01youthबहुतेक पार्टीजमध्ये सिलेब्रिटिज लाल लिपस्टिकमध्ये दिसतात. मलाही लाल लिपस्टिक घ्यायची आहे. पण वेगवेगळ्या ब्रॅण्ड्समध्ये लाल रंगाचेच वेगवेगळे शेड्स उपलब्ध असतात. त्यातील नेमका कोणता निवडायचा, हा प्रश्न पडतो. कारण दुकानात सगळेच शेड आपल्यावर सूट होताना दिसतात. प्रत्यक्षात घरी आल्यावर मात्र ती शेड तितकीशी चांगली वाटत नाही.
– श्वेता, वय १८.

लाल लिपस्टिक म्हणजे प्रत्येक तरुणीचा जीव की प्राण. मेकअप करण्याची, अप-टू-डेट राहण्याची आवड असेल तर लाल लिपस्टिक तुमच्या मेकअप किटचा अविभाज्य भाग असतो. कारण ही एक अशी शेड आहे, जी कधीच फसवत नाही. फक्त तुम्हाला तुमच्या कॉम्प्लेक्शनला साजेशी शेड निवडायची असते. त्यामुळे श्वेता तुझी अडचण समजू शकते. दुकानात भरपूर लाइट्स असल्याने समोरचा दाखवतो ती प्रत्येक शेड आपल्यावर मॅच होतेय, असं वाटत. मग ते फाऊंडेशन असो किंवा लिपकलर. पण त्यामुळे लिपस्टिक खरेदी करण्यापूर्वी आपल्या मनात त्याबद्दलचे काही नियम पक्के असणे गरजेचे असते. सगळ्यात प्रथम तुझ्या स्किनटोनचा विचार कर. जर तुझे कॉम्प्लेक्शन डार्क असेल, तर डार्क शेड निवड आणि जर उजळ असेल तर पिंक किंवा ऑरेंज टोनकडे झुकणाऱ्या रेड शेड्स निवडण्यास हरकत नाही. त्याचबरोबर ही शेड तुला कुठल्या समारंभाला वापरायची आहे, यावरही तुझी निवड अवलंबून असते. पार्टीसाठी जाताना मस्त, शिमर किंवा जेल फिनिश लिपस्टिक वापरू शकतेस. पण ऑफिस मीटिंग्सना मॅट फिनिश निवड. अर्थात तुझे कॉम्पेक्शन डार्क असेल न तुला ब्राइट रेड शेड आवडली असेल, तर मॅट फिनिश केव्हाही उत्तम. अर्थात मॅट फिनिश लिपस्टिक ड्राय दिसते, त्यामुळे जर तुझे लिप्स ड्राय असतील तर मात्र मॅट फिनिश टाळणे उत्तम किंवा आधी लिपबाम लावून मग ही लिपस्टिक लाव.

सध्या विविध प्रकारचे फंकी आणि मस्त प्रिंट्स पाहायला मिळतात. पण असे कपडे घालायला थोडं घाबरायला होतं. आपल्याला सूट होईल की नाही हे कळत नाही. असे प्रिंट्स आपल्या पेहरावात कसे वापरता येतील? – सुनीता, वय २४.

बोल्ड आणि फंकी प्रिंट्स सध्या इन आहेत. अगदी फुले, पक्षी, प्राणी अशा निसर्गातील घटकांपासून ते इतिहासातील खास व्यक्तिरेखाही कपडय़ांवर पाहायला मिळतात. अर्थात हे प्रिंट्स तितक्याच सहजतेने कॅरी करणेही महत्त्वाचे असते. मोठय़ा प्रिंट्सच्या कुर्तीसोबत बोल्ड शेडचा चुडीदार किंवा डेनिम घालू शकता. अशा प्रिंट्ससोबत कॉन्ट्रास शेड्स उठून दिसतात. शक्यतो एका मोठय़ा प्रिंटसोबत इतर कोणते प्रिंट्स मॅच करू नका. पण छोटय़ा किंवा मध्यम आकाराच्या प्रिंट्स एकमेकांसोबत टीमअप करून तुम्ही नक्कीच घालू शकता. एकाच आकाराच्या आणि साइजच्या पण वेगवेगळ्या कलरमधील पेझ्ली, फ्लोरल प्रिंट्स पण एकत्र छान दिसतात. अशा प्रकारच्या प्रिंट्स कुर्ती-चुडीदारवर पाहायला मिळतात. तुमच्या बॉडीस्ट्रक्चरचा प्रिंट्स घालताना विचार करणे महत्त्वाचे असते. जर अॅपल शेपची बॉडी असेल तर प्रिंटेड पँट्स, स्कर्ट्स छान दिसतात. पिअर शेपच्या मुलींनी मोठे प्रिंट्स शक्यतो टय़ुनिक्स, कुर्तीज वापरलेले उत्तम. (या बॉडीशेपबद्दल आपण मागच्या वर्षी बोललो होतो, आठवतंय ना..) लहान प्रिंट्सचे कपडे इल्युजन तयार करायला मदत करतात. त्यामुळे बॉडीमधील एक्स्ट्रा फॅट लपवण्यासाठी लहान प्रिंट्सचे कपडे कधीही उत्तम.