गेमिंग हा खरं तर लहानांपासून मोठय़ांपर्यंत साऱ्यांच्या अगदीच आवडीचा विषय आहे. सुट्टीच्या दिवशी फेसबुकवर फावल्या वेळात ते कर्जत -विरार लोकलच्या सेकंडक्लासच्या खच्चून भरलेल्या डब्यापर्यंत कुठेही, कोणलाही मानसिक आनंद मिळवून देणारी गोष्ट म्हणजे गेम्स. पूर्वी आपल्याकडे निव्वळ पोरकटपणा समजलं जाणारं हे गेमिंगचं क्षेत्र गेल्या काही वर्षांपासून चांगलंच भरभराटीला आलेलं दिसत आहे. अ‍ॅन्ड्रॉइडच्या वापरामुळे गेिमगचा नवीन चेहरा इथे रुजला असला तरी प्रोफेशनल गेमिंग करणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या गेमिंगच्या भरभराटीपाठोपाठच गेमिंग कन्सोल बनविणाऱ्या कंपन्यांचीही भारतीय बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणावर कमाई होताना दिसते आहे व यात आता एचसीएलसारख्या बडय़ा कंपन्यांनीही उडी घेतल्याचं आपल्याला दिसून येतं. भारतीय बाजारात उपलब्ध असणाऱ्या याच गेमिंग कन्सोल्सचा घेतलेला आढावा.
पूर्वी छोटय़ाशा चौकोनी आकाराच्या डब्यामध्ये गेम्सच्या कॅसेट टाकून, त्याला टीव्हीशी कनेक्ट करून गेम्स खेळले जात असत. याच प्रकारात पुढे सोनी या कंपनीने प्ले स्टेशन हे अशाच प्रकारचं गेमिंग कन्सोल बाजारात आणलं व ते प्रचंड लोकप्रिय झालं, त्यानंतर आजपर्यंत सोनीने यामध्ये काळानुरूप अनेक बदल केले, त्यांना टक्कर म्हणून मायक्रोसॉफ्टची एक्स बॉक्स सीरिज बाजारात होती व तीही खूप लोकप्रिय झाली. आता अनेक नवीन कंपन्यांनी गेमिंग कन्सोल बनविण्याच्या क्षेत्रात उडी घेतली आहे. गेिमग कन्सोल म्हणजे फक्त गेम खेळण्यापुरता मर्यादित डिव्हाइस असते असा अनेकांचा समज आहे, परंतु आपण या कन्सोलला आपल्या टीव्हीला कनेक्ट करून डीव्हीडी प्लेअरसारखा देखील वापरू शकता, शिवाय आताच्या वाय-फाय सुविधेमुळे आपण याच गेिमग कन्सोलचा उपयोग करून आपल्या टीव्हीवर ऑनलाइन चित्रपट पाहणं, गाणी ऐकणं, त्याचा कॅमेरा वापरून ऑनलाइन व्हिडीओ चॅटिंग करणं अशा गोष्टींसाठीही वापरू शकता. त्यापैकी कोणते गेमिंग कन्सोल विकत घ्यावे हा प्रश्न साऱ्यांनाच पडलेला असतो, खरं तर याचं उत्तर अगदी सोपं आहे आणि ते म्हणजे आपली गरज. गेमिंग कन्सोलवर आपल्याला कोणते गेम्स खेळावयाचे आहेत, आपल्याला इतर मनोरंजनासाठी म्हणजेच (एमपीथ्री प्लेअर, व्हिडीओ प्लेअर) म्हणून वापरावयाचा आहे का? आपलं बजेट या साऱ्या गोष्टींचा विचार केला असता आपल्या प्रश्नाचं उत्तर सहज मिळू शकतं व या साऱ्या गोष्टी निश्चित झाल्यानंतर आपल्याला योग्य निवड करण्यासाठी बाजारात सध्या उपलब्ध असलेले काही गेमिंग कन्सोल्स व त्यांची वैशिष्टय़ं पुढीलप्रमाणे-
lp70मायक्रोसॉफ्ट एक्सबॉक्स ३६० कीनेक्ट
खरं तर मायक्रोसॉफ्ट एक्सबॉक्स ३६० हा पूर्वीच लॉन्च झाला होता, परंतु २०१० मध्ये मायक्रोसॉफ्टने कीनेक्ट ही नवी टेक्नॉलॉजी आपल्या गेमिंग कन्सोलसाठी वापरली. सध्याचा सर्वात प्रसिद्ध व सर्वाधिक खप असलेल्या ह्य गेमिंग कन्सोलची खासियत या कीनेक्ट नावाच्या डिव्हाइसमध्येच आहे, हे डिव्हाइस आपल्या कन्सोलला जोडायचं ज्यामुळे आपल्याला उत्तम युजर इंटरफेस मिळतो व आपण कोणत्याही रिमोटशिवाय गेम्स खेळू शकतो. कारण हे कीनेक्ट आपल्या शरीराच्या हालचालींवरून तसंच आपल्या आवाजावरून गेम्स ऑपरेट करतं, म्हणजेच आपण बॉिक्सगचा गेम खेळत असताना त्या सेन्सरसमोर उभं राहून हवं तसं पंच मारायचं की गेममधील प्लेयरदेखील तसंच पंच मारतो. या नव्या टेक्नॉलॉजीने एक्सबॉक्सला संपूर्ण जगभरात अतिशय लोकप्रिय ब्रॅण्ड बनविलं आहे, याशिवाय यामध्ये वाय-फाय, एचडी सपोर्ट म्हणजेच हाय डेफिनेशन व्हिडीओ पाहता येण्याची सोय, एक्स बॉक्स लाइव्ह कनेक्शन आदी सुविधा आहेतच. अर्थातच याची तशी किंमतही आपल्याला मोजावी लागते.
