्ता- मोदी युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, एन एच- ११, लक्ष्मणगड- ३३२३११, जिल्हा- सिकर, राजस्थान, दूरध्वनी- ०१५७३-२२५००१, फॅक्स- २२५०४२, वेबसाइट- http://www.modyuniversity.ac.in, ईमेल- contact@modyuniversity.ac.in
वेल्स युनिव्हर्सिटी- इंटिग्रेटेड एमबीए
पत्ता- वेल्स युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी कॅम्पस, वेलननगर, पी. व्ही वैथियालिंगम रोड, पल्लावरम, चेन्नई- ६००११७, दूरध्वनी- ०४४- २२६६२५००, फॅक्स- २४३१५५४२, वेबसाइट- http://www.velsuniv.ac.in, ईमेल- admission@velsuniv.ac.in
डून युनिव्हर्सिटी- १) इंटिग्रेटेड बीए (ऑनर्स)/ एम ए इन चायनिज, २) इंटिग्रेटेड बीए (ऑनर्स)/ एम ए इन स्पॅनिश, ३) इंटिग्रेटेड बीए (ऑनर्स)/ एम ए जर्मन, ४) इंटिग्रेटेड बीए (ऑनर्स)/ एम ए जॅपनिज, ५) इंटिग्रेटेड बीए (ऑनर्स)/ एम ए इन अरेबिक लँग्वेजेस, ६) इंटिग्रेटेड बीए (ऑनर्स)/ एम ए इन फ्रेंच, ७) इंटिग्रेटेड बीए (ऑनर्स)/ एम ए इन इकॉनॉमिक्स, ८) इंटिग्रेटेड बीए (ऑनर्स)/ एम ए इन मास कम्युनिकेशन, ९) इंटिग्रेटेड बीबीए/ एमबीए, अर्हता- कोणत्याही विषयातील ५० टक्के गुणांसह १२ वी. १०) इंटिग्रेटेड बीसीए/ एमसीए, अर्हता- गणित विषयासह ५० टक्के गुणांसह १२ वी. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी चाळणी परीक्षा घेतली जाते.
पत्ता- डून युनिव्हर्सिटी, मोथ्रोवाला रोड, अजाबपूर, देहरादून- २४८००१, दूरध्वनी-०१३५- २५३३१०५, वेबसाइट- http://www.doonuniversity.ac.in, ईमेल- ar@doonuniversity.gmail.co
गुरू गोविंदसिंघ इंद्रप्रस्थ युनिव्हर्सिटी-
बीटेक अ‍ॅण्ड एमटेक डय़ुएल डिग्री इन बायोटेक्नॉलॉजी.
पत्ता- गुरू गोविंदसिंघ इंद्रप्रस्थ युनिव्हर्सिटी, सेक्टर- १६ सी, द्वारका, न्यू दिल्ली-११००७८, वेबसाइट- http://www.ipu.ac.in, दूरध्वनी- ०११- २५३०२१७०, फॅक्स-२५३०२१११.
गांधीग्राम रुरल युनिव्हर्सिटी-
इंटिग्रेटेड एम ए इन डेव्हलपमेंट अ‍ॅडमिनिस्ट्रेशन.
पत्ता- गांधीग्राम रुरल युनिव्हर्सिटी, गांधीग्राम- ६२४३०२, दिंडीगुल डिस्ट्रिक्ट, तामिळनाडू, वेबसाइट- http://www.ruraluniv.ac.in, ईमेल- academic@ruraluniv.ac.in, फॅक्स- ०४५१- २४५४४६६, दूरध्वनी-२४५२३२३.
माता वैष्णो देवी युनिव्हर्सिटी-
इंटिग्रेटेड डय़ुएल डिग्री- एमएस्सी इन इकॉनॉमिक्स. अर्हता- कोणत्याही शाखेतील १२ वीमध्ये ६० टक्के गुण.
पत्ता- माता वैष्णो देवी युनिव्हर्सिटी, काकरियाल, कात्रा- १८२३२०, वेबसाइट- http://www.smvdu.net.in, ईमेल- info@smvdu.ac.in, दूरध्वनी- ०१९९१- २८५५३६, फॅक्स- २८५६९४.

