lp06‘गुरू-शिष्य परंपरेत बदलत्या काळात फरक पडला असला तरी गुरू-शिष्याच्या नात्यातली आदराची, प्रेमाची भावना तशीच आहे. त्यात काहीच फरक पडलेला नाही,’ असं स्पष्ट मत गायिका मंजूषा थत्ते व्यक्त करतात. गेली अनेक र्वष त्या डोंबिवलीत राहून अनेक तरुणांना, लहान मुलांना, वयोवृद्धांना संगीताचं शिक्षण देत आहेत. त्या सांगतात, ‘तरुणांना शास्त्रीय संगीत आवडतं. ते आवर्जून वेळ काढतात आणि आनंदाने संगीत शिकतात.’ त्यांच्या मते, आजच्या ताणतणावाच्या आयुष्यात तरुणांना तेवढीच विश्रांती मिळते.
त्या म्हणतात, ‘पूर्वी जे तरुण संगीत क्षेत्राकडे वळायचे ते फक्त त्याचाच ध्यास घ्यायचे कारण त्यांना फक्त आणि फक्त संगीतात आणि त्याचा प्रसार करण्यात आनंद मिळायचा. पण, आता तरुणांपुढे अनेक साधनं, माध्यमं उपलब्ध आहेत, करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे संगीत शिकणारे बरेच शिष्य आज या कलेकडे मनोरंजनाच्या आणि आपली आवड जोपासण्याच्या दृष्टिकोनातून बघतात. यातले कोणी मैफिलीचे गायक होणारही नाहीत पण चांगले कानसेन निर्माण होतील हे नक्की.’
आजकाल संगीताचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना इंटरनेटद्वारे बरीच माहिती मिळते, अनेक दिग्गज कलाकारांची गाणीसुद्धा ऐकायला मिळतात. त्यामुळे संगीत विद्यालयात शिकवल्या जाणाऱ्या संगीतापुरतं त्यांचं ज्ञान मर्यादित राहत नाही. मंजूषा थत्ते याकडे सकारात्मकतेने बघतात. त्या स्वत: विद्यार्थ्यांना नवनवीन शिकण्यास प्रोत्साहन देतात आणि स्वत:सुद्धा त्या माहितीचा वापर करतात. संगीताच्या क्षेत्राकडे आजकाल गुरू आणि शिष्यसुद्धा आर्थिक दृष्टिकोनातून बघताना दिसतात याबद्दल त्यांना काही वावगं वाटत नाही, कारण ती काळाची गरज असू शकते, पण व्यावसायिकतेकडे वळताना कलेवर मेहनत घेणं अजिबात थांबता कामा नाही, असं त्यांचं मत आहे. विद्यार्थ्यांचा कल ओळखून त्या स्वत: विद्यार्थ्यांना विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन देतात.
तेजल शृंगारपुरे – response.lokprabha@expressindia.com

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
chaturang article, mazhi maitrin chaturang
माझी मैत्रीण : जिवाभावाची…
Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !