01vbपोळीचा स्टफ पिझ्झा

साहित्य:
* ४ पोळ्या (चपात्या)
* पिझ्झा सॉस किंवा टॉमेटो केचप
* १ चमचा लोणी किंवा बटर
* १ कांदा, उभा पातळ चिरून
* १ मध्यम सिमला मिरची, उभे पातळ काप
* २ बेबी कॉर्न, अर्धवट वाफवून घ्यावे (ऐच्छिक) मध्यम तुकडे
lp38* पाव वाटी ब्लॅक ऑलीव्ज (ऐछिक)
* मश्रुम, स्वीटकॉर्न इत्यादी ऐच्छिक
* १/२ चमचा इटालियन मिक्स हब्र्ज
* २ ते ३ वाटय़ा भरून किसलेले पिझ्झा चीज
* चवीपुरते मीठ
* २-३ चमचे बटर

कृती:
१) कढईत १ चमचा लोणी गरम करून त्यात सर्व भाज्या अर्धवट परतून घ्याव्यात. त्यात थोडे मीठ आणि इटालियन हब्र्ज घालून मिक्स करावे. या मिश्रणाचे ४ भाग करावे.
२) तवा मंद आचेवर ठेवावा. त्यावर पोळी ठेवून अध्र्या भागावर सॉस लावावा. त्यावर १/२ वाटी चीज घालावे. त्यावर १ भाग भाज्या घालाव्यात. वरून परत चीज घालावे. पोळीचा उरलेला भाग चीजवर ठेवून पोळीचा अर्धगोल बनवावा.
३) तव्यावर बटर सोडून स्टफ पिझ्झा दोन्ही बाजूंनी थोडा भाजून घ्यावा.
आवडीनुसार कट करून सव्‍‌र्ह करावे.
टीप:
१) वरील पिझ्झा ताज्या किंवा आदल्या दिवशीच्या पोळ्यांपासून बनवता येतो.
२) तिखटपणा हवा असल्यास थोडे चिली फ्लेक्स घालावे.

lp36चपाती शेजवान नूडल्स

साहित्य:
* २ पोळ्या (चपात्या)
* नूडल्स तळायला तेल
* १ चमचा भरून शेजवान सॉस
* १/२ चमचा तेल
* १ चमचा आलं-लसूण बारीक चिरून
* १ मिरची, बारीक चिरून
* २ चमचे बारीक चिरलेला कांदा
* २ चमचे सिमला मिरचीचे पातळ काप
* २ चमचे गाजराचे पातळ काप
* २ चमचे कोबीचे पातळ काप
* १/४ चमचा सोया सॉस
* १/२ चमचा कॉर्न फ्लोअर
* १/४ ते १/२ वाटी पाणी
* चिमूटभर मीठ
* पाती कांद्याचा हिरवा भाग बारीक चिरणे

कृती:
१) पोळ्या नूडल्ससारख्या पातळ आणि लांबट आकारात कापून घ्याव्यात.
२) तेल गरम करून पोळ्यांच्या नूडल्स कुरकुरीत तळून घ्याव्यात. टिश्यू पेपरवर काढून ठेवावे.
३) दुसऱ्या कढईत १/२ चमचा तेल गरम करून त्यात आलं-लसूण परतून घ्यावे. सोया सॉस, मिरची, कांदा, गाजर, शिमला मिरची आणि कोबी घालावा.
४) नंतर मैदा घालून मंद आचेवर काही सेकंद परतावे. शेजवान सॉस आणि थोडे पाणी घालून दाटसर सॉस बनवावा.
५) चव पाहून लागल्यास थोडे मीठ घालावे. तयार सॉसमध्ये तळलेल्या नूडल्स घालाव्यात. हलकेच मिक्स पाती कांद्याने सजवावे. आणि लगेच सव्‍‌र्ह करावे.

lp37ड्राय इडली मंचुरियन

साहित्य:
* ७ ते ८ आदल्या दिवशीच्या इडल्या
* २ चमचे भरून चिरलेले आलं आणि लसूण
* १/४ वाटी बारीक चिरलेला कांदा
* १/२ वाटी सिमला मिरचीचे मोठे तुकडे
* १/२ वाटी कांद्याचे मोठे चौकोनी तुकडे (पाकळ्या मोकळ्या कराव्या)
* १ चमचा सोया सॉस
* १ चमचा टॉमेटो केचप
* १ चमचा कॉर्न फ्लोअर
* २ चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर
* १ हिरवी मिरची, बारीक चिरून
* १/४ चमचा व्हिनेगर
* चवीपुरते मीठ
* तळण्यासाठी तेल
* कांद्याची हिरवी पात, बारीक चिरून

कृती:
१) कढईत तेल गरम करावे. इडल्या सुरीने कापून मध्यम तुकडे करावे. हे तुकडे तेलात तळून काढावे. टिश्यू पेपरवर काढून ठेवावे.
२) दुसऱ्या कढईत २ चमचे तेल गरम करून त्यात आलं-लसूण घालून परतावे. मिरची घालावी. नंतर बारीक चिरलेला कांदा घालावा. छान परतून घ्यावा. कोथिंबीर घालावी.
३) आता सिमला मिरची आणि चौकोनी चिरलेला कांदा घालावा. अर्धवट परतावा. सोया सॉस घालावा. आणि १/२ वाटी पाणी घालावे.
४) कॉर्न फ्लोअरमध्ये थोडेसे पाणी घालून पेस्ट करावी. ही पेस्ट कढईत घालून ढवळावे. थोडे आटले की थोडे मीठ, व्हिनेगर. टॉमेटो केचप आणि तळलेली इडली घालावी. आच मंद करून मिक्स करावे.
कांद्याच्या पातीने सजवून सव्‍‌र्ह करावे.
वैदेही भावे