lp45फूटवेअर डिझाइन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट इन्स्टिटय़ूट
बिझिनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन अ‍ॅण्ड मास्टर ऑफ बिझिनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ( बीबीए – एमबीए )
पत्ता- फूटवेअर डिझाइन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट इन्स्टिटय़ूट, नॉयडा, ए-१०, नॉयडा डिस्ट्रिक्ट, सेक्टर २४, पिन -२०१३०१. दूरध्वनी-०१२०-४५००००, फॅक्स-२४१२५५६, वेबसाइट- http://www.fddiindia.com, ई-मेल- admission@fddindia.com 
अम्रिता विश्वविद्यापीठम-
इंटिग्रेटेड एम. एस्सी इन केमिस्ट्री, (२) इंटिग्रेटेड एम. एस्सी इन फिजिक्स, (३) इंटिग्रेटेड एम. एस्सी इन मॅथेमॅटिक्स. या सर्व अभ्यासक्रमासाठी अर्हता- १२ वी विज्ञान परीक्षेत सरासरीने ५५ टक्के गुण, आणि केमिस्ट्री, फिजिक्स, मॅथेमॅटिक्स या सर्व विषयांमध्ये प्रत्येकी ५० टक्के मिळणे आवश्यक आहे. (४) इंटिग्रेटेड एम. ए इंग्लिश लँग्वेज अ‍ॅण्ड लिटरेचर. अभ्यासक्रमासाठी अर्हता- १२ वी मध्ये इंग्रजीमध्ये ५५ टक्के गुण. पत्ता- अ‍ॅडमिशन को-ऑर्डिनेटर, अम्रिता विश्वविद्यापीठम, अम्रिता नगर, एत्तीमदाई, कोईम्बतोर, तामिळनाडू, पिन- ६४१११२, दूरध्वनी-०४२२-२६८५०००/ फॅक्स- २६८६२७४, ई-मेल- admissions@amrita.edu, वेबसाइट- www.amrita.edu

lp46हिंदुस्थान इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड सायन्स
बीटेक – एमटीएम (मास्टर ऑफ मॅनेजमेंट) इन ऑटोमोबाइल इंजिनीअरिंग. या अभ्यासक्रमाचा कालावधी हा साडेपाच वर्षांचा आहे. २) इंटिग्रेटेड एम टेक इन सिव्हिल इंजिनीअरिंग ( कन्स्ट्रक्शन इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड मॅनेजमेंट ) पत्ता- नंबर ४०, जीएसटी, रोड, सेंट थॉमस माऊंट, चेन्नई-६०००१६, दूरध्वनी-०४४-२२३४१३८९, फॅक्स-२२३४२१७०, वेबसाइट- http://www.hindustanuniv.ac.in, ई-मेल- hetc@vsnl.com
सरदार पटेल युनिव्हर्सिटी ऑफ पोलीस सेक्युरिटी अ‍ॅण्ड क्रिमिनल जस्टिस – इंटिग्रेटेड कोर्स इन सोशल सायन्स. अर्हता- कोणत्याही शाखेतील १२वीमध्ये ५५ टक्के गुण.
पत्ता-सरदार पटेल युनिव्हर्सिटी ऑफ पोलीस सेक्युरिटी अ‍ॅण्ड क्रिमिनल जस्टिस, अपोजिट ग्रामीण पोलीस लाइन, दैजेर, जोधपूर- ३४२३०४, दूरध्वनी- ०२९१-३०६२०२९, फॅक्स- ३०६२०९१, वेबसाइट- http://www.policeuniversity.ac.in,
ई-मेल- info@policeuniversity.ac.in
वेल्लोर इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी – (१) इंटिग्रेटेड अभ्यासक्रम मास्टर ऑफ सायन्स इन बायोटेक्नॉलॉजी (हा अभ्यासक्रम वेल्लोर कॅम्पसमध्ये शिकवला जातो.), (२) इंटिग्रेटेड मास्टर ऑफ सायन्स इन सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग (हा अभ्यासक्रम वेल्लोर आणि चेन्नई कॅम्पसमध्ये शिकवला जातो. )
पत्ता- अ‍ॅडमिशन ऑफिसर, वीआयटी युनिव्हर्सिटी, वेल्लोर-०४१६-२२४३०९१, फॅक्स- २२४ ०४११, वेबसाइट- http://www.vit.ac.in, ई-मेल- admission@vit.ac.in
पाँडिचेरी युनिव्हर्सिटी (१) एम. एस्सी इन केमिस्ट्री (२) एम. एस्सी इन फिजिक्स (३) एम. एस्सी इन स्टॅटिस्टिक्स, (४) एम. एस्सी इन इकॉनॉमिक्स, (५) एम. एस्सी इन कॉम्प्युटर सायन्स, (६) एम. एस्सी इन अ‍ॅप्लाइड जिऑलॉजी (७) एम. एस्सी इन मॅथेमॅटिक्स.
