lp26वयात येताना होत असलेल्या शारीरिक बदलांबाबत मुलामुलींमध्ये निर्माण होणारे कुतूहल लक्षात घेऊन योग्य वयात, योग्य माहिती, योग्य पद्धतीने त्यांना दिली गेली तरच पुढे होऊ शकणारे अनेक गोंधळ टाळता येतील.

‘‘सर, मी एका मुलाला आणि त्याच्या वडिलांना तुमच्याकडे पाठवतोय. मी सांगलीजवळील एका गावामध्ये शिक्षक आहे. ही जरा विचित्र समस्या आहे. हा मुलगा आहे तेरा-चौदा वर्षांचा. अभ्यासात साधारणच आहे; पण गेले एक वर्ष त्याच्याविषयीच्या काही विचित्र तक्रारी माझ्याकडे काही विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. तो मुलींशी विचित्र वागतोय आणि त्याच्या वयात तो फारच फॉर्वर्ड झाला आहे.’’ ते शिक्षक मला जरा विषय समजावून देत होते.

ही टीनएज, पौगंडावस्थेतील लैंगिकतेची समस्या असणार हे माझ्या लक्षात आले. मी त्यांना जी अपॉइंटमेंट दिली त्या वेळी ते दोघेही आले. मुलगा चांगला चुणचुणीत दिसत होता; पण थोडा वयापेक्षा जास्त हुशार, बिलंदरही वाटत होता. त्याच्या वडिलांनी मला जी थोडक्यात माहिती दिली त्यावरून अभ्यासामध्ये तो साधारण होता, वेगवेगळे विषय शिकण्याच्या शिकवण्यांमध्ये तो रस घेत होता असे काही काळ जे त्यांना वाटत होते त्याचा भ्रमनिरास काही महिन्यांपूर्वीच्या त्याच्या आलेल्या तक्रारींनंतर शहानिशा करताना झाला. मुलींच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणे, त्यांच्या शाळेतील टॉयलेटमध्ये डोकावून पाहाणे, त्यांच्याशी लगट करणे, शरीरांना स्पर्श करणे अशा गोष्टी शाळेमध्ये हा मुलगा फार करतोय, या तक्रारी गेले काही महिने येत होत्या. शिक्षकांनी दम देऊन, धाक दाखवून, शिक्षा करूनही त्याच्यामध्ये सुधारणा दिसत नव्हती. वडिलांना बोलावून त्यांच्यासमोर त्याचा पाढा वाचून जर तो सुधारला नाही, तर त्याला शाळेतून काढून टाकण्यात येईल, अशी शेवटची वॉìनगही दिली गेली.

वडिलांना हा सगळा शॉकच होता. या वयात मुलगा असं काही वागतोय यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. त्यांना लगेचच त्यांचे दिवस आठवले. ‘असे काही’ करणे सोडाच, ‘असं काही’ असतं हेच त्या वेळी त्यांना कळलेले नव्हते हे त्यांच्या लक्षात आले. मुलाची ‘सखोल’ चौकशी केल्यावर त्यांच्या लक्षात आले की, क्लासेसना दांडय़ा, कुठे तरी टाइमपास हे त्याचे शाळा सोडून रुटीन होते. जास्तच खोलात शिरल्यावर त्याच्याकडून हे बरेच महिने चालले आहे हे त्यांना कळले. ते हादरले. त्यांनी व त्या सरांनी माझा सल्ला घेऊन त्याचे काऊन्सेिलग करणे आवश्यक आहे असे ठरवले.

मुलाकडून मी स्वतंत्र माहिती घेऊ लागलो. त्याचा विश्वास जिंकल्यावर तो मनमोकळं बोलू लागला. वेगवेगळे ‘गुगली’ प्रश्न विचारून त्यांच्या उत्तरांची जुळवाजुळव करून त्या मुलाचे विचार व वागणे हे मी लक्षात घेतले.

