08 July 2020

News Flash

फॅशन पॅशन : डेनिममध्ये व्हरायटी आहे?

मला डेनिम फॅब्रिक आवडतं. आपल्याकडे डेनिम म्हटलं की फक्त पँट्स डोळ्यासमोर येतात. इतर कोणत्या पद्धतीने आपण डेनिम घालू शकतो? - सुप्रिया जगताप, २१.

| March 6, 2015 01:10 am

01youthमला डेनिम फॅब्रिक आवडतं. आपल्याकडे डेनिम म्हटलं की फक्त पँट्स डोळ्यासमोर येतात. इतर कोणत्या पद्धतीने आपण डेनिम घालू शकतो?
– सुप्रिया जगताप, २१.

सुप्रिया, डेनिम आणि जीन्स पँट्स हे समीकरण आपल्या मनात इतकं पक्कं बसलंय की, त्यापुढच्या कित्येक पर्यायांकडे आपण दुर्लक्ष करतो. अर्थात काही जणांना डेनिम जॅकेट्स घालायला आवडतात. त्यापलीकडे डेनिम ट्राय केला जात नाही. डेनिमचा सर्वात बेस्ट ऑप्शन म्हणजे डेनिम शॉर्ट्स. दिसायला स्मार्ट दिसतात आणि मस्त यंग लुक देतात. लूझ टय़ुनिक्स, गंजीसोबत तू शॉर्ट्स नक्कीच घालू शकतेस. बॅकलेस टी-शर्ट आणि शॉर्ट्स म्हणजे अल्ट्रा-सेक्सी लुक. बीचवेअरसाठी हा बेस्ट लुक आहे. यशिवाय डेनिम स्कर्टस्चा पर्यायही आहेच. त्यांनाही शॉर्टस्प्रमाणे टीमअप कर. अर्थात तू शॉर्टस् किंवा मिनी स्कर्टस्मध्ये कम्फर्टेबल नसशील तर, या स्कर्टस्सोबत ब्लॅक नायलॉन लेगिंग किंवा स्टॉकिंगसुद्धा घालता येते. अर्थात प्रिंटेड कलरफुल लेगिंगसुद्धा यंग लुक देतात. पण जास्त लेन्थचा स्कर्ट ट्राय करू नकोस, ते आता आउट ऑफ फॅशन गेले आहेत. याशिवाय डंग्री, डेनिम ड्रेसचा पर्यायसुद्धा आहेच की.. शॉर्ट डेनिम ड्रेस छान दिसतात. सोबत चंकी ज्वेलरी घालता येते. जॅकेट्समध्ये डेनिम आणि लेसचे कॉम्बिनेशन असलेले जॅकेट्स सध्या पॉप्युलर आहेत.

मला ज्वेलरी घालायला आवडते. पण कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करीत असल्यामुळे आम्हाला ज्वेलरी घालता येत नाही. अशा वेळी कॉर्पोरेट लुकला साजेसे ज्वेलरीचे ऑप्शन सांगू शकतेस का?
– अनन्या पाटील, २५.

कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांच्या लुक्सबद्दल ऑफिसमध्ये खूप नियम असतात आणि त्यांचे काटेकोरपणे पालन होईल, याकडे मॅनेजमेंटचं जातीने लक्ष असतं. विशेषत: ज्वेलरीच्या बाबतीत खूपच काळजीपूर्वक राहावं लागतं. त्यामुळे कित्येक कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करणाऱ्या मुली कानात एखादी सोन्याची इअररिंग किंवा छोटासा खडा, गळ्यात चेन इतकीच नावापुरती ज्वेलरी घालताना दिसतात. अर्थात तुमचा प्लस पॉइंट असलेल्या सर्वात महत्त्वाच्या ज्वेलरीकडे दुर्लक्ष करून कसं चालेल. ती म्हणजे घडय़ाळ. व्रिस्ट वॉच हा तुमच्यासाठी बेस्ट आणि कधीही चालून जाणारा ज्वेलरी ऑप्शन आहे. त्यामुळे त्याचा फायदा घेतलाच पाहिजे. मोठय़ा डायलचे वॉच सध्या ट्रेंडमध्ये आहेत. त्यांना ट्राय कर. याशिवाय ब्रेसलेट्स वापरू शकतेस. एलिगंट ब्रेसलेट्स कॉर्पोरेट ड्रेसिंगसोबत मॅच होतात. छोटे पेन्डेंट्स नक्कीच ट्राय करू शकतेस. शक्यतो ज्वेलरी एकाच रंगाची असू देत. मल्टी कलर ज्वेलरी तुमच्या ऑफिस कल्चरमध्ये चालेलच असे नाही. पेन्डेंट्स न वापरता फक्त वेगवेगळ्या आकाराच्या आणि साइझेसच्या दोन-तीन चेन्स एकत्र घालता येतात. बारीक नक्षीच्या किंवा छोटय़ा स्टोन्सच्या अंगठय़ासुद्धा ट्राय कर. थम रिंगसुद्धा चालू शकेल. हेअरस्टाइलमध्ये व्हेरिएशन आणत वेगवेगळ्या हेअर क्लिप्स घालून पाहा. तुझ्या लुकमध्ये कमीत कमी ज्वेलरीतसुद्धा मोठा फरक दिसेल.

आवाहन
फॅशनच्या संदर्भात तुमचे काही प्रश्न, शंका असल्यास जरूर पाठवा किंवा ‘लोकप्रभा’ला ई-मेल पाठवा. पाकिटावर किंवा ई-मेलच्या विषय रकान्यात ‘फॅशन पॅशन’ असा उल्लेख करावा.
मृणाल भगत

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 6, 2015 1:10 am

Web Title: fashion 9
टॅग Fashion,Lifestyle
Next Stories
1 स्मार्ट‘ती’ : सत्तर वर्षांची तरुणी…
2 घडलंय-बिघडलंय : पडद्यामागेही तेच..?
3 ट्रॅव्हलॉग : प्रवासातले अनुभव
Just Now!
X