पत्ता- पाँडिचेरी युनिव्हर्सिटी, आर वेंकटरमन नगर, कलापेट, पुडुचेरी- ६०५०१४, वेबसाइट- ६६६. http://www.pondiuni.edu.in, ई-मेल- registrar@ pondiuni.edu.in दूरध्वनी- ०४१३-२६५५१७९.
(१) गुरू घसिदास युनिव्हर्सिटी- (१) एम. ए इन इंग्रजी (२) एम. ए इन हिंदी (३) एम. ए इन लायब्ररी अ‍ॅण्ड इन्फर्मेशन सायन्स (६) एम. ए इन जर्नालिझम अ‍ॅण्ड मास कम्युनिकेशन (७) एम. ए इन इकॉनॉमिक्स (८) एम. ए इन हिस्ट्री (९) एम. ए इन पोलिटिकल सायन्स (१०) एम. ए इन कॉमर्स (११) एम. ए इन सोशल वर्क (१२) एम. ए इन अँथ्रॉपॉलॉजी
विज्ञान शाखा- (१) एम. एस्सी इन फॉरेन्सिक सायन्स (२) एम. एस्सी इन बॉटनी (३) एम. एस्सी इन केमिस्ट्री (४) एम. एस्सी इन फिजिक्स (५) एम. एस्सी इन मॅथेमॅटिक्स (६) एम. एस्सी इन झुऑलॉजी (७) एम. एस्सी इन कॉम्प्युटर सायन्स (८) एम. एस्सी इन इलेक्ट्रॉनिक्स (९) एम. एस्सी इन रुरल टेक्नॉलॉजी
पत्ता- रजिस्ट्रार, गुरू घसिदास युनिव्हर्सिटी, कोनी, बिलासपूर-४९५००९, दूरध्वनी- ०७७५२-२६०३३५३, फॅक्स- २६०१४८, वेबसाइट- www.ggu.ac.in
पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी- एम. टेक इंटिग्रेटेड बायोटेक्नॉलॉजी.
पत्ता- पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, प्लॉट ५०, १५ सीबीडी बेलापूर, नवी मुंबई-४००६१४, दूरध्वनी-०२२- २७५६३६०० वेबसाइट- www.dypatil.ac.in
अ‍ॅमिटी स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी- (२) डय़ुएल डिग्री – बीटेक अ‍ॅण्ड एमबीए. (बीटेक सिव्हिल इंजिनीअरिंग/ कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंग/इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग), (२) बीटेक अ‍ॅण्ड एमटेक (मेकॅनिकल अ‍ॅण्ड ऑटोमेशन आणि ऑटोमोबाइल इंजिनीअरिंग)
पत्ता- अ‍ॅमिटी स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी सेक्टर – १२५, नॉयडा- २०१३१३ (न्यू दिल्ली एनसीआर) दूरध्वनी- ०१२०-२४४५२५२, ४७१३६००, वेबसाइट- http://www.amity.edu.
युनिव्हर्सिटी ऑफ हैदराबाद
विज्ञान शाखा- १) एम.एस्सी. इन मॅथेमॅटिक सायन्स, २) एम.एस्सी. इन फिजिक्स, ३) एम.एस्सी. इन केमिकल सायन्स, ४) एम.एस्सी. इन सिस्टीम बॉयॉलॉजी, ५) एम.एस्सी. इन हेल्थ सायकॉलाजी, ५) एम.एस्सी. इन ऑप्टोमेट्री अ‍ॅण्ड व्हिजन सायन्स. सामाजिकशास्त्र शाखा १) एम.ए. इन हिस्ट्री, २) एम.ए. इन इकानॉमिक्स, ३) एम.ए. इन सोशिओलॉजी, ४) एम.ए. इन पोलिटिकल सायन्स, ५) एम.ए. इन अ‍ॅन्थ्रापॉलॉजी. मानव्यशास्त्र शाखा १) एम.ए. इन लँग्वेज सायन्स, २) एम.ए. इन हिंदी, ३) एम.ए. इन उर्दू.
