News Flash

फ्रेशर पार्टीत कूल दिसायचंय?

आमच्या सीनियर्सनी आमच्यासाठी कॉलेजमध्ये फ्रेशर्स पार्टी आयोजित केली आहे. पण त्या दिवशी नक्की काय घालायचं हे लक्षात येत नाही. पार्टी कॉलेजमध्ये संध्याकाळी आहे. मी कोणता

| July 10, 2015 01:07 am

आमच्या सीनियर्सनी आमच्यासाठी कॉलेजमध्ये फ्रेशर्स पार्टी आयोजित केली आहे. पण त्या दिवशी नक्की काय घालायचं हे लक्षात येत नाही. पार्टी कॉलेजमध्ये संध्याकाळी आहे. मी कोणता ड्रेस घालू शकते?
– पायल कनोजिया, १८.

कॉलेजमध्ये नव्याने येणाऱ्या मुलांना कॉलेजचे वातावरण, सीनियर्स यांच्यासोबत छान टय़ुनिंग जमावं आणि कॉलेजविषयीची अनावश्यक भीती जावी म्हणून फ्रेशर्स पार्टी दिली जाते. या पार्टीमध्ये आपण सर्वात ‘कूल’ दिसावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. पायल, अशी संधी अजिबात सोडू नकोस. फ्रेशर्स पार्टीसाठी एलिगंट ड्रेस कधीही उत्तमच असतात. त्यामुळे स्केट्रर ड्रेस छान पर्याय आहे. हे ड्रेस कमरेपर्यंत फिटेड असतात आणि नंतर त्याला फ्लेअर असतो. पेन्सिल किंवा टँक ड्रेससुद्धा घालू शकतेस. यांच्यासोबत कूल लेदर जॅकेट छान दिसेल. ऑफ शोल्डर ड्रेसचा पर्याय आहेच की.. फ्लोरल किंवा पेस्टल शेड्सचे ड्रेस निवड. तुला ड्रेस घालायचा नसेल तर फिटेड डेनिम किंवा लेदर पँट्स फ्लोव्ही टय़ुनिक छान दिसतात. त्यासोबत पार्टीवेअर ब्लेझर घालता येईल. लेदर पेन्सिल स्कर्ट आणि पारदर्शी शर्ट पण घालता येईल. अशा पार्टीजसाठी पेन्सिल हिल्स घालू शकतेस. पण तुला ते घालता येणार नसतील तर वेजेस घालायला हरकत नाही. फक्त एक लक्षात राहू दे की, आत्मविश्वासाने तुझा लुक कॅरी कर.. अ‍ॅण्ड यू गॉना रॉक..

मला कॉलेजमध्ये असल्यापासून टी-शर्ट्स घालायला आवडतात. ऑफिसमध्ये फॉर्मल्स घालावे लागतात. तिथे हे टी-शर्ट्स वेगळ्या पद्धतीने फॉर्मल्ससोबत घालता येऊ शकतात का?
– प्रिया असोलेकर, २३.

ऑफिसच्या फॉर्मल्स ड्रेसिंगमुळे कॉलेजमधील कित्येक कूल ड्रेसेसना दूर लोटावं लागतं.. त्यातीलच एक आहेत टी-शर्ट्स. एरवी कॉलेजमध्ये कूल वाटणारे टी-शर्ट्स ऑफिसला घालता येत नाहीत, असं समजलं जातं. पण असं मुळीच नाही आहे, थोडीशी शक्कल लावली तर हे टी-शर्ट्स ऑफिसमध्येसुद्धा वापरता येऊ शकतात. पण त्यासाठी काही काळजीही घ्यावी लागते. पहिलं म्हणजे कुठलंही आक्रमक स्लोगन असलेलं टी-शर्ट्स तू ऑफिसमध्ये घालू शकत नाहीस. छानशा टी-शर्टवर सेमी-फॉर्मल ब्लेझर घालणं हा सर्वात सोप्पा आणि स्टाईलिश पर्याय आहे. त्याशिवाय स्कार्फपण अशा वेळी मदतीला येतो. एलिगंट स्कार्फ छानपैकी गळ्याभोवती गुंडाळून टी-शर्टला मस्त लुक देता येतो. स्टेटमेंट नेकपीससुद्धा तुझ्या सिंपल टी-शर्टमध्ये थोडासा फॉर्मल ट्विस्ट आणू शकतो. त्यामुळे असे नेकलेस वापरायला हरकत नाही. डार्क डेनिम किंवा लेदरच्या पेन्सिल स्कर्टसोबत लूझ टी-शर्ट छान दिसतात. सोबतीला उत्तम हिल्स कॅरी केल्यास तर साधासा टी-शर्ट आणि डेनिम हा लुकसुद्धा आकर्षक वाटतो.

आवाहन
फॅशनच्या संदर्भात तुमचे काही प्रश्न, शंका असल्यास जरूर पाठवा किंवा ‘लोकप्रभा’ला ई-मेल पाठवा. पाकिटावर किंवा ई-मेलच्या विषय रकान्यात ‘फॅशन पॅशन’ असा उल्लेख करावा.
मृणाल भगत response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2015 1:07 am

Web Title: fashion 17
टॅग : Fashion
Next Stories
1 टॅटू डिझाइन निवडताना…
2 पावसाळ्यात कपडय़ांचे पर्याय?
3 अँकलेट्स कसे वापरू?
Just Now!
X