त्याच्या लैंगिक वाढीबरोबरच त्याच्या लैंगिकतेची वाढही झपाटय़ाने झाली होती, त्याच्या वयातील इतर मुलांपेक्षा जास्त. त्याच्या अगोदरच्या पिढीला जी माहिती कॉलेजच्या काळात व्हायची ती त्याला आता आठवीतच झालेली होती. तो जरी गावाकडील होता तरी कुणाच्या तरी मोबाइलमधून ‘क्लिप्स आणि फोटो’ बघून त्याच्या वर्गातील इतरांपेक्षा याचे या विषयात ‘पीएच.डी.’ झाले होते. त्याच्याकडून काही विचित्र गोष्टीही घडल्या हे त्यानेच सांगितले.

सध्याच्या पिढीला तंत्रज्ञानातून झपाटय़ाने मिळणारी माहिती हे लैंगिकतेच्या जाणिवेमध्ये प्रभावी कारण आहे; परंतु ही मिळणारी माहिती शास्त्रीय नसल्याने या लैंगिक गरज्ञानातून त्यांच्यात निर्माण होणारे लैंगिक मनोगंड व्यक्तिगत तसेच सामाजिकदृष्टय़ा धोकादायक ठरू शकतात हे या मुलाच्या केसवरून लक्षात आले असेलच. तीन-चार वेळा काऊन्सेिलगला त्याला बोलावून योग्य वाट दाखवणे हे अत्यावश्यक असते.

माणसाला लागलेला सर्वात महत्त्वाचा शोध म्हणजे त्याला स्वत:चा स्वभाव बदलता येऊ शकतो. त्यासाठी महत्त्वाचे औषध असते ‘काऊन्सेिलग’, कारण ‘काऊन्सेिलग हे औषध असून ते कानातून मेंदूत जाते व योग्य परिणाम करते; परंतु त्यासाठी कान ते मेंदू हा मार्ग नेहमी स्वच्छ असला पाहिजे. म्हणजेच संबंधित व्यक्तीने स्वत:हून बदल करण्यासाठी येणे आवश्यक असते.

दोन-तीन काऊन्सेिलग सेशननंतर या मुलाला बऱ्यापकी फरक वाटू लागला. त्याला त्याच्या लैंगिकतेची माहितीपूर्वक जाणीव करून देऊन विधायक वळण द्यायला प्रवृत्त केले. पुन्हा सहा महिन्यांनंतर तो मुलगा आला तेव्हा त्याच्यातील फरक चांगलाच जाणवत होता.

या मुलासारख्या कित्येक केसेस समाजामध्ये घडत असतात. त्यातून काही रेव्ह पाटर्य़ासारखे प्रकार, बलात्कारासारखे गुन्हे, प्रेम-प्रकरणातील थिल्लरता अशा गोष्टी मीडियामधून आपल्यापर्यंत पोहोचत असतात. लैंगिकतेची जबाबदारी व परिस्थितीप्रमाणे ती हाताळण्याची क्षमता किशोरवयीनांमध्ये येण्यासाठी आणि रेव्ह पाटर्य़ासारखे स्फोट आटोक्यात आणण्यासाठी लैंगिकतेचा शास्त्रीय अभ्यासच समाजाला उपयोगी पडणार आहे. शालेय जीवनाच्या बायॉलॉजी विषयापासून विवाहपूर्व समुपदेशनापर्यंत टप्प्याटप्प्याने लैंगिक शिक्षण आवश्यकच आहे. विवाहोत्तर काळातही पती-पत्नी नाते समृद्ध होण्यासाठी कामजीवन मार्गदर्शन आवश्यकच असते. लैंगिक गुन्हे व लैंगिक मानसिकतेच्या समस्या काही प्रमाणात अनावर किंवा दाबलेल्या कामोत्तेजनेमुळे घडत असल्याने लैंगिकता हाताळण्यासाठी युवकांना सामाजिक जबाबदारीची जाणीव, प्रौढांना स्वत:चे कामजीवन दुर्लक्षित न करता जगण्याचे मार्गदर्शन सध्याच्या काळात अत्यावश्यक आहे.