पत्ता- युनिव्हर्सिटी ऑफ हैदराबाद, प्रो. सी. आर. राव रोड, गाचीबावली, पोस्ट ऑफिस सेन्ट्रल युनिव्हर्सिटी, हैदराबाद- ५०००४६, दूरध्वनी- ०४०-२३१३२१०२, वेबसाइट- http://www.uohyd.ac.in, ईमेल- acadinfo@uohyd.ernet.in
ओ. पी. जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटी
या युनिव्हर्सिटीअंतर्गत कार्यरत असणाऱ्या जिंदाल ग्लोबल बिझिनेस स्कूलने बीबीए-एमबीए हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमाला १२० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. अर्हता- कोणत्याही शाखेतील ७० टक्के गुणांसह १२वी उत्तीर्ण.
पत्ता- ओ. पी. जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटी, सोनिपत नरेला रोड, जगदीशपूर व्हिलेज, सोनिपत हरयाणा- १३१००१, टेलिफॅक्स- ०१३०-४०९१८८८ वेबसाइट- http://www.jgbs.edu.in, ईमेल- admissions.jgbs@jgu.edu.in
जी डी गोयन्का युनिव्हर्सिटी-
बी.एस्सी.- एम.एस्सी. इन डिझाइन (स्पेशलायझेशन इन कम्युनिकेशन डिझाइन, फॅशन डिझाइन, जेमॉलॉजी अ‍ॅण्ड ज्वेलरी डिझाइन, इंटेरिअर डिझाइन, प्रॉडक्ट डिझाइन)
पत्ता- जी डी गोयन्का युनिव्हर्सिटी, जी डी गोयन्का एज्युकेशन सिटी, सोहना गुरगांव रोड, साऊथ ऑफ दिल्ली, दूरध्वनी- ०१२४-३३१५९००, फॅक्स- ३३१५९७०, वेबसाइट- http://www.gdgoenkauinversity.com, ईमेल- admissions@gdgoenka.ac.in
वेल टेक
बीटेक वुइथ एमबीए
पत्ता- वेल टेक युनिव्हर्सिटी, ४२ अ‍ॅण्ड ६०, अ‍ॅवदी-वेल टेक रोड, अ‍ॅवदी चेन्नई- ६०००६२, दूरध्वनी- ०४४-२६८४११६०१, वेबसाइट- http://www.veltechuniv.edu.in, ईमेल- admission@veltech.org 

lp47एमबीबीएस अभ्यासक्रम चालविणाऱ्या काही संस्था
डॉक्टर होण्याचे स्वप्न बहुतांश विद्यार्थ्यांचे असते. या स्वप्नपूर्तीसाठी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या संस्थांचा पर्याय निवडावा लागतो. अशा काही संस्था पुढीलप्रमाणे आहेत-
(१) ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्स
ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्स ही देशातील वैद्यकीय शिक्षण देणारी सवरेत्कृष्ट संस्था होय. अभियांत्रिकीच्या शाखेच्या शिक्षणाबाबत जसे आयआयटीचे महत्त्व आहे. तसे महत्त्व एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या बाबत या संस्थेचे आहे. या संस्थेमार्फत एमबीबीएस प्रवेशासाठी अखिल भारतीय स्तरावर १ जून २०१५ रोजी ऑनलाइन चाळणी परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा देशातील विविध केंद्रांसोबतच महाराष्ट्रातील मुंबई, पुणे या केंद्रांवरसुद्धा घेण्यात येईल. ऑनलाइन अर्ज http://www.aiimsexams.org  या वेबसाइटवरून भरता येतो. परीक्षेद्वारे दिल्ली सोबतच रायपूर, भोपाळ, भुवनेश्वर, जोधपूर, पाटणा आणि हृषीकेश येथे प्रवेश दिला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांना अर्जामध्ये संस्थांच्या शहरांचा पसंतीक्रम नमूद करावा लागेल. परीक्षेच्या निकालाप्रमाणे ७७ विद्यार्थ्यांना दिल्लीच्या एआयएमएममध्ये प्रवेश दिला जाईल इतर सहा संस्थांमध्ये गुणानुक्रम व पसंतीक्रमानुसार प्रत्येकी १०० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. ही सर्व प्रवेश प्रक्रिया म्हणजेच कौंसेलिंग भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब नियोजन विभागामार्फत करण्यात येईल. पत्ता- ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्स, अन्सारी नगर, न्यू दिल्ली- ११००६८ वेबसाइट-  www.aiims.edu किंवा http://www.aiims.ac.in,
