14 December 2019

News Flash

चित्रानंद आणि शब्दाभ्यास

मुंबईत भरलेल्या एका प्रदर्शनात संजय शेलार यांच्या चित्रांचा आनंद घेत इंग्रजी शब्दांचाही अभ्यास होत होता. चित्र आणि त्याविषयीची इंग्रजी कॅप्शन बरंच शिकवून जात होती.

| November 14, 2014 01:12 am

मुंबईत भरलेल्या एका प्रदर्शनात संजय शेलार यांच्या चित्रांचा आनंद घेत इंग्रजी शब्दांचाही अभ्यास होत होता. चित्र आणि त्याविषयीची इंग्रजी कॅप्शन बरंच शिकवून जात होती.

कोल्हापूरचे चित्रकार संजय शेलार यांच्या चित्रांचं प्रदर्शन मुंबई येथे भरलं. प्रदर्शनाचा ब्रोशर (brochure) पाहण्याचा योग आला. यात शेलार यांच्या चित्रांचे रंगीत फोटो इंग्रजी टायटल्ससह छापलेत. ब्रोशरमधील काही फोटो आणि त्यांची नावं आपल्या शब्दअभ्यासासाठी घेऊ. म्हणजे ‘चित्रानंद आणि शब्दाभ्यास’ असे एका दगडात दोन पक्षी.
चित्र पहिले : नाच किंवा पार्टीसाठी तयार झालेली युवती. फुलाफुलांचा फ्रॉक, गुढगे टेकून बसलीय, हात गुंफलेले, चेहऱ्यावर किंचित उदास भाव. चित्राचं नाव wallflower.
* wallflower -1) a sweet-smeeling garden plant with yellow and red flowers.
2) a girl who has no one to dance with at a dance or party. (जोडीदार नसल्याने किंवा बुजऱ्या स्वभावामुळे एकटीच बसलेली मुलगी)
उदा. She expresses hereself in poems, but in social gatherings, she is a wallflower.
चित्र दुसरे : लाल टांगा, त्याला जोडलेला घोडा, टांग्यात मात्र पॅसेंजर्सऐवजी हिरवा चारा भरला जातोय. चित्राचं नांव for the horse’s mouth.
* from the horse’s mouth – (an information) given by somebody who is directly involved and therefore likely to be accurate
उदा. He is resigning. I got it straight from the horse’s mouth.
[जनावरांचा बाजार. खरेदीदार घोडय़ाचं तोंड उघडून पहातो. कारण दातांवरून घोडय़ाचं वय, आरोग्य वगरे जाणता येते. दलालांच्या तोंडून आलेलं अतिशयोक्त पण घोडय़ाच्या तोंडून आलेलं मात्र सत्य असतं, यावरून (straight) from the horse’s mouth हा वाक्प्रचार आलाय.]
[घोडय़ासाठी टांग्यात भरून, चारा नेला जातोय अशा चित्राला वरील वाक्प्रचारावर कोटी करून for the horse’s mouth असं शीर्षक दिलंय.]

चित्र तिसरे : लाल फ्रॉकमध्ये सजलेली बाहुली. तिच्या चहूबाजूनं मांडलेल्या वस्तू- एक मोठा कप, तांब्याचा तांब्या, पितळी डबा, फुलं वगरे.. चित्राचं नांव Hope chest.
* hope chest – the things a young woman collects to use in her home after she is married.
[चित्रातली बाहुली ही मुलींच्या खेळातली वधू आणि तिच्या आजूबाजूला मांडलेल्या वस्तू हा तिचा रूखवत म्हणजे hope chest.]

चित्र चवथे : तरुण सुंदरी. काखेत घडा घेऊन उभी. पाणी भरायला निघालीय की रसिकांना सौंदर्यरसपान घडवण्यासाठी? चित्राला नाव आहे – belle.
* belle  (बेल) – beautiful woman;
उदा. The manager fell in love with the new receptionist- a beautiful belle and married her.

First Published on November 14, 2014 1:12 am

Web Title: english language 5
Just Now!
X