–    किंमत : २१-२२ हजार रुपये.
का घ्यावा:- सध्या उपलब्ध असणाऱ्या कन्सोलपैकी कमीत कमी किमतीत उत्तम गेमिंग सुविधा पुरविणारं कन्सोल आहे, अर्थात एक्सबॉक्स वन हे यापेक्षा पुढील व्हर्जन बाजारात असलं तरी किमतीमुळे हा पर्याय योग्य ठरतो आणि टेक्नॉलॉजीच्या बाबतीतही उत्तम ठरतो. हार्डकोअर गेमर्ससाठी सर्वोत्तम.
का टाळावा:- जर आपले बजेट चांगले असेल व आपण खरोखर उत्तम आणि अतिशय जलद व प्रगत तंत्रज्ञान असणारा कन्सोल शोधत असाल तर एक्सबॉक्स वनचा विचार करावा.

lp71मायक्रोसॉफ्ट एक्सबॉक्स वन
 एक्सबॉक्स प्रकारातील सर्वात नवीन व्हर्जन म्हणजे एक्सबॉक्स वन. ह्य गेिमग कन्सोलची मेमरी प्रोसेसरची क्षमता, या कन्सोलला अधिक उत्तम बनविते. याची प्रोसेसिंग क्षमता इतकी उत्तम आहे की, साधारण गेमचा लोिडग टाइम हा २५ सेकंदांइतका कमी आहे. साधारण ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या काळात भारतात दाखल झालेल्या या कन्सोलमध्ये मायक्रोसॉफ्टने उत्तम असे गेम्स उपलब्ध करून दिले आहेत. या कन्सोलमध्ये आपल्याला सर्वोत्तम असा व्हिडीओ एक्स्पीरियन्स घेता येतो. याचा इंटरफेस थोडा गोंधळवून टाकणारा असला तरी यामध्ये नव्याने दाखल झालेल्या फीचरमुळे ही समस्या काही प्रमाणात कमी होते, ते म्हणजे याची स्क्रीन आपण आपल्या मोबाइल, टॅब्लेटवर शेअर करू शकता; जेणेकरून आपणास टाइिपग करणं सोयीचं ठरतं ज्यामुळे फेसबुकसारखे इंटरनेट अ‍ॅप्लिकेशन्स आपण सहजपणे वापरू शकतो व ऑप्शन्समध्ये टाइप करून सिलेक्ट करणं सोयीचं होऊन जातं. शिवाय वर सांगितल्याप्रमाणे कीनेक्ट सुविधा जोडल्यावर एक्सबॉक्सचा गेिमग एक्सपीरीअन्स दुपटीने वाढतो
–    किंमत :- ४० हजार रुपये.
–    का घ्यावा:- उत्तम आणि प्रगत ग्राफिक्स, तसंच उत्तम असे मीडिया अ‍ॅप्स मायक्रोसॉफ्टने एक्सबॉक्स वनमध्ये उपलब्ध करून दिले आहेत, गेम्ससह इतर मीडिया स्ट्रीिमगचा एक्सपीरीअन्सही उत्तम आहे.
–    का टाळावा:- याचा इंटरफेस जरा गोंधळात टाकणारा आहे, बऱ्याचदा कीनेक्टच्या व्हॉइस कमांड्स नीट रन होत नाहीत. जास्तीची किंमत.

सोनी प्ले स्टेशन ४
–    सोनी प्ले स्टेशन या ब्रॅण्डने पीएस, पीएस १, पीएस २ ,पीएस ३, पीएस ३ स्लीम, या कन्सोलच्या माध्यमातून बाजारपेठेत बराच काळ साम्राज्य गाजविलं व आपल्या कन्सोल्समध्ये काळानुरूप बदलही केलेत व सध्या त्यांचे बाजारात असलेले कन्सोल म्हणजे प्ले स्टेशन ४ यामध्ये उत्तम कार्यक्षमतेसाठी सोनीने सिंगलचीप प्रोसेसर ८ कोअर सीपीयू उपलब्ध करून दिला आहे, ज्यामुळे हे कन्सोल अतिशय जलद वेगाने काम करू शकतो. एकाच वेळी अनेक प्लेअर्स कनेक्ट करण्यासाठी, लोिडगसाठी लागणारा वेळही बऱ्याच प्रमाणात कमी होऊन जातो. एएमडी रेडॉनवर आधारित ग्राफिक्स गेमचा ग्राफिक एक्सपीरीअन्स लाक्षणिकरीत्या सुधारतो आणि आपल्याला उत्तम गेमिंगची अनुभूती अनुभवता येते. व्हिडीओ स्ट्रीिमग जरा डावाडौल बाजू वाटते. कारण सीडी आणि एमपीथ्री प्लेबॅक सुविधा पुरविण्यात आलेली नाही.
