एखाद्याचा अपमान करायचा असेल, घालून पाडून बोलायचं असेल तर चक्क त्यासाठी वापरायच्या शब्दांचं पुस्तकच इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे. हवंय का तुम्हाला ते? त्याआधी त्याची ही झलकच पहा..

तुम्हाला कुणाचा अपमान करायचाय? शाब्दिक बदला घ्यायचाय? घालून, पाडून बोलायचंय? हिशोब चुकता करायचाय? मग हे पहा, तुमच्यासाठीच हे पुस्तक आहे. Book of insults या पुस्तकात हजारो अपमान-वचनं संकलित केली आहेत. कुणी तरी या पुस्तकाचाच अपमान करून ते रद्दीत टाकलं आणि माझ्या हाती लागलं. यातल्या काही शेलक्या वचनांचा आज आपण आस्वाद घेऊ म्हणजे नव्या इंग्रजी शब्दांची ओळख होईल आणि खवचटपणाचा आनंदही मिळेल.
अशा कोटीबाज, कुटाळखोर वाक्यांचा अर्थ फोडून सांगताना त्यातली मजा निघून जाते म्हणून सगळी अपमान-वचनं खाली दिलीत. ती वाचा. अर्थ लागतोय का पहा. (वाक्यानंतर अवघड शब्दांचे अर्थ आणि क्ल्यू दिलेत त्यांची मदत घ्या.)
1) He won her with soft soap, now he’s washing dishes.
2) Life for him is a matter of profits and lasses.
3) She has a real faminine look.
4) Once she did have an hourglass figure, but the sands of time ran down to the bottom.
5) During the courtship, he used to hold her hands and, ah ! it was love. He’s still doing it, but oh! it’s self defence.
soft soap – गोडगोड बोलून फूस लावणे. – to say nice things to somebody in order to persuade them to do something.
उदा. The poet put his imagination and words to their best use and soft soaped the girl.
(सॉफ्ट सोपनं तिला जिंकलं आणि आता (लग्नानंतर) (सौम्य साबण लावून) भांडी घासतोय. बिच्चारा!)
* lass – a girl; a young woman. 
उदा. Tina is a good lass. As I wake up, she brings me my cup of tea.
(profit and losses ऐवजी profit and lasses)
* famine – दुष्काळ ; – lack of food during a long period of time in a region.
* feminine – स्त्रीला योग्य असं वागणं, पेहराव, गुण वगरे असलेली; ष्टद्धr(२२९ौण.
उदा. The spiritual Guru was a kind, soft-spoken man, with almost feminine gestures.
(feminine (२२९ौण) सारखा वाटणारा faminine (दुष्काळी) हा शब्द तिच्या वर्णनासाठी वापरलाय.)
* hourglass figure – वाळूच्या घडय़ाळासारखी कमनीय शरीरयष्टी.
उदा. Girls with hourglass figures are watched time and again.
(आउअर ग्लासमधली वाळू तळाकडे सरकली असं म्हणत, तिचा सध्याचा बेढबपणा उघड केलाय.)
* courtship – प्रणयाराधन.
– the time when two people have a romantic relationship before they get married. (फ्रेंडशिप आणि मॅरेज यांच्यामधला टप्पा)
उदा. Our’s was an arranged marriage and we had no place for courtship.
(ah आणि oh हे उद्गार आहेत, लग्नाआधी ah! हा आनंद, सुखोद्गार आणि लग्नानंतर oh! हा आश्चर्य, भयोद्गार चपलखपणे वापरलेत.)
या चोपडीत एकजात सर्वाचा अपमान करणारी वचनं आहेत. हे वाक्य पहा. There are people more stupid than stupids, who can’t insult their enemies in their own words. (शत्रूचा अपमान ज्यांना स्वतच्या शब्दात करता येत नाही ते मूर्खापेक्षाही मूर्ख.) .च्यामारी ! हे पुस्तक वाचणाऱ्यांचा म्हणजे आपलाच की हा अपमान ! अरे, कुणी रद्दीवाला आहे काय तिकडे?…