05 March 2021

News Flash

दत्तात्रेयांचे चोवीस गुरू

आपल्या आसपासच्या पर्यावरणातून अनेक गोष्टी शिकायला मिळतात. त्यातील कुणापासून काय घ्यायचे, काय घ्यायचे नाही याचे विवेचन अवधूतोपाख्यानात आहे.

| July 31, 2015 01:12 am

lp06आपल्या आसपासच्या पर्यावरणातून अनेक गोष्टी शिकायला मिळतात. त्यातील कुणापासून काय घ्यायचे, काय घ्यायचे नाही याचे विवेचन अवधूतोपाख्यानात आहे.

पृथ्वी, वायू, आकाश, जल, अग्नी, चंद्र, सूर्य, कपोल, अजगर, समुद्र, पतंग, मधमाशी, हत्ती, मधुहा (भ्रमर), हरिण, मासा, पिंगळा (वेश्या), टिटवी, बालक, कुमारी, बाण तयार करणारा सर्प, कोळी, कुंभारमाशी ह्य़ा साऱ्यांच्या आचरणावरून विविध प्रकारची शिकवण आत्मसात केलेली आहे. त्यामुळे ज्ञानप्राप्तीसाठी त्यातील काही गुरू नक्की कसे वागायचे हे शिकवणारे आहेत. काही गुरू त्याज्य गोष्टी शिकवणारे आहेत.
प्रथम गुरू पृथ्वी
पृथ्वीपासून मला अनाकोष क्षमाशीलतेचे ज्ञान प्राप्त झाले. कारण पृथ्वीवर तुम्ही काहीही केले तरी ती सहन करते.
दुसरा गुरू वायू
वायूचा सर्वत्र संचार करूनही सुगंध व दरुगध कशानेच लिप्त होत नाही. सर्वाच्या शरीरात सारखेप्रमाणे राहते. त्याच्यापासून अलिप्त व समदर्शन हे ज्ञान प्राप्त झाले.
तिसरा गुरू आकाश
आकाशापासून अमर्याद मृदुत्व व सर्वसमावेशत्वाचे ज्ञान प्राप्त झाले.
चवथा गुरू पाणी
पाण्यापासून शुद्धता पावित्र्य व अभेदवृत्तीचे ज्ञान प्राप्त झाले.
lp39पाचवा गुरू अग्नी
अग्नीपासून तेजस्विता, अपरिग्रह, रसनेन्द्रियावरही विजयो ज्ञान प्राप्त झाले.
सहावा गुरू चंद्र
चंद्र शुक्लपक्षात वाढतो व कृष्णपक्षात कमी कमी होत जातो, असे आपल्याला दिसते. पण प्रत्यक्षात चंद्राला काहीच फरक होत नसतो. तारुण्य व वार्धक्य ज्ञान शरीराच्या अवस्था आहेत आत्म्याच्या नाहीत. हे ज्ञान चंद्राकडून प्राप्त झाले.
सातवा गुरू सूर्य
सूर्याकडून अनासक्त परोपकार व उपाधीमुळे होणारी भेदप्रतीती हे ज्ञान प्राप्त झाले. उपाधीमुळे भेदप्रतीती म्हणजे सूर्याची विविध ठिकाणी विविध प्रतिबिंब त्या उपाधीमुळे वेगवेगळी दिसतात. तव्दतच आत्मतत्त्व एकच असून गुणसंगाने म्हणजेच उपाधीमुळे भेदमय दिसते.
आठवा गुरू कपोल
कपोल म्हणजे कबूतर. त्या कपोलाचे घरटे ज्या झाडावर होते त्या झाडाखाली पारध्यांनी जाळे टाकून कपोलाच्या पिल्लांना पकडले. इतक्यात त्यांची आई तिथे आली. तेव्हा पिल्लांच्या कळवळाने ती पण जाळ्यात अडकली. तेवढय़ातच कपोलही तिथे आला व कपोल तिला व पिल्लांना सोडवायला जाऊन स्वत:च त्यात अडकला. हे सर्व आसक्तीमुळे घडले. आसक्तीमुळे आपला घात होऊ नये म्हणून मी अनासक्तीचे ज्ञान कपोलापासून घेतले व अनासक्त झालो.
