14 December 2019

News Flash

ओली-सुकी

पूर्वीच्या काळी खेळताना मुलं छापा की काटा करायची तसंच ओली की सुकी करूनदेखील एखादी गोष्ट ठरवली जायची. इंग्रजी भाषेत ओली आणि सुकी शब्दावरूनच काही वाक्प्रचार

| August 15, 2014 01:15 am

पूर्वीच्या काळी खेळताना मुलं छापा की काटा करायची तसंच ओली की सुकी करूनदेखील एखादी गोष्ट ठरवली जायची. इंग्रजी भाषेत ओली आणि सुकी शब्दावरूनच काही वाक्प्रचार वापरले जातात.

चपटा दगड किंवा खापराच्या तुकडय़ाच्या एका बाजूला थुंकी लावली की ती ओली आणि खालची कोरडी बाजू म्हणजे सुकी. लहानपणाच्या सगळ्या खेळांची सुरवात या ओली-सुकीनं व्हायची. खापरतुकडा हवेत भिरकावून दान मागायचं, आणि पडेल ते स्वीकारून खेळाला सुरवात करायची. जीवनाच्या खेळातही कधी ओलीचं दान पडतं तर कधी सुकीचं. ते विनाअट स्वीकारून, खेळत राहणं, हाच जीवन-योग असतो.
कधी ओली जादा होताना दिसते तर कधी सुकीचा अतिरेक जाणवतो. पण शेवटी साऱ्या गोष्टींचा योग्य समतोल साधतो. कारण ओली अन् सुकी विरोधी नसून परस्परपूरक असतात. ओल्यात सुकी अन् सुक्यात ओली दडलेली असते. विनोबांनी गृहत्याग केला, अपरिग्रही बनले, पण आईनं शिवलेली गोधडी शेवटपर्यंत त्यांच्याकडे होती. ती पांघरून विनोबा झोपायचे. ही सुक्यातली ओली. आज इंग्रजीतले काही ओले-सुके शब्द अभ्यासासाठी घेतलेत.
wet behind the ears – lacking experience; immature.
उदा. 1) He’s a young teacher, still wet behind the ears.

2) He’s fresh out of college, still wet behind the ears.

(काही प्राण्यांची पिल्लं जन्मताच उभी राहतात. त्यांचं अंग वाळत,ं पण कानामागचा ओलेपणा आणखी काही वेळ टिकून राहतो. यावरून wet behind the ears म्हणजे अजून बच्चा, अननुभवी असा वाक्प्रचार बनलाय.)
a wet blanket- someone who does or says something that stops people from enjoying themselves. 
उदा. 

1) She is such a wet blanket that people never invite her to parties.
2) I don’t want to be a wet blanket but you must stop your music before 10 pm and allow us to sleep.

(समजा तुम्ही शेकोटीच्या उबेला बसला असताना, कुणी त्यावर ओली चादर आणून टाकली तर गेली ना शेकोटी विझून.. यावरूनच उत्साह, आनंदावर पाणी फिरवणाऱ्यासाठी a wet blanket  हा वाक्प्रचार रूढ झालाय.)
wet your whistle – have an alcoholic drink.
उदा. In the evening I went to his home & saw him weting his whistle. 
milk somebody dry- get from somebody all the money, help, information etc. they have, usually giving nothing in return; सगळं शोषून घेणे.
उदा. He milked his grandmother dry of all her money before she died.
५ not a dry eye in the house – used to say that everyone was very emotional about something.
उदा.  

1) There wasn’t a dry eye in the house when they annouced their engagement.
2) She talked about her son who died in the war, and there wasn’t a dry eye in the house.

dry – without alcoholic drinks.
उदा. dry wedding – ओल्या पार्टीशिवायचं लग्न.
dry day – मद्यविक्री बंद असलेला दिवस
dry state -मद्यविक्रीवर प्रतिबंध असलेले राज्य
संन्याशाच्या झोळीत एक छोटासा चपटा दगड होता. गुरुबंधूनं अनेकदा विचारल्यावर संन्यासी बोलता झाला. ‘‘लहानपणी माझ्याच वयाची एक मुलगी शेजारी राहायची. तिचं नाव चिऊ. आम्ही दिवसभर खेळत असायचो. खेळाच्या सुरवातीला ओली-सुकी करण्यासाठी एक चपटा दगड नेहमी माझ्या खिशात असायचा, कारण चिऊच्या फ्रॉकला खिसाच नव्हता. एक दिवस चिऊ खेळायला आली नाही. तिचं अंग गरम झालं होतं. तिच्या आजारासंबंधी मी दोनदा ओली-सुकी केली, पण दान प्रतिकूल पडलं. आठ दिवसांनी मला कळलं की चिऊ देवाघरी गेली. तेव्हापासून माझं खेळणं कमी होत गेलं. पण ओली-सुकीचा हा दगड मात्र अजूनही माझ्याकडे आहे.’’

First Published on August 15, 2014 1:15 am

Web Title: english language 25
Just Now!
X