सध्या रेव्ह पाटर्य़ाचे फुटलेले पेव, किशोरवयीन मुलामुलींचे बेदरकार उन्मुक्तपणे वागणे हे एक अतिरेकी टोक, तर त्यांना येनकेनप्रकारेण काबूत ठेवण्यासाठी चिंतित पालकवर्ग, ‘सोशल पोलिसिंग’ व ‘सरकारी पोलिसिंग’, हे आपल्याकडील समाजातील दृश्य आहे. त्याच वेळी ‘लिव्ह इन रिलेशनशिप’, होमोसेक्सुआलिटी, िलग-परिवर्तन शस्त्रक्रिया, बलात्काराचे बदलते निकष यांची जाणीव समाजाला होत आहे. या सर्वाचे मूळ आहे केवळ लैंगिकतेच्या डोळस शिक्षणाचा अभाव. ‘लैंगिकता’ वयाप्रमाणे, परिस्थितीप्रमाणे हाताळायला शिकणे तसेच लैंगिकतेचे इतर पलूही माहीत करून घेणे यालाच लैंगिक शिक्षणाचा पाया म्हणायला हरकत नाही.

लॅटरल िथकिंग, विचारसरणी म्हणजे चाकोरीबाहेर पडून विचार करण्याची प्रवृत्ती. रिव्हर्सििबलिटी िथकिंग, विचारसरणी म्हणजे एखाद्या गोष्टीविषयी पुनर्वचिार करून अगोदरचे मत बदलण्यास मन मोकळे ठेवण्याची प्रवृत्ती. या दोन्ही प्रकारच्या विचारसरणींनी मनाची लवचीकता वाढते. सेक्सबद्दल या दोन्ही विचारप्रणालींचा वापर आपल्या समाजात अत्यावश्यक आहे. सेक्सविषयी विचारावेसे खूप वाटते, त्याचा मनसोक्त आनंदही खूप घ्यावासा वाटतो, पण संकोचामुळे पती-पत्नी एकमेकांशीही याविषयी उघडपणे बोलत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.

प्राणीजगतात सेक्स म्हणजे समागमाची इच्छा. सम् म्हणजे एकत्र, आगम म्हणजे येणे. मानवामध्ये सेक्सच्या उत्क्रांतीत बदल होत गेले. सेक्स एक नाते बनले. घनिष्ठ नाते. पण त्याला काळाच्या ओघात संकोचाचे वलय लाभले. सेक्स विषयाला संकोच, लाज, शरम याची आवरणे चढवून त्याज्य बनवायला कारणीभूत आहे या विषयीचे अज्ञान.

डिसेन्सिटायझेशन तत्त्व

ज्या गोष्टीने नुकसान होऊ नयेसे वाटते, पण जी गोष्ट अपरिहार्य असते त्या गोष्टीला हळूहळू पण मुद्दामहून सामोरे जाणे फायदेशीर ठरते. यालाच डिसेन्सिटायझेशनचे तत्त्व असे म्हणतात. ही पद्धत वेगवेगळ्या रोगांच्या लसीकरणाच्या वेळी वापरली जात असते. यासाठी त्याच रोगाच्या जंतूंना त्यांचा मूळ स्वभाव शाबूत ठेवून त्यांची घातकता कमी करून वापरले जाते. त्याचा आयुष्यभर फायदाच होतो. लंगिक शिक्षणाच्या बाबतीत टप्प्याटप्प्याने ते दिले असता त्यातील सामाजिक घातकता उलट कमीच होईल. एवढेच नव्हे तर हे शिक्षण नसतानाही लंगिक समस्या, एचआयव्ही-एड्स, घटस्फोट यांचे प्रमाण वाढत चाललेच आहे हे वास्तवही सर्वानी लक्षात घेतले पाहिजे. कुठल्याही विषयाच्या शास्त्रीय ज्ञानाने कोणाचेही कधीच नुकसान होत नसते. फायदाच होतो. डिसेन्सिटायझेशनचे म्हणजेच संवेदनहीनतेचे तत्त्व हे सेक्सच्या नसíगक ऊर्मीचा आवेग स्वत:च्या अधीन ठेवायला निश्चितच उपयुक्त ठरते.

सेक्सविषयी शिक्षण देणाऱ्यांच्या पुढे महत्त्वाचा अडथळा असतो तो म्हणजे लोकांना काय माहीत नाही तेवढेच ज्ञान देणे नसून त्यांना जे माहीत आहे ते कसे चुकीचे आहे, हे त्यांना पटवून त्यातून परावृत्त करणे. लंगिक समस्यांची बीजे अज्ञानापेक्षा गरज्ञानातूनच पेरली जात असतात. चुकीच्या माहितीतून निर्माण होणारा विचार हा जास्त अढळ असतो. त्यामुळे गरज्ञान टाळण्यासाठी लंगिक विषयात योग्य वयापासून योग्य ज्ञान मिळायला लागणे हे आपल्या समाजाचे पुरोगामी लक्षण ठरणार आहे. त्यातून निर्माण होणाऱ्या युवावस्थापूर्व लंगिकता (अ‍ॅडोलेसन्ट सेक्सुयालिटी) व लंगिक व्यक्तिमत्त्व यांचे सामाजिक महत्त्व मोलाचे आहे.

