News Flash

मुलांना डब्याला देता येतील अशा रेसिपी.

कलरफुल सँडविच साहित्य : ल्ल ८ ब्रेडचे स्लाइस ल्ल १/२ गाजर ल्ल १/२ वाटी एकदम बारीक उभी चिरलेली कोबी ल्ल १/२ बीट

| June 26, 2015 01:23 am

01vbमुलांना डब्याला देता येतील अशा रेसिपी.

कलरफुल सँडविच

साहित्य :
८ ब्रेडचे स्लाइस
१/२ गाजर
१/२ वाटी एकदम बारीक उभी चिरलेली कोबी
१/२ बीट
lp46१ चमचा हिरवी मिरची आणि कोथिंबीर यांची भरड पेस्ट
बटर
मीठ आणि मिरपूड

कृती :
१) गाजर सोलून एकदम बारीक किसणीवर किसून घ्यावे. बीट बारीक किसणीवर किसून घ्यावे. किसलेल्या बिटामध्ये थोडे मीठ मिरपूड घालावे.
२) किसलेले गाजर आणि कोबी मिक्स करावी. थोडेसे मीठ घालावे.
३) २ चमचे बटर आणि मिरचीची पेस्ट एकत्र मिक्स करावे.
४) एक ब्रेड स्लाइसला बटर लावावे. त्यावर मिक्स केलेले गाजर कोबी पसरावे.
५) त्यावर दुसरा स्लाइस ठेवून त्याला बटर मिरची कोथिंबिरीचे मिश्रण लावावे.
६) तिसऱ्या स्लाइसला थोडे बटर लावून त्यावर किसलेले बीट घालावे. वरून चौथा ब्रेड स्लाइस ठेवून सँडविच तयार करावे. धारदार सुरीने मधून तिरके कापावे.
टीप :
मिरचीपेस्ट गरजेनुसार कमी-जास्त करावी.

lp47मॅक्रॉनी उपमा

साहित्य :
१ वाटी मॅक्रॉनी
१/२ वाटी कांदा, बारीक चिरलेला
१ लहान टोमॅटो, बारीक चिरून
१ ते २ हिरव्या मिरच्या, उभ्या चिरून
१ चमचा तूप
१/४ चमचा जिरे, २ चिमटी हिंग, ४-५ कढीपत्ता पाने
चवीपुरते मीठ
बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती :
१) ३-४ वाटय़ा पाणी उकळण्यास ठेवावे. त्यात अर्धा चमचा मीठ घालावे. पाणी उकळले की त्यात मॅक्रॉनी घालाव्यात. ८ ते १० मिनिटे किंवा पाकिटावर दिलेल्या वेळानुसार उकळवून मॅक्रॉनी शिजवाव्यात. चाळणीत मॅक्रॉनी गाळून गरम पाणी निथळून मॅक्रॉनीवर गार पाणी घालून तेही पाणी निथळू द्यावे.
२) कढईत तूप गरम करावे. त्यात जिरे, हिंग, कढीपत्ता आणि मिरची घालून फोडणी करावी. काही सेकंद परतून कांदा घालावा. कांदा पारदर्शक होईस्तोवर परतून टोमॅटो घालावा. टोमॅटो चांगला मऊसर होईस्तोवर परतावा.
३) आता मॅक्रॉनी घालून मिक्स करावे. चव पाहून लागल्यास मीठ घालावे. २ मिनिटे गरम करून कोथिंबिरीने सजवून लगेच सव्र्ह करावे.
हा उपमा लहान मुलांच्या डब्यासाठी चांगला पर्याय आहे.
टीप :
उपमा बनवताना फोडणीत गाजर, फरसबी यांसारख्या भाज्याही घालू शकतो.

lp48व्हेज योगर्ट राइस

साहित्य :
२ वाटय़ा मोकळा भात
फोडणीसाठी :
२-३ चमचे तेल, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, कढीपत्ता, २-३ हिरव्या मिरच्या
१/४ वाटी मटार, १/४ वाटी गाजर
पाऊण ते १ वाटी दही
चवीपुरते मीठ
कोथिंबीर

कृती :
१) भात आणि दही मिक्स करून घ्यावे. चवीपुरते मीठ घालावे.
२) गाजराचे लहान तुकडे करून घ्यावे.
३) कढईत तेल गरम करून त्यात फोडणी करावी. मटार आणि गाजर फोडणीस टाकावे. मंद आचेवर वाफ काढावी.
४) ही फोडणी एका मोठय़ा वाडग्यात काढून ठेवावी. त्यात मिक्स केलेला दहीभात घालावा. नीट मिक्स करावे.
टीप :
दही शक्यतो गोडच असावे.
वैदेही भावे – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2015 1:23 am

Web Title: food recipes 21
Next Stories
1 पालक काथी रोल्स
2 मायक्रोवेव्ह फ्राईड राईस
3 रुचकर : स्प्राउट्स ग्रील्ड सँडविच
Just Now!
X