lp50गाऊन कसा निवडू?
मला एका पार्टीसाठी गाऊन घालायचा आहे. गाऊनमध्येही प्रकार असतात का? त्यातून आपल्यासाठी योग्य गाऊन कसा निवडावा? माझ्या बॉडी टाइप किंवा वजनावरून कोणता गाऊन निवडावा हे ठरत असतं का? असल्यास ते कसं ठरवावं?
श्रेया, वय २३.

नक्कीच, श्रेया. इतर कोणत्याही प्रकारचे कपडे निवडताना ज्याप्रमाणे आपण आपल्या बॉडी टाइपचा विचार करतो, तोच विचार गाऊनच्या बाबतीत करणे महत्त्वाचे असते. हे का महत्त्वाचे असते, हे रेड कार्पेटवरील सेलेब्रिटीजचे गाऊनमधील फोटो बघून तुझ्या लक्षात येईल. गाऊन दिसायला छान वाटत असले, तरी बॉडी टाइपचा विचार न करता गाऊन निवडल्यास तिथे तुमची फसगत होण्याची शक्यता असते. हॉवरग्लास, शेप, पेअर किंवा बेल शेप, क्युकंबर किंवा स्ट्रेट शेप, अ‍ॅपल किंवा ट्रायअँगल शेप असे चार मुख्य बॉडी टाइप्स असतात, हे आपण यापूर्वी पाहिले आहे. या प्रत्येक बॉडी टाइपचे स्वत:चे वैशिष्टय़ असते. त्यावर फोकस ठेवणे गाऊन निवडतानाही महत्त्वाचे असते. म्हणजे बघ, हॉवरग्लास शेपच्या मुलींचा त्यांची कमनीय कंबर त्यांच्यासाठी प्लस पॉइंट असतो. त्यामुळे त्यांना मर्मेड, ए-लाइन प्रिन्सेस किंवा कॉलम स्टाइलचे गाऊन छान दिसतात. या प्रकारातील गाऊन्स कंबरेच्या भागात फिटेड असतात, त्यामुळे तुमची कंबर हायलाइट होते. बारीक शरीरयष्टीच्या क्युकंबर बॉडीटाइपच्या मुली फिटेड गाऊनमध्ये अजूनच बारीक दिसतात, त्यामुळे या मुलींना बॉलगाऊन, मर्मेड गाऊनमुळे मिळणारा फ्लेअर नक्कीच मदत करतो. अ‍ॅपल आणि पेअर शेपच्या मुलींकडे ए-लाइन, एम्पायर किंवा बॉल गाऊनचा पर्याय असतो. या गाऊन्समध्ये त्यांच्या शरीराचा फुलेस्ट भाग लपायला मदत होते. याशिवाय उंच मुलींना टी—लेंथ गाऊनसुद्धा छान दिसतो.

lp51मला फॉर्मल ड्रेसिंग खूपदा बोरिंग वाटतं, कारण त्यात डार्क किंवा मग पेस्टल शेड्स, स्ट्राइप्स, चेक्स यापेक्षा वेगळं काही खूप कामी पाहायला मिळतं. पण मी कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करीत असल्याने, फॉर्मल्स घालणे बंधनकारक असते. अशा वेळी माझ्या फॉर्मल वेअरमध्ये वेगळेपणा कसा आणू शकते? 
– काव्या, वय २८.

फॉर्मल क्लोदिंग म्हटलं की कमी-अधिक फरकाने काव्या तू सांगत असलेल्या स्टाइलचे कपडे आपल्या डोळ्यांसमोर येतात. त्यात जर तुला खासकरून प्रिंट्स, बोल्ड कलर्स घालायला आवडत असतील, तर हा तुझ्यासाठी मोठा प्रश्न ठरू शकतो. पण त्यासाठी तमाम फॉर्मल क्लोदिंगवर बहिष्कार टाकायची गरज नाही. उलट टू तुझ्या ड्रेसिंगमध्ये खूप भन्नाट बदल करू शकतेस. नेहमीचे कॉटनचे शर्ट्स घालण्यापेक्षा सॅटिन किंवा जॉर्जेट, शिफॉन अशा शिअर फॅब्रिकची शर्ट्स घालून बघ. यामध्ये नेहमीचे पेस्टल शेड्सपण उठून दिसतात. नेव्ही, मरून, ब्राऊन हे डार्क शेड्स तर याच फॅब्रिक्ससाठी बनले आहेत, असं म्हणायला हरकत नाही. हे फॅब्रिक्स या शेड्सना वेगळीच शाईन देतात. याशिवाय स्कर्ट्स किंवा ट्राऊझरऐवजी एखादे वेळेस पलॅझो घालायलाही हरकत नाही. अर्दी शेडमधील पलॅझो फॉर्मल्स म्हणून नक्कीच वापरू शकतेस. यशिवाय नेहमीचे फॉर्मल जॅकेट्स घालण्यापेक्षा सोबर प्रिंट्सचे किंवा बोल्ड शेडचे जॅकेट्स घालून पाहा. एखादा स्टेटमेंट नेकपीस किंवा पेन्डेंटसुद्धा तुझा लुक बदलू शकतो. त्यामुळे तेही ट्राय कर. शिवाय पर्सनॅलिटीमध्ये आणखी वेगळेपणा आणण्यासाठी तू तुझ्या फुटवेअरमध्ये थोडे बदल नक्कीच करू शकतेस. त्यासाठी शिमर शाईन असलेले किंवा सेल्फप्रिंट्स असलेले शूज एकदा घालून बघ, तुला नक्कीच आवडतील.

आवाहन
फॅशनच्या संदर्भात तुमचे काही प्रश्न, शंका असल्यास जरूर पाठवा किंवा ‘लोकप्रभा’ला ई-मेल पाठवा. पाकिटावर किंवा ई-मेलच्या विषय रकान्यात ‘फॅशन पॅशन’ असा उल्लेख करावा.
मृणाल भगत