01vbमिरची पकोडा चाट

साहित्य:
४ ते ६ भावनगरी मिरच्या
२ मध्यम कांदे बारीक चिरून
१ टॉमेटो, बारीक चिरून
कोथिंबीर बारीक चिरून
काळं मीठ
साधं मीठ
स्टफिंग :
lp39१ मोठा बटाटा, उकडलेला
१/२ चमचा जिरेपूड
१/४ चमचा चाट मसाला
१/४ चमचा लाल तिखट
१/४ वाटी कोथिंबीर, बारीक चिरून
चवीपुरते मीठ
भजीचे पीठ:
१ वाटी बेसन
चिमटीभर खायचा सोडा
चवीपुरते मीठ
तळण्यासाठी तेल
इतर साहित्य:
शेव
हिरवी चटणी
चिंच गुळाची चटणी
दही
चाट मसाला
कृती:
१) मिरच्या एका बाजूने उभ्या चिरून घ्याव्यात. आतील बिया काढून टाकाव्यात.
२) बटाटा, जिरेपूड, चाट मसाला, लाल तिखट, कोथिंबीर आणि चवीपुरते मीठ घालून मिक्स करावे. हे मिश्रण मिरच्यांमध्ये भरावे.
३) बेसनात मीठ आणि पाणी घालून दाटसर पीठ भिजवावे. सोडा घालून मिक्स करावे.
४) कढईत तेल गरम करून आच मध्यम ठेवावी. भरलेल्या मिरच्या पिठात बुडवून तळून घ्याव्यात.
५) प्रत्येक मिरचीचे बाइटसाइझ तुकडे करावे. सवर्ि्हग डिशमध्ये ठेवून वरून कांदा, टॉमेटो, दही, हिरवी आणि आंबट-गोड चटणी, चाट मसाला, काळं मीठ आणि साधं मीठ पेरावे. वरून थोडी शेव घालून सव्‍‌र्ह करावे.

उपवासाचे चाट

lp41साहित्य :
२ बटाटे
१ मध्यम रताळे
१ वाटी लाल भोपळ्याचे तुकडे
२ ते अडीच वाटय़ा बटाटय़ाचा गोड चिवडा
१/२ वाटी तळलेले शेंगदाणे
१/२ वाटी हिरवी चटणी (फक्त कोथिंबीर, मिरची आणि मीठ यांची चटणी वापरावी.)
१/२ वाटी चिंचगुळाची चटणी
काळं मीठ
साधं मीठ
दही
तूप
कृती :
१) रताळे आणि बटाटा सोलून घ्यावा. मध्यम आकाराचे तुकडे करावे. तूप गरम करून त्यात बटाटा, लाल भोपळा आणि रताळ्याच्या फोडी तळून घ्याव्यात.
२) लहान प्लेटमध्ये थोडे तळलेले तुकडे घालावे. त्यावर काळं मीठ, दही, हिरवी आणि चिंच गुळाची चटणी, तळलेले शेंगदाणे आणि बटाटय़ाचा चिवडा घालावा. वरून थोडी कोथिंबीर पेरावी. रंगसंगतीसाठी थोडेसे लाल तिखट भुरभुरावे.

lp40कॉर्न फ्लेक्स चाट

साहित्य:
१ वाटी मोड आलेले हिरवे मूग (मीठ घालून वाफवलेले)
१/२ वाटी काबुली चणे (भिजवून उकडलेले)
२ वाटय़ा कॉर्न फ्लेक्स
३/४ वाटी बारीक चिरलेला कांदा
३/४ वाटी दही, थोडे मीठ घालून घोटलेले
१ वाटी चिंचगुळाची चटणी
१/२ वाटी हिरवी चटणी
१ चमचा चाट मसाला
१ चमचा लाल तिखट
मीठ चवीनुसार
कोथिंबीर सजावटीसाठी

कृती:
१) सवर्ि्हग प्लेटमध्ये थोडे हिरवे मूग आणि २ चमचे काबुली चणे पसरवावेत. त्यावर थोडे कॉर्न फ्लेक्स चुरून घालावेत. त्यावर बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी चटणी घालावी. त्यावर फेटलेले दही आणि चिंचगुळाची चटणी घालावी. वरून चाट मसाला आणि लाल तिखट पेरावे. वरून चिरलेल्या कोथिंबिरीने आणि शेवेने सजवावे.
हे चाट लगेच खावे, कॉर्न फ्लेक्स मऊ पडले की चाट चांगले लागत नाही.
हिरवी चटणी :
१/२ जुडी कोथिंबीर, वेचून
१ वाटी पुदिना
३-४ हिरव्या मिरच्या (आवडीनुसार कमीजास्त कराव्यात.)
१ चमचा लिंबाचा रस
१/२ चमचा चाट मसाला
१ लहान कांदा चिरून
चिमटीभर साखर
चवीपुरते मीठ
थोडेसे काळे मीठ
मिक्सरमध्ये वरील साहित्य घालून बारीक वाटावे. वाटताना थोडेसे पाणी घालावे.
चिंचगुळाची चटणी :
१ वाटी भरून गूळ
१/४ वाटी चिंच
२-३ चमचे साखर
१ चमचा जिरेपूड
१/४ चमचा लाल तिखट
थोडेसे मीठ

कृती
१) चिंच थोडय़ा गरम पाण्यात भिजत घालावी. नंतर मिक्सरमध्ये वाटून चाळणीवर चाळून घट्ट कोळ तयार करावा.
२) गुळात थोडे पाणी १/२ वाटी पाणी घालावे. त्यात साखर घालावी. मंद आचेवर थोडे आटू द्यावे.
३) नंतर त्यात चिंचेचा निम्मा कोळ घालावा. चव पाहून लागल्यास अजून कोळ घालावा. थोडा वेळ मंद आचेवर उकळून आच बंद करावी.
४) कोमट झाले की जिरेपूड आणि लाल तिखट घालावे. चव पाहून काळे मीठ आणि साधे मीठ घालावे.