दीप्ती शिंदे – response.lokprabha@expressindia.com

#करोनाशीदोनहात

Concession for students to attend school due to highest temperature in state
विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्याबाबत सवलत… काय आहे शालेय शिक्षण विभागाचा निर्णय?
54 courses across the country from NCERT pune
पूर्वप्राथमिक शिक्षण बोलीभाषेत; ‘एनसीईआरटी’कडून देशभरात ५४ अभ्यासक्रम
Loksatta kutuhal Limitations of learning
कुतूहल: सखोल शिक्षणाच्या मर्यादा
Career MPSC exam Guidance UPSC job
प्रवेशाची तयारी: व्यवस्थापन शिक्षणासाठी राज्यस्तरीय सीईटी

करोनाने प्रत्येक क्षेत्रात उलथापालथ घडवून आणली आहे. शिक्षण क्षेत्रही त्याला अपवाद नाही. इंडिया ब्रँड इक्विटी फाऊंडेशनच्या संकेतस्थळावर मार्च २०२०मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखातील माहितीनुसार भारतात ५ ते २४ वयोगटातील लोकसंख्या ही सुमारे ५० कोटी इतकी आहे. हा वयोगट म्हणजे कोणत्या ना कोणत्या स्तरावर शिक्षण घेणारा गट आहे. आपल्याकडे प्रचलित पद्धतीनुसार विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयात जाऊनच शिक्षण घ्यावं लागतं. पण आता अंतरसोवळे काटेकोरपणे पाळण्याची गरज असताना अनेक विद्यार्थ्यांना एका वर्गात बसवून शिक्षण देणे अयोग्य ठरले आहे. अंतरसोवळेही पाळायचे आहे आणि शैक्षणिक सोयीसुविधाही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायच्या आहेत, तर काय करता येईल, असा प्रश्न सध्या भारतीय शिक्षणव्यवस्थेपुढे आहे.

पण गेल्या काही वर्षांत संगणक, आंतरजाल व तत्सम क्षेत्रांत झपाटय़ाने प्रगती झाली. ई-लर्निग नामक नवीन पर्याय उपलब्ध झाला. भारतात शिक्षणासाठी संगणकाचा उपयोग याआधी कधी केला गेला नाही असे नाही, पण त्याचा गांभीर्याने तितकासा विचार केला गेला नव्हता. आता तो करावा लागत आहे. बऱ्याच शिक्षणतज्ज्ञांच्या मते ई-लर्निग हा पारंपरिक शिक्षण पद्धतीला कायमचा पर्याय कधीच ठरू शकत नाही, पण आज अनेक शाळा, महाविद्यालयं आणि विद्यापीठांनी संगणकीय शिक्षणाचा पुरस्कार केला आहे.

भारतीय विद्यार्थ्यांचा विचार करताना आपल्याला दोन प्रवाहांचा विचार करायला हवा- एक तथाकथित मुख्य प्रवाह ज्यातील विद्यार्थ्यांच्या विशेष गरजा नाहीत तो आणि दुसरा म्हणजे ज्यातील विद्यार्थ्यांच्या विशेष गरजा आहेत असा प्रवाह. कौतुकाची बाब ही आहे की या दोन्ही प्रवाहांत संगणकीय शिक्षणप्रणालीचा अवलंब जोमाने सुरू झाला आहे. या नवीन पद्धतीचे नेमके स्वरूप कसे आहे, त्यातील जमेच्या आणि कमकुवत बाजू कोणत्या आणि या पद्धतीचे भारतातील भविष्य काय, याचा थोडक्यात मागोवा घेऊ.

संगणकीय शिक्षणप्रणाली म्हणजे शिक्षणाची उद्दिष्टं साध्य करण्यासाठी संगणक, मोबाइल, नोटपॅड इत्यादी साधनांचा वापर करणं. विशेष गरजा नसलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत या पद्धतीचा अवलंब करताना सरकारी आणि खासगी शाळांतील शिक्षक सध्या अनेक प्रयोग करत आहेत. विद्यार्थ्यांना शिकवायचा मजकूर पीडीएफ, लहान चित्रफिती किंवा ध्वनिचित्रफिती, फ्लिप बुक्स इत्यादींच्या माध्यमांतून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत आहेत. त्यासाठी पालकांचे व्हॉट्सअ‍ॅप समूह तयार करण्यात आले आहेत व ही शिक्षणसामग्री त्यावर शेअर केली जात आहे, जेणेकरून ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल. ऑनलाइन शिक्षण देण्यात भारतीय शिक्षक तरबेज व्हावेत यासाठी काही संस्था आपणहून पुढाकार घेऊन शिक्षकांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे ऑनलाइन धडे देत आहेत. अशा ऑनलाइन प्रशिक्षण शिबिरांमध्ये अँड्रॉइडवरील व्हिडीओ आणि ऑडिओ एडिटिंग अ‍ॅप्स, फ्लिप बुक्स तयार करणारी अ‍ॅप इत्यादींचा अधिकाधिक कौशल्याने आणि सर्जनशीलतेने कसा उपयोग करता येईल हे शिकवले जाते. फक्त शिकवण्याच्या पद्धतीच नाहीत तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे मूल्यमापन कसे करता येईल याचीही माहिती शिक्षकांना दिली जाते.

