News Flash

आरोग्य : सर्वाना हवंय हायड्रॉक्सी क्लोरोक्वीन

अमेरिकेने भारताकडे मागणी केल्यानंतर हायड्रॉक्सी क्लोरोक्वीन या औषधाचा मुद्दा जगभरात चर्चेत आला.

आरोग्य : सर्वाना हवंय हायड्रॉक्सी क्लोरोक्वीन
हायड्रॉक्सी क्लोरोक्वीन

प्रभा राघवन – response.lokprabha@expressindia.com

अमेरिकेने भारताकडे मागणी केल्यानंतर हायड्रॉक्सी क्लोरोक्वीन या औषधाचा मुद्दा जगभरात चर्चेत आला. औषध क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करून या संदर्भातील प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न..

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मागणीनंतर कोविड-१९च्या उपचारांसाठी हव्या असलेल्या हायड्रॉक्सी क्लोरोक्वीनची बंदी उठवण्याचं सरकारने ठरवलं आहे. नेमकं काय आहे हे औषध?

हायड्रॉक्सी क्लोरोक्वीन हे काय आहे आणि ते कशासाठी वापरले जाते?

ल्ल हायड्रॉक्सी क्लोरोक्वीन हे मलेरियावरील उपचारांमध्ये वापरले जाते. ते क्लोरोक्वीनपेक्षा कमी तीव्रतेचे असते. ऱ्हुमॅटॉइड ऑथ्र्रायटिस आणि लुपूस अशा आजारांमध्येही डॉक्टर ते घ्यायला सांगतात.

भारतात या औषधांचं संशोधन कोण करतं?

ल्ल औषधनिर्मितीसंदर्भात संशोधन करणाऱ्या एआयओसीडी अ‍ॅव्ॉक्स फार्मा या संस्थेच्या आकडेवारीनुसार फेब्रुवारी २०२० पर्यंतच्या फक्त १२ महिन्यांमध्ये हायड्रॉक्सी क्लोरोक्वीनची बाजारातली उलाढाल १५२.८० कोटी रुपयांची होती. जगातले अनेक देश भारताकडून या औषधाची खरेदी करतात.

भारताने या औषधाची निर्यात कधीपासून थांबवली?

ल्ल अमेरिकेला हे औषध वापरण्यासाठी ताबडतोब हवे आहे. मार्च २१ रोजी आयपीसीएने शेअर बाजारात सांगितले की, ‘‘अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने अपवादात्मक परिस्थितीत संबंधित कंपनीच्या विरोधातले आयात र्निबध शिथिल केले असून आता ते औषध उपलब्ध होऊ शकेल. भारताने ४ एप्रिल रोजी या औषधाच्या निर्यातीवर र्निबध घातले होते. मंगळवारी सरकारने ते शिथिल केले.

हे औषध कोविड-१९वर खरोखर प्रभावी आहे का?

ल्ल कोविड-१९च्या उपचारात क्लोरोक्वीन आणि हायड्रॉक्सी क्लोरोक्वीन खरोखरच परिणामकारक आहे का, याबाबत दोन मोठय़ा चाचण्या सुरू आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका चाचणीचा भारतही भाग आहे. या चाचणीत रुग्णांवरील उपचारांमध्ये हायड्रॉक्सी क्लोरोक्वीन वापर करणाऱ्या डॉक्टरांनी काही समान नियम पाळायचे आहेत. दुसऱ्या चाचणीत क्लोरोक्वीनचावापर आहे. या चाचणीसाठी वेलकम ट्रस्ट तसंच बिल आणि मेलिंदा गेट्स फाऊंडेशनने निधी पुरवला आहे. पण तरीही करोनाच्या उपचारात ही औषधं किती प्रभावी आहेत हे सिद्ध व्हायचे आहे.

इतर कारणांसाठी ही औषधं घेणाऱ्या रुग्णांवर या उद्रेकाचा कसा परिणाम झाला आहे?

ल्ल मार्चमध्ये ट्रम्प यांनी केलेल्या या औषधाबद्दलच्या विधानामुळे त्याची अमेरिकेत अचानक विक्री वाढलीच, शिवाय भारतातल्या त्याच्या साठय़ावरही परिणाम झाला. फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिटय़ूट ऱ्हुमॅटॉलॉजीचे सल्लागार डॉ. नवल मेंदीरत्ता म्हणतात की, ‘लोकांनी या औषधांची जोरदार खरेदी सुरू केल्यामुळे दुकांनामधला त्याचा साठा संपायला लागला आहे आणि ते मिळत नाही असे रुग्णांचे फोन यायला सुरुवात झाली आहे. ऑथ्र्रायटिस तसंच लुपूसच्या काही रुग्णांना आठवडय़ातले काही दिवस हे औषध नाही मिळालं, त्यांनी नाही घेतलं तरी चालेल, पण त्यापेक्षा जास्त काळ त्यांनी ते न घेणं धोक्याचं ठरेल.’ आता त्याचा साठा मर्यादित आहे. जो आहे तो राज्य तसंच केंद्र सरकारने विकत घेतला आहे.

या प्रश्नी औषध कंपन्या काय करताहेत?

ल्ल आयपीसीएचे संचालक अजित कुमार जैन सांगतात की, ‘सरकारच्या गरजेनुसार कंपनी उत्पादन करू शकते. आजपर्यंत हायड्रॉक्सी क्लोरोक्वीनचे फक्त १० टक्के उत्पादनच भारतात वापरले गेले आहे. त्याचा साठा किंवा त्याचा गैरवापर होतो आहे, हे खरं नसेल तर कंपनी ऱ्हुमॅटॉइड आथ्र्रायटिस तज्ज्ञांशी बोलून काही निवडक फार्मसीजना हायड्रॉक्सी क्लोरोक्वीन उपलब्ध करून द्यायला तयार आहे.’ झायडस कॅडिलाचा प्रवक्ता सांगतो की, ‘गरज असेल तर उत्पादन दरमहा ४० ते ५० टनांपर्यंत नेता येईल.

(‘द इंडियन एक्स्प्रेस’मधून साभार)

अनुवाद : वैशाली चिटणीस

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2020 8:28 am

Web Title: coronavirus pandemic everybody wants hydroxychloroquine arogya dd70
टॅग : Coronavirus
Next Stories
1 राशिभविष्य : दि. १० ते १६ एप्रिल २०२०
2 ‘निर्शहरीकरणा’च्या दिशेने..
3 अर्ध्यावरती डाव मोडला..
Just Now!
X