–    किंमत:- ३९-४० हजार रुपये.
–    का घ्यावा:- उत्तम कंट्रोलर, बेस्ट ग्राफिक्स, उत्तम आणि सोपा इंटरफेस, ६ एक्स ब्लू रे डिस्क टेक्नॉलॉजी या कन्सोलला विशेष ठरवितं, शिवाय वाय-फाय, ब्लूटूथ हेदेखील पी एस ४ ला एक्स बॉक्स वनच्या तोडीस घेऊन जातात.
–    का टाळावा:- पीएसथ्रीचे गेम्स चालत नाहीत, गेम सोडून इतर मीडिया स्ट्रीिमग एक्सपीरीअन्स जरा कमी पडतो, जास्तीची किंमत.

 निन्टेन्डो वाई
–    नाव फारसं ऐकिवात नसलं तरी या कन्सोलची युजरसंख्या चांगली आहे आणि त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे याची कमी किंमत व यातील मोशन सेन्सेबल टेक्नॉलॉजी, हार्डकोअर गेम्स खेळण्याची इच्छा असेल, परंतु पीएस व एक्सबॉक्सवर खर्च करण्याइतपत पैसे नसतील तर अशांसाठी निन्टेन्ड वाई हे चांगलं ऑप्शन ठरू शकतं. वाई या कंपनीचं सातव्या जनरेशनचं हे कन्सोल असून यातील मोशन सेन्सेबल टेक्नॉलॉजी ही एक्सबॉक्सच्या कीनेक्टशी काहीशी साधम्र्य साधणारी आहे. अर्थातच याच्या कमी किमतीचं मुख्य कारण आहे ते याची कमी असलेली ग्राफिकल व मल्टीमीडिया फॅसिलिटी, ज्यामुळे हे कन्सोल पीएसपी व एक्सबॉक्सपेक्षा बरंच मागे पडतं. बाकी बिल्ट इन वायफायमुळे ऑनलाईन गेमिंग सहज व सुकर होतं. तसंच याची गेम लायब्ररीही चांगलीच पुढारलेली आहे. त्याचे युजर फ्रेंडली व लहान मुलांना आनंद देणारे गेम्स हेसुद्धा वाईच्या यशाचं एक रहस्य आहे.
–    किंमत:-११ ते १३ हजार रुपये.
–    का घ्यावा:- मोशन सेन्सेबल टेक्नॉलॉजी व उत्तम गेम्स लायब्ररी व कमीत कमी किंमत ही या कन्सोलची विशेष वैशिष्टय़ं आहेत. लहान मुलांसाठी अगर नॉन प्रोफेशनल गेमर्ससाठी उत्तम.
–    का टाळावा:- ग्राफिकल कॅपॅसिटी अगदीच निराशादायक आहे, तसेच यात कोणतीही सीडी अगर डीव्हीडी प्ले होऊ शकत नाही.
याशिवाय एच.सी.एल.ची ‘मी’ सीरीज आपले लक्ष वेधून घेते. याखेरीज आता अनेक फक्त गेमिंगसाठी कंपेटीबल असणारे मोबाइल्स, स्मार्टफोन्स, लॅपटॉप बाजारात येत आहेत. त्यांना देखील गेमिंग कन्सोलच म्हणावं लागेल. अशी अनेक कन्सोल्स आता आपल्या देशात उपलब्ध आहेत आणि त्यांची योग्य माहिती इंटरनेटवर मिळू शकते.     
–    सध्याचा जमाना हा थ्रीडीचा जमाना आहे, त्यामुळे आता बऱ्याच कंपन्या थ्रीडीचा थरार गेमिंगमध्ये अनुभवण्यासाठी पोर्टेबल असं कन्सोल बनविण्याइतकं लक्ष केंद्रित करताना दिसत आहेत असे थ्रीडी कम्पेटीबिलीटी असणारे काही कन्सोल्स बाजारात उपलब्धही होऊ लागले आहेत. आपल्याला गेिमग कन्सोल घेणं शक्य नाही, पण आपण फावल्या वेळातले उत्तम गेमर आहात तर आपल्यासाठी अ‍ॅन्ड्रॉइडने फारच उत्तम असे ऑप्शन्स उपलब्ध करून दिले आहेत आपण ते नक्की अनुभवावे, आपण खेळायलाच हवं अशा काही अ‍ॅन्ड्रॉइड गेम्सबद्दल पुढील भागात

–  प्रशांत जोशी