0shitalकोणताही कलाप्रकार प्रसिद्ध होण्यासाठी जनमानसात रुजण्यासाठी प्रसार माध्यमं फार महत्त्वाची भूमिका बजावतात. सध्याचा युग हे जाहिरातींचे आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या कार्यक्रमाची जाहिरात जेवढय़ा प्रभावीपणे कराल तेवढा तुमचा कार्यक्रम यशस्वी होणार. एखादी संस्था मोठी असेल किवा प्रायोजकांचे चांगले पाठबळ असेल तर मोठय़ा प्रमाणावर जाहिरात करणे शक्य होते परंतु तसे नसेल तर.. अशा वेळी प्रसारमाध्यमांची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरते. लोकांवरती या सर्व माध्यमांचा एवढा पगडा आहे की फारच थोडे प्रेक्षक नृत्याचे कार्यक्रम किंवा नृत्यातील नवीन प्रयोग प्रत्यक्ष पाहायला जातात मात्र बहुतांश लोक अशा कार्यक्रमाला प्रसार माध्यमातून प्रसिद्धी मिळाली अथवा त्याचा गवगवा झाला की मगच तिकडे आपली पावले वळवतात. यातील पारंपरिक माध्यम म्हणजे वर्तमानपत्र. यातून आपल्या कार्यक्रमाची जाहिरात करता येते. परंतु वर्तमानपत्रातील जाहिरात हे खूपच खर्चीक प्रकरण आहे. कार्यक्रमाला प्रायोजकत्व मिळाले असेल तरच ते शक्य होते. सर्वसामान्य कलाकारांसाठी मात्र हा खर्चाचा भाग अडचणींचा ठरू शकतो. तरीही वर्तमानपत्रांतून कार्यक्रमाची पूर्व प्रसिद्धी आणि नंतरचे परीक्षण यामुळे त्या कार्यक्रमाची माहिती असंख्य वाचकांपर्यंत पोहोचते, ज्यामुळे नंतरच्या प्रयोगांची प्रेक्षक संख्या वाढायला मदत होते.

यानंतरचे सर्वदूर पसरलेले माध्यम म्हणजे दूरदर्शन. अर्थात अजूनही नृत्याच्या कार्यक्रमांना आवश्यक तेवढे महत्त्व दिले जात नाही जेवढे नाटक, चित्रपटांना अथवा गाण्याच्या कार्यक्रमांना दिले जाते. तसेच दिवाळी पहाट, वसंतोत्सव, सवाई गंधर्व यांसारखे संगीतविषयक महोत्सव प्राधान्याने दाखवले जातात. त्याच प्रकारचे रेनड्राँप फेस्टिवल, सिंधू महोत्सव, कालाघोडा महोत्सव यांसारखे नृत्याशी संबंधित अनेक प्रतिष्ठित महोत्सव पुण्या-मुंबईत नियमितपणे आयोजित केले जातात, मात्र त्यांना हवी तेवढी प्रसिद्धी मिळत नाही ही खरे तर अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. याला एकमेव अपवाद म्हणजे ऊऊ इऌअफअळक ज्यावरून खजुराहो महोत्सवाचे थेट प्रक्षेपण दरवर्षी केले जाते. आजकाल चॅनल्सची संख्या प्रमाणाबाहेर वाढलेली. या सर्वाना लोकांना दाखवायला अखंड काही तरी हवंच असते. त्यामुळे तुमच्या कार्यक्रमाची माहिती, एक किंवा दोन मिनिटांचे क्लिपिंग आणि मुख्य कलाकारांची छोटीशी मुलाखत. यामुळेसुद्धा तुमचा कार्यक्रम प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला मदत होते. यातही थोडं डावं-उजवं केलं जातं बर का! कसं ते पाहा बरं. जर एखाद्या नृत्याच्या कार्यक्रमात कोणी सेलिबेट्री सहभागी असेल तर मग त्या कार्यक्रमाला जोरदार प्रसिद्धी मिळते. जशी ‘मराठी तारकां’ना मिळाली. अशा सेलिबेट्रींच्या मागे चॅनल्स धावत जातात.