08 December 2019

News Flash

शून्य ते सात, अंकांची बात

साईझ झिरो, फोर्थ इस्टेट, फिफ्थ कॉलम, सिक्स पॅक असे इंग्रजी अंकवाचक शब्द आपल्या कानावर नेहमी पडत असतात. काय आहे त्यांचा नेमका अर्थ?

| November 7, 2014 01:17 am

साईझ झिरो, फोर्थ इस्टेट, फिफ्थ कॉलम, सिक्स पॅक असे इंग्रजी अंकवाचक शब्द आपल्या कानावर नेहमी पडत असतात. काय आहे त्यांचा नेमका अर्थ?

आमच्या लहानपणी एक प्रसिद्ध गणिती कोडं होतं. ‘शून्य ते सात या अंकांची बेरीज मोठी की शून्य ते सात या अंकांचा गुणाकार? सांगा लवकर’. [शून्य ते सात या अंकांची बेरीज मोठी, कारण शून्य ते सातचा गुणाकार शून्यच येतो.] गणित आणि आकडेमोड यांची (माझ्याप्रमाणेच) तुम्हालाही भीती वाटत असेल तरी घाबरू नका. बुलेटिनचा विषय ‘शून्य ते सात’ असला तरी यात आकडेमोड नाही. आहेत ते केवळ अंक वापरून बनलेले शब्दप्रयोग.
Size zero
– स्त्री देहाच्या  bust-31.5 inches, waist-23 inches and hips-32 inches  या मापांना  size zero अशी संज्ञा आहे. (जिममध्ये जाऊन, डाएट करून अशी कमनीय आणि सडपातळ शरीरयष्टी बनवण्याचं फॅडच शहरी स्त्रियांमध्ये आलंय. उपाशी पोटी, राबराब राबताहेत बिचाऱ्या!)
उदा. For the lead role, they selected not an actress but a size zero model. 
one off
– happening or done only once, not as a part of regular series. (एकदाच केली जाणारी किंवा होणारी गोष्ट)
उदा. The bike is yours for a one-off payment of only 30,000 Rs. 
double whammy
– two bad things happening together or one after the other.
उदा. The double whammy of higher prices and more taxes, has angered the middle class. 
three Rs 
– basic education that is reading, writing and arithmatic हे तीनही विषय उच्चारताना, सुरवातीला ‘र’ (r) हा ध्वनी आहे म्हणून three Rs]
उदा. The businessman had no formal education. He learnt the three Rs from his uncle. 
fourth estate
– newspapers and journalists in general and the political influence that they have; media.

उदा. The fourth estate criticised the government’s decision of petrol price hike.

fifth column
– a group of people who secretly support enemies of their country ; पंचमस्तंभी. (भारत-अमेरिका अणुकराराला विरोध हा चीनच्या इशाऱ्यानुसार असून, ही भूमिका पंचमस्तंभी असल्याचा आरोप भारतीय डाव्यांवर झाला होता.)
उदा. The police suspects, presence of fifth column in the bomb blasts in the capital.

six pack‘
– very well developed stomach muscles of a man. 
उदा. The hero rarely wears his shirt. Wherever he goes, people ask him to show his six pack.
at sixes and sevens
– disorganised and confused. 
उदा. 1) When the guests arrived, we were still at sixes and sevens.
2) The husband, wife and three-children-total five members and the house is permanently at sixes and sevens.

[नवली नामक योगप्रकार करताना रामदेव बाबा पोटातील स्नायूंची अशी काही उलथापालथ घडवतात की बघणारालाच घाम फुटतो. या उदर उत्पाताचं वर्णन आमच्या मित्रानं stomach at sixes and sevens असं केलंय. आता तुम्हीही लेखणी उचला. कल्पनेला पंख द्या. आणि भन्नाट वाक्यं रचा. शब्द स्मरणात पक्के बसवायचा हा रामबाण उपाय आहे.]

First Published on November 7, 2014 1:17 am

Web Title: english language 6
Just Now!
X