सध्या किती तरी बॉलीवूड सेलेब्रिटीज शिअर किंवा पारदर्शक फॅब्रिकचे शर्ट्स, ड्रेसेस घालताना दिसतात. मलाही असे ड्रेस घालायची इच्छा आहे; पण ते ‘ओव्हर एक्पोझिव्ह’ दिसणार नाहीत यासाठी कोणती काळजी घेता येईल? ऑफिस ते पार्टी अशा प्रकारचे कपडे कधी आणि कसे घालावेत?
– आरती, वय २४

lp58उत्तर : आरती तुझ्या म्हणण्याप्रमाणे सध्या ‘शिअर ड्रेसिंग’ सध्या खूप लोकप्रिय आहे आणि फक्त सेलेब्रिटीजमध्ये नाही, तर तरुणींमध्येसुद्धा हा ट्रेंड बराच गाजतोय. अर्थात शिअर फॅब्रिकचे कपडे घालताना बरीच काळजी घ्यावी लागते, कारण जर तुमचे इनर योग्य नसेल, तर तो ड्रेस व्हल्गर दिसण्याच्या शक्यता अधिक असतात. त्यामुळे शिअर ड्रेस घालताना कोणते इनर घालता आहात हे पाहणे सर्वात महत्त्वाचे असते. इनरचा विषय निघताच काळा आणि सफेद असे दोन रंग डोळ्यांसमोर येतात. आपल्यातील कित्येक जण अजूनही या दोन रंगांवरच अवलंबून असतात; पण पेस्टल शेडच्या शिअर ड्रेसच्या आत सफेद इनर घातल्यास किंवा डार्क शेडसाठी काळा इनर वापरल्यास ड्रेसमधून तो स्पष्ट दिसून येतो आणि दिसायलाही चांगला दिसत नाही. त्यामुळे शक्यतो ज्या रंगाचा ड्रेस आहे, त्याच रंगाचे किंवा स्किन कलरचे इनर वापरावे. इनर बॉडी फिटेड असणे उत्तम, नाही तर त्याला पडलेल्या सुरकुत्या ड्रेसमधून स्पष्ट दिसतात. अर्थात शिअर ड्रेसमधून इनर दिसणार हे स्वाभाविकच असल्याने इनरमध्ये विविध पर्याय वापरून पाहायला हरकत नाही. पेस्टल शेडच्या ड्रेससोबत डार्क किंवा कॉन्ट्रास शेडचे इनर घालू शकता. नेहमीचे इनर घालण्याऐवजी सिक्वेन्स टय़ूब टॉपसुद्धा घालू शकता. पांढऱ्या ड्रेसवर वेगवेगळ्या रंगांचे इनर्स किंवा बेज शेडसोबत ब्राऊन इनर छान दिसते. मल्टिकलर इनरसुद्धा वापरून बघ. थोडक्यात सांगायचे झाल्यास शिअर ड्रेस तुम्हाला तुमचा सेन्स ऑफ स्टाइल आणि ड्रेसिंग दाखवायची संधी देतात, ती कधीच गमावू नकोस.

आम्ही गोवा ट्रिपला जाणार आहोत. बीच ट्रिप लक्षात घेता बॅग भरताना कोणत्या प्रकारचे कपडे, अ‍ॅक्सेसरीज घेणे आवश्यक आहे?
– रिया, वय २०

lp59उत्तर : ट्रिपसाठी गोवा हे अल्टिमेट डेस्टिनेशन आहे. मस्ती, खाबुगिरी आणि बीचेस यांचा संगम म्हणजे गोवा. त्यामुळे तिथे जाताना कोणत्याही प्रकारचे गांभीर्य अगदी तुमच्या लुकमध्येसुद्धा दिसता कामा नये. त्यामुळे नेहमीच्या रटाळ डेनिम्स, स्ट्रेट स्कर्ट्सना सुट्टी दे. छान समर ड्रेसेस तुझ्या बॅगेत असू देत. फ्लोरल, पोल्का डॉट्स, क्रेझी प्रिंट्सचे ड्रेसेस असतील तर उत्तम. अर्थात ड्रेसेसची लेन्थ किती हवी हे पूर्णपणे तुझ्यावर अवलंबून आहे. शॉर्ट्स इज मस्ट. मस्त डेनिम शॉर्ट्स, त्यावर लूज टी-शर्ट आणि हॅट म्हणजे अस्सल गोवन मूड. तुला बिकिनीज घालायला आवडत असतील तर सर्वात आधी त्या बॅगेत टाक. नाही तर कॉटन किंवा डेनिमच्या शॉर्ट्स आणि टी-शर्ट्स तू पाण्यात जाताना वापरू शकतेस. शक्यतो ओव्हरलॅप होतील असे ड्रेसेस तुझ्या बॅगेत असू देत. म्हणजे रॅप अराऊंड स्कर्टच्या खाली शॉर्ट घातली, तर संध्याकाळी फक्त स्कर्ट काढून ठेवला, की दुसरा लुक मिळतो किंवा ओव्हर साइझ टी-शर्टसोबत गंजी असेल तरी, नंतर फक्त गंजी घालता येतो. सोबत भरपूर मॉइश्चराइझर असणे गरजेचे आहे. तसेच सनक्रीमसुद्धा, कारण बीचवर स्किन टॅन आणि ड्राय होऊ शकते. चंकी ज्वेलरीसुद्धा असू देत सोबत. चप्पल्स, बॅलरीनाज हे बीच ट्रिपसाठी बेस्ट. स्निकर्सचासुद्धा एक जोड बरोबर असू देत.
मृणाल भगत

आवाहन
फॅशनच्या संदर्भात तुमचे काही प्रश्न, शंका असल्यास जरूर पाठवा किंवा ‘लोकप्रभा’ला ई-मेल पाठवा. पाकिटावर किंवा ई-मेलच्या विषय रकान्यात ‘फॅशन पॅशन’ असा उल्लेख करावा.