(अर्थात टीआरपीचा विचार करता ते योग्यच म्हणावे लागेल) परंतु एखादा नवोदित कलाकार असेल तर चॅनलने कार्यक्रमस्थळी येऊन चित्रीकरण करण्यासाठी पाठपुरावा करणे अथवा या संबंधात अधिक माहिती देणे अशांसारखी कामे त्या नवोदित कलाकारालाच पार पाडावी लागतात. म्हणजेच प्रसारमाध्यमसुद्धा पक्षपात करतातच. त्यातही शास्त्रीय नृत्याला बॉलीवूड डान्सपेक्षा कमी महत्त्व दिले जाते. परंतु तरीही या माध्यमाची ताकद जबरदस्त आहे हे नि:संशय. याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे ‘महाराष्ट्राची लोकधारा.’ हा अद्वितीय कार्यक्रम विविध चॅनल्समुळे संपूर्ण महाराष्ट्रभर पहिला गेला. यात विशेष उल्लेख करण्यासारखे चॅनेल म्हणजे कठरठउ. हे चॅनल संपूर्णपणे शास्त्रीय संगीत आणि नृत्य या विषयाला वाहिलेले आहे. अनेक नवोदित तसेच जाणकार पण दुर्लक्षित कलाकारांची यामुळे सर्वाना ओळख व्हायला मदत होते. डीडीभारती या चॅनलवर भारतभरातील विविध प्रकारची लोकनृत्य अथवा शास्त्रीय नृत्य नियमितपणे दाखवली जातात.
आता पाळी आहे सोशल नेटवर्किंग साइटची. हे जवळपास मोफत परंतु प्रचंड प्रभावी माध्यम. असंख्य लोक याच्याशी जोडले गेले आहेत. सध्याच्या काळात अनेक जण प्रचंड वेळ या सोशल नेटवर्किंग साइटवर घालवतात. त्यामुळे आपल्या कार्यक्रमाचे अपडेट्स देत राहणे, फेसबुकवर फोटो टाकणे, पोस्टर टाकणे, कार्यक्रमाची माहिती देणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आग्रहाचे आमंत्रण देणे याद्वारे शक्य होते. सर्वानाच सर्व कार्यक्रम पाहणे शक्य नसते तरीही त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचते हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे तुमची कला जगभरात पोहोचवण्याचा अजून एक अभिनव मार्ग म्हणजे डव ळवइए. एखादा व्हिडीओ डव ळवइए वर अपलोड केला की जगातील कोणत्याही कोपऱ्यातून एखादी व्यक्ती त्याचा आस्वाद घेऊ शकते. नृत्याचे असे असंख्य व्हिडीओ आपल्याला यूटय़ूबवर पाहायला मिळतील. आता कानामागून येऊन तिखट झालेला प्रकार म्हणजे वॉटस्अप हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालेला आहे. त्यामुळे वॉटस्अपवर शेअर करा की क्षणात साथीच्या रोगासारखं ते पसरलंच म्हणून समजा. त्यामुळे वॉटस्अपला कोणी कितीही दूषणं दिली तरीही कलाकारांसाठी मात्र निश्चितच हे एक वरदान आहे आणि अलीकडच्या काळात हे वारंवार सिद्धही झालं आहे. याचा अजून एक फायदा म्हणजे समोरच्याला आपल्या कार्यक्रमाचा विसर पडूनच द्ययचा नाही. एवढय़ा वेळा त्याच्यावर आठवणीचा मारा करता येतो आणि तोही अत्यल्प दरात. तर अशी ही प्रसार माध्यमाची किमया. याची ताकद ओळखा, शक्य तेवढी मदत घ्या आणि आपला कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचेल यासाठी प्रयत्न करा.
शीतल कपोले

light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Professor arrested for taking bribe to accept PhD thesis
विद्येच्या माहेर घरात शिक्षणाचा बाजार! पीएचडीचा प्रबंध मान्य करण्यासाठी लाच घेणारी प्राध्यापिका अटकेत
non marathi mobile phone professionals
अमराठी भ्रमणध्वनी व्यावसायिकांना समज, दुरुस्ती काम न करण्याचा मनसेचा इशारा