नववा गुरू अजगर
कोणत्याही चवीच्या आहारी न जाता विविध शात्मिकेत त्यात समाधान मानण्याचे ज्ञान मला अजगराकडून प्राप्त झाले.
दहावा गुरू समुद्र
बाहेर अथांग व आत गंभीर बाह्य़ संगाने क्षोभणारा. आपणही बाह्य़ विषयांती क्षोभ न होता परमात्माच्या चिंतनात गंभीर रहावे, हे समुद्राकडून शिकता आले.
अकरावा गुरू पतंग
दीपाच्या सौंदर्यावर मोहित होऊन दीपावर झेप घेऊन आपला प्राण गमावतो. तसे फसव्यामध्ये मायेच्या सौंदर्यावर आसक्त न होण्याचे ज्ञान मला पतंगाकडून मिळाले.
बारावा गुरू मरा (मधुकुंद)
फुलांना जराही न दुखावता मध गोळा करतो. तद्वत् एकावरच भार न टाकता कल्पा माधुकरी मागून उपजिविका करण्याचे ज्ञान मला भ्रमराकडून प्राप्त झाले.
तेरावा गुरू हत्ती
तो लाकडाच्या तीणीवर भुलून खडय़ात पडून पराधीन होतो तव्दत् स्त्री मोहाने येणारी पराधीनता टाळावी हे ज्ञान मला हत्तीकडून मिळाले.
चौदावा गुरू मधमाशी
संग्रह न करण्याचे ज्ञान मला प्राप्त झाले. कारण मधमाश्या मधाचा संग्रह करतात. मधमाश्यांना मारून शेवटी तो मध भिल्लच लुटून नेतात.
पंधरावा गुरू हरिण
पारध्याच्या नादलुब्ध तालाला भुलून हरिण पकडले जाते. म्हणून विकारो जनक गोष्टीपासून दूर रहाण्याचे ज्ञान मला प्राप्त झाले.
सोळावा गुरू मासा
आमिषाच्या लोभाने गळाला अडकून प्राण गमावतो. म्हणून रसना जिंकून आत्मोन्नती साधण्याचे ज्ञान मला प्राप्त झाले.
सतरावा गुरू पिंगळा
वेश्या देहविक्रीस तयार झाली पण गिऱ्हाईक न मिळाल्याने वैफल्य ग्रस्तेत तिला निवैद्य बुद्धी प्राप्त झाली. त्यात तिला जे गीत सुचले त्याचा अर्थ असा की अमंगल देहाचे विकार जरी क्षणोक्षणी बदलत असले तरी आत्मा मात्र सदास्थिर मंगलमय असतो आणि तोच खरा नियंता पती आहे. त्यामुळे परपुरुषापासून मी सौख्याची अभिलाषा करणे किती मूर्खपणाचे आहे. त्यामुळे आता मला विधीवशात जे प्राप्त होईल त्यात मी समाधानी राहील. अशा दृढ निश्चयाने शांत झोपी गेली. त्यामुळे तिच्यापासून मी आत्यतत्त्वात स्थिर राहण्याचा बोध घेतला.
अठरावा गुरू कुरार पक्षी
आवडत्या वस्तूच्या साठय़ांमुळे मनुष्याला दु:ख प्राप्त होते हे मी अठरावा गुरू कुरार पक्षाकडून शिकलो. कुरार पक्षाच्या चोचीत मासाचा तुकडा होता. तोवर इतर पक्षी त्याच्यावर तुटून पडत होते. पण तो तुकडा टाकून देताच तोच सुखी झाला.
एकोणविसावा गुरू बालक
बालकाला कसलीच काळजी नसलेल्या व आपल्यातच रममाण झालेल्या त्याच्याकडून मी आत्यावंदनात राहण्यास शिकलो.