अनेक विद्यापीठांनी ऑनलाइन वर्ग भरवण्यास सुरुवात केली आहे. तर काहींनी ऑनलाइन पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम घोषित केले आहेत. तज्ज्ञांच्या मते, शाळा, महाविद्यालये व विद्यापीठे यांनी आता आभासी वर्ग, व्हिडीओ कॉन्फरिन्सग इत्यादी सुविधा पुरवण्यावर भर द्यायला हवा. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नवीन धोरणानुसार विद्यापीठांना आता त्यांचे सर्व शैक्षणिक साहित्य त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर डिजिटल स्वरूपात अपलोड करावे लागणार आहे, जेणेकरून विद्यार्थी त्याचा कधीही लाभ घेऊ शकतील.

आता आपण दुसऱ्या प्रवाहाचा विचार करू. विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांबाबत अध्यापनपद्धती ही एरवीही फार निराळी असते. या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांसह समूहात शिकवताना त्यांच्या अभ्यासक्रमात त्यांच्या गरजांनुसार फेरबदल करावे लागतात. शाळेत प्रवेश घेताना या विद्यार्थ्यांच्या अनेक चाचण्या घेतल्या जातात व त्याद्वारे त्यांची वैयक्तिक शैक्षणिक योजना (कल्ल्िर५्र४िं’्र२ी िए४िूं३्रल्ल ढ’ंल्ल) आखली जाते. शिक्षक ही योजना वर्षभर पाळतात. आता टाळेबंदीमध्ये या विद्यार्थ्यांकडे अधिक लक्ष पुरवले जात आहे. या विद्यार्थ्यांना वर्गात शिकवतानाही त्यांच्या अधिक कार्यक्षम इंद्रियांना अधिकाधिक सामावून घेऊन शिकवले जाते. अधिकाधिक गडद रंग, विविध आकार, चटकन लक्ष वेधून घेणाऱ्या वस्तू इत्यादींचा जास्त वापर केला जातो. असे साहित्य शाळांमधून उपलब्ध असते व त्याचा अधिक परिणामकारक वापर करण्यात शिक्षक निष्णात असतात. पण आता हे विद्यार्थी घरी असल्याने त्यांच्या पालकांनाच पालक व शिक्षक अशी दुहेरी भूमिका बजावावी लागत आहे. अशा वेळी घरी उपलब्ध वस्तूंचा मुलांना शिकवण्यात कसा वापर करता येईल यासाठी पालकांनाही शिक्षकांकडून प्रशिक्षण दिले जात आहे. या विद्यार्थ्यांशीसुद्धा व्हिडीओ कॉल्स इत्यादी माध्यमांतून संपर्क साधून त्यांना शिकवण्याचा, त्यांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न शिक्षक करत आहेत. या विद्यार्थ्यांच्या पालकांचेही अनेक ऑनलाइन समूह तयार करून एक प्रकारे सपोर्ट ग्रुप्स तयार केले गेले आहेत, ज्यातून अनेक पालकांना एकमेकांच्या अनुभवांतून शिकता येईल व पाल्यांची शिक्षण प्रक्रिया थांबणार नाही.

असे सर्व आशादायी चित्र असले तरीही हे सर्व सुरळीत आहे असे दुर्दैवाने म्हणता येणार नाही. संगणकीय शिक्षण प्रणालीत अनेक अडथळे आहेत. जगातील अनेक विकसित देशसुद्धा या प्रणालीवर पूर्णपणे अवलंबून राहू शकत नाहीत. मग भारतासारख्या विकसनशील देशात तर या बाबतीत अनेक अडथळे येणे साहजिक आहे. आजही मुंबई, पुणे, दिल्ली, चेन्नई, इत्यादी महानगरे सोडता अनेक ठिकाणे आंतरजालाच्या कक्षेत पूर्णपणे आलेली नाहीत. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांशी संपर्क साधणे, त्यांना व्हिडीओ माध्यमातून शिकवणे आणि त्यांच्यापर्यंत डिजिटल शिक्षण साहित्य पोहोचवणे ही अनेक आव्हाने शिक्षकांसमोर आहेत. व्यवहार्यतेच्या आव्हानापलीकडे अजून एक मोठे आव्हान आहे ते म्हणजे विद्यार्थ्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य जपणे. चार भिंतींमधील वर्ग हे किमान पाच-सहा तास सलग चालतात. पण आभासी वर्ग आपण सलग एवढा वेळ सुरू ठेवता येत नाहीत. तेवढा वेळ मुलांना संगणकासमोर बसवून ठेवून त्यांचे आरोग्य धोक्यात घालणे योग्य नाही. आभासी वर्गाच्या निमित्ताने मुले अधिकाधिक वेळ घरी राहू लागली तर त्यांच्या मानसिक विकासावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यांचा सामाजिक बुध्यांक विकसित होण्याची प्रक्रिया मंदावू शकते. त्यांचे परस्पर संवादकौशल्य विकसित होण्याच्या मार्गात अडचणी येऊ शकतात. असे अनेक दुष्परिणाम संगणक प्रणालीवर आधारित शिक्षणामुळे होऊ शकतात.

शाळेत असताना आपण विज्ञान शाप की वरदान हा निबंध लिहिलेला आहे. संगणकीय शिक्षणप्रणालीच्या बाबतीतही असेच म्हणता येईल. ते फक्त एक तंत्रज्ञान आहे. ते आपल्यासाठी शाप ठरणार की वरदान हे आपण त्याचा कसा वापर करतो, त्यासाठी कशी काटेकोर योजना आखतो व तिची कशी अंमलबजावणी करतो यावर अवलंबून आहे. प्राप्त परिस्थितीनुसार स्वतत बदल करून घेताना भारतीय विद्यार्थ्यांच्या गरजा, त्यांच्या विकासाची उद्दिष्टे आणि भारताच्या उज्ज्वल भविष्याचा सारासार विचार करणे आज शिक्षणव्यवस्थेसाठी अपरिहार्य आहे.