दूरध्वनी- ०११-२६५८८५००, फॅक्स-२६५८८६६३
(२) जवाहरलाल इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल रिसर्च अँड मेडिकल एज्युकेशन
जवाहरलाल इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल रिसर्च अँड मेडिकल एज्युकेशन या संस्थेच्या मार्फत वैद्यकीय अभ्यासक्रम चालविण्यात येतात. ही या क्षेत्रातील महत्त्वाची संस्था होय. या संस्थेच्या एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अखिल भारतीय स्तरावर चाळणी परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेद्वारे १५० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. ही परीक्षा ७ जून २०१५ रोजी होणार आहे. महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रे- मुंबई आणि नागपूर. अर्ज http://www.jipmer.edu.in  या वेबसाइटवर ऑनलाइन भरावा लागेल. या अर्जाची प्रिंट काढून, संबंधित कागदपत्रे, छायाचित्र, फिंगरप्रिंट आदी माहितीसह संस्थेला पाठवावी लागेल. पत्ता- प्रोफेसर, अ‍ॅकाडमिक, जवाहरलाल इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल रिसर्च अँड मेडिकल एज्युकेशन, धनवंत्री नगर, पोस्ट ऑफिस पुडीचेरी- ६०५००६, दूरध्वनी- ०४१३-२२९६००२
(३) डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी
डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी- डीम्ड युनिव्हर्सिटी कोल्हापूर एमबीबीएस प्रथम वर्षांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. संस्थेच्या एमबीबीएस आणि बीएस्सी नर्सिग अभ्यासक्रमांना ऑल इंडिया कॉमन एंट्रंस टेस्ट- एआयसीईटी-२०१५ या परीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो. ही परीक्षा १४ मे २०१५ रोजी नवी मुंबई, पुणे, कोल्हापूर, हैदराबाद, नवी दिल्ली या केंद्रांवर घेतली जाईल. पत्ता- ८६९, ई कसाबा बावडा, कोल्हापूर- ४१६००६, दूरध्वनी- ०२३१-२६०१२३५, वेबसाइट- http://www.dypatilunikop.org  मेल- info@dypatilunikop.org. अर्ज संस्थेच्या वेबसाइटवरसुद्धा उपलब्ध आहे.
(४) कृष्णा इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस
कृष्णा इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस डीम्ड युनिव्हर्सिटी कराड अंतर्गत कृष्णा इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस-मेडिकल कॉलेज, कृष्णा स्कूल ऑफ फिजिओथेरेपी, स्कूल ऑफ डेंटल सायन्स, कृष्णा इन्स्टिटय़ूट ऑफ नर्सिग सायन्सेस या चार संस्था कार्यरत आहेत. या संस्थांमधील एमबीबीएस, बॅचरल ऑफ फिजिओथेरेपी, बॅचलर ऑफ डेंटल सायन्स, बॅचलर ऑफ नर्सिग या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी कृष्णा ऑल इंडिया एंट्रंस टेस्ट २०१५ घेण्यात येते. ही परीक्षा २१ मे २०१५ रोजी मुंबई, नागपूर, पुणे यांसारख्या शहरांमध्ये होणार आहे. अर्ज ऑनलाइनसुद्धा भरता येतो. पत्ता- कराड, जिल्हा सातारा – ४१५११०, दूरध्वनी- ०२१६४-२४१५५५, फॅक्स- २४३२७२, वेबसाइट- http://www.kimsuniversity.in, ई-मेल- contact@kimsuniversity.in
(५) महात्मा गांधी इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ सायन्स
या संस्थेच्या वतीने नवी मुंबई आणि औरंगाबाद येथे वैद्यकीय महाविद्यालय उघडण्यात आली आहेत. या महाविद्यालयातील एमबीबीएसच्या प्रवेशासाठी एमजीएम- कॉमन एंट्रंस टेस्ट ही परीक्षा घेण्यात येते. परीक्षेची तारीख- ११ मे २०१५. ही परीक्षा नांदेड, औरंगाबाद, पुणे, मुंबई आणि नवी मुंबई या केंद्रांवर घेण्यात येईल.