लंगिक व्यक्तिमत्त्व हे व्यक्तीच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा पाया असतो. त्यातील न्यूनगंड, अपराधी भावना, घट्ट असलेले गरसमज याचे व्यक्तीवरच नव्हे तर समाजावरही विपरीत परिणाम होत असतात. म्हणून लहानपणापासूनच हे लंगिक व्यक्तिमत्त्व निरोगीपणे विकसित होईल हे पाहायला पाहिजे. शालेय शिक्षणाचे महत्त्व हे म्हणूनच जास्त आहे. शाळेपासूनच लंगिक शिक्षण टप्प्याटप्प्याने दिले तर किती तरी प्रमाणात सामाजिक आणि व्यक्तिगत हानी टाळली जाईल.

औपचारिक पद्धतीने शाळेपासून लंगिक शिक्षण हा विषय शिकवणे गरजेचे आहे. म्हणून शाळेत हा विषय कसा हाताळावा यासंबंधीच बघू. मुळात इतर शास्त्रविषय शिकवले जातात तसाच शिकवायचा हा विषय आहे. पहिल्यांदा हे लक्षात घ्यावे की, आठवी, नववी व दहावीमध्ये जीवशास्त्रामध्येच याचा समावेश फायदेशीर ठरू शकतो. लंगिक शिक्षण म्हणजे संभोगशास्त्र शिकवणे हा समज ठेवल्यानेच गोंधळ होत आहे; परंतु मुळात तसे नाही.

आठवीच्या अभ्यासक्रमात जीवशास्त्रातच सेक्स हार्मोननिर्मिती, स्त्री-पुरुषातील लंगिक बदल, गर्भनिर्मिती, त्या जीवनिर्मितीसाठी आवश्यक असणारे शुक्राणू व बीजांड यांचे मीलन, शुक्राणूंचा निर्माता पुरुष व बीजांडाची निर्माती स्त्री यांच्या लंगिक शरीररचनेची माहिती, त्यांचे एकत्र येणे, आई-वडील या नात्याचे महत्त्व यांचे केवळ प्राथमिक ज्ञान देणे आवश्यक आहे. हेच ज्ञान सखोलपणे नववीच्या अभ्यासक्रमात देण्याने लंगिकतेचा पाया मजबूत होईल. या वेळी मासिक पाळी याचीही माहिती द्यावी. यामुळे या विषयाचा संकोचही नष्ट व्हायला मदत होईल. मुलींनी शारीरिक वाढीविषयी जागरूक राहून परिलगी व्यक्तीशी वागताना पाळायची पथ्ये याच काळात देणे जरुरीचे आहे. शिक्षकांनाही हा विषय शिकवताना सुलभता येईल.

दहावीमध्ये सेक्स म्हणजे काय, त्याची मानसिकता, हस्तमथुन, सेक्स फॅण्टसी, एचआयव्ही, एड्स, गुप्तरोग याचेही शास्त्रीय ज्ञान अभ्यासक्रमात आले पाहिजे. याच काळात प्रेम, प्रेमाचे विविध प्रकार, कोवळे प्रेम, एकतर्फी प्रेम त्यांचे वैयक्तिक व सामाजिक दुष्परिणाम याचीही जाणीव करून देणे आवश्यकच नव्हे तर अत्यावश्यकही आहे. या काळात मुलांचा नेट-माध्यमातून, समवयस्कांकडून (पीयर ग्रुप), वाचनामधून सेक्सची माहिती घेण्याचा कल असतोच. नेट सìफग, चॅटिंग याचीही सवय लागते. म्हणूनच याच सुमारास याची योग्य माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवली पाहिजे. नाही तर चुकीच्या माहितीतून किंवा उत्तेजनाच्या अनावरपणातून एखादे कृत्य घडल्यास नंतर पश्चात्ताप त्यांना व पर्यायाने पालकांना होऊ शकतो. इट इज बेटर टू प्रीपेअर अ‍ॅण्ड टू प्रीव्हेन्ट रादर टू रिपेअर अ‍ॅण्ड टू रिपेंट. ज्ञान देण्याच्या संकोचामुळे उद्भवणाऱ्या नंतरच्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक पश्चात्तापापेक्षा शैक्षणिक मोकळेपणाने होणारा सामाजिक फायदा शिक्षणकर्त्यांनी लक्षात घेतला पाहिजे.