विसावा गुरू एक कुमारी
तिच्यापासून एकांत सेवनाचा बोध मी घेतला. तो असा की त्या कुमारीला मागणी घालायला परगांवाचे पाहुणे आले होते. कुमारीचे आई-वडील घरी नव्हते. भोजनाची व्यवस्था करणे आहे म्हणून ती तयारी करू लागली. पण कंकणाचा आवाज होऊ लागला म्हणून तिथे फक्त एकच कंकण ठेवले व बाकीची काढून ठेवली त्यावेळी साळी काढताना होणारा आवाज बंद झाला. त्यापासून मी बोध घेतला की अनेकजण असले तर गडबड गोंधळ होतो व दोघे असले तर गप्पा-गोष्टी होतातच. म्हणूनच साधकाने एकांत सेवन करावा.
एकविसावा गुरू शरकृत
(बाण तयार करणारा कारागीर)
बाण तयार करीत असताना त्यात तो इतका तल्लीन झाला होता की, त्याच्या समोरून वाजतगाजत राजाची मिरवणूक गेली तरी जराही विचलित न होता आपल्या कार्यात व्यस्त राहिला. त्याच्याकडून मी आत्मनंदात तल्लीन राहण्याचा बोध घेतला.
माझा बाविसावा गुरू सर्प
स्वत:चे घर नसलेला अनिकेत पण सदैव सावध राहून गुप्तपणे वावर करणारा प्राणी. त्याच्यापासून देहाच्या क्षणभंगुरत्वाची जाणीव ठेवून गृहादी संग्रहाच्या फांदात न पडता सदैवनाम स्मरणात सावध राहून साधना करावी हा बोध मी घेतला.
तेविसावा गुरू कोळी (उर्णनाभी)
स्वत:च्या बेंबीतून तंतू काढून स्वत:चे विश्व निर्माण करतो. त्यात इतरांना अडकवतो पण स्वत: मात्र अडकत नाही. परमेश्वरही याच मायेपासून विश्व निर्माण करतो. अज्ञानी जिवांना अडकवतो. पण स्वत: कधीच अडकत नाही हे ज्ञान मी त्यांच्याकडून घेतले.
चोविसावा गुरू कुंभारमाशी
आपल्या घरात कीटक आणून बंदिस्त करून ठेवते. कीटक भयाने कुंभारणीच्या चिंतनात मग्न होतो. त्यामुळे तो स्वत:च कुंभारमाशी बनतो. त्याच्यापासून हे ज्ञान प्राप्त झाले की सतत ईश चिंतनात केल्यास आपणही ईश्वराला मिळणार. ज्या गुरूंकडून मी जे शिकलो ते मी तुला सांगितले, पण स्वदेहाकडूनही खूप काही शिकलो. अनेक स्त्रिया असलेल्या पुरुषांची जशी ओढाताण होते तशीच ओढाताण माझा देह म्हणणाऱ्यांची इंद्रियांच्या विविध प्रकारच्या विषयांच्या ओढीमुळे होते. ते ध्यानात घेऊन मी विवेकवैराग्य धारण करण्याचे स्वदेहाकडून शिकलो. स्वत:ला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सोडण्याचा हा एकमेव मार्ग आहे.
(अवधूतोपाख्यान- श्रीमद् भागवत- स्कंद अकरावा. पुष्प १८९, अध्याय ७)
दत्ता देशपांडे – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2015 1:12 am

Web Title: guru paurnima special 27
Next Stories
1 रसिकश्रीमंत चित्रकार!
2 पंढरपुरातील हाताने मैलासफाई
3 न्यायालयाच्या प्रयत्नांनाही सुरुंग…
Just Now!
X