पत्ता- महात्मा गांधी इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ सायन्स, सेक्टर १८, कामोठे, नवी मुंबई- ४१०२०९, दूरध्वनी- ०२२-२७४२२४७१, फॅक्स-२७४३१०९४, मेल- registrar@mgmuhs.com, वेबसाइट- www.mgmuhs.com
(६) स्कूल ऑफ मेडिसिन
अमृता विद्यापीठम या संस्थेच्या स्कूल ऑफ मेडिसिन मार्फत एमबीबीएस अभ्यासक्रम, स्कूल ऑफ डेंटिस्ट्री मार्फत बीडीएस अभ्यासक्रम, स्कूल ऑफ आयुर्वेद मार्फत बीएएमएस अभ्यासक्रम, स्कूल ऑफ नर्सिग मार्फत बॅचलर ऑफ नर्सिग अभ्यासक्रम चालविले जातात. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी १७ मे २०१५ रोजी अमृतापुरी, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोची, कोलकाता कोझिकोड, नवी दिल्ली, थिरुवनंतपूरम या ठिकाणी चाळणी परीक्षा घेतली जाईल. अर्ज ऑनलाइनसुद्धा भरता येतो.
द अ‍ॅडमिशन को-ऑर्डिनेटर, ऑफिस ऑफ द अ‍ॅडमिशन्स, अमृता इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस, एआयएमएस- पोनेक्करा, पोस्ट ऑफिस- कोची- ६८२०४१, केरळ, दूरध्वनी- ०४८४-२८५८३७३ मेल- ugadmissions@aims.amrita.edu, वेबसाइट- www.amrita.edu 
(७) श्री रामचंद्र मेडिकल कॉलेज अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटय़ूट
श्री रामचंद्र युनिव्हर्सिटी अंतर्गत कार्यरत असणाऱ्या श्री रामचंद्र मेडिकल कॉलेज अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटय़ूटच्या वतीने एमबीबीएस आणि श्री रामचंद्र डेंटल कॉलेज अ‍ॅण्ड हॉस्पिटलच्या वतीने बॅचलर ऑफ डेंटल सायन्स हे अभ्यासक्रम चालविण्यात येतात. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अखिल भारतीय स्तरावर चाळणी परीक्षा घेतली जाईल. एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी चाळणी परीक्षा ३१ मे २०१५ ला सकाळी १० वाजता आणि बीडीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दुपारी २.३० वाजता चाळणी परीक्षा होईल. परीक्षेची केंद्रे- बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, कोलकाता आणि पुणे आहेत. या परीक्षेचे माहितीपत्रक आणि अर्ज http://www.sriramchandra.edu.in  या वेबसाइटवरून डाऊनलोड करता येईल. श्री रामचंद्र युनिव्हर्सिटी, चेन्नई या नावे काढलेला असावा. पत्ता- श्री रामचंद्र युनिव्‍‌र्हसिटी, पोरुर, चेन्नई-६००११६, दूरध्वनी- ०४४-२४७६ ५९९५, फॅक्स-०४४-२४७६ ५५१२.