दहावीमध्येच लग्न म्हणजे काय, पती-पत्नी नात्यात निर्माण करावे लागणारे प्रेम, लंगिक मानसिकतेमध्ये होमोसेक्सुआलिटी, बायसेक्सुआलिटी, आयुष्याचा जोडीदार निवडीचे निकष, सेक्सच्या क्रियेची माहिती, लग्नाअगोदरच्या सेक्सचे धोके, उत्तेजना हाताळण्याचे मार्ग, एफएक्यू (फ्रीक्वेन्टली आस्क्ड क्वेश्चन्स) यांचाही समावेश करावा. सोळावं वरीस धोक्याचं हे माहीत असल्याने परिलगी व्यक्तीशी वागताना वापरायचे तारतम्य, दुसऱ्यांशी वागताना आपण स्वत पाळायची पथ्ये, सेक्सची उत्तेजकता हाताळायला शिकायची तंत्रे, शारिरीक वाढीला मानसिक वाढीची लागणारी जोड याचा सखोल विचार करणे जरुरीचे आहे. आपला समाज पाश्चात्त्यांप्रमाणे स्वकेंद्रित नसून, नातेकेंद्रित असल्याचे मुलांवर ठसवले पाहिजे.

शक्यतो १८ ते २१ वष्रे या काळात काही विशिष्ट गोष्टींची माहिती देणे जरुरीचे असते. गोलमोल गप्पा न मारता सेक्सविषयीची शास्त्रीय माहिती परखडपणे सांगणे आवश्यकच असते. कारण तारुण्याच्या उत्सुकतेमुळे काही वेळा प्रत्यक्ष लंगिक अनुभव घेण्याचा मोह अशा वयात होत असतो.

कल्पनाविश्वात रमून, प्रेमाच्या शोधात या वयातील मुलेमुली वेडीपिशी पण होऊ शकतात. प्रेम व वासना यांची गल्लत होऊन ‘जो भी प्यारसे मिले’ त्याच्या प्रेमात एकतर्फीपणे पडून शिक्षणातील लक्ष उडून शाळेतील हुशार मुलगा (किंवा मुलगीही) कॉलेजमध्ये अचानकपणे अभ्यासात मागे कसा पडतो हे पालकांना व शिक्षकांना कळेनासे होते. म्हणून या काळातही युवकांचे मानसशास्त्र माहिती असणे जरुरीचे आहे. तरच त्याला योग्य सल्ला देता येतो. योग्य तज्ज्ञ डॉक्टरांकडून अशा प्रकारे अभ्यासक्रम तयार करून प्रथम शिक्षकांना प्रशिक्षित केले पाहिजे. त्यांचेच सेक्सविषयीचे गरसमज, गंड दूर झाले तरच हा विषय ते मोकळेपणाने व आत्मविश्वासाने शिकवू शकतील. सेक्सच्या अशा प्रकारे देण्यात येणाऱ्या शास्त्रीय ज्ञानाने अ‍ॅडल्ट सेक्सुआलिटीच्या विकासाला फायदाच होणार असतो.

सेक्सविषयीचे शिक्षण हे स्त्री-पुरुष नातेसंबंधाचे शिक्षण आहे. हे विशेष नाते हे त्रिबंध स्वरूपाचे असते. मानसिक, भावनिक व शारीरिक या विषयीच्या ज्या समस्या समाजात तीव्रतेने आढळत आहेत त्या सेक्सविषयीच्या अज्ञानातूनच नव्हे, तर गरज्ञानातूनही निर्माण होत असतात.

(लेखक पुणे येथील डर्मेटॉलॉजिस्ट आणि क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट आहेत.)