टू-व्हीलर्स या आपल्या जीवनाचा अनिवार्य भाग बनल्या आहेत. आपण गाडय़ा चालवतो. त्यांची नावेही जाणतो, पण त्या नावांचे अर्थ मात्र अनेकदा अनोळखीच राहतात. म्हणूनच गाडीनामांची अर्थशोधन यात्रा.

* ‘‘स्कूटी Pep आल्यापासून लाइफ अगदी उत्साहानं भरून गेलंय.’’
* ‘‘हीरो होंडा Charisma  घेतली. करिश्मा कपूरचा फॅन आहे.’’
* ‘‘सुझुकी Zeus  ला पाच गियर, जबरदस्त ताकद, King of two wheelers.’’
* ‘‘आहे तीच गाडी वापरायची की यामाहा Crux घ्यायची, हाच कळीचा मुद्दा आहे.’’
* ‘‘बॉडीबििल्डग करतोस आणि बिनगियरच्या गाडीवर फिरतोस. हिरो होंडा Hunk  घेऊन टाक.’’

असे संवाद रोजच कानी पडतात. टू-व्हीलर्स या आपल्या जीवनाचा अनिवार्य भाग बनल्या आहेत. आपण गाडय़ा चालवतो त्यांची नावेही जाणतो, पण त्या नावांचे अर्थ मात्र अनेकदा अनोळखीच राहतात. म्हणूनच या वेळी गाडीनामांच्या अर्थशोधन यात्रेला जायचं आहे. चला, बसा मागे.

pep – lively energy; सळसळता उत्साह, जीवन ऊर्जा.
उदा. 1) Ramesh is always full of pep, bubbling with energy.
2) Eating right food and taking exercise will give you more pep.
(pep talk- उत्साहवर्धक भाषण)

charisma – the powerful personal quality to attract and impress other people ; charm.

उदा. 1) What the party needs is a more charismatic leader.

2) The President has great charisma. Crowds gather to watch and listen him, whereever he goes.

Zeus – the king of gods in Greek mythology. 
उदा. 1) Sir Don Bradman-the Zeus of batsmanship.

2) The company wanted this brand to be the king of all two wheelers, hence the name-Zeus.

crus – most important aspect of something.
उदा. 1) The crus of the matter is how do we prevent a flood occuring again ?

2) The crux of the country’s economic problems is its foreign debt.

hunk – 1> a large piece of solid substance. 
उदा. 

a hunk of meat / bread.
– 2> a strong and sexually attractive man.

उदा. Who was the handsome hunk you were with last evening  ?
(Hunk  गाडीच्या जाहिरातीची कॅचलाइन. New-All muscle-Hunk.- no one messes with it.)

शेवटी भररस्त्यातला भाषाप्रयोग. शहर-कोल्हापूर, वेळ-दुपारची, स्थळ-अरुंद रस्ता. बांधकामाचं साहित्य निम्म्या रस्त्यात पसरलेलं. एक ट्रॅक्टर उभा. त्यातच एक तरुण, नवी कोरी ‘हिरो होंडा Passionl  रस्त्यात लावून, काही अंतरावर मत्रिणीशी बोलण्यात मश्गूल. एकूण सगळा रस्ता बंद. आमचे मित्र ऑफिसला निघालेले, पण गाडय़ांच्या कोंडीमुळे पुढं जायला रस्ताच नाही. परिस्थितीचा अंदाज घेऊन, मित्र गाडीवरून उतरले. त्या तरुणापाशी जाऊन, ”hello” म्हणाले. मागे वळून गुर्मीत तरूण बोलला, ”any problem?” आमच्या मित्रांनी भर रस्त्यात, शुद्ध इंग्रजीत त्याचा कोथळा काढला. ”Young man, your passion is miss-placed.”