(८) भारथ युनिव्हर्सिटी
भारथ युनिव्हर्सिटीमार्फत एमबीबीएस, बीडीएस, बॅचलर ऑफ फिजिओथेरेपी, बॅचलर ऑफ सायन्स इन नर्सिग हे वैद्यकीय शाखेशी निगडित अभ्यासक्रम संबंधित विषयांच्या स्कूल्समार्फत चालविले जातात. पत्ता- १७३, आघाराम रोड सेलैवूर, चेन्नई- ६०००७३, दूरध्वनी- ०४४- २२२९०२४७/ २२२९०७४२, फॅक्स- २२२९ ३८८६, ईमेल- admission@bharathuniv.ac.in,  वेबसाइट- bharathuniv.ac.in  
(९) सुमनदीप विद्यापीठ
सुमनदीप विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या संस्थांच्या अभ्यासक्रमांसाठी ऑल इंडिया कॉमन एन्ट्रन्स टेस्ट घेण्यात येते. त्याद्वारे (१) एमबीबीएस (एसबीकेएस मेडिकल इन्स्टिटय़ूट अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर, पिपारिया), (२) बॅचलर ऑफ डेंटल सायन्स (के. एम. शाह डेंटल कॉलेज अ‍ॅण्ड हॉस्पिटल, पिपारिया), (३) डेन्टल मेकॅनिक (के. एम. शाह डेन्टल कॉलेज अ‍ॅण्ड हॉस्पिटल, पिपारिया), (४) बॅचलर ऑफ फार्मसी (डिपार्टमेंट ऑफ फार्मसी), (५) बॅचलर ऑफ सायन्स इन नर्सिग (सुमनदीप कॉलेज ऑफ नर्सिग), (६) बॅचलर ऑफ फिजिओथेरेपी (के. जे. पांडय़ा कॉलेज ऑफ फिजिओथेरेपी) या अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो. ही परीक्षा २३ मे २०१५ रोजी नवी दिल्ली, मुंबई, पिपारिया, वडोदरा, इंदोर, जयपूर, बेंगलुरू या केंद्रांवर घेण्यात येणार आहे. अर्ज व माहितीपत्रक http://www.sumandeepuniversity.co.in  या वेबसाइटवरून डाऊनलोड करता येतो. पत्ता- सुमनदीप विद्यापीठ, पोस्ट पिपारिया, ता.- वाघोडिया, जिल्हा- वडोदरा- ३९१७६०, दूरध्वनी- ०२६६८-२४५२६७
(१०) इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस
श्री. बी. एम. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरमध्ये एमबीबीएस शाखेच्या प्रवेशासाठी अखिल भारतीय पातळीवर (बीएलडीयू-यूजीईटी )चाळणी परीक्षा घेण्यात येते. महाराष्ट्रातील केंद्र- मुंबई. यंदा ही परीक्षा २४ मे २०१५ रोजी घेण्यात येणार आहे. पत्ता-श्रीमती बंगाराम्मा सज्जन कॅम्पस, सोलापूर रोड, बिजापूर-५८६१०३, दूरध्वनी- ०८३५२-२६४०३०, फॅक्स- २६३३०३, वेबसाइट- http://www.bldeuniversity.org  मेल- office@bldeuniversity.org 
(११) केएलई युनिव्हर्सिटी
केएलई अकॅदमी ऑफ हायर एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च या संस्थेतील एमबीबीएस, बीडीएस, बी.फार्म, बीएएमएस, बॅचलर ऑफ फिजिओथेरेपी, बीएस्सी इन नर्सिग या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी केएलई युनिव्हर्सिटी-ऑल इंडिया एन्ट्रन्स टेस्ट (केएलईयू-एआयईटी-२०१५) घेण्यात येणार आहे. ही परीक्षा ९ मे २०१५ रोजी देशभरातील विविध केंद्रांवर घेण्यात येईल. यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या केंद्रांचा समावेश आहे. ही परीक्षा ऑनलॉइन आहे. अर्ज http://www.kleuniversity.edu.in या संकेतस्थळावरून ऑनलाइन भरता येईल. मेल- info@kleuniversity.edu.in. पत्ता- केएलई युनिव्हर्सिटी, जेएनएमसी कॅम्पस, नेहरूनगर, बेळगाव-५९००१०, कर्नाटक. दूरध्वनी-०८३१-२४४४४४४, फॅक्स- २४९३७७७ या परीक्षेद्वारे केएलई कॉलेज ऑफ फार्मसी हुबळी, केएलई कॉलेज ऑफ फार्मसी बेळगाव, केएलई कॉलेज ऑफ फार्मसी बंगलोर केएलई व्हीके, इन्स्टिटय़ूट ऑफ डेन्टल सायन्सेस बेळगाव, केएलई इन्स्टिटय़ूट ऑफ नर्सिग सायन्सेस बेळगाव, केएलई इन्स्टिटय़ूट ऑफ फिजिओथेरेपी, बेळगाव, केएलई श्री बीएमके आयुर्वेद महाविद्यालय- बेळगाव, जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज बेळगाव या संस्थांमध्ये प्रवेश दिला जातो.